७ कप स्वीट (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by मिलिंदा on 16 September, 2009 - 03:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप ओले खोबरे
एक कप बेसन
एक कप दूध
एक कप तूप
तीन कप साखर
वेलची, जायफळ, केशर, बदाम काप, काजूचे तुकडे, बेदाणे अंदाजाने

क्रमवार पाककृती: 

एका जाड बुडाच्या पातेल्यात बेदाणे, बदाम आणि काजू सोडून बाकी सर्व एकत्र करा.
बेसनाच्या गुठळ्या फोडून घ्या.
पातेले मध्यम आचेवर ठेवून सतत ढवळत राहा.
साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनी मिश्रण पातेल्याच्या कडेपासून सुटायला लागते.
तेव्हा बेदाणे, बदाम आणि काजू घालून तूप लावलेल्या ताटात ओता.
थोडे थंड झाल्यावर वड्या पाडा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
मिनोती कुंदरगी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात मी पुढे केलेले बदल -

१/४ कप तूप पुरते. आणि बेसन तूपात थोडे भाजुन घ्यायचे.

येवढे खोबरे वापरायचे नसेल तर त्यात गाजराचा खीस वापरु शकता किंवा गाजर खोबरे एकत्र घेउ शकता.
१/४ रवा आणि ३/४ कप बेसन हा पण काँबो छान लागतो.

मी याचे वेगन व्हर्जन करतेय. ऑल्मोस्ट जमलेय ते झाले की ते पण टाकेन.

आजच सेव्हन कप स्वीट्स केले , मस्त रेसिपी .
तूप मी १/४ कपच घातले . मात्र सगळे मिश्रण हलवून घट्ट व्हायला जवळपास १ तास लागला Happy . मिश्रण खाली लागू नये म्हणून मी गॅस low ठेवला होता .

मलाही एक तास लागतो ह्या वड्यांसाठी, मंद आचेवर. ह्यात अनंत व्हेरियेशन केली आहेत, आणि सगळी हिट आहेत. अगदी रेग्युलरली करते मी ह्या वड्या. मिनोतीला कायमचे आभार आहेत ह्या रेस्पीसाठी Happy

मी पण बरेच वेळा या वड्या करते. आधी बेसन थोडं कोरडंच भाजून घेते आणि मग बेसन भिजेल एवढंच तूप घालते.
मायक्रोवेवमधे या वड्या कधी कोणी करून पाहिल्या आहेत का? कमी वेळात होतील का?

मि आज करुन पाहिल्या पण चिक्की सारख्या चिकट झाल्या....खुट्खुटीत नाही झाल्या..
सगळं प्रमाण निम्म घेतलं होतं..
काय चुकलं असेल?

माझी आई ह्याचच एक वेरिएशन करते. मी कालच तिच्या रेसिपीने केल्या वड्या रवा वापरून.
१ वाटी बारीक रवा + १ वाटी आलं खोबरं + १ वाटी पातळ साजूक तूप + १ वाटी दूध + २.५ वाट्या साखर असं सगळं एकत्र करून एका नॉन स्टीक पातेल्यात शिजवत ठेवावे. सतत ढवळत रहावे. ते सगळ आळत आलं की गॅस बंद करून अंदाजे वॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून आणखी ढवळावे अथवा कोणालातरी ढवळत रहायला सांगावे.
मग ताटात्/ट्रे मध्ये तळाशी जरासं तूप चोळून त्यावर ते मिश्रण ओतावं मग ते evenly थापावं. जरा थंड झालं की वड्या पाडाव्या.

ह्या घ्या तज्या वड्या. साधारण ५ झाल्या.
Rava-Khobara_vadya.jpg

मिलिंदा , आर्च, Happy
५५ झाल्या. आता १०-१५ च उरल्या आहेत.
सव्वादोन कप च साखर घालणार मी पुढ्च्या वेळी, ह्या जरा किंचित जास्त गोड झाल्यात माझ्या मुलीसाठी.

मी पण केल्या या वड्या. मला साधारण तीस पस्तीस मिनिटे लागली पण मी तूप एक कप इतके घेतले होते. आता पुन्हा करताना कमी तूप वापरून बघेन,

फोटो काढायचा होता पण वड्याच संपल्या Happy