Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? 
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे कुठल गाण हेलनच काय
अरे कुठल गाण हेलनच काय चाललाय....
"मधुबाला" च्या संदर्भातील तुमचे हे वाक्य वाचून ढसाढसा रडलो ! रात्री एक आयमॉल टॅब्लेट खाल्ली.
थांब प्रतिक आता तुला चांगली शिक्षा करतो. सॉर्बिट्रेट घे!!!
प्रत्यक्ष आयुष्यात ही तुमची अप्सरा मधुबाला प्रेमनाथच्या प्रेमात होती... त्याने दिलीपकुमारसाठी त्याग केला हा किस्सा बराच फेमस आहे.
सई चा प्रेमविवाह. घरच्यांचा
सई चा प्रेमविवाह. घरच्यांचा विरोध डावलुन तीने लग्न केले आणि माहेर कायमचे बंद झाले. लग्नानंतर पहिला श्रावणमास आला आणि तीला माहेरचा आठवण येऊ लागली. बाहेर इतर मुली झाडांवर झोके घेत नाचत गात होत्या. ती हे सारे खिडकीत बसुन बघत होती. माहेरची सय आणखीणच गडद होऊ लागली आणि नकळतच डोळ्यात अश्रु आले. अशावेळी ती कोणंते (मराठी) गाणे म्हणेल?
("घाल घाल पिंगा वारा" अपेक्षित नाही. )
>>>>>>>
एक क्लु : प्रकाशचित्र विभागातील माझी आजची पोस्ट (हि रिक्षा नाहीये ;-))
बरीच वेगात धावतेय गाडी इकडे.
बरीच वेगात धावतेय गाडी इकडे. रात्री सगळे वाचतो.
प्रीतम दरस दिखाओ, या मन्ना डे / लताच्या गाण्यावर, अनिता गुहाच नाचलीय ना ? आणि तीच संतोषी माँ !!
अहो गुग्गुजी....प्रेमनाथच्या
अहो गुग्गुजी....प्रेमनाथच्या प्रेमात पडली नव्हती ती.....तिला 'तसे' वाटत होते. शिवाय १४ वर्षाची होती ती अप्सरा त्या वेळी....आणि त्या वयात तोच ओंडका तिच्या वाटेवर आला तर तिला वाटले असेल हा देवदार चांगला...इतकेच. प्रेमनाथही तेवढ्याच भांडवलावर पुढील ५०-६० वर्षे जगला....आणि मुलाखती देत बसला....त्याचे तोंड कोण धरणार ?
तिला फक्त 'सलीम' च हवा होता....पुढे झुमरूबरोबरची ती एक तडजोड होती म्हणायची.
ती कोणंते (मराठी) गाणे
ती कोणंते (मराठी) गाणे म्हणेल?
एक झोका.... एक झोक
चुके काळजाचा ठोका...
किंवा लग्नाआधिच्या आथवणी फारच गडद झाल्या असतील तर
एका पावसात दोघानी भिजायचं...
गूज ओठानी ओठाना सांगायचं....
नाही ह.बा. बर्याच दिवसांनी
नाही ह.बा.

बर्याच दिवसांनी माबोवर
अजुन एक क्लु: हे गाणे जरी "सई"चे असले तरी ते गायलंय पुरूष गायकाने.
लग्नाआधिच्या आथवणी फारच गडद
लग्नाआधिच्या आथवणी फारच गडद झाल्या असतील तर
एका पावसात दोघानी भिजायचं...
गूज ओठानी ओठाना सांगायचं....
सही!!!! हबा गडाबडा लोळतोय मी
फांद्यावरी बांधले गं मुलींनी
फांद्यावरी बांधले गं मुलींनी हिंदोळे
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
येस्स्स्स भरत १०० पैकी १००
येस्स्स्स भरत

१०० पैकी १०० मोदक
सई चा प्रेमविवाह. घरच्यांचा विरोध डावलुन तीने लग्न केले आणि माहेर कायमचे बंद झाले. लग्नानंतर पहिला श्रावणमास आला आणि तीला माहेरचा आठवण येऊ लागली. बाहेर इतर मुली झाडांवर झोके घेत नाचत गात होत्या. ती हे सारे खिडकीत बसुन बघत होती. माहेरची सय आणखीणच गडद होऊ लागली आणि नकळतच डोळ्यात अश्रु आले. अशावेळी ती कोणंते (मराठी) गाणे म्हणेल?
("घाल घाल पिंगा वारा" अपेक्षित नाही. )>>>>>>
फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
(स्वर आणि संगीत: गजानन वाटवे)
"यमुनाकाठी ताजमहाल" चे संगीत आणि स्वर गजानन वाटवे यांचेच आहे.
>>मधुबालेची चिठ्ठी उघडताना
>>मधुबालेची चिठ्ठी उघडताना भाभुच्या चेह-यावर बायकोने दिलेल्या वाणसामानाची लिस्ट उघडतानाचे भाव आहेत.
साधना
>>नाहीतर मधुबाला भाभुची आर्जवं करतेय हे वाचून मंडळी खवळतीलच
मी मधुबालावरचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात होतं की मधुबालाने एके काळी प्रदीपकुमार किंवा भारत भूषण ह्यांचाशी विवाह करायचा सिरियसली विचार केला होता. त्यापैकी प्रदीपकुमार विवाहित होता. भाभूची पहिली बायको वारली होती. ती मधुबालाची चांगली मैत्रिण होती. मधुबालाला तिच्या हितचिंतकांनी ह्या विचारांपासून परावृत्त केलं.
>>अगं...मी थांबलो आहे ते 'स्वप्ना' च्या आगमनासाठी. ती आणि जान्या दोघे एकाच शाळेत शिकत होती
'जान्या' म्हणतोस त्याला? कुठे फेडशील ही पापं? पुन्हा दोन्ही कोडी आणि क्लू टाक रे. मागच्या लि़ंक्स पुन्हा पुन्हा तपासायची हिंमत नाही माझ्यात.
>>प्रत्यक्ष आयुष्यात ही तुमची अप्सरा मधुबाला प्रेमनाथच्या प्रेमात होती... त्याने दिलीपकुमारसाठी त्याग केला हा किस्सा बराच फेमस आहे.
प्रेमनाथ तेव्हा हीमॅन म्हणून प्रसिध्द होता कारण बाकी हिरो एकतर पाप्याचं पितर ह्या कॅटेगरीतले होते. मधुबालाने एकदा त्याला एक गुलाबाचं फूल आणि प्रेमपत्र दिलं. ते पाहून तो हरखून गेला. आणि मग त्याने एकदा अशोककुमारला त्याबद्दल सांगितलं. अशोककुमार हसायला लागला आणि त्याने प्रेमनाथला आपल्यालाही मधुबालेकडून गुलाबाचं फूल आणि प्रेमपत्र मिळालं होतं (महल च्या शूटिंगदरम्यान) हे सांगितलं. तेव्हा प्रेमनाथ खट्टू झाला. तरी त्याने तिचा नाद सोडला नाही. शेवटी ती दिकुच्या प्रेमात आहे म्हटल्यावर ही अनारकली नाही तर दुसरी तरी म्हणून त्याने बीना रॉयशी लग्न केलं म्हणे.
आता प्रतीकची कोडी पेंडींग
आता प्रतीकची कोडी पेंडींग आहेत. आणि कुठली आहेत का?
साधनाचे कोडंही पेंडिग आहे ना?
साधनाचे कोडंही पेंडिग आहे ना?
ऑ़क्के स्वप्ना.... हे घे ते
ऑ़क्के स्वप्ना....
हे घे ते जान्याचे कोडे
जॉन अब्राहमने शेवटी जेनेलियाला सांगितले, "चल गं जेने, करू या आपण शादी आता !". या वर जेनेलिया गाण्यातून काय उत्तर देईल ? १. खुशीचे....तर २. सावधगिरीचे
कालपासून हिंटांचा पाऊस पाडला मी इथे...पण अजून ती दोन्ही गाणी ओळखली नाहीत कुणी.
हिंट : १. पहिले उषा किरण
२. वैजयंतीमाला
ओळख आता तू तरी...!!
कोणाला आलं नाही तर मला काय
कोणाला आलं नाही तर मला काय येणार म्हणा. पण प्रयत्न करून पहाते:
उषा किरण - किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया?
वैजयंतीमाला - जुल्मीसंग आख लडी?
वॉव्व्व्व्व्व्व्व्व.....:
वॉव्व्व्व्व्व्व्व्व.....: पहिल्या गाण्यासाठी तुला १० मोदक
लेकीन दुसरा चुक्या.....तरीही बरीचशी 'त्या' गाण्याजवळ पोचली आहेसच म्हणा.
प्रतीक, ते 'चढ गयो पापी
प्रतीक, ते 'चढ गयो पापी बिछुआ' नाही ना? जॉनला 'पापी' आणि 'बिछुआ' म्हटलं असशील तर तुला १०० फटके
पण मधुबालाने, प्रेमनाथच्या
पण मधुबालाने, प्रेमनाथच्या लग्नात हजर राहुन, बीना रॉयला शाप दिला होता असे पण वाचले होते. बरीच वर्षे बीना रॉय, भ्रमिष्टावस्थेत होती.
>>पण मधुबालाने, प्रेमनाथच्या
>>पण मधुबालाने, प्रेमनाथच्या लग्नात हजर राहुन, बीना रॉयला शाप दिला होता असे पण वाचले होते. बरीच वर्षे बीना रॉय, भ्रमिष्टावस्थेत होती.
अरे बापरे!
मस्त गं स्वप्ना... मी
मस्त गं स्वप्ना... मी जिप्स्याला हेच गाणे सांगत होती उषाकिरणचे. उषा काय क्युट दिसते ह्या गाण्यात. यातले 'याद किया दिल ने कहा हो तुम ही मस्ग्त आहे... उषा नी देव - दोघेही मस्त दिसतात.
बरीच वर्षे बीना रॉय,
बरीच वर्षे बीना रॉय, भ्रमिष्टावस्थेत होती.
ती काय शापामुळे नसणार. प्रेमनाथला नुसते पाहिले तरी माणुस घाबरेल. त्याच्या बायकोचे काय होणार??????
(No subject)
साधना मला "जानी दुश्मन"
साधना

मला "जानी दुश्मन" आठवला.
१ ) चंद्रावरती खनिजे
१ ) चंद्रावरती खनिजे सापडल्याची बातमी आली. तिथे तर अत्यंत मौल्यवान खनिजे आहेत आणि ती पृथ्वीवर आणायचाच जो काय खर्च येईल तो. आता हि बातमी आल्यावर सर्व महासत्तांचा संघर्ष सुरु झाला. आणि भारतातर्फेही दावा मांडण्यात आला, पण तो गाण्यातून...
२) आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून बाईसाहेबांनी एक फोटोची फ्रेम कपाटात जपून ठेवली होती. कपाट साफ करता करता, कामवालीच्या हातून ती फ्रेम तूटली, तर ती कामवाली याची कबूली कुठल्या गाण्यातून देईल.
दोन्ही गाणी सोपी आहेत. मी बराच वेळ इथे आलो नाही, तर द्रुपल आला असे समजून पुढे जा.
तो नंतर सुटला, आधी बरा होता.
तो नंतर सुटला, आधी बरा होता. जहॉ डाल डाल पर सोनेकी चिडिया... मधे तोच आहे ना ?
माझे कोडे सोडवा कोणीतरी आता
माझे कोडे सोडवा कोणीतरी
आता एक सोप्पे कोडे घालते. म्हटले तर सोप्पे, म्हटले तर कठिण.
सोप्पे यासाठी की ही सिचुएशन ६० च्या दशकातल्या जवळजवळ सगळ्याच गोड्डुल्या चित्रपटात असायची. कठिण यासाठी की या सगळ्या गाण्यातुन मग नेमके मला अभिप्रेत असणारे गाणे कसे ओळखायचे??
तर सिचुएशन अशी दोस्तानो - हिरो नेहमीप्रमाणे उघड्या गाडीतुन जवानी के मजे चाखायला काश्मिरला निघालाय नी सोबत प्रचंड मोठा आशावाद हा की कोणीतरी भेटावे.
ह्या गाण्याची हटके बाब ही की गाण्याच्या गायकाचे हे गाणे आजही त्याच्या अप्रतिम अशा गाण्यांपैकी एक म्हणुन ओळखले जाते. त्याची ह्या सिचुएशनवर बरीच गाणी आहेत पण हे गाणे त्यात नंबर १. अतिशय तरल नी सुंदर गाणे.
आणि या गाण्यात हिरोईनही आहे. फक्त हीच आपली हिरोईन हे हिरोला माहित नाहीय त्यामुळे तो तिच्याकडे पाहात नाही.
आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण
आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून बाईसाहेबांनी एक फोटोची फ्रेम कपाटात जपून ठेवली होती. कपाट साफ करता करता, कामवालीच्या हातून ती फ्रेम तूटली, तर ती कामवाली याची कबूली कुठल्या गाण्यातून देईल
दिलका खिलौना हाय टुट गया....
तो नंतर सुटला, आधी बरा होता. जहॉ डाल डाल पर सोनेकी चिडिया... मधे तोच आहे ना ?
हो तोच आहे. वर स्वप्नाने लिहिल्याप्रमाणे तो आधी खरेच हीमॅन होता. ५० च्या दशकातल्या त्याच्या चित्रपटात तो अतिशय छान दिसतो.
प्रतिक दिल धडक धड्क के दे रहा
प्रतिक
दिल धडक धड्क के दे रहा ये सदा
दिनेशदा
किसी ना किसी से कहीं ना कहीं कभी ना कभी दिल लगाना पडेगा
स्वप्ना...."सावधगिरी" चे गाणे
स्वप्ना...."सावधगिरी" चे गाणे म्हटले होते, (आणि वैजयंतीमाला, तसेच काहीसे भोजपुरी) म्हणजे तू आणि इतरांनी ओळखायला हवे होते :
"ना मानूँ ना मानूँ ना मानूँ रे, दगाबाज तोरी बतियाँ ना मानूँ रे
पिया मन में तोरे का है मैं ना जानूँ रे, दगाबाज तोरी बतियाँ "
~ धन्नो सिंगिंग इन गंगा जमुना....! हेच ते जेनेलियाचे वुड-बी सावधगिरीचे गाणे.
तर ती कामवाली याची कबूली
तर ती कामवाली याची कबूली कुठल्या गाण्यातून देईल>>>>>
दिलका खिलौना हाय टुट गया....>>>>साधना, कामवालीने हि कबूली दिली तर घरात "वादळ" नाही का येणार????
>>ती काय शापामुळे नसणार.
>>ती काय शापामुळे नसणार. प्रेमनाथला नुसते पाहिले तरी माणुस घाबरेल. त्याच्या बायकोचे काय होणार??????
हीहीही....१०० मोदक
>>उषा नी देव - दोघेही मस्त दिसतात.
अगदी अगदी.
Pages