..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अरे अरे....सॉरी, जिप्सी. माझ्याअगोदर तुम्हीच लीनाच्या मागे धावल्याचे पाहिलेच नाही, त्यामुळे 'गुल' हे गाणे आठवले आणि तो ठोकळरावही.

आता दुसरा प्रयत्न करतो.

स्वपना..

मुझे तुम मिल गये हम्दम
सहारा हो तो ऐसा हो
जिधर देखू उधर तुम हो
नझारा हो तो ऐसा हो

हे गाणं आहे का?

अरेच्या....स्वप्ना...जॉमु देखील ठोकळा ? तसा 'शागिर्द' मध्ये सगळ्यांना भावला होता ना !

हे ओळखा:
एका विद्यार्थ्याला शिक्षक जग (world) या विषयावर काही प्रश्न विचारतात. त्याला उत्तर येत नाही. शिक्षक पुन्हा तो विषय वाचायला सांगतात. पण काही केल्या याला उत्तर सापडत नाही. शेवटी शिक्षक त्याला चांगलंच फटकावतात. तेंव्हा तो विद्यार्थी रडता रडता कोणतं गाणं म्हणेल?

नाही Happy

लोक्स माझ्या पण एका कोड्यावर विचार करा....

एका वेड्याच्या इस्पितळाला भेट द्यायला एक मंत्रीमहाशय येतात. सगळेच वेडे वेड्याला शोभेलसे चाळे करत असतात. पण एक वेडा मात्र शांतपणे खुर्चीत बसून पुस्तक वाचत असतो. मंत्र्यांना आश्चर्य वाटतं. ते त्याच्याजवळ जातात आणि त्याच्याशी बोलतात. तोही सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देतो. मंत्री अवाक होतात की हा शहाणा माणूस इथे काय करतोय? ते त्यालाच विचारतात तर तो काय उत्तर देईल?

आर्या Happy

जिप्सी Happy

जिप्सी तुझ्या गाण्याचे उत्तरः 'दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे" आहे का?

नाही Happy

चला मीच उत्तर देतो Happy

एका विद्यार्थ्याला शिक्षक जग (world) या विषयावर काही प्रश्न विचारतात. त्याला उत्तर येत नाही. शिक्षक पुन्हा तो विषय वाचायला सांगतात. पण काही केल्या याला उत्तर सापडत नाही. शेवटी शिक्षक त्याला चांगलंच फटकावतात. तेंव्हा तो विद्यार्थी रडता रडता कोणतं गाणं म्हणेल?
>>>>>>>>>

"दुनिया" ओ दुनिया, तेरा "जवाब" नही Proud

(किशोर कुमार, नया जमाना)

जिप्सी
दुनिया रे दुनिया very good very good
दुनिया वाले very bad very bad

सुभाष घईचा फारसा न पाहीलेला त्रिमुर्ती

हे राम ! टोल नाका कारकून द्रुपलराव यानी परत अडविले, त्यामुळे धाग्यावरील यातायात परत थांबली. आता थोडेसे वातावरण निवळल्यावर आलो आणि पाहिले तर इथे बर्‍यापैकी धमाल घडली आहे. असो.

एक ताजे कोडे :

जॉन अब्राहमने शेवटी जेनेलियाला सांगितले, "चल गं जेने, करू या आपण शादी आता !". या वर जेनेलिया गाण्यातून काय उत्तर देईल ?

जान गयी मैं तो जान गयी, कोई बनाये बहाने??????

कि,

जॉनी को जाना है मैने आज, झूठा है वो दिल का सच्चा नही???

१७३६ आणि तरीही चिरतरूण!!!

आज घर बदलण्याची प्रक्रीया जोरात सुरू आहे त्यामुळे सकाळनंतर आता डोकावतेय. तर पन्नास प्रतिसाद! आता वेळ नाही. मग वाचते. चालू द्या मंडळी! Happy

आज घर बदलण्याची प्रक्रीया जोरात सुरू आहे त्यामुळे सकाळनंतर आता डोकावतेय. तर पन्नास प्रतिसाद! आता वेळ नाही. मग वाचते. चालू द्या मंडळी!>>>>मामी, सावकाश वाचा. तो पर्यंत आम्ही गड लढवतो. Happy

अक्षरी ~ बहुतांशी जुळत्ये...पण ते नाही.

जिप्सी ~ अ‍ॅबसोल्युटली नॉट ! ट्राय अगेन.

खरं तर, मला जेनेलियाचे एकच गाणे अपेक्षित नाही. मघाशी कोड्यातच तसा उल्लेख करणार होतो, पण झाले असे की, नेटराव गोगलगायदेखील लाजून चूर होईल इतक्या वेगाने धावत असल्याने जेवढे टंकले तितके प्रथम पोस्टले.

तर जेनेलिया खुश होऊन जान्यासाठी कोणते गाणे म्हणेल
तसेच
त्याचे पूर्वीचे धवल रेकॉर्ड माहीत असल्याने सावध होऊन कोणते म्हणेल.

दोन्हीसाठी प्रयत्न करावा.

Pages