..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजीवकुमारची जी प्रतिमा मनी आहे, तीत ही 'थोबाडात' येत नाही. पण असो, मजनूने तर दगड खाल्ले होते, थोबाडीची काय बात !!

प्रतिक
तुझ्या मनी असलेली संजीवकुमारची प्रतिमा खरी नाही. शोभा डे च सिलेक्टेड मेमोरीज वाच.

चला परत एक गॉसिप गाण

संजीवकुमार अनमॅरीड गेला. सुलक्षणा पंडीत त्याच्या प्रेमात होती त्याने नाकारल कारण तो हेमाच्या प्रेमात होता. पुढे तो गेल्यावर सुलक्षाणाच्या डोक्यावर परीणाम झाला.
या किश्शाबाबत विचारल तर सुलक्षणा फारच संकोचली आणि गाऊ लागली

तिची अशी दोन गाणी आहेत जी ती गाऊ इथे शकते

सुलक्षणा हे गाणे तर नक्कीच म्हणेल :

"बाँधी रे काहे प्रीत पिया के संग अन्जानी रीत
बाली उमर में मैं ना समझी, क्या है प्रीत की रीत"

"संकोच" (जितेन्द्र) मधील आहे...तिनेच गायल्ये आहे.

तर दुसरे बहुतेक :

माना तेरी नज़र में तेरा प्यार हम नहीं, कैसे कहें के तेरे तलबगार हम नहीं

हे होऊ शकेल, खात्री नाही....(यातील 'तलबगार' चा अर्थ माहीत नाही.)

प्रतीक तलब = तलफ च्या जवळपास जाणार्‍या अर्थछटा, तलबगार = इच्छूक

जाणकारांनी चूक असल्यास सुधारावी

प्रचंड टाळ्या!!!!!

तलबगार म्हणजे इच्छा कराणारा/ री किंवा काहीतरी मागणारा/ री

कस सांगू की मला तुझ्याकडून काहीच मागायचाही हक्क नाही.
असा त्या ओळीचा अर्थ मला वाटतोय

@ बागुलबुवा : थॅन्क्स अ लॉट. आता नेमका त्या ओळीचा अर्थ समजला. सिनेसंगीतप्रेमीनी जाणीवपूर्वक उर्दुचा अभ्यास करणे नीतांत गरजेचे आहे हे परत एकदा पटले....विशेषतः जे तलतप्रेमी आहेत, त्यानी तर प्रामुख्याने.

@ गुगु ~ 'प्रचंड टाळ्या' ~ पण कुणासाठी? संजीव की सुलक्षणा ? मी दिलेली गाणी सुयोग्य वाटतात का ?

(थोडेसे हटके ~ आज प्रथमच "बागुलबुवा" याना या ठिकाणी पाहिले. वेलकम सर ! एखादे कोडे द्या ना !!)

अरेच्चा तो शब्दांवरून गाणी सांगण्याचा बीबी आधीच आहे म्हणे. लॉजीकल अंताक्षरी. बरं. आता जरा चांगला विषय मिळेपर्यंत थांबूयात की. काहीतरी नाविन्य हवं ना. विचार करूयात.

'प्रचंड टाळ्या' ~ पण कुणासाठी? संजीव की सुलक्षणा ? मी दिलेली गाणी सुयोग्य वाटतात का ?

तुझ्याच साठी महामानवा

आता मात्र सुलक्षणा सावरतेय आणि परत गायला यायच म्हणतेय. पण तिला आता कोणी काम देत नाही.
कस देणार कारण तिची अवस्था तर तिच्याच एका मनाला स्पर्शून जाणा-या गाण्यात आहे

मामी
आपण आधी ठरवलेल ना तस आवडत्/नावडत गाण चित्रीकरण शब्द वगैरे सामावून घेता येइल असा विषय असू दे.
आता हेच बघ तलबगार
मी अनेक गाण्यांचे अर्थ माझ्या मुस्लिम मित्राना विचारून घेतो. तस काही तरी करता येईल

अंतर्‍यातील ओळींवरून गाण्याचा मुखडा ओळखा
जमल्यास चित्रपटाचे नांव, कलाकार, गायक इ.इ. सांगा
(तसा अगदी नवीन प्रकार नाहीये हा....पूर्वी कोणीतरी/कुठेतरी वापरलेलाही असू शकेल)

नाहीतर पाच क्लु मध्ये गाणं ओळखा.

एखाद्या गाण्याबद्दल दोन-तीन ओळीत माहिती द्यायची. त्यावरून कोणाला ओळखता आलं नाही तर एक एक क्लु द्यायचा (पाचपर्यंत). जो कमीत कमी क्ल्युज मध्ये गाणं ओळखेल तो खरा.

तिची अवस्था तर तिच्याच एका मनाला स्पर्शून जाणा-या गाण्यात आहे

"बेकरार दिल, तू गाये जा खुशियों से भरे वो तराने
जिन्हें सुन के दुनिया झूम उठे और झूम उठे दिल दीवाने..."

~ गुगु, हे गाणे जरी तुमच्या कोड्याचे नसले तरी वैयक्तिकरित्या मला खूप भावते हे गाणे. पडद्यावर अशोककुमार आणि तनुजा गाताना दिसतात (चित्रपट मी पाहिला नसल्याने कथेतील नेमकी सिच्युएशन मला माहीत नाही....तरीही मनी फार स्पर्शून जाणारे गीत आहे, यात वाद नसावा.)

मामी....तुम्ही नवीन धाग्याबाबत जो निर्णय घ्याल तो घ्यालच; पण बरोबरीने हा इतका देखणा आणि हवाहवासा वाटणारा धागा बंद करू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. फार फार आनंद होत आहे मला इथे भाग घेताना तसेच इतरांनी शोधून काढलेली कोड्यांची उत्तरे वाचताना. किती छान अभ्यास आहे इथल्या सदस्यांचा या 'दिल की बात' सांगणार्‍या धाग्याबाबत....विशेषतः कालपासून इथे 'गॉसिप' चे पतंग उडताना पाहिले आणि तेही काफी इंटरेस्टिंग आहे.

आजच दुपारी मी एका अत्यंत गर्दीच्या ठिकाणी कामानिमित्य होतो, पण तिथेही "आता या क्षणी मामींच्या धाग्यावर कोणते नवे कोडे आले असेल? उमजेल का मला ते गाणे?" असाच विचार मनी रुंजी घालत होता. अगदी एक नंबरी Stress Buster धागा आहे हा, यात दुमत नसेल.

(विशेष म्हणजे "अ‍ॅडमिन" यानाही १५०० नंतरही हा धागा बंद व्हावा असे वाटत नाही, असे दिसत्ये !)

हो बरोबर प्रतीक. अजूनतरी अ‍ॅडमीननी धागा बंद करायला सांगितलं नाहीये. आता मला वाटतं याचाच दुसरा भाग काढावा लागणार. वाटलंही नव्हतं एवढा लोकप्रिय झालाय हा धागा. आगे आगे देखते है होता है क्या!

मामी तो एखाद्या शब्दाच्या गाण्याचा बीबी लवकर चालु करा... आणी त्या दिवशी त्या शब्दाची ज्यास्तीत ज्यास्त गाणी जो कोणी देइल त्याला विजेता घोशीत करा.... मि चंद्र, पाउस , फुले यावरची बरीच गाणी शोधुन ठेवली आहेत..

>>> राम, सुरू केला होता तसा बिबी पण अ‍ॅडमिन म्हणाले की आधीचे तसे दोन बिबी आहेत (वाहते.) त्यामुळॅ आता आणखीन एक नको. Happy

अ‍ॅड्मीन चा निषेध... मामींच्या बीबी ला मिळणारा प्रतिसाद त्याना दिसत नाही वाटते.. Happy

पण मला तरी असे कळले होते की बाफ च्या नियमावली बाबात अ‍ॅडमीन लालुप्रसादचे चाहते आहेत... काढु फसाफस्..:P

खुप छान चर्चा चाललीय.
गुगु, माझी शाळा चेंबूरला. तनूजाचे तिथेच घर होते. अजूनही तिथे आहे ते घर. उषाकिरण मधे पण होता तिचा फ्लॅट.

नूतनचे बहुतेक चित्रपट बघितलेत मी. (कर्मा, मै तुलसी.., साजन बिना सुहागन वगैरे नाहीत. पण ग्रहण, यादगार असे विचित्रपट पण बघितलेत्.सुरत और सीरत हा सत्यम शिवम सुंदर ची मूळ आवृत्ती पण बघितल्यासारखे वाटतेय. हे टायटल राज कपूरला हवे होते पण ते नूतनने नोंदवून ठेवले होते कालिगंज की बहू, या सिरियलचे नाव वेगळे होते ना ? तिचा रोल मोठा नव्हता. पण त्यातल्या साड्या फार सुंदर होत्या. )

मामी, हे गाणे मला का आवडते ? असा काहितरी बीबी हवाय. स्वप्नाच्या मनात पण तसेच आहे. खुप पर्सनल आठवणी असतात, एखाद्या गाण्याशी निगडीत. त्या लिहायच्या. खुप पर्सनल टच येईल.

नूतनची एक आठवण. मालाड पूर्वेला पुर्वी सिनेमा थिएटर नव्हतं. १९७२ च्या दरम्यान तिथे जोहरा नावाचे थिएटर झाले (पुढे त्याचेच संगीता झाले ) त्या थिएटरच्या उदघाटनाला नूतन आली होती. तिचा, गौरी नावाचा सिनेमा तिथे पहिल्यांदा आला होता. आणि तो मी बघितल्याचे मला आठवतेय. बाकी काही नाही, पण त्यात तिच्या डोळ्याचे ऑपरेशन सविस्तरपणे दाखवले होते आणि त्यावेळी मी डोळे घट्ट मिटून घेतल्याचे आठवतेय.

एका घरी सतत लाईट जात असत. तपासणीअंती लक्षात आलं की वायरींग मधे फॉल्ट आहे. electrician ला बोलावण्यात आलं. त्यानं वायरींग दुरुस्त करुन दिलं. त्याला उद्देशून घरातली माणसं कुठलं गाणं म्हणतील ?

ओके. जाऊ दे. मीच सांगते. ( रहावत नाही मलाच)
" तुम आ गए हो, नूर आ गया है...
नही तो चिरागोंसे लौ जा रही थी..."

आता मात्र सुलक्षणा सावरतेय आणि परत गायला यायच म्हणतेय. पण तिला आता कोणी काम देत नाही.
कस देणार कारण तिची अवस्था तर तिच्याच एका मनाला स्पर्शून जाणा-या गाण्यात आहे

प्रतिक तुझ गाण छान आहे पण मला आपेक्षित आहे ते
खाली प्याला धुँधला दर्पण
खाली खाली मन, खाली खाली मन
बुझता सूरज जलता चन्दा
पतझारी सावन, पतझारी सावन
खाली प्याला ...

सई परांजपेचा नसरूद्दिन शबाना वाला स्पर्श

दिनेशदा
मी दिलय त्या सिरीयलच नाव मुजरीम हाजिर हो!!
मला वाटत मुळ कादंबरीच नाव कालीगंज की बहू हेच होत. नुतन आणि तिच ते हुण्हुणा करत येण इतक ठसल की कालीगंज की बहू म्हणूनच ती सिरीयल ओळखली जाते.
मला सुरत और सिरत माहीत नाही.
एक मात्र नक्की राज कपूरने वाईट नजरेने न बघितलेल्या दोन नट्यांमधली नुतन एक आणि दुसरी नादिरा. त्या त्याच्या मानलेल्या बहीणी होत्या.

सत्यम शिवम सुंदरम पाहील्यावर लता मंगेशकर जाम भडकलेली. कारण कथानकाचा गाभा तिच्यावर बेतलेला होता.

Pages