..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगु, आवडती हिंदी चित्रपटगीते ऐकताना/आठवताना होणारा निखळ आनंद आणि हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित गॉसिप ऐकताना/उगाळताना येणारी मजा(?) यात फरक आहे ना?
या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर पुन्हा ती गाणी आठवताना/ऐकताना गॉसिपमध्ये रस नसलेल्याना कुठेतरी कडवटपणा जाणवेल असे मला वाटते.
अर्थात हे माझे मत आहे. सगळ्यांनाच ते पटावे असा आग्रह नाही.

.....

मला जे एखाद्या गाण्यासंदर्भात आठवत ते मी दिल. त्यासाठी मला फटक्यांची शिक्षाही झालेय.
पण एखाद्या दोघांच्या भुवया उंचावल्या असतिल काही जण हसलेही असतिल हाच माझा आनंद
अर्थात हे माझे मत आहे. सगळ्यांनाच ते पटावे असा आग्रह नाही. खि!!!!!खि!!!!!खि!!!!!खि!!!!!

सुलक्षणा चे,

बेकरार दिल अरे तू गाये जा
खुशीयोंसे भरे ये तराने .. हे गाणे का ?

नूतनचे शिक्षण स्वित्झर्लंड मधे झाले होते. ती फ्रेंच भाषा जाणत होती, उत्तम स्विमर होती ( दिल्ली का ठग / यादगार ) उत्तम कुत्र्यांची तिला पारख होती. आणि उत्तम अभिनेत्रीही होतीच.

हे माझे आजचे कोडे Happy

एक तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला बागेत जातो. बागेत ते एका नारळाच्या झाडाखाली भेटतात, त्यांच्यात गप्पा सुरू होतात. तितक्यातच झाडावरचा एक नारळ त्या तरूणाच्या डोक्यात पडतो आणि तो बेशुद्ध होतो. रात्री शुद्धीत आल्यावर त्याला कळते कि तो त्याच्या घरात आहे आणि घरचे त्याला विचारतात कि हे सगळं कसं झालं. यावर तो तरूण कुठले गाणे म्हणेल?

रातकली एक ख्वाब मे आयी, सूचवणार होतो, पण नारळ नाही.

पण हे कोडे आहे कि सत्यकथा रे ?

दिनेशदा :फिदी:, कोडंच आहे Happy

एक क्लु: राज कपूरच्या एका चित्रपटाच्या शिर्षकाचे शब्द या चित्रपटाच्या शिर्षकात आहे. Happy

>>अरेच्चा तो शब्दांवरून गाणी सांगण्याचा बीबी आधीच आहे म्हणे. लॉजीकल अंताक्षरी. बरं. आता जरा चांगला विषय मिळेपर्यंत थांबूयात की. काहीतरी नाविन्य हवं ना. विचार करूयात.

मामी तो आवडत्या गाण्याचा काढा हो बीबी. माझे हात शिवशिवताहेत नुस्ते. Proud पण थांबू नका. थांबला तो संपला Happy

स्वप्ना, बरोब्बर Happy

एक तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला बागेत जातो. बागेत ते एका नारळाच्या झाडाखाली भेटतात, त्यांच्यात गप्पा सुरू होतात. तितक्यातच झाडावरचा एक नारळ त्या तरूणाच्या डोक्यात पडतो आणि तो बेशुद्ध होतो. रात्री शुद्धीत आल्यावर त्याला कळते कि तो त्याच्या घरात आहे आणि घरचे त्याला विचारतात कि हे सगळं कसं झालं. यावर तो तरूण कुठले गाणे म्हणेल?>>>>>

इतना तो याद है मुझे के उनसे मुलाकात हुई
बाद मैं जाने क्या हुवा, न जाने क्या बात हुई

एक क्लु: राज कपूरच्या एका चित्रपटाच्या शिर्षकाचे शब्द या चित्रपटाच्या शिर्षकात आहे.>>>>>
राज कपूरचा चित्रपट : "हिना" = मेहंदी
"मेहबूब कि मेहंदी" Happy

ह्या पिक्चरात लीना चंदावरकर भारी दिसलीय>>>>अगदी अगदी. बाहुली दिसते. Happy
सगळीच गाणी मस्त, पण "ये जो चिलमन है" जरा खासच. Happy

आता माझं कोडं:

गुलनार जन्मली आणि वाढली काश्मिरमध्ये पण तिला वाळवंटाचं भयंकर आकर्षण. भुरुभुरू पडणार्‍या बर्फापेक्षा रणरणती वाळू तिला आवडायची. शेवटी तिच्या ह्या वेडाला कंटाळून तिचे आईवडिल तिला एका वाळवंटी प्रदेशात घेऊन गेले. दूरपर्यंत पसरलेली वाळू बघून गुलनार जाम खुश झाली. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

क्लू - गाण्याच्या चार ओळींपैकी एक ह्या कोड्याला जुळत नाही पण बाकी तीन ओळी एकदम फिट्ट बसतात. Happy

लिना छानच होती. काजळ कोरलेले डोळे आणि मुमताजसारखी साड्या नेसायची स्टाईल! तिचं ते गाणं, "....चर्चा गली गली", एकदम सुखद!! (ते अंगाला झटके देणं सोडल्यास! Proud )

अजुन काही क्लु Happy

मेरे दिल ने जो मांगा मिल गया मैने जो कुछ भी चाहा मिल गया, हो गयी प्यार की हर तमन्ना तमन्ना जवां????

(स्वगत: आज सगळी लीना चंदावरकरची गाणी आठवत आहेत. :-))

स्वप्नाताई, वाळवंट म्हटलं की 'तू चंदा मै चांदनी' हेच आठवत मला. माझ्या लाडक्या गाण्यांपैकी एक.

स्वप्नाची गुलनार "लीना चंदावरकर' च असेल असे गृहित धरले तर मग :::

"आज मैं जवान हो गई हूँ, गुल से गुलिस्तान हो गई हूँ
ये दिन ये साल ये महिना ओ मिट्ठू मियाँ, भुलेगा मुझ को कभी ना...."

हे होईल कदाचित !!

(अवांतर ~ शंकर जयकिशन जोडीतील जयकिशन याना त्यानी कंपोज केलेल्या सर्व गाण्यांपैकी लताचे सर्वाधिक आवडलेले गाणे म्हणजे....हेच "आज मै जवाँ".)

Pages