..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकिरणबद्दल ब-याच उलटसुलट बातम्या ऐकल्यात Sad मानसिकरित्या आजारपण हा समान धागा त्या सगळ्या बातम्यातला.

आज कोणी कोडं घातलं नाही का? चला मी घालते.

एका मेंढपाळाचं लाडकं मेंढरू हरवतं. बिच्चारा दिवसभर रानोमाळ फिरतो, अगदी जीवाचा कान करून ऐकतो की त्या मेंढराचा आवाज ऐकू येईल. पण नाहीच. थकून भागून घरी येतो तेव्हा बायको त्याला विचारते तर तो काय उत्तर देईल?

मला आठवतंय त्याप्रमाणे तो एका मेन्टल हॉस्पिटलमध्ये भरती होता आणि तिथेच त्याचं निधन झालं....

~ अगं स्वप्ना....तसं नाही, तो आत्ता या क्षणी जिवंत आहे. मी आत्ताच ३१ मे च्या टाईम्समध्ये वाचले त्याबद्दल

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-intervie...

वरील लिंक पाहा.

मेंढपाळ >> "खो गया है मेरा प्यार, ढूंढता हुं मै मेरा प्यार...खो गया खो गया..." ???

ह्या कोड्यावर विचार करा. तोवर हे दुसरं:

अमिताचं अभयवर एकतर्फी प्रेम असतं. शेवटी वैफल्यग्रस्त होऊन ती आत्महत्येचा प्रयत्न करते. तिला आयसीयूमध्ये ठेवल्याचं कळताच अभय तिला बघायला जातो. डॉक्टर ती काही तासांचीच सोबती असल्याचं सांगतात. तिची अवस्था पहावत नसल्याने अभय जायला निघतो. एव्हढ्यात अर्धवट शुध्दीत असलेली अमिता डोळे उघडते. त्याला 'जाऊ नकोस' असं ती कुठलं गाणं म्हणून सांगेल?

एका डोळ्यांच्या डॉक्टरचं (म्हणजे डॉक्टर एक, डोळे अनेक) एका आंधळ्या माणसावर प्रेम बसतं. मग ती त्याला आपल्या हॉस्पिटलात बोलावून त्यावर शस्त्रक्रिया करून दृष्टी परत मिळवून देते. तर शस्त्रक्रियेनंतर बाहेर जात असलेल्या त्याला पाहून ती कोणतं गाणं म्हणेल?

हे दिनेशदांना येईल. मागे आम्ही हे गाणं असलेल्या चित्रपटाबद्दल बोललो होतो.

नोप.

स्निग्धा, गुगु नाही. मामी, 'नजर चुराना' वगैरे काहीतरी मामला दिसतोय. जरा नजरोंसे कह दो जी, निशाना चुक ना जाये?

मामी.. नजरे मिली मिलकर झुकी दिवाने फीर हो गये....
किंवा, नजरे मिली दील धडका मेरी धडकन ने कहा लव्ह यु राजा...
किंवा.. नजर के सामने जीगर के पास, कोइ रहता है वो हो तुम.. Happy

अरे, आत्ता सगळे लोक्स येताहेत. आता आपली जाण्याची वेळ झाली Sad मामी, नव्या बीबीचं काय ठरवलंत?

एका डोळ्यांच्या डॉक्टरचं (म्हणजे डॉक्टर एक, डोळे अनेक) एका आंधळ्या माणसावर प्रेम बसतं. मग ती त्याला आपल्या हॉस्पिटलात बोलावून त्यावर शस्त्रक्रिया करून दृष्टी परत मिळवून देते. तर शस्त्रक्रियेनंतर बाहेर जात असलेल्या त्याला पाहून ती कोणतं गाणं म्हणेल?

>>> चला है बलमवा नैना लगाईके.
सिनेमा : शीशे का घर
गायिका : सलमा आगा

मामी तो एखाद्या शब्दाच्या गाण्याचा बीबी लवकर चालु करा... आणी त्या दिवशी त्या शब्दाची ज्यास्तीत ज्यास्त गाणी जो कोणी देइल त्याला विजेता घोशीत करा.... मि चंद्र, पाउस , फुले यावरची बरीच गाणी शोधुन ठेवली आहेत.. Wink

मामी, मला शब्दाच्या गाण्याचा बीबी पण चालेल आणि आवडत्या गाण्यावर लिहायचा बीबी तर धावेल. सर्व्हे टाका एक आता Happy

स्निग्धा, नाही ग Sad

कोडं.
अमिताचं अभयवर एकतर्फी प्रेम असतं. शेवटी वैफल्यग्रस्त होऊन ती आत्महत्येचा प्रयत्न करते. तिला आयसीयूमध्ये ठेवल्याचं कळताच अभय तिला बघायला जातो. डॉक्टर ती काही तासांचीच सोबती असल्याचं सांगतात. तिची अवस्था पहावत नसल्याने अभय जायला निघतो. एव्हढ्यात अर्धवट शुध्दीत असलेली अमिता डोळे उघडते. त्याला 'जाऊ नकोस' असं ती कुठलं गाणं म्हणून सांगेल?

उत्तरः
चले जाना जरा ठहरो, किसीका दम निकलता है
ये मंजर देखकर जाना

पिक्चर: अराऊन्ड द वर्ल्ड
पडद्यावर - बहुतेक राज कपूर आणि राजश्री असावेत (गाणं नुस्तं ऐकलंय)
पडद्यामागे - शारदा (उर्फ असह्य किनरा आवाज) आणि मुकेश

Pages