कोणता कॅमेरा घ्यावा?

Submitted by सावली on 11 May, 2011 - 22:56

आशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का? पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.
पण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला "कोणती गाडी .." सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.
या धाग्यावर फक्त मी उत्तरे देणार असे नसुन ज्या कोणाला अनुभव आहे, माहिती आहे त्या सगळ्यांनीच उत्तर द्यावे आणि माहीती शेअर करावी असा विचार आहे. शिवाय मला सगळ्याच प्रश्नांना उत्तरे द्यायला नेहेमीच जमेल असे नाही. माझा इतर ब्रॅंड कॅमेर्‍यांचा अनुभवही नाही.

सगळ्यात आधी फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी
हा धागा किमान एकदा तरी वाचा हि विनंती.

काही कॅटेगरी:
#पॉईंट एन्ड शूट कॅमेरा - छोटा पॉकेट डिजिकॅम इ.

#एस एल आर लाईक कॅमेरा हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येत नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.

#माय्क्रो फोर/थर्ड्स कॅमेरा
हे डिजिकॅम पेक्षा बेटर, थोडेसे मोठे, जरा महाग आहेत. डिजिकॅम पेक्शा हा चांगला पर्याय असु शकतो ( एस एल आर लाइक सारखा, तरिही लेन्स बदलता येतात हा प्लस पॉईंट). पण लेन्स ऑप्शन फार कमी आहेत सध्या.

मिररलेन्स स्मॉल सेन्सर कॅमेरा
सध्या सोनी आणि निकॉनचे (CX)वेगवेगळे फॉरमॅट्स आहेत.
साधारण पणे फिचर्स -
सध्या फार महाग आहेत. पण लेन्स इंटरचेंजेबल आहेत. मिनी फ्लॅश चे वेगळे युनीटही विकत घेता येते. ऑप्टीकल व्ह्यु फाईंडर अर्थातच नाहीये.

#कंझ्युमर कॅमेरा SLR/DSLR म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्‍याच्या बोलीभाषेत ) असं पण म्हणतात.

#प्रोझ्युमर कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.

#प्रोफेशनल कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किंमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).

#मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट कॅमेरामोठ्या फ्रेमचे कॅमेरे.

इतर

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ कॅमेरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्तुरे | 11 May, 2011 - 22:35
Olympus चा SP-600 UZ हा कॅमेरा कसा आहे?

12 MPX, 1 GB internal memory, TFT colour LCD monitor 2.7 inches, Zoom [Optical / Digital (total)] 15x / 5x (75x) (हे नक्की काय आहे ते कळले नाही), Recording file format - JPEG , 4 GB memory card असलेला हा कॅमेरा रू. १३,००० ला आहे.

कोणी वापरला असल्यास माहिती द्यावी.

प्रतिसादaschig | 12 May, 2011 - 11:39
मला Olympus कॅमेरे आवडतात, पण १३ च्या मानानी महाग वाटतो - आजकाल२५०-४०० $ मध्ये २०-३५ ऑप्टीकल झूमचे कॅमेरे मिळतात. यात १५क्ष ऑप्टीकल आहे व आणखी ५क्ष डिजीटल आहे (त्यात फार काही अर्थ नाही).

५-६ मेगापिक्सेल ही योग्य रेंज असते - त्यापुढे नॉईज वाढतो (डिजीटल असल्यास) व जागाही भरमसाठ लागते.

SP-600 UZ चा पहिलाच रिव्ह्यु वाचला पण तो चांगला नाही. इमेज क्वालिटि अगदीच खराब आहे असे लिहिले आहे. त्यामुळे माझ्यामते तरी हा घेऊ नये. अजुन दुसरे कॅमेरे मी काही जणांना सुचवले होते
त्यांची लिस्ट खाली देते. त्यातील कुठले आवडल्यास ते सांगा मग जास्त खोलात जाऊन माहीती देता येईल.

canon IXUS
http://www.photographyblog.com/reviews/canon_digital_ixus_100_is_review/
canon S90, canon S95(माझ्याकडे आहे.)
Canon G11, Canon G12

सोनी
Cyber-shot मधे नविन हे चांगले आहेत इथे वाच
Cyber-shot DSC-HX5
Cyber-shot DSC-W390, W380, W370, W360, W350, W330, W320, W310
Cyber-shot DSC-TX7
(यात Cyber-shot DSC-S2100, S2000 घेउ नका कारण व्हिडियो रेकॉर्ड नाहिये.)
http://www.dpreview.com/news/1001/10010701sonyhx5w380s2100tx7.asp

Casio EX-Z400
याचे रेव्ह्यु इथे आहेत
http://www.trustedreviews.com/digital-cameras/review/2009/06/27/Casio-Ex...
स्पेसिफिकेशन इथे
http://www.dpreview.com/news/0901/09010807casio6exilimcompacts.asp#specs2

पॅनासॉनिक चा हा एक कॅमेरा चांगला आहे
http://www.dpreview.com/news/0803/08031802panasonicfx500.asp

सावली असे प्रश्नार्थक धागे काढण्यासाठी नवीन प्रश्न ही सुविधा वापरली तर उत्तम. तिथे आलेल्या प्रत्येक उत्तराला मत देता येते तसेच धागा काढलेल्या प्रश्नकर्त्याला आलेल्या उत्तरापैकी सर्वोत्तम उत्तर निवडता येते.

रुनी मी विचार केला तो, पण हा प्रश्न एकच सर्वोत्तम उत्तर असणारा नाही तर प्रत्येकाच्या वेगळ्या गरजांनुसार माहिती / मॉडेल सुचवणारा आहे.
तरीही तिथेच धागा काढावा हे योग्य वाटत असेल तर कृपया तिथे हलवणार का?

अ‍ॅडमिनना सांगावे लागेल धागा "नवीन प्रश्न" मध्ये बदलायला.
एकच सर्वोत्तम उत्तर नसले तरी माझ्यामते आलेल्या प्रतिसादाला मत द्यायची सोय असल्याने जास्त मत मिळालेले प्रतिसाद आणि अनावश्यक प्रतिसादांना दिलेले -ve मत यामुळे येणार्‍या वाचकांना काय वाचायचे हे जरा सोयीचे होवू शकेल असे वाटले म्हणून तो उपाय सुचवला होता.

माझ्याकडे NIKON SLR आहे पण मी त्याला हातही लावत नाही. तुझे लेख पहिल्यापासून वाचून वापरायला लागेन म्हणतेय.

सांगीतले आहे. लगेच न होता उशीरा धागा बदलला गेला तरी सगळे प्रतिसाद तसेच रहतात, तेव्हा चिंता नको.

इथे काय चाललय ते कळतच नाही नुसतं अर्धवट चर्चा झाली की दुसरीकडे कुठला तरी थ्रेडवर रिडायरेक्ट केले जाते...:(

सावली अखेर मनावर घेतलेस ते बरे झाले.
एक सूचना - फक्त कॅमेराच नव्हे तर त्याच्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टींविषयी पण इथे चर्चा करता येईल, जसे लेन्स वगैरे...
बाकी - मी नुकताच कॅनन ५५० डी घेतला. रिझल्टबाबत अतिशय समाधानी. फक्त एकच अडचण अशी की - फाईल साईझ सेट करताना 'एल' १८ एमपी असल्याने ५१८४ X ३४५६ या आकारात सेव्ह होतात. साधे घरगुती फोटो काढायला ही साईझ जास्त वाटते. त्याखाली 'एम' एकदम ८ एमपी ईतका खाली येतो. यामधे एक ऑप्शन हवा होता असे वाटले.

मी एक आठवड्यापुर्वीच निकॉन L120 हा मॉडेल घेतला, 21X Optical Zoom, 14Mp, व्हायब्रेशन कन्ट्रोल, HD Movie recording आणि किंमत फक्त रु १३६००/- सोबत एसेसरीज मधे रिचारजेबल बॅटरी आणि चार्जर सेट, ४ जीबी मेमरी कार्ड, AV cable ई. मिळाले. फोटोग्राफी करताना रिझल्ट्स पण छानच मिळतायेत.

<<साधे घरगुती फोटो काढायला ही साईझ जास्त वाटते. त्याखाली 'एम' एकदम ८ एमपी ईतका खाली येतो.>> आशुचँप ८ एम्बी बक्कळ आहेत रे! A4 साईज प्रिंट आरामात काढता येते. (मोठीही येईल खरतर) माझ्याकडचा २०डी हि ८ एम्बी आहे.
घरातल्या फोटोंची कुणी त्यापेक्षा मोठी प्रिंट काढत नाहीत.

प्रसिक अभिनंदन.
निकॉन L120 #एस एल आर लाईक कॅमेरा
चांगला वाटतोय. फोटो चांगले आहेत.

सावली, कॅनन आणि निकॉन ह्या कॅमेरा प्रॉडक्सच्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. पण समजा, मला पहिल्यांदाच कॅमेरा घ्यायचाय तर मी यातील कोणत्या कंपनीच्या कॅमेराला प्रेफरन्स द्यावा?

पहिल्यांदाच SLR कॅमेरा घ्यायचाय>> खरतर कुठलाही चालेल. जवळ कुठलं सर्विस सेंटर आहे तेही बघावे.
पुढे फोटोग्राफी मधे खुप काही करायचे झाल्यास / फोटोग्राफी हाच व्यवसाय झाल्यास सिस्टीम पुर्ण बदलता नक्कीच येते.
कॅनन मधे सध्यातरी लेन्स ऑप्शन जास्त आहेत. पण त्या सगळ्याच लेन्स आपण घेणार असतो का तर नाही. नेहेमी हव्या असलेल्या लेन्स निकॉन मधे ही आहेतच.
माझ्या पाहाण्यात निकॉन वरुन कॅनन कडे आणि कॅनन वरुन निकॉन मधे शिफ्ट झालेले दोन्ही आहेत.

मास्तुरे तुम्हाला वरच्या कॅटॅगरी मधला कुठला कॅमेरा घ्यायचाय ते ठरले का?

नाही दोन्हीचे माउंट वेगळे आहेत. कॅननच्या लेन्स निकॉनला किंवा विस अ वर्सा चालत नाही
सिस्टीम बदलताना कॅमेरे ही बदलावे लागतात.

सावली,

सध्या सोनीचा DSC-W570 (Rs. 10,990) आणि नायकॉनचा Coolpix L-120 (Rs. 13600) हे दोन कॅमेरे चांगले वाटत आहेत. अजून १-२ बघून (कॅनन किंवा पॅनॉसॉनिकचा) या ३-४ मधला एखादा फायनल करेन.

सोनीचा नेक्स सिरीज म्हणून एक कॉम्पॅक्ट एसएलआर आला आहे मार्केटमध्ये...खरं तर एसएलटी...त्यांचा दावा आहे हे नव्या युगाचे तंत्रज्ञान आहे. यामुळे आता वजनी आणि बोजड एसएलआरच्या ऐवजी त्याचे सगळे फिचर्स कॉम्पॅट कॅमेराच्या आकारात मिळतील...
यातले काही काही फिचर्स तर फारच मस्त आहेत...
http://www.sony.net/Products/ilc/E-series/nex5nex3/features01.html

नायकॉनच्या "Coolpix L-120 (ब्रॉशर किंमत Rs. १५,४५०) आणि "Coolpix S8100 (ब्रॉशर किंमत रू. १३,४५०)" यापैकी कोणते मॉडेल जास्त चांगले आहे?

Coolpix L-120 - हा वर लिहिल्याप्रमाणे #एस एल आर लाईक कॅमेरा आहे. चांगला वाटतोय असे वर म्हणाले आहेच.
पण हा साधारण ४३१ ग्रॅ आहे वजनाला , बॅग सकट जास्तच होणार वजन. तुम्हाला खरच या टाईपचा कॅमेरा नेहेमी वापराला घ्यायचा असेल तर चांगला आहे. पण वजन आणि मोठा आकार हा फॅक्टर विचारात नक्की घ्या.

Coolpix S8100 - हा #पॉईंट एन्ड शूट कॅमेरा आहे.
रिव्ह्यु खुप चांगला वाटतोय. छोटा आकार आणि सांभाळायलाही सोपा आहे. सँपल इमेजेस आवडल्या.
इथे पुर्ण रिव्हु वाचा
http://www.photographyblog.com/reviews/nikon_coolpix_s8100_review/image_...

माय्क्रो ४/३ >> हा चांगला ऑप्शन आहे. पण अजुनही खुप लेन्स ऑप्शन उपलब्ध नाहीत. यदा कदाचित कॅनन / निकॉन या मार्केट मधे उतरले तर कॉम्पिटिशनने पर्याय वाढतील.

<सोनीचा नेक्स सिरीज म्हणून एक कॉम्पॅक्ट एसएलआर > मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा
चांगला आहे. रिव्हु चांगला आहे. स्मार्ट आणि सुंदर दिसतो Wink बेसिक लेन्स बरोबर खुपच छोटा दिसतो. फक्त मोठी लेन्स लावली तर मात्र बॉडी छोटी आणि लेन्स मोठी वाटते.
किंमत महाग वाटते, याच किमतीत कंझ्युमर एस एल आर (अगदी लेटेस्ट मॉडेल नाही) मिळु शकतात. त्यामुळे घेताना लोक विचार करणारच.
LA-EA1 Alpha-mount to E-mount adapter हे (वेगळे विकत घ्यावे लागेल) लावले तर सोनी आणि मिनोल्टाच्या एस एल आर लेन्स ही वापरता येतील. पण ऑटो फोकस आणि कन्टीन्युअस फोटो वगैरे चालत नाहीत नीट. त्यामुळे लेन्स वापरण्यावर बर्‍याच मर्यादा येणार. पण तरी हि बाब महत्वाची आहे, सोनी यात इंम्प्रुव करेल असे वाटते.

सावली, सोनी चे कॅमेरे मायक्रो ४/३ नाहीत - त्यांनी स्वतःचा वेगळ फॉर्मॅट बनवला आहे. माय्क्रो ४/३ च्या लेन्सेस्ची अदलाबदल करता येते (ऑलिंपस व पॅनॅसोनीक), त्याचप्रमाणे अडाप्टर्स वापरुन स्टॅन्डर्ड ४/३ लेन्सेस पण वापरता येतात.
मायक्रो ४/३ प्रमाणेच नेक्स ३/५ हे मिरर्/प्रिझम-लेस आहेत.

कॅनन्/निकॉन ला पण लवकरच तसे काही करावे लागेल ...

ओह येस अस्चिग. माझ्या लक्षातच आलं नव्हतं. (वरचे दुरुस्त करतेय)
या कॅमेर्‍याचे इंटर्नल कसे आहेत याची फारशी काही माहीती मिळत नाहीये. मिळाल्यावर टाकते. याला मिररलेस इंटरचेंजेबल लेन्सेस असे म्हणतात, पण अजुन हि वेगळी अशी कॅटेगरी नाहीये.
शिवाय सॅमसंग चा सुद्धा अशाच प्रकारचा एक कॅमेरा आलाय. Samsung NX100

हि नविन कॅटेगरी खरच इंप्रुव्ह होणार आहे खुप असे वाटतेय. मग पॉ.अ‍ॅ.शु वरून डीएसएलआर ची उडी मारायला नको आणि वजन/ आकार हे मुद्दे हि निघुन जातील.

वरती अशई माहिती मिळली कि - आजकाल२५०-४०० $ मध्ये २०-३५ ऑप्टीकल झूमचे कॅमेरे मिळतात.
मी भारतात राह्तो आणि या किमतीत (१३ ते १५ हजारात) फक्त चारच कमेरे आहेत तेही १२क्ष ओप्टिकल झूम चे.

२० ते ३५ झूम चे कमेरे कोनते ते कलेल क किमति सह ?

अनिरुद्धम, इथे ३-४ लिंक्स दिल्या आहेतः
High optical zoom cameras

पण इमेज स्टॅबिलायझर आहे की नाही ते पाहुन घ्याल.
डिजीटल कॅमेरा हा ६ मेगापिक्सेल व १५ ऑप्टीकल झुम पर्यंत असेल तरी पुरेसा असतो. त्या पुढे इतर कॅमेर्यँकडे वळणे जास्त योग्य व्हावे.

शेवटी Nikon Coolpix L-120 हा कॅमेरा घेतला. सध्या मॅन्युअल वाचून समजावून घेतोय.

मदतीबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

Pages