कोणता कॅमेरा घ्यावा?

Submitted by सावली on 11 May, 2011 - 22:56

आशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का? पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.
पण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला "कोणती गाडी .." सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.
या धाग्यावर फक्त मी उत्तरे देणार असे नसुन ज्या कोणाला अनुभव आहे, माहिती आहे त्या सगळ्यांनीच उत्तर द्यावे आणि माहीती शेअर करावी असा विचार आहे. शिवाय मला सगळ्याच प्रश्नांना उत्तरे द्यायला नेहेमीच जमेल असे नाही. माझा इतर ब्रॅंड कॅमेर्‍यांचा अनुभवही नाही.

सगळ्यात आधी फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी
हा धागा किमान एकदा तरी वाचा हि विनंती.

काही कॅटेगरी:
#पॉईंट एन्ड शूट कॅमेरा - छोटा पॉकेट डिजिकॅम इ.

#एस एल आर लाईक कॅमेरा हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येत नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.

#माय्क्रो फोर/थर्ड्स कॅमेरा
हे डिजिकॅम पेक्षा बेटर, थोडेसे मोठे, जरा महाग आहेत. डिजिकॅम पेक्शा हा चांगला पर्याय असु शकतो ( एस एल आर लाइक सारखा, तरिही लेन्स बदलता येतात हा प्लस पॉईंट). पण लेन्स ऑप्शन फार कमी आहेत सध्या.

मिररलेन्स स्मॉल सेन्सर कॅमेरा
सध्या सोनी आणि निकॉनचे (CX)वेगवेगळे फॉरमॅट्स आहेत.
साधारण पणे फिचर्स -
सध्या फार महाग आहेत. पण लेन्स इंटरचेंजेबल आहेत. मिनी फ्लॅश चे वेगळे युनीटही विकत घेता येते. ऑप्टीकल व्ह्यु फाईंडर अर्थातच नाहीये.

#कंझ्युमर कॅमेरा SLR/DSLR म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्‍याच्या बोलीभाषेत ) असं पण म्हणतात.

#प्रोझ्युमर कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.

#प्रोफेशनल कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किंमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).

#मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट कॅमेरामोठ्या फ्रेमचे कॅमेरे.

इतर

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ कॅमेरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गेली अनेक वर्षे कॅनॉन पॉवरशॉट ए५५० ने फोटो काढतो आहे.... आता डीएसएलआर कडे वळण्याचा विचार आहे
कॅनॉन EOS550D एंट्री लेव्हल डीएसएलआर म्हणून कसा आहे?.... बरीच डोकेफोड करुन शॉर्टलिस्ट केला आहे!
हा भारतातुनच घ्यावा का US हुन मागवावा.... कितीसा फरक पडेल?
भारतातच घ्यायचा झाला तर flipkart सारख्या साइटवरुन डील्स बघुन घेणे चांगले की अधिकॄत शोरुम मधुन घेणे जास्त चांगले?

DSLR's are on dying bed.

आत्ता नवीन mirrorless technology आली आहे ..जर तुम्ही full sensor camera घेणार नसलात तर Sony NEX -7 वगैरे चा विचार करा ...

mirrorless चे खूप फायदे आहेत.. छोटा...१५-२० FPS ...अंतरजाल वर भरपूर माहिती उपल्भ्द आहे. शुभेछा.

स्वरुप,
५५०डी एंट्री लेवल म्हणुन चांगला कॅमेरा आहे.
तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टींचेच फोटो काढायला आवडतात का? इतर काही रिक्वायरमेंट्स आहेत का? असल्यास ते लिहा म्हणजे अजुन काही सुचवता येईल.
रुपयाचे भाव बघता युएस वरुन मागवुन फायदा होईल असे वाटत नाही. पण तरी अ‍ॅमेझॉन वगैरे वर बघा एकदा. शिवाय कॅमेर्‍याची वॉरंटी इंटरनॅशनल नसते. फक्त लेन्सेसची असते. कॅमेरा वॉरेंटी त्या देशात घेतला तिथेच लागु होते.
इथे घेतलात प्रत्यक्ष जाऊन चांगल्या शोरुम मधुनच घ्या. बरोबर वॉरेंटी येते ती चेक करा.

निती
DSLR's are on dying bed.>> मान्य नाही.
कॅमेरा खरेदीच्या बाफ वर किंवा इथेच माझी मिररलेसबद्दल पोस्ट असावी.

व्ह्यु फाइंडर नसणे हा मोठा ड्रॉबॅक आहे.

>>स्वरूप.. तुझ्या प्रश्नावर बाजो, आशुचॅम्प वगैरेंचे प्रतिसाद आले होते ना?? कुठे गेले ते सगळे ??
ते या धाग्यावर आहेत: http://www.maayboli.com/node/17057?page=2

सावली धन्यवाद....
तश्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट वगैरे खास काही नाही आहेत.... मला क्लोजअप्स घ्यायला आवडतात!
५५०डी आता बहुतेक फायनल आहे फक्त कीट लेन्स घ्याव्यात की अजुन थोडे पैसे घालुन १८-१३५ वगैरेकडे वळावे का हा प्रश्न आहे!

तुमचे बजेट किती आहे त्यावरही अवलंबुन आहे.
१८-५५ हि लेन्स सुद्धा चांगली आहे. इमेज क्वालिटी बर्‍यापैकी चांगली आहे.
तुमच्या क्लोज अप साठी मात्र कदाचित कमी पडेल असे वाटते.
बजेट किती ते ठरले तर अजुन एखादी लेन्स सुचवता येईल.

निती
DSLR's are on dying bed.
जर तुम्ही full sensor camera घेणार नसलात तर Sony NEX -7 वगैरे चा विचार करा ...

तुम्हाला हे विरंगुळा (विनोद (PJ)) सदरात पोस्ट करायचे होते का ? चुकून इथे झाले का ?

हुर्रे..... आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहुर्तावर Cannon EOS550D घेतला Happy
तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा खुपच उपयोग झाला!
महावीरमधुनच घेतला.... ३० मध्ये मिळाला... आशुचँपच्या सल्ल्यानुसार होयाचा UV Filter आणि १० पॉवरचे मेमरी कार्ड पण घेतले Happy

अभिनंदन स्वरुप. Happy

महावीरमधुनच घेतला.... ३० मध्ये मिळाला>> अरे वाह!!
गुड डील. Happy

माझ्याही मनात आशा जागी झालीये...
बघु अजुन किती विरह डीएसएलाआरचा ते.. Happy

धन्यवाद मित्रहो....
आशुचँप, कार्ड ८०० ला मिळाले
>>१८-५५ लेन्स सेकंड एडीशन आहे का?
ते कसे ओळखायचे?

झकासराव.... घेऊन टाका आता लवकर Happy

स्वरुप - अभिनंदन !!

इंद्रधनू - सावली ,
DSLRs are on dying bed ?.... Yes !

3rd Generation Cameras आता येउ घातलेत... सोनी ने मागच्याच आठवड्यात full senser mirrorless camera आणला.

FPS,portability, Digital VF..असे अनेक फायदे आहेत...आजून बर्याच सूधारणा १२-१५ महिन्यात अपेक्षित आहेत... आणि हो Nikon ने काळ आधिच ओळखला आहे..म्हणूनच त्यानी best sensor D800 E बाजारात आणला... जे काहि पैसे DSLRs विकून कमवता येतील तितके बर.

अधिक माहीतीसाठी येथे click करा. काही sample photos पण आहेत तीथे... ते पण जरा डोळ्याखालून घाला.

हा विनोद नाही Happy

सोनीचे काहीही घेऊ नये. त्यांच्या अक्सेसरीज डेडिकेटेड असतात केवळ सोनीसाठीच घ्यायच्या आणि सोनीसाठीच वापरायच्या. उदा सोनीच्या कॅमेर्‍याला फक्त सोनीचीच मेमरी स्टिक चालते आणि ती दुसर्‍या कोणत्याही कॅमेर्‍याला चालत नाही. मेमरी कार्ड कोणतेही बाकी कोणत्याही कॅमेर्‍याला चालते. नुकताच विद्यापीठात एका कार्यक्रमात कॅनन कॅमेरा नेला असता मेमरी कार्ड घरीच राहिल्याचे लक्षात आले . सोबतच्या मित्राकडचे मेमरी कार्ड घेऊन कॅमेर्‍यात बसवून लगेच फोटो काढले. ही कॉम्पॅटिबिलिटी सोनीत नाही...

ही कॉम्पॅटिबिलिटी सोनीत नाही..>> सोनी सगळं एक्सक्लुजिव्ह ठेवतं. Happy
त्यांचे मेमरी कार्ड फोटोसाठीचे बाकीच्यांपेक्षा महाग आहेत. माझ्याकडे सोनीचाच कॅमेरा आहे.
पण एस एल आर नाहिये. डिजिटल आहे. त्यामुळे मला फार अ‍ॅक्सेसरीज वै कधी लागल्या नाहीत.
लेन्सच्या बाबतीत मात्र हे कटकटीचं होउ शकत.

विषय mirrorless camera चा होता...हे cameras olympus ,cannon ,nikon ने पण आणले आहेत....पण ते aps-c sensor आहेत ...त्यांचे full sensor cameras येतीलच लऊकर.

NEX - 7 ला SD (SD ,SDHC ,SDXC ) कार्ड्स चालतात...पण सध्यातरी लेन्स त्यांच्याच... अ‍ॅक्सेसरीजसाठी इतर पर्याय आहेत.

मला
(१) सोबत बाळगायला व फोटो काढायला सोपा.
(२) जवळचे (उदा. माणसांचे) , दूरचे( उदा. डोंगरदर्‍या) वा झूम करून( उदा. पक्षी ) अशा सगळ्या प्रकारचे फोटो व व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काढता येतील असा.
(३) हात थरथरण्यामुळे निर्माण होणारे दोष आपोआप सुधारून घेणारा.
(४) अपुर्‍या प्रकाशातही उत्तम फोटो काढता येतील.

असा कॅमेरा घ्यायचा आहे. इकडेतिकडे थोडेफार वाचून सोनी RX100 किंवा कॅनन S110 घ्यावा का असे वाटले. जाणकारांचे मत कळले तर ठरवायला मदत होईल. दुसरा कुठलाही सुचवला तरी चालेल.

जीएस
सोनीचे फिचर जास्त चांगले वाटत आहेत.
स्पेशली वाईड अपेर्चर , लाँग शटर आणि फ्रेम पर सेकंद चांगले आहे.
किंमतीची तुलना करुन आणि सोनीच्या कार्डच्या किंमतीची तुलना करुन कुठलाही एक ठरवा. दोन्ही चांगलेच आहेत.

अपुर्‍या प्रकाशातही उत्तम फोटो काढता येतील.>> ह्यासाठी लेन्सची F व्हॅल्यु किती आहे हे बघावं लागेल.
जनरली कॉम्पॅक्ट कॅमेर्‍यात फ ३.२ येते. थोड्या एस एल आर लाइक डिजिटल कॅमेर्‍यात फ २.७ येते. (ह्यामुळे नॉइज कमी येइल. शेक कमी येइल. )

दोन्ही कॅमेरे छान आहेत...त्यातल्यात्यात सोनी उजवा ठरतोय... मोठा इमेज सेन्सोर, वाईड अपेर्चर महत्वचे फिचर....पण किंमत जवळपास दुप्पट आहे

आपण flickr.com वर जाऊन ईतरानी काढलेले फोटो बघा. तुम्हाला निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल.
कॅनन - http://www.flickr.com/groups/canonpowershots100/
सोनी - http://www.flickr.com/groups/rx100/

कॅनन S110 ते १८० -- ची ब्याटरी लगेच संपते हो.... नका घेऊ.

विसरभोळा:
डी ८०० हा डी एस एल आर नाही... हा छान विनोद आहे... का फूल फ्रेम आहे म्हणून ?
डी एस एल आर कसले मरणपंथाला लागतायेत... अजुन ही प्रोफेशनल्स लोक फिल्म कॅमेरे वापरता आहेत...
मिररलेस, थ्री डी वगैरे येतील आणि जातील..

परवा Nikon Coolpix S6300 (Golden Colour) घेतला
10x Zoom, CMOS सेन्सर, Full HD मूव्ही, 16 Megapixcels
Additional Gold Parker pen (min Rs. 1500/- to max 3000/- exact price I don' no) + case + 4GB memory card + HDMI cable Free. 2yrs warranty. @ Rs. 8900/-
आणि बरेच काही फीचर्स आहेत. अभ्यास चालू आहे. नंतर रिझल्ट सांगेन.

आत्तापर्यंत जुना हँडीकॅम (कॅसेट वाला) वापरत होते. आता सोनीचा A55 घेतला आहे. व्हिडीओ शूटिंग साठी मला आधीचा जेवढा युजर फ्रेंडली वाटत होता, तसा हा वाटत नाहीये (अजुन वापरायची सवय ही झाली नाहीये म्हणा). काही टिप्स असतील तर द्या नवीन वापरणार्‍यांसाठी.

अमित मोरे

डी - ८०० डी एस एल आर नाही हे मी कधी हे मी कधी म्हंटले हो ? बोलाची कढी बोलाचा भात Happy

"अजुन ही प्रोफेशनल्स लोक फिल्म कॅमेरे वापरता आहेत" -- हा खरा विनोद आहे..तूमच्या गल्लीतले स्टुडीयो बघा, landscape, fashion , wildlife फोटोग्राफर ९०% DSLR वापरतात.

ग्रामाफोन, ऑडियो कॅसेट टेप वापरणारे सुद्धा आहेत अजून....तसेच काही वर्षानी फिल्म आणि DSLR वापरणारे असतील.

बरोबरे आहे मिररलेस, थ्री डी येतील आणि जातील...पण त्याच्या आधी DSLR जातील....येत्या २-३ वर्षात कळेलच.

माधव, कॅननचे ऑ. सर्विस सेंटर अंधेरीला आहे. अगदी खात्रीचे. ईथे पहा
त्याशिवाय दादरला जे जे मेहता पण चांगलय. आयडियल बुक शॉपच्या बाजूला आहे.

कुणी canon powershot sx500 IS घेतला आहे का? नेट वर त्याचा रीव्हु चांगला दिला आहे.

Pages