कोणता कॅमेरा घ्यावा?

Submitted by सावली on 11 May, 2011 - 22:56

आशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का? पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.
पण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला "कोणती गाडी .." सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.
या धाग्यावर फक्त मी उत्तरे देणार असे नसुन ज्या कोणाला अनुभव आहे, माहिती आहे त्या सगळ्यांनीच उत्तर द्यावे आणि माहीती शेअर करावी असा विचार आहे. शिवाय मला सगळ्याच प्रश्नांना उत्तरे द्यायला नेहेमीच जमेल असे नाही. माझा इतर ब्रॅंड कॅमेर्‍यांचा अनुभवही नाही.

सगळ्यात आधी फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी
हा धागा किमान एकदा तरी वाचा हि विनंती.

काही कॅटेगरी:
#पॉईंट एन्ड शूट कॅमेरा - छोटा पॉकेट डिजिकॅम इ.

#एस एल आर लाईक कॅमेरा हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येत नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.

#माय्क्रो फोर/थर्ड्स कॅमेरा
हे डिजिकॅम पेक्षा बेटर, थोडेसे मोठे, जरा महाग आहेत. डिजिकॅम पेक्शा हा चांगला पर्याय असु शकतो ( एस एल आर लाइक सारखा, तरिही लेन्स बदलता येतात हा प्लस पॉईंट). पण लेन्स ऑप्शन फार कमी आहेत सध्या.

मिररलेन्स स्मॉल सेन्सर कॅमेरा
सध्या सोनी आणि निकॉनचे (CX)वेगवेगळे फॉरमॅट्स आहेत.
साधारण पणे फिचर्स -
सध्या फार महाग आहेत. पण लेन्स इंटरचेंजेबल आहेत. मिनी फ्लॅश चे वेगळे युनीटही विकत घेता येते. ऑप्टीकल व्ह्यु फाईंडर अर्थातच नाहीये.

#कंझ्युमर कॅमेरा SLR/DSLR म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्‍याच्या बोलीभाषेत ) असं पण म्हणतात.

#प्रोझ्युमर कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.

#प्रोफेशनल कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किंमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).

#मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट कॅमेरामोठ्या फ्रेमचे कॅमेरे.

इतर

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ कॅमेरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्तुरे L-120चा review टाकणार का? AA-Battery बद्दल काय मत?

सावली... Optical Zoom आणि Digital Zoom मधे काय फरक असतो?

मास्तुरे, मी असं ऐकलंय L120 खूप स्लो आहे...

इंद्रालाच जोडून पुढचा प्रश्न -
L 120 आणि P 500 मधला फरक सांगा

http://reviews.cnet.com/

या संकेतस्थळावर सर्व इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टस् चे रिव्ह्यू दिसतील.

हा L 120 रिव्ह्यू

http://reviews.cnet.com/digital-cameras/nikon-coolpix-l120-red/4505-6501...

http://reviews.cnet.com/digital-cameras/nikon-coolpix-l120-red/4505-6501...

आम्हाला olympus चा olympus sp 610 UZ घ्यायचा आहे. इथे जाणकारांच्या रिव्ह्यू टिप्स मिळाल्या तर बरं होईल.

साधारण रू ५०००-६००० किंमत, नेहमीचे फोटो प्रिंट चांगले येतील इतपत मेगापिक्सेल्स (नाहीतरी आजकाल किमान ६ असतातच), किमान ३X ऑप्टिकल झूम, दोन फोटोंमधे कमीतकमी लॅग (जी पूर्वीच्या सगळ्या Nikon point and shoot मधे असायची) - अशा स्पेक्समधे सध्या कोणता चांगला आहे? आमच्या ओळखींच्यांकरता हवा आहे, त्यांना मुख्यतः ट्रीपला वापरायचा आहे.

अशा कॅमेर्‍यांमधे माझे अनुभव म्हणजे निकॉन/नायकॉन ला क्वालिटी चांगली पण point and shoot मधे दोन फोटोंमधली लॅग जास्त होती, कॅनन ला एवढी लॅग नसायची, क्वालिटी थोडी निकॉन पेक्षा कमी. पण कॅननच्या काही मॉडेल्स ला तो वळू शकणारा डिजिटल viewfinder होता, त्यामुळे एखाद्या ठिकाणी कॅमेर्‍याच्या optical viewfinder जवळ आपण डोके नेऊ शकलो नाही तरी त्यातून व्यवस्थित अंदाज येतो.

मास्तुरे - एल-१२० चा अनुभव कसा आहे? एक फोटो काढल्यावर दुसर्‍यासाठी कॅमेरा 'रेडी' व्हायला वेळ लागतो का? विशेषतः रात्री.

आजकाल बर्‍याच छोट्या कॅमेर्‍यांमधे optical viewfinder नसतो. खूप उन असले की त्याचा फार प्रॉब्लेम येतो.

इंद्रधनुष्य, नविन कॅमेर्‍याबद्दल अभिनंदन.
Optical Zoom आणि Digital Zoom > थोडक्यात सांगायचे तर
Optical Zoom म्हणजे वेगवेगळी भिंग वापरुन जे मॅग्निफिकेशन मिळते ते. त्यात मिळालेले मोठे चित्र पुर्ण सेन्सरवर जसेच्या तसे पाठवले जाते.
Digital Zoom म्हणजे सेन्सर वर पडलेल्या चित्राचा काही भाग क्रॉप करुन (म्हणजे बाजुचा कापुन टाकुन) मधला भाग इलेक्ट्रॉनिकली मोठा करणे. यात चित्र मोठे करण्यासाठी चित्रबिंदु / पिक्सेल्स इलेक्ट्रॉनिकली तयार केले जातात. अर्थात चित्राची क्वालीटी कमी होते.

dj14 > फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी इथे काही प्रमाणात उत्तर दिले आहे.

गोडगोजिरी, तुम्हाला नक्की कशासाठी घ्यायचा आहे ते कळलं तर चांगले. कॅमेर्‍याला प्लस मायनस पॉइंट असतातच. जर अगदी ठरलच असेल तर हा एक रिव्ह्यु वाचुन पहा. म्हणजे तुम्हाला सुटेबल आहे का ते कळेल.

फारएण्ड, भारतातल्या किमती बद्दल मला माहित नाहिये. तुम्ही तुमच्या बजेट मधले कॅमेरे लिस्ट केले तर त्याबद्दल सांगता येईल.

फारएण्ड मी PowerShot A2200 चा Demo बघितला आहे. point and shoot साठी उत्तम. मुंबईत ६३००/- पर्यंत मिळतो.
ही लिंक चेक कर...
http://www.canon.co.in/personal/products/compact-cameras/powershot/power...

धन्यवाद सावली Happy

सचिन ते. अ‍ॅड करतो तो कॅनन चा एच. डी. कॅमेरा कसा आहे??? कुणि वापरला आहे का?... अ‍ॅड मध्ये सान्गतात त्या प्रामाणे फोटॉ आणी व्हिडीयो दोघा वापरा साठी हा कॅमेरा चान्गला का? रात्री चे फोटो आणी शुट पण ह्यात चाग्नल येत अस अ‍ॅड मध्ये दाखवतात ... हा कॅमेरा घ्यायच अस मनात आहे पण किम्मत बजेट मध्ये असेल तरच ... ट्रिप वर जाण्यासाठी कॅमेरा हवा आहे फोटॉ आणी व्हिडीयो दोघा वापरा साठी... फ्लॅश तर हवाच ना... दहा हजारा च्या आत बजेट आहे वा जास्टित जास्त १० Happy ...

मला सांगा.... Bracketing ह्या feature चा DSLR कॅमेर्‍यावर किती वापर होतो ? म्हणजे ते नसणं हा कॅमेर्‍यासाठी फार मोठा weak point आहे का?

18-55mm VR Lens आणि 55-200mm VR Lens अश्या दोन घेणं गैरसोईचं आहे का ? म्हणजे दोन घ्याव्या की एकच १८-१०५ किंवा १७-१३५ वगैरे घ्यावी.. कारण एकच जास्त रेंजची लेन्स बर्‍यापैकी महाग आहे.. !

कृपया माहिती द्या..धन्यवाद..

माझ्या limited knowledge प्रमाणे महिती देतो.
autobaracketing प्रामुख्याने HDR photography मध्ये वापरले जाते. म्हणजे वेगवेगळ्या exposure ला
फोटो घेतला जातो व नंतर ते सर्व फोटो एकत्र केले जातात. माझ्या मते DSLR मध्ये autobaracketing असणे खुप महत्वाचे आहे. जरी हे फिचर सुरवातिला वापरले गेले नाही पण आता मी याचा खुप वापर करतो. आणि HDR photography च्या तर सध्या प्रेमातच पडलो आहे. आणि autobaracketing शिवाय HDR जवळ्पास अशक्य आहे.

बाकी lens बाबत, एकच लेन्स असणे केव्हाही चांगले, पण हा निर्णय पुर्णपणे तुमच्यावर अवलंबुन आहे. मी १८-१०५ पासुन सुरुवात केली व जसजसे cameraचे फिचर्स कळाले व वापरता येउ लागले, तसे नविन लेन्स घेतल्या. तसेच अमेरिकेत असाल तर लेन्स रेंट करण्याची सोयदेखिल आहेच.

पराग, ब्रॅकेटिंगचा वापर मुख्यतः वेगवेगळ्या एक्स्पोजर ची ३-४ छायाचित्रे काढून फोटोशॉप वा तत्स्म सॉप्फ्ट्वेअर मध्ये एक एच डी आर छायाचित्र बनवण्यासाठी होतो. तुमच्याकडे ट्रायपॉड असेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा ते करू शकता. माझ्यामते जवळपास ९९% एस एल आर कॅमेर्‍यात ते फिचर असते.

दोन लेन्स जवळ ठेवणं गैर सोयीचं होऊ शकतं. खासं करून लेन्स बदलेपर्यंत कधी कधी सब्जेक्ट भलतीकडेचं गेलेला असतो (उदा. पक्षी, किडा वगैरे). तसच सेन्सर वर धूळ बसण्याचा धोका त्यामुळे वाढतो. निकोन ची १८-२०० ची एक व्ही आर लेन्स आहे. ती चांगल्या प्रतीची छायाचित्रे घेते. थोडी महाग आहे पण जर का तुम्ही लेन्स कॅमेर्‍या ला लावून स्टोर करणार असाल तर इट इज वर्थ. अर्थात ते ठरवण्याचे इतर criteria सुद्धा आहेत, जसे कि maximum aperture, image quality loss, weight वगैरे वगैरे, पण रोजच्या वापरासाठी जास्त रेंजची एक लेन्स असलेलं वापराच्या दॄष्टीने बरं असतं.

हम्म्म्म !
Nikon च्या नवीन आलेल्या D3100 कॅमेर्‍याचं चांगलं डील कॉस्कोमध्ये आहे. त्याच्याबरोबर मी वर लिहिलेल्या २ लेन्स त्याबरोबर मिळतायत. पण त्या कॅमेर्‍याला auto किंवा कुठलच bracketing नाहीये एहडा एकच निगेटीव्ह पॉईंट रिव्यूजमध्ये आहे.
माझ्याकडे आत्तापर्यंत SLR नाहीये. त्यामुळे घेतानाच सगळी फिचर असलेला घ्यावा की bracketing नसलं तरी चालेल असा विचार करत होतो. आता परत कन्फुजन.. Happy

canon sx230 hs ह्या बद्दल जाणकारांच मत काय?
ह्या व Canon PowerShot SX40 HS ( हा नेहमी साठी जरा बल्की वाटतोय)नक्की कोणता घ्यावा हे ठरत नाहीये.
तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल Happy

पराग तुझ्या प्रश्नाला इमेल मघुन उत्तर देताना मी तुला विचारले होते ते इथे पुन्हा लिहिते.

1) zoom havech ka? (kasale photo kadhanaar?)
2) Don lens gheun firane jamel ka?
-- he asel tar D3100.

2) Low light photo kadhale jaataat ka?
-- he asalyas D5100

ब्रॅकेटींग बद्दलही लिहिले होतेच. नसेल तर फारसे काही बिघडत नाही. मॅन्युअली करता येतेच.

तोषवी,
canon sx230 hs खुप चांगला आहे, मागेही एका मैत्रिणीला सुचवला होता आणि तीला आवडला आहे.

Canon PowerShot SX40 HS हा वेगळ्या प्रकाराचा आहे एस एल आर लाईक. तुला एस एल आर लाईक घ्यायचा आहे का ते ठरव.

नेहेमीच्या वापरासाठी, घरातले फोटो काढण्यासाठी हवा असल्यास canon sx230 hs चांगला वाटतो.

कोणी मला प्लीज या कॅमेराबद्दल सांगू शकेल का? एका मित्राला घ्यायचा आहे. (बायकोला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी हवा आहे).
त्याच्या रिक्वायरमेंट्सः
१) हाताळायला सोप्पा
२) उत्तम पिक्चर क्वालिटी

त्याच्याकडे पॉइंट अँड शुट आहे. पण तरी पॉइंट अँड शुट मधलाअजून एक उत्तम कॅमेरा हवा आहे. त्याने हा खालील कॅमेरा शोधला आहे. कोणी प्लीज हा कसा आहे किंवा या किंमतीमध्ये अजून काही चांगले ऑप्शन्स असतील तर सांगू शकेल का?

http://www.flipkart.com/cameras/sony/itmczpynztq2d5cz?pid=camczzzstwefxh...

धन्यवाद.

Canon PowerShot S100 हा कॅमेरा चांगला आहे अस ऐकल आहे, कुणी घेतला आहे का?

चातक हो. इथे स्पेक्स आहेत

स्वाती,
तुम्ही लिंक दिलेला पॉइंट अँड शूट कॅमेरा नाहीये.

मी अलिकडे सजेस्ट केलेले काही - यांची इमेज क्वालिटी मला चांगली वाटली.
Canon S100 /older Canon S95 /older Canon S90
Powershot SX230 HS /older Powershot SX130 HS,
Panasonic Lumix DMC-FS22
PentaxOptio WG-1
अजुन वर पोस्ट केलेल्या लोकांनी वेगवेगळे कॅमेरे घेतले आहेत ते ही बघा.

अनु वरची माझी पोस्ट बघा.
एकदम नवा आहे तो. खुप चांगला आहे. अर्थात महाग आहे.
तसाच हवा तर मागच्या वर्षीचे मॉडेल Canon PowerShot S95 (year 2010) / Canon PowerShot S90 (year 2009)

वर वेगवेगळ्या कॅमेर्‍या टाईप वर चर्चा झालीये.
त्यात एक नविन -
Nikon V1 -
Nikon announces Nikon 1 system with V1 small sensor mirrorless camera

कॅनन / निकॉन हे माय्क्रो फोर/थर्ड्स कॅमेरा किंवा मिररलेस इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा काहीतरी काढेल असे वाटले होते.
निकॉन चे स्वतःचे नवे स्टँडर्ड बनवुन Nikon V1 आणला आहे. बातमी आणि थोडक्यात रिव्ह्यु इथे वाचा.
- सध्या फार महाग आहे.
- लेन्स इंटरचेंजेबल आहेत.
- मिनी फ्लॅश चे वेगळे युनीटही विकत घेता येते.
- सर्वात महत्वाचे कॅमेर्‍याचा स्पीड जबरदस्त आहे. ( रिव्ह्यु वरुन तरी)
- ऑप्टीकल व्ह्यु फाईंडर अर्थातच नाहीये.

पुढच्या वर्षात कॅननही अशाच प्रकारचा नवा कॅमेरा आणेल असे वाटतेय.
कॅननही स्वतःचेच वेगळे स्टँडर्ड बनवण्याची शक्यता जास्त.

काल Powershot SX230 HS घेतला.
Appears to be very versatile. Is a Point and Shoot as well as a manual control where you can determine either only aperture or only timing or both and everything inbetween.
Has all kind of effects possible, full 1080P. Looking forward to using all functionalities.

.

मी डिजीकॅम वापरला आहे,पुर्वी प्वांईंट अँड शूट वापरला आहे. फुजीफिल्म फाईनपिक्स ३३०० कसा आहे ? माहिती मिळेल काय ?

Pages