Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
सदाबहार गीतकार जगदीश खेबुडकर
सदाबहार गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन


ओह, खेबूडकर गेले का..
ओह, खेबूडकर गेले का..
त्यांना श्रद्धांजली.
जगदीश खेबुडकर, अगदी चिरपरीचित
जगदीश खेबुडकर, अगदी चिरपरीचित नाव.
पं माधव गुडी यांचे गायन मी प्रत्यक्ष ऐकले आहे.
शिवानंद पाटील पण फार लवकर गेले.
या तिघांना श्रद्धांजली.
ठाण्यातल्या साहित्य
ठाण्यातल्या साहित्य समेंलनातली भेट हि अखेरची भेट ठरली.
अजरामर भक्ती गिते लिहिणारे आणि लावणीचे सरकार आपल्यातून गेले. आता सकाळ मधल्या 'सप्तरंगात' त्यांच्या गाण्यांविषयी कुठून कळणार.
हेच लिहायला आलो होतो छबीदार
हेच लिहायला आलो होतो
छबीदार छबी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल ते देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा अशी विविध गाणी लिहिलेल्या जगदीश खेबुडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या गाण्यांची लिस्ट
(No subject)
'... आणि गीतरचना आहे जगदीश
'... आणि गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची' असं निवेदिकेनं एकदाही सांगितलं नाही अशी रेडिओवर एकही 'आपली आवड' सादर झाली नसेल.
खेबुडकरांना श्रद्धांजली.
(No subject)
आणि गीतरचना आहे जगदीश खेबुडकर
आणि गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची' असं निवेदिकेनं एकदाही सांगितलं नाही अशी रेडिओवरची एकही 'आपली आवड' सादर झाली नसेल.>>>>>अगदी अगदी
(No subject)
'अष्टविनायका तुझा महिमा कसा'
'अष्टविनायका तुझा महिमा कसा' गीत लिहायच्या आधी त्यांनी त्यातला एकही गणपती पाहिला नव्हता. एक दीड तासाच्या गाडीतल्या प्रवासात 'अष्टविनायक दर्शन' पुस्तक वाचून त्यांनी लगेच ते गीत लिहीले होते!
या अजरामर प्रतिभेला श्रध्दांजली!
गदिमांनी ज्यांना आपला वारसदार
गदिमांनी ज्यांना आपला वारसदार म्हणुन गौरविले त्या जगदीश खेबुडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली
जगदिश खेबुडकरांना
जगदिश खेबुडकरांना श्रद्धांजली!
(No subject)
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
जगदिश खेबुडकरांना
जगदिश खेबुडकरांना श्रद्धांजली!
'... आणि गीतरचना आहे जगदीश
'... आणि गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची' >>>> सगळ्यात आधी हेच आठवलं.
खेबुडकरांना श्रद्धांजली !!!
खरच. २७५० गाणी लिहिली त्यानी,
खरच. २७५० गाणी लिहिली त्यानी, सर्वच्या सर्व अतिसुंदर. आणि साधे व्यक्तिमत्व. हल्लीच त्यांची मुलाखत पाहिली होती. आकाशी झेप घे रे, देहची तिजोरी, मला वाटते, सर्वच सुंदर गाणी त्यांची असणार!
मनःपूर्वक श्रद्धांजली!
जगदिश खेबुडकरांना श्रद्धांजली
जगदिश खेबुडकरांना श्रद्धांजली !
>>'अष्टविनायका तुझा महिमा
>>'अष्टविनायका तुझा महिमा कसा' गीत लिहायच्या आधी त्यांनी त्यातला एकही गणपती पाहिला नव्हता. एक दीड तासाच्या गाडीतल्या प्रवासात 'अष्टविनायक दर्शन' पुस्तक वाचून त्यांनी लगेच ते गीत लिहीले होते!
या अजरामर प्रतिभेला श्रध्दांजली!
>> !!!!
श्रद्धांजली
खेबुडकरांना श्रद्धांजली.
खेबुडकरांना श्रद्धांजली.
जगदीश जींना श्रद्धांजली
जगदीश जींना श्रद्धांजली
जगदीश खेबुडकरांना
जगदीश खेबुडकरांना श्रद्धांजली!
काल आमची मुलगी "आठवणीतली
काल आमची मुलगी "आठवणीतली गाणी" साईट पहात होती, त्यामधे मी तिला खेबूडकरांची गाणी पहायला सांगितली. तिने त्यांचे पेज उघडले आणि म्हणाली त्यांच्या मृत्युची तारीख दिली आहे ३ मे २०११.
हे कळाल्यावर खुप वाईट वाटले. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा"
गदिमा, खेबूडकर, यांच्यासारखी गीते लिहिता यावीत असे वाटते, या जन्मात तरी शक्य दिसत नाहीये.
(No subject)
सांगलीला सिटी हायस्कूलमध्ये
सांगलीला सिटी हायस्कूलमध्ये मी शिकत असताना तिथे एका समारंभासाठी खेबुडकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. संध्याकाळची वेळ होती. त्यांनी भाषणाला सुरूवात केली . दोन्-तीन तास ते ओघवत्या शैलीत बोलत राहिले. तपशील आठवत नाही. पण खुप छान बोलले होते. अंधार पडला तरी ते बोलतच होते. मुले घरी का आली नाहीत म्हणून पालक शाळेत पहायला आले होते. पण मुलेसुद्धा चुळबुळ न करता मंत्रमुग्ध होऊन त्यांचे भाषण ऐकत होती.
आज ही वाईट बातमी आठवून त्यांच्या भाषणाची आठवण झाली.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
खरा तारा निखळला
खरा तारा निखळला
जगदीश खेबुडकरांना
जगदीश खेबुडकरांना श्रद्धांजली.
अपघाताच्या बातम्या वाचताना,
अपघाताच्या बातम्या वाचताना, त्यात आपल्या परिचिताचे नाव कधी असू नये असेच वाटत असते. पण आज मात्र मला एक वाईट बातमी ऐकावी लागली. माझा चुलत भाऊ, रजनीश उर्फ राजू शिंदे आणि त्याची पत्नी, काल रात्री वडखळ नाक्याजवळ अपघातात जागच्या जागीच दगावले. काकी महिनाभरापूर्वीच वारली. काका सावंतवाडीला हॉस्पिटलमधे अत्यवस्थ आहेत.
रजनीश आणि त्याचे कुटुंबीय मालवणहून परतत होते. तोच गाडी चालवत होता. बहुदा त्याला डुलकी लागली असावी. अपघातात गाडी झाडावर थडकली. त्यांच्या तीन मूलीदेखील सोबत होत्या. तिघी जबर जखमी झाल्या आहेत. मधली अतिदक्षता विभागात आहे. तिच्या खुब्याची हाडे मोडली आहेत. मोठी आणि धाकटी जखमी आहेत. पण शुद्धीवर आहेत. मोठी बँकेत आहे व एम बी ए करतेय. धाकटीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी माझी वहिनी गेली होती. काका येण्याच्या परिस्थितीत नाहीत.
आम्ही व त्या मुलींचे मामा, त्या तिघींना आधार देऊच. मधली, लवकरात लवकर बरी व्हावी हि सदिच्छा.
राजू वयाने माझ्यापेक्षा लहान होता. आपल्यापेक्षा लहान भावंडाच्या मृत्यूची बातमी ऐकण्याइतके दुर्दैवी काहि नाही. त्या दोघांना हार्दिक श्रद्धांजली.
खरंच दुर्दैवी घटना दिनेश..
खरंच दुर्दैवी घटना दिनेश.. फार वाईट वाटलं.
मुली आणि काका त्यातून लवकर सावरोत हीच सदिच्छा.
Pages