त्रिशूल बिल्डर्स : प्रशस्तिपत्र

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

hemant_1.jpg
मायबोलीवर जाहिरात करून मायबोलीला पाठींबा देणारे जाहिरातदार "त्रिशूल बिल्डर्स" यांच्याकडून आलेलं हे प्रशस्तिपत्र. मायबोलीवरची ऑनलाईन जाहिरात त्यांनी कुठल्याही वेबसाईटवर पहिल्यांदाच केलेली जाहिरात होती.

हेमंत बुद्धीवंत,
त्रिशूल बिल्डर्स,
राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार आणि इंदिरा गांधी सद्भावना पुरस्काराचे मानकरी.
trishul letter_sm.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अभिनंदन. मायबोलीची ब्रँड इक्विटी जबरदस्त आहे आणि ती अशीच उत्तरोत्तर वाढो ह्या शुभेच्छा.

मायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

त्रिशुल बिल्डर्स ने सचोटीने व्यवसाय करावा आणी योग्य रेट लावावे हिच अपेक्षा. Wink

अभिनंदन मायबोलीचे. Happy

असो. पण याच बिल्डरचा नुकताच कुटुंबात आलेला अनुभव मात्र वाईट आहे. त्यांच्या जाहीरातीवरच सावधानतेचा इशारा देणार होतो.

वा! जाहिरात क्षेत्रातही मायबोलीचा उत्तम ठसा उमटतो आहे हे प्रत्यक्ष जाहिरातदारांकडूनच कळल्यावर खूप आनंद झाला. या विभागात कार्यरत असणार्‍यांचे धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

व्वॉ ! मला व्यक्तीशः सांगायला खूपच आनंद होतो की, माझ्या २ मावसभावांनी त्रिशूलची "मायबोली" वर प्रकाशित झालेली जाहिरात पाहूनच त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि गुढी पाडव्या दिवशी कोंढवा-कात्रज बाय पासवर बांधण्यात येत असलेल्या "शालिनी हाईट्स" या त्यांच्या ११ मजली प्रकल्पात २ बीएचकेचा फ्लॅट बुक केला आहे. त्यानी (शैलेन्द्र पवार आणि दत्ता पाटील, कोल्हापूर - सध्या पुण्यात नोकरी) मला सांगितले की, "ज्याअर्थी आपल्या मायबोली अ‍ॅडमिन यानी त्रिशूलची जाहिरात स्वीकारली आहे, त्याचवेळी कंपनीची विश्वासार्हता अधोरेखीत झाली, म्हणूनच चटदिशी बुकिंगचा निर्णय घेतला".

प्रकल्पाच्या ठिकाणी जी किंमत सांगितली व करारात ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यानुसारच पेमेंटही स्वीकारले व त्या रकमेच्या अधिकृत पावत्याही मॅनेजमेन्टने नोंदणी करणार्‍यांना जागीच दिल्या, हेही विशेष.

'मायबोली' आणि 'त्रिशूल बिल्डर्स' यांच्या सर्व प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा !

हा सगळा बुध्दीवंत परीवार पुण्याला चिरपरीचीत आहे.

याच्या घरातल्या मातोश्री शालुताई बुध्दीवंत काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना १९७०- १९८० काळात मुलुखमैदान म्हणुन ओळखल जाई. त्यांचे काँगेस प्रचाराचे भाषण ऐकायला खुप गर्दी होत असे. माझ्या आठवणी प्रमाणे त्या नगरसेवीका पण होत्या.

आपल्या मायबोली अ‍ॅडमिन यानी त्रिशूलची जाहिरात स्वीकारली आहे, त्याचवेळी कंपनीची विश्वासार्हता अधोरेखीत झाली, म्हणूनच चटदिशी बुकिंगचा निर्णय घेतला>>>>
मायबोली अ‍ॅडमिन फक्त जाहीरात म्हणुन व एक उत्पन्नाचे साधन म्हणुन याकडे बघत असावे. विश्वासार्हता वगैरे कोण तपासते आहे? जाहीरात करणारा (वर्तमानपत्र, टीव्ही इ.) त्याला जबाबदार नसतोच.

असो. शक्यतो त्यांच्या इतर प्रोजेक्टचे काम किती झाले आहे? खरेच कराराप्रमाणे पझेशन मिळते का. चालु झालेले काम पूर्ण होते का याची स्वतः खात्री करुन घ्या व मग निर्णय घ्या असे माझे वैयक्तीक मत आहे.

Pages