त्रिशूल बिल्डर्स : प्रशस्तिपत्र

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

hemant_1.jpg
मायबोलीवर जाहिरात करून मायबोलीला पाठींबा देणारे जाहिरातदार "त्रिशूल बिल्डर्स" यांच्याकडून आलेलं हे प्रशस्तिपत्र. मायबोलीवरची ऑनलाईन जाहिरात त्यांनी कुठल्याही वेबसाईटवर पहिल्यांदाच केलेली जाहिरात होती.

हेमंत बुद्धीवंत,
त्रिशूल बिल्डर्स,
राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार आणि इंदिरा गांधी सद्भावना पुरस्काराचे मानकरी.
trishul letter_sm.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ज्याअर्थी आपल्या मायबोली अ‍ॅडमिन यानी त्रिशूलची जाहिरात स्वीकारली आहे, त्याचवेळी कंपनीची विश्वासार्हता अधोरेखीत झाली, म्हणूनच चटदिशी बुकिंगचा निर्णय घेतला >>> धन्य आहे!

जरा त्यांना गुगल करायला सांगा !

>मला सांगितले की, "ज्याअर्थी आपल्या मायबोली अ‍ॅडमिन यानी त्रिशूलची जाहिरात स्वीकारली आहे, त्याचवेळी कंपनीची विश्वासार्हता अधोरेखीत झाली, म्हणूनच चटदिशी बुकिंगचा निर्णय घेतला".

मायबोली प्रशासन कुठल्याही जाहिरातदाराची विश्वासार्हता पडताळून पहात नाही/पाहू शकत नाही. आणि समजा जरी पडताळून पाहिली तरी हा व्यवहार असल्याने एखाद्या व्यक्तीला अपेक्षेपेक्षा वेगळा अनुभव येऊ शकतो.

मायबोलीवरच्या किंवा कुठल्याही प्रकाशनात दिसणार्‍या जाहिराती हे उत्पन्न मिळवण्याचे साधन असते. जाहिरातदाराची विश्वसनियता तपासून पाहण्यासाठी नाही.

कुठलाही व्यवहार करताना घ्यायची योग्य ती काळजी मायबोलीवरच्या जाहिरातदारांबरोबर व्यवहार करतानाही घ्यावी हे उत्तम.

@ अ‍ॅडमिन, कांदापोहे आणि चाणक्य
~ सावध केल्याबद्दल धन्यवाद. अर्थात त्या दोघांनी (तसेच त्यांच्या आयटीतील आणखीन सहा लोकांनी) संबंधित बिल्डर आणि या क्षेत्रातील त्यांचा गतैतिहास निश्चितच अभ्यासला असणार. मला कळविताना दोघांनी मायबोलीवरील 'त्रिशूल" जाहिरातीचा उल्लेख केला होता. कदाचित 'मायबोली' विषयी वाटत असलेल्या आपलेपणामुळे येथील प्रत्येक बाबीचा त्यानी विश्वासार्हतेकडे संबंध जोडला असण्याची शक्यता आहे.

शेवटी घरबांधणीच काय तर जीवनातील हरेक गोष्टीत काही प्रमाणात 'रिस्क फॅक्टर' गृहित धरावाच लागतो. हांडेवाडी-उन्द्री परिसरातील "शालिनी लेक ह्यू" बांधकाम संदर्भात त्रिशूल बिल्डर्स आणि बुकिंग करणारी जनता यांच्यात 'तू-तू-मै-मै' होऊन प्रकरण कोर्टापर्यंत गेल्याच्या बातम्या/वदंता आजही चघळल्या जातात. तरीही श्री.हेमंत बुद्धीवंत यांच्या अन्य प्रकल्पाविषयी चांगले बोलणार्‍यांचीही संख्या काही कमी नाही. तेव्हा या व्यवसायातील दोन्हीकडील लेखाजोखा पाहून्/तपासूनच माझ्या भावांनी आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी फ्लॅट्स बूक केले असणार हे निश्चितच.

शेवटी अशा प्रकल्पांबाबत पुण्यातच काय पण इतरत्रही विश्वास हा ठेवावाच लागेल. पण या निमित्ताने त्रिशूल बिल्डर्स यानी आवर्जून मायबोलीवर पत्र प्रकाशित करून जो एक चांगला पायंडा पाडला आहे त्यावरूनही त्यांच्याबद्दल अनुकूल मत तयार होण्यास काही अडचण नसावी.

आशा आहे की, श्री.हेमंत बुद्धीवंत तसेच त्रिशूल संबंधित अन्य घटक 'मायबोली' वरील हा धागा व त्यावरील प्रकाशित झालेल्या उलट्यासुलट्या प्रतिक्रिया/मते वाचत असतील.

Pages