अगं आई...

Submitted by लाजो on 16 April, 2011 - 10:40

अगं आई,
आज दहा दिवस झाले गं....

बाबा म्हणतात, सावर गं पोरी, हे तर होणारच होतं कधी ना कधी....
त्याच्या हातात हुकुमाचा एक्का, डाव तर तोच जिंकणार... .फॅक्ट आहे गं साधी...

झालं ते भूतकाळात गेलं...पण तुझ्या सगळ्या छान छान आठवणी आणि अनुभव
मनात सांभाळुन ठेव आणि लेकीसाठी गोष्टीरुपात टिपुन ठेव....

पटतयं गं आई बाबांच म्हणणं ...तुम्ही नेहमीच आम्हाला धीर दिला...
पण मनाने तेही खचलेत.. कळतय की गं मला...

त्यांच्याशी फोनवर बोलताना, भावना अनावर होतात...
डोळ्यातुन आसवं बांध फुटल्यासारखी ओघळतात...

त्यांना त्रास नको म्हणुन सांगते सर्दी झालिये...
सध्या इथे थंडी खुपच वाढलिये...

त्यांना ही कळतं म्हणा माझं असं लपवणं...
विषय बदलुन कॉन्वर्सेशन दुसरीकडे वळवणं....

तरी बोलता बोलता एखादा हुंदका येतो...
पलिकडे त्यांचाही आवाज किंचित गहिवरतो...

तु घरात नसणं हे कधी अनुभवलच नव्हतं...
आणि आता तुझ्या शिवाय रीतं घर... काळीज पोखरतं...

तुझा हसरा चेहरा आता फक्त डोळ्यांत तरळणारं..
मायेने पाठीवर फिरणारा तुझा हात आता फक्त अठवणीत रहाणारं...

पण आई, तु काळजी नको करुस... आम्ही एकमेकांना आधार देऊ...
तु नसलिस तरी तु आमच्या सोबतच आहेस... हे कस बरं विसरु?

तु केलेले संस्कार, तुझे मार्गदर्शन ...
तु दिलेले प्रेम आणि कधी पकडलेले कान...

खुप काही अजुन शिकायच होतं गं तुझ्याकडुन...
तुला गोडं हसताना बघत रहायचं होतं मन भरुन...

अगं आई, तु जाऊन आज दहा दिवस झाले गं...
पण नभी टपोरी चांदणी होऊन परत येशिल ना गं????

Sad

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लाजो, तुला हे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो Sad (तू लिहिलेल्या ओळी आणि नीरजाचा प्रतिसाद वाचून डोळे पाणावले.)

तुम्हाला आणि बाबांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हे म्हणणे केवळ पोकळ सांत्वना आहे मला माहित आहे. हे दु:ख तुटलेल्या नाळेच्या दु;खासारखे. आता तुम्ही आणि बाबा खर्‍या अर्थाने पोरके झाले. आई कायम जवळच असते; शरीराने असो की मनाने. आता तुम्ही स्वतः आई नसलेल्यांच्या आई व्हा. तोच या दु:खातून आईला शोधण्याचा उपाय. विनम्र श्रद्धांजली.

लाजो, बरेच दिवसात तू माबोवर का दिसत नाहीएस हे मनात येत होतं आणि आत्ता हे वाचल्यावर समजलं!
तुझ्या आईला विनम्र श्रध्दांजली.

सगळ्यांचे आभार.

हळुहळु सावरतोय आम्ही सगळेच या धक्क्यातुन. बाबांची काळजी आहेच पण सध्या काही दिवस माझे काका (बाबांचे धाकटे बंधु) घरी आहेत बाबांच्या सोबतीला. काकाचा खुप आधार आहे त्यांना. आणि माझी मोठी बहिण पण येऊन-जाऊन आहे.

इथे लांब असल्यामुळे खुप एकटं आणि हेल्पलेस वाटतं अश्यावेळेस. इथे तुम्ही सर्वांनी दिलेला आधार खुप खुप मोलाचा आहे.

म्हणतात काळ हेच दु:खावर औषध आहे... खरच आहे का ते????

लाजो, आत्ताच हे वाचल्यावर समजलं ग Sad
तुझ्या आईला विनम्र श्रध्दांजली, काळजी घे बाबांची आणि तुझीपण .. बाकी काय सांगु ग....

लाजो.....स्वतःला सावर..... आणि बाबांना पण....!!
ईश्वर तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो !!
काळजी घे !!

Sad

तुझ्या आईला विनम्र श्रद्धांजली.
काळजी घे, स्वतःची आणि बाबांचीही.

लाजो, वाचून खरच खूप वाईट वाटलं. लांब राहात असल्याचं अशा वेळी खूप दु:ख होतं. धीर धरावा आणि शक्य होईल तेव्हा बाबांना भेटावं.

शब्द संपतात इथे.

आपल्या आईस माझी विनम्र श्रद्धांजली.
कठिण प्रसंग आहे. बाबांची काळजी घ्या.
देव आपल्या परिवारास ह्या दुखा तून बाहेर निघण्याची शक्ति प्रदान करो - ही प्रार्थना करतो.
- आ. निनाव.

माझी आई २१ अप्रिल २००८ ला गेली.... पण आम्हा चारी बहिणींच्या आठवणींत ती आहे.... तशीच तुझ्या आईलाही आठवणींतुन, तुझ्या आचार विचारातुन जागते ठेव.... लाजो ...... Sad

Pages