अगं आई...

Submitted by लाजो on 16 April, 2011 - 10:40

अगं आई,
आज दहा दिवस झाले गं....

बाबा म्हणतात, सावर गं पोरी, हे तर होणारच होतं कधी ना कधी....
त्याच्या हातात हुकुमाचा एक्का, डाव तर तोच जिंकणार... .फॅक्ट आहे गं साधी...

झालं ते भूतकाळात गेलं...पण तुझ्या सगळ्या छान छान आठवणी आणि अनुभव
मनात सांभाळुन ठेव आणि लेकीसाठी गोष्टीरुपात टिपुन ठेव....

पटतयं गं आई बाबांच म्हणणं ...तुम्ही नेहमीच आम्हाला धीर दिला...
पण मनाने तेही खचलेत.. कळतय की गं मला...

त्यांच्याशी फोनवर बोलताना, भावना अनावर होतात...
डोळ्यातुन आसवं बांध फुटल्यासारखी ओघळतात...

त्यांना त्रास नको म्हणुन सांगते सर्दी झालिये...
सध्या इथे थंडी खुपच वाढलिये...

त्यांना ही कळतं म्हणा माझं असं लपवणं...
विषय बदलुन कॉन्वर्सेशन दुसरीकडे वळवणं....

तरी बोलता बोलता एखादा हुंदका येतो...
पलिकडे त्यांचाही आवाज किंचित गहिवरतो...

तु घरात नसणं हे कधी अनुभवलच नव्हतं...
आणि आता तुझ्या शिवाय रीतं घर... काळीज पोखरतं...

तुझा हसरा चेहरा आता फक्त डोळ्यांत तरळणारं..
मायेने पाठीवर फिरणारा तुझा हात आता फक्त अठवणीत रहाणारं...

पण आई, तु काळजी नको करुस... आम्ही एकमेकांना आधार देऊ...
तु नसलिस तरी तु आमच्या सोबतच आहेस... हे कस बरं विसरु?

तु केलेले संस्कार, तुझे मार्गदर्शन ...
तु दिलेले प्रेम आणि कधी पकडलेले कान...

खुप काही अजुन शिकायच होतं गं तुझ्याकडुन...
तुला गोडं हसताना बघत रहायचं होतं मन भरुन...

अगं आई, तु जाऊन आज दहा दिवस झाले गं...
पण नभी टपोरी चांदणी होऊन परत येशिल ना गं????

Sad

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नमस्कार मंडळी,

तुमच्या सर्वांची आपुलकी आणि मला दिलेला आधार बघुन खरच खुप गहिवरुन आलं.

मायबोली हा नुसताच पब्लिक फोरम नाही तर एक मोठ कुटुंबच आहे ज्यात गरज पडेल तेव्हा सगळेच एकमेकांना मदत करतात, आधार देतात ही गोष्ट अगदी पूर्णतः पटली. धन्यवाद सगळ्यांना.

आता मी बरीच सावरल्येय. बाबाही आता बरे आहेत. त्यांनी देखिल तुम्हा सर्वांचे आभार मानले आहेत, मला सपोर्ट केल्याबद्दल.

भेटत राहुच.

लाजो

लाजो Sad

मी आज वाचलं हे सगळं... तू तिकडे लांब; ह्य बातमीला कशी सामोरी गेली असशील ह्याची कल्पनाच करवत नाहिये. पण सावरलीस हे वाचून बरं वाटलं. तुमच्या सर्वांच्या सोबत आई नेहमीच राहिल.

Pages