अभिनंदनीय कामगिरी व सन्मान

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2011 - 23:47

हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!

लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.

'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.

म्हणून हा धागा!

अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्‍या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================================================

प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!

यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.

मनःपुर्वक अभिनंदन!

कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.

कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अरे वा.. डॉक. तुमचे मनापासून अभिनंदन.. वाटणारा अभिमान आणी झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत हो!! स्मित

अगदी अगदी

सर्वांचे इष्ट नेहमीच चिंतिणार्‍या डॉ कैलासजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
वेळो वेळी स्वयं स्फूर्तीने त्यांनी अनेक दु:खिताना या मा बो वर सल्ला दिलेला आहे.पदोपदी त्यांचा सेवा भाव प्रदर्शित होतो व सज्जनपणाही.
हार्दिक शुभेच्छा अन पुढील वाटचालीसाठी ईश्वर चरणी प्रार्थना.
Happy

उत्तम गझल लिहिणार्‍या व सर्व वादांपासून दूर असणार्‍या डॉक्टरसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांना इतरही क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळोत ह्याच सदिच्छा!

कैलासजींचे अभिनंदन.
मायबोलीवरचे एक अजातशत्रू , प्रतिभासंपन्न, मनमिळावू, सहिष्णू व्यक्तिमत्व.
उत्तरोत्तर असेच पुरस्कार मिळोत हीच सदिच्छा.

Keep it up Doctor..................................

डॉक्टर.........तुमचं मनापासून अभिनंदन !!
ज्या क्षेत्रात जाल तिथे तुम्हाला असेच मानसन्मान मिळोत Happy

Pages