अभिनंदनीय कामगिरी व सन्मान

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2011 - 23:47

हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!

लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.

'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.

म्हणून हा धागा!

अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्‍या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================================================

प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!

यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.

मनःपुर्वक अभिनंदन!

कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.

कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

हार्दिक अभिनंदन कैलासदादा !
कालची पार्टी त्यासाठीच होती का? Wink

अवांतर : आता बघा कसे फोन येतात तुम्हाला पार्टीबद्दल ते Proud

डॉ. अभिनंदन.
आम्ही एक मेडीकल कॅम्प घेणार आहोत त्या निमित्ताने परवाच डॉक्टरांशी प्रत्यक्ष परीचय झाला. आमचा क्लब स्थापन झाला तेंव्हा मी डॉ. ना विचारल की तुम्ही आमच्या प्रोजेक्टसाठी काही मदत करु शकाल का ? तेंव्हा त्यांनी आमच्यापेक्षा जास्त उत्साह दाखवला.
डॉ. नुसते पेशा सांभाळत नसुन ते तितकेच समाजकार्यही करतात.
डॉ. तुम्ही परवा बोलला नाहीत ह्या अ‍ॅवॉर्डबद्दल ! अभिनंदन.

माणूस वाटतो भला पण 'मिजास'खोर गझल
माणूसकीच्या वाटेवर ही मिठासभरी मजल !

डॉकसाहेब, मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

डॉक अभिनंदन !
(ये तो होना ही था !)
कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!
Happy

गझलकार नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री यांचे आर्टिकल आजच्या पुणे सकाळमधील टुडे या पुरवणीतील फास्ट ट्रॅक या पानावर प्रकाशित झाले.

गेली अनेक वर्षे गिर्यारोहण करणार्‍या आनंदयात्रींचे हे 'दुर्ग दुर्गट भारी' आर्टिकल खचितच वाचनीय आहे.

आनंदयात्रींचे अभिनंदन!

-'बेफिकीर'!

Pages