अभिनंदनीय कामगिरी व सन्मान

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2011 - 23:47

हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!

लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.

'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.

म्हणून हा धागा!

अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्‍या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================================================

प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!

यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.

मनःपुर्वक अभिनंदन!

कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.

कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मायबोलीकर लेखक, गझलकार हबा व विशाल कुलकर्णी हे माबोवर लोकप्रिय तर आहेतच. पण माणसाचा जन्म मिळाल्याची सर्वात उत्तम परतफेड म्हणजे मानवता व सेवाभाव, या दोन आघाड्यांवरही त्यांनी मने जिंकली.

http://www.maayboli.com/node/27268

या कार्यात त्यांना अनेक माबोकरांचा व इतरांचा मनापासून सहभागही लाभला.

या संपूर्ण ग्रूपचे, त्यांच्या उत्तम कार्याचे व त्यातील प्रामाणिकपणाचे मनापासून अभिनंदन! ही एक अत्यंत अभिनंदनीय कामगिरी आहे. Happy

-'बेफिकीर'!

क्रांती सडेकर यांचे मनःपुर्वक अभिनंदन! जबाबदार गंभीर गझलकारा क्रांती यांच्या गझललेखनाला सतत असेच पुरस्कार मिळत राहोत ही प्रार्थना!

http://www.maayboli.com/node/30811

डॉ. कैलास गायकवाड यांचे अष्टपैलूत्व पुन्हा एकदा येथे नोंदवताना आनंद होत आहे. Happy

==============

नवी मुंबई मनपाच्या वर्धापन दिनीसादर केलेल्या नाट्याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

मनःपुर्वक अभिनंदन, मायबोलीकर डॉ, कैलास गायकवाड व त्यांचा विजेता संघ यांचे!

Happy

-'बेफिकीर'!

आपल्या सर्वांच्या लाडक्या गझलकारा प्राजक्ता पटवर्धन उर्फ प्राजू यांचा हा अल्बम प्रकाशित झाला

खूप खूप अभिनंदन प्राजू Happy

http://www.maayboli.com/node/33712

अरे वा! अभिनंदन डोक्स... Happy

रच्याकने भुंग्याला कसला अ‍ॅवॉर्ड मिळालाय? Uhoh
(स्वगतःबहुतेक सर्वोत्कृष्ट भ्रमर असा काहीतरी असावा Lol )

अभिनंदन प्राजु...

मराठी कवितेची पताका आपल्या रचनांतून अशीच फडकत राहो.

म्युझिक रीलीजची पार्टी वगैरे पण ठेवा जरा, पेज थ्री टाईप Wink Light 1

प्राजु, नचिकेत हार्दिक अभिनंदन Happy
बेफिकिर ,या धाग्याचे तुम्ही जनक म्हणून तुम्हाला थँक्स Happy

Pages