भेट..

Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 00:28

म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...>>>

व्वा!

ही काहीच्या काही कविता आहे???

कवितेची व्याख्या-वर्गवारी बदलली की काय हल्ली???
किंवा मग व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे शब्दांना स्वत:चं महत्त्व कळायला लागलं असावं...

असो. मला आवडली.. Happy

धम्माल!!

अवांतर : कविता काहीच्या काही आहे की काय हे ठरवण्याचे स्वातंत्र्य कवीलाच देण्यात यावे ह्या मतापर्यंत मी पोहोचलो आहे. आणि माझ्या कवितांच्या बाबतीत तो अधिकार मी स्वतः वापरायला सुरूवात केली आहे.

मुक्त,
भेट ! रियली ग्रेट. बस्स अजुन काय? खुप आनंद झला रचना वाचून. कविता "काहीच्य कांही" का अजून कांही? मला कळत नाही. पण आनंद किळाला हे खरे.

"उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता..."

नाही सांगता येणार म्हणून,
यातूनच बरंच काही सांगून गेली कविता
...... छान

सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार.. Happy

शेवटच्या ओळी हिंदीत आणि त्याआधीची जरा उडती रचना यामुळेच काहीच्या काहीत पोस्टावी वाटली मला.. Happy

किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं................. क्या बात है!!!!

उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है..... वाह.... !!!

खूप छान कविता. धन्यवाद Happy

खरंच लै च्य लै भारी... कै च्या कै मध्ये नकोच खरी!!!
सुंदर आहे कविता.
मुक्ता: तिथल्या गर्दीत तुमच्या डेफिनिशन प्रमाणे बर्‍याच कविता असतात की???

अरे ही छानच आहे......खरे तर काहीच्या काही मध्ये नसावी. पण तुम्हाला ठेवायची असेल तर राहू दे.....
<<किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,>> ही ओळ मस्त भाग पाडते कवितेचा.....
<<कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...>>
नेहेमीप्रमाणे शेवट मस्त केलात...... Happy

Pages