भ्रष्टाचाराच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा माहितीसाठी खालील लिंक पहा.
http://www.indiaagainstcorruption.org/
जन लोकपाल विधेयकावर आपल्या सुचना आपण या ब्लोगवर देउ शकता. अजुन काहि नंबर्/मेल मिळाले की इथे टाकतो!
http://www.indiaagainstcorruption.com/forum/showthread.php?t=11419&page=2
पंतप्रधानांना लिहिण्याचा मसुदा खालीलप्रमाणे. तो वरच्या साइटवरही मिळेल.
Mr. Chief Public Servant,
Manmohan Singh
We have suffered enough due to corruption. We are deeply hurt and disappointed with any lack of a real and meaningful solution from you and your government.
We want change, and we want accountability and we cannot wait any longer to have this! We will not vote for you if an effective anti-corruption bill is not enacted. Not the farce Lokpal Bill proposed by your government, but the peoples “Jan Lokpal Bill”. We want strict and effective punishment for the corrupt. They MUST go to jail! Or you Mr. PM, along with your party, will fall from the people’s grace. We assure you, stand by us, and we will stand by you. The opposite will also hold true.
Your government has appointed a GoM to draft the Lokpal Bill. This GoM includes -
Sharad Pawar,Veerapa Moily and Kapil Sibal. Mr. Pawar and Mr. Moily have a past of corruption and mis-deeds that the entire country if aware of. Mr. Sibal does not feel there was corruption in the 2G scam. Having these people draft the anti-corruption law – is it not an insult to the people of India? How can the corrupt be asked to draft an anti-corruption bill? We urge you to consider the choice put forth by the people – credible names such as Justice Santosh Hegde, Prashant Bhushan, Shanti Bushan and others, to be part of the committee to draft the Lokpal Bill.
Shri Anna Hazare, one of the Greatest Social Reformers India has ever seen has announced a Fast Unto Death beginning April 5th. His demands are extremely beneficial for the future of India. We urge you to immediately accept the demands of the people of India represented by the demands of Shri Anna Hazare lest the discontent among the people grows out of control.
The sentiments against rampant corruption in this country are quickly becoming as strong as those that led to the uprising in Tahrir Square. The honest and hardworking people of this country refuse to be innocent bystanders in the wholesale public looting that is taking place as you read this letter. We request your immediate and strong response to this concern of the people as corruption should be the top priority of your government. If the challenge is not met effectively and promptly, it has the potential of undermining every valuable effort made by upright citizens of this country over the last century - including you. It also has the potential of leaving your government with a legacy of shame.
Tahrir square can yet be a reality in India.
We trust you will take immediate steps to give us our solution, and not force us to take the above steps!
Citizen of India
क्रिकेट मॅच च्या धाग्यावर
क्रिकेट मॅच च्या धाग्यावर १०००+ प्रतिक्रिया होत्या ..
आणी इकडे १०० सुध्दा नाही..
ह्यावरन लक्षात येते.. लोकांना क्रिकेट ची गरज जास्त आहे.. भ्रष्टाचार चालायचा तो चालुदेत ह केअर्स
आवळा, अनुमोदन.. तसंही
आवळा,
अनुमोदन.. तसंही उद्यापासून IPL ची सोय केलेली आहे पवारांनी. मग हा धागा कुठे जाईल ह्याचा विचार न केलेलाच बरा..
भिब्ररांची पोस्ट पटली.
"दोन प्रकारचे भारतिय आहेत
एक रिस्पॉन्सिबल आणि दुसरे उत्सवी.."
क्रिकेट मॅच च्या धाग्यावर
क्रिकेट मॅच च्या धाग्यावर १०००+ प्रतिक्रिया होत्या ..
आणी इकडे १०० सुध्दा नाही..
---- मला काय त्याचे ?
स्वागत या इंडियन
स्वागत या इंडियन एअरलाईन्सच्या नियतकालिकात एक लेख छापून आलेला होता. ( मला आता त्याचा नेमका अंक सांगणे शक्य नाही ).
त्यात सीबीआय आणि दक्षता आयोगाच्या मर्यादा उघड केल्या होत्या. सीबीआय ने भ्रष्ट अधिका-यांविरूद्ध केलेल्या कारवायांपैकी ५५% कारवाया या त्या खात्याच्या वरिष्टांच्या परवानगीसाठी प्रलंबित आहेत. २०% कारवायांना संबंधित खात्याची परवानगी न मिळाल्याने त्या गुंडाळाव्या लागल्यात. उरलेल्या कोर्टात कशाबशा तग धरून आहेत.
दक्षता आयोगाला तर कारवाईचेही अधिकार नाहीत. ते बिचारे वेबसाईटवर भ्रष्ट अधिका-यांची नावे जाहीर करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत.
आमदार, खासदार आणि मंत्री यांच्याविरूद्ध गदारोळ होऊनही लवकर कारवाई होत नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती अशांच्या परवानग्या काढाव्या लागतात. कुणाकडे लिंक असेल तर द्या प्लीज...
या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आटोक्यात आणायला निघालेल्या पंतप्रधानांची कधी कधी दया येते.
( अण्णांच्या आंदोलनाबाबतही लिहीणार आहे... वेळ मिळाल्यावर )
पंतप्रधानांची कधी कधी दया
पंतप्रधानांची कधी कधी दया येते. <<< राजकारणी माणसं स्वतःसाठी नियम करणार.
अण्णांच्या आंदोलनाच्या
अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने लिबिया वगैरेसारखी क्रांती होईल का असा प्रश्न इथं विचारला जातोय..
भारताला खरच क्रांतीची गरज आहे का हा मुद्दा त्यासाठी विचारात घ्यावा लागेल. याची दोन उत्तरं येतील हे नक्की. म्हणजेच क्रांतीच्या मुद्द्यावर जनतेत एकमत होईलसं वाटत नाही. त्यातही ज्यांना क्रांतीची गरज आहे त्यांच्यात जागृती कितपत आहे , अशा घडामोडीत भाग घेण्याइतपत त्यांच्याकडं वेळ आहे का आणि मुख्य म्हणजे त्यांना व्यासपीठ / आवाज आहे का हे ही पहावं लागेल.
महाराष्ट्राबाहेर अण्णांना जी लोकप्रियता लाभल्याचं गेल्या दोन दिवसात दिसतंय त्यातल्या दोन टक्के लोकांना अण्णा आधीपासून ठाऊक असतील. बाकि मेडियाने अण्णांना उचलून धरल्याचं जाणवतंय. मेणबत्त्या लावून मोर्चा काढला वगैरे दृश्य वारंवार दाखवण्यात येताहेत. काल इंडिया गेटला या मोर्चात दीड हजार लोक्स होते तर आज तीन हजार होते.
अण्णांच्या आंदोलनाचं क्षेत्र मात्र संपूर्ण देशभर आहे पण त्याच्ञ व्याप्ती समाजाच्या सर्व थरात आहेच असंही म्हणता येत नाही. कदाचित ते पुढे झिरपूही शकेल.
मुद्दा असा आहे कि महाराष्ट्राबाहेरच्या पब्लिकने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आज अण्णांना डोक्यावर घेतलंय तो परिणाम तत्कालिक आहे का ? अण्णांची हुकूमत या मनांवर चालते का ? ( तुलना करायचा मोह आवरत नाही पण जसं बाळासाहेबांची हुकूमत शिवसैनिकांवर चालते ते उदाहरण आठवलं..)
अण्णांच्या मागे खरचं देश असेल तर अण्णांनी त्यांच्यापुढं ठेवलेलं ध्येय खूपच छोटं आहे असं म्हणावंस वाटतं. असो. क्रांती न सही भ्रष्टाचारही सही... !!
तिसरा दिवस संपत आला! अजुन
तिसरा दिवस संपत आला! अजुन सरकारचा माज उतरला नाहि!
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "लोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.
गंगाधर मुटे माहीतीबद्दल
गंगाधर मुटे
माहीतीबद्दल धन्यवाद आणि सहर्ष पाठिंबा !!!
सगळे आपआपल्या Blogs वर या
सगळे आपआपल्या Blogs वर या बद्द्ल लिहा google search मधे सगळे अण्णा दिसायला हवेत जगाला
मुटे धन्यवाद! उद्या(
मुटे धन्यवाद!
उद्या( शुक्रवारी) संध्याकाळी candle मार्च आहे बर्याच शहरात.
शुक्रवारच्या candle मार्च
शुक्रवारच्या candle मार्च साठीचे contact नंबर
नागपुर - अजय संधी - ९८२३९१९७६०
नाशिक - धीरज पाटील - ८८८८८४७७७७
पुणे - सोमाणी - ९७६४४४७१४१
पुणे - गीतेश देव्हाण - ९०२८४८५२६१
वसइ - अशोक वर्मा - ९३२०४७५०००
गणोबा.. ग्रेट !!
गणोबा.. ग्रेट !!
अजुन काहि शहरांचे आहेत.
अजुन काहि शहरांचे आहेत. थोड्या वेळात टाकतो!
सर्व लोकांनी लक्षात घ्यायला
सर्व लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे ही केवळ एक लढाई नाही, हा एक मोठा लढा आहे. वर्षानुवर्षे सुरू राहणारा, किचकट आणि सर्वांच्या सहनशक्तीची परिक्षा बघणारा. ही केवळ एक सुरूवात आहे. आपण सर्वचजण भ्रष्टाचाराविरुद्ध फक्त बोलतो पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपणही त्यात सहभागी असतो. काम लवकर होण्यासाठी, कोर्ट-कचेरी टाळण्यासाठी, सिलेंडर मिळविण्यासाठी ते अर्ज पुढे सरकवण्यासाठी आपण सर्वांनीच कधीना कधी पैसे दिले आहेत.
हा दोष आपला नाहीये. ही भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था आपल्याला सरळ मार्गाने गेल्यानंतर जो मनस्ताप देते कुणालाच नको असतो. पण आता वेळ आली आहे या सर्वांविरुद्ध ठाम उभे राहण्याची...
अण्णांनी दिल्लीतून जो लढा सुरू केला आहे त्याला देशभरातून केवळ नुसता पाठींबा देऊन उपयोग नाही. आपणही त्या लढ्यात सक्रीय भाग घेऊ शकतो. प्रत्येकजण दिल्लीला जाऊन लढा उभारू शकत नाही पण प्रत्येकाने आज शपथ घेतली की मी कुणालाही लाच देणार नाही, काम लवकर व्हावे म्हणून हात ओले करणार नाही, ट्रॅफिक पोलिसाला, सिलेंडरवाल्याला, रेशनकार्डवाल्याला, सरकारी कचेरीत चिरीमिरी देणार नाही तर प्रत्येकजण या लढ्यातला सैनिक होईल.
आज वाढत्या दबावासमोर सरकार नमते घेईल..कुटील डाव खेळण्यात तरबेज राजकारणी जनमानसाचा रेटा पाहून दोन पावले मागे जातील आणि वेळकाळ पाहून पुन्हा एकदा पुर्वपदाला येतील. त्यांना दोन नाही शंभर पावले मागे ढकलावे लागेल तर खर्या अर्थाने आपण देशासाठी काही केले असे होईल. हा भ्रष्टाचाराविरुद्धचा स्वातंत्र्यलढा आहे.
जो सरकारी कर्मचारी, पोलिस अथवा कुणीही लाच मागेल त्याचे नाव त्या विभागातल्या सामाजिक संघटनांना, गणेश मंडळांना कळवा. त्याचे नाव मोठ्या अक्षरात फलकावर झळकू दे..
काम काय होते आणि लाच किती मागितली त्याचा आकडा जाहीर होऊ दे...
रोज अशी यादी झळकायला लागल्यावर परिणाम दिसून येईलच...
आता भ्रष्टाचारविरोधात जनमानस तापू लागले असतानाच या गोष्टीचा शुभारंभ करणे योग्य ठरेल.
स्थानिक प्रसारमाध्यमांनीही यात मोठा वाटा उचलण्याची गरज आहे.
नुसते पाठींबा देऊन स्वस्थ बसू नका..सक्रीय लढा द्या...विजय आपलाच राहील
संयुक्त समितीसाठी सरकार तयार.
संयुक्त समितीसाठी सरकार तयार. पण अण्णा सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाहित!
येस आशु.. सहमत अण्णांच्या
येस आशु.. सहमत
अण्णांच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्यानंतर माझी त्यांच्याबद्दलची मतं बदलली. आदर निर्माण झाला.. त्यांचं म्हणणं हेच तर आहे. ( आपल्यापर्यंत ते येत नाही)
अण्णा हजारे आगे बढो.. हम
अण्णा हजारे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है!
'भ्रष्टाचारी' नही चलेगीSS...!
नही चलेगीSS..नही चलेगीSS
'भ्रष्टाचार' को हटाना है

देश को बचान है!
हे काहीसे आदर्शवादाकडे
हे काहीसे आदर्शवादाकडे झुकणारे आहे. पण कधी ना कधी...कुठे ना कुठे याची सुरूवात करावीच लागणार आहे...नाहीतर आहेच आपल्या बोकांडी बसलेला भ्रष्टाचार...
पण यातला आशावाद असा आहे की ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याने या सर्व परिस्थितीत सुधारणा घडवून आणायला सुरूवात झाली आहे. (अजूनही त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाहीये) त्याचप्रमाणे हे पाऊल हळूहळू स्थिर व्हायला लागेल तेव्हा त्याचे परिणाम दिसून येतील. तोपर्यंत सर्वांनाच चटके सोसावे लागणार आहे.
इथे प्रत्येकजण उद्याच्या उद्या एकदम निष्ठावान, निष्कलंक होऊन लाच देणे-घेणे प्रकार बंद करेल अशी अपेक्षाच नाहीये. पण किमान ज्यांना खरोखर कळकळ आहे त्यांनी तरी याची सुरूवात करावी. एकट्याने लाच दिली नाही म्हणून त्रास देणारे अधिकारी शंभर लोकांना त्रास देऊ नाही शकणार.
पुण्यातल्या काही स्वयंसेवी
पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी 8 एप्रिलला पुणेकरांनी एक दिवसाचं उपोषण करायचं आवाहन केलंय. प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार नाष्टा, दुपारचं जेवण. रात्रीचं जेवण यापैकी एक अथवा सर्व गोष्टी टाळून पुणे महापालिकेच्या दारात सुरू असलेल्या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलंय.
आणखी काहि नंबर औरंगाबाद - डॉ.
आणखी काहि नंबर
औरंगाबाद - डॉ. अर्चना अग्रवाल ९७३०७९२४०५
पणजी - नीरज प्रभू - prabhuniraj@gmail.com - ९०११०४३३८२
अमरावती - मुकुंद देशमुख -mukundraodeshmukh@gmail.com - ९६३७९२५०९५
मुंबइ - प्रफुल्ल वोरा - ०९८६७३३७३९
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24864
...........UDYAA. KONTAA
...........UDYAA. KONTAA SAAMANAAA JAAST BAGHNAAR.....?
GAMBHIR V/s DHONI
KI
ANNA V/s SARKAAR..........
अण्णांना भ्रष्टाचाराविरुद्ध
अण्णांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यात पुर्ण पाठिंबा.
मुटे अभिनंदन !
हीच वेळ आहे भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचार्यांना मुळापासुन उखडुन फेकण्याची.
अण्णांच्या लढ्याला
अण्णांच्या लढ्याला पाठिंबा!
आशुचँप, पोस्ट आवडली.
प्रत्येकाने आज शपथ घेतली की
प्रत्येकाने आज शपथ घेतली की मी कुणालाही लाच देणार नाही, काम लवकर व्हावे म्हणून हात ओले करणार नाही, ट्रॅफिक पोलिसाला, सिलेंडरवाल्याला, रेशनकार्डवाल्याला, सरकारी कचेरीत चिरीमिरी देणार नाही तर प्रत्येकजण या लढ्यातला सैनिक होईल. >> अनुमोदन
नाहीतर , चोरांनीच पोलीसांकडे तक्रार केल्यासारखे होइल.
अण्णांना पाठिंबा देणार्या
अण्णांना पाठिंबा देणार्या आपण सगळ्यांनी (त्यात देशभरातील इतर लोकही आलेच)
जर शपथ घेतली की भ्रष्टाचार्याला आम्ही मत देणार नाही , पण मतदान जरुर करणार
तरी हि संख्या बघता राजकारणी हालतील . ते सुधरतील असे नाही वाटत पण कुठेतरी
चलबिचल जरुर होइल.
आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण फार लवकर सगळं विसरुन जातो , कायदा होइल आणी
अण्णांनीच त्याचा पाठपुरावा करावा असे नको व्हायला.
एका मराठी माणसाने दिल्लीचे तख्त गदागदा हलविले आहे .
माझा पुर्ण support अण्णाना..
माझा पुर्ण support अण्णाना..
एका मराठी माणसाने दिल्लीचे
एका मराठी माणसाने दिल्लीचे तख्त गदागदा हलविले आहे . >>
अनुमोदन..
परत एकदा एक मराठी माणुसच अन्यायाविरुध्द आवाज ऊठऊ शकतो हे सिध्द झाले आणी सुरेश भटांची कवीता आठवली.. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी"
त्यावेळी लढाई परकीय शत्रु बरोबर होरी आता दुर्देवाने आपलेच लोक आहे दिल्लीत..
आशुशी पूर्ण सहमत. आज
आशुशी पूर्ण सहमत.
आज सकाळमध्ये अग्रलेखामध्ये अण्णांच्या मागण्यांची अवास्तवता सांगितली गेली आहे. त्याच्या बाजूलाच नामदेव ढसाळांचा लेख आहे त्यातही अण्णांच्या मागण्या घटनेला अडचणीत आणणार्या आहेत असा आशय आहे. यावर कुणी अधिक माहिती देईल का?
लोकपाल विधेयक संमत झाले तरी प्रत्यक्ष भ्रष्टाचार नियंत्रणात यायला असे अजून १० अण्णा हवेत हे अण्णांना एका क्लिकवर पाठिंबा देणारी आणि कधीही अशा उपोषणांचा अनुभव नसलेली समस्त नेटीझन युवा पिढी लक्षात घेईल ना?
Pages