जन लोकपाल बिल आणी अण्णा हजारेंचे आंदोलन

Submitted by चाणक्य. on 6 April, 2011 - 12:18

भ्रष्टाचाराच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा माहितीसाठी खालील लिंक पहा.

http://www.indiaagainstcorruption.org/

जन लोकपाल विधेयकावर आपल्या सुचना आपण या ब्लोगवर देउ शकता. अजुन काहि नंबर्/मेल मिळाले की इथे टाकतो!

http://www.indiaagainstcorruption.com/forum/showthread.php?t=11419&page=2

पंतप्रधानांना लिहिण्याचा मसुदा खालीलप्रमाणे. तो वरच्या साइटवरही मिळेल.

Mr. Chief Public Servant,
Manmohan Singh

We have suffered enough due to corruption. We are deeply hurt and disappointed with any lack of a real and meaningful solution from you and your government.

We want change, and we want accountability and we cannot wait any longer to have this! We will not vote for you if an effective anti-corruption bill is not enacted. Not the farce Lokpal Bill proposed by your government, but the peoples “Jan Lokpal Bill”. We want strict and effective punishment for the corrupt. They MUST go to jail! Or you Mr. PM, along with your party, will fall from the people’s grace. We assure you, stand by us, and we will stand by you. The opposite will also hold true.

Your government has appointed a GoM to draft the Lokpal Bill. This GoM includes -
Sharad Pawar,Veerapa Moily and Kapil Sibal. Mr. Pawar and Mr. Moily have a past of corruption and mis-deeds that the entire country if aware of. Mr. Sibal does not feel there was corruption in the 2G scam. Having these people draft the anti-corruption law – is it not an insult to the people of India? How can the corrupt be asked to draft an anti-corruption bill? We urge you to consider the choice put forth by the people – credible names such as Justice Santosh Hegde, Prashant Bhushan, Shanti Bushan and others, to be part of the committee to draft the Lokpal Bill.

Shri Anna Hazare, one of the Greatest Social Reformers India has ever seen has announced a Fast Unto Death beginning April 5th. His demands are extremely beneficial for the future of India. We urge you to immediately accept the demands of the people of India represented by the demands of Shri Anna Hazare lest the discontent among the people grows out of control.

The sentiments against rampant corruption in this country are quickly becoming as strong as those that led to the uprising in Tahrir Square. The honest and hardworking people of this country refuse to be innocent bystanders in the wholesale public looting that is taking place as you read this letter. We request your immediate and strong response to this concern of the people as corruption should be the top priority of your government. If the challenge is not met effectively and promptly, it has the potential of undermining every valuable effort made by upright citizens of this country over the last century - including you. It also has the potential of leaving your government with a legacy of shame.

Tahrir square can yet be a reality in India.

We trust you will take immediate steps to give us our solution, and not force us to take the above steps!

Citizen of India

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

india against corruption म्हणुन search करा. साइट ला काहितरी problem आहे.

खरंच, आण्णांना अनुमोदन..

मला एक प्रश्न पडतो - जसं विश्वचषकाच्या रात्री पूर्ण भारत जागा झाला होता, त्याच्या अर्धे तरी लोक आता उठून धावत येतील का आण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ?

भिब्ररा,
You said it ! Happy

उद्या सुट्टी तर मिळणार नाही, पण आण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उपवास नक्कीच पाळणार आहे. खारीचा वाटा.

अण्णांना माझ्या शुभेच्छा.

विश्वचषकाच्या विजया नंतर लाखो लोकं रस्त्यावर येतात आणि उत्साहाने विजय साजरा करतात, माझी काहीच तक्रार नाही. पण त्याच्या १० % जरी उत्साह भ्रष्टाचाराविरुद्ध दाखवला तरी देश कुठल्या कुठे जाईल. पण तसे होत नाही :अरेरे:.

एक प्रश्न पडलाय -
एवढ्या मोठ्या आंदोलनाबद्दल आजच्या 'सकाळ'मध्ये(६ एप्रिल) एकही बातमी नाहीये!! फक्त अवतीभवती मध्ये एक चिल्लर साईझची बातमी आहे, तीसुद्धा कोणितरी त्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी मोर्चा की काहीतरी काढल्याची!!

एका राष्ट्रीय वाहिनीवर खालील माहिती दिली आहे.

भ्रष्टाचारविरोधी लढ्यात आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर नेटवरून आपण अण्णांना पाठिंबा देऊ शकता.

manmohan@sansad.nic.in

या विरोपावर पंतप्रधानांना तुम्ही अण्णांना पाठिंबा असल्याचं कळवू शकता,

अधिक माहीतीसाठी..

http://www.indiaagainstcorruption.org/

इथं टिचकी मारा

भिब्ररा, ती आज गेलीय, बातमी काल सुरू झालेल्या आंदोलनाची हवी होती ना? इतरवेळी हे मारे भ्रष्टाचाराविरुद्ध आवज उठवतात, आघाडीचे वृत्तपत्र म्हणे!!
मला आश्चर्य एवढंच आहे, की अज्ज्जिबातच बातमी नाही दिसली... की मग आंदोलन फसवे आहे हे सकाळवाल्यांना आधीच कळले आहे?

माझ्या माहितीनुसार तरी सकाळ हा राष्ट्रवादी धार्जिना पेपर आहे. म्हणून चिल्लर भागात प्रकाशित झाली असावी.

मला आश्चर्य एवढंच आहे, की अज्ज्जिबातच बातमी नाही दिसली... की मग आंदोलन फसवे आहे हे सकाळवाल्यांना आधीच कळले आहे? >>>

आंदोलन पवांराविरुध पण होते ( एक मुद्दा होता) त्यामुळे सकाळमधे येणे शक्यच नाहि!

आनंदयात्री

पॉवर गेली म्हणजे पवार बाहेर पडले मंत्रीगटातून. आत्ता वाहीन्यांवर धमाल चाललीये. संपूर्ण देशातून अण्णांना सपोर्ट मिळतोय. राजकारण्यांना अण्णांच्या तंबूतून दिल्लीच्या तरूणांनी हाकललं. उमा भारतींना पण माघारी धाडलं.. खूप काही घडतंय..

पवार गेले ते अण्णांनी डागलेल्या तोफेने. पंतप्रधानांना त्यांनी लिहीलेलं पत्र वाचून दाखवत होते त्यात भ्रष्ट लोकच लोकपाल विधेयकाच्या मंत्रिगटात असतील तर चर्चा कुणाशी आणि कशी करायची हा आक्षेप त्यांनी नोंदवला होता.

पवारांनी राजीनामा दिल्यावर वाहीन्यांनी एकच गर्दी केली , तरूणांचा जल्लोष सुरू आहे. पहिली विकेट पडली वगैरे भाषा सुरू आहे.

अण्णांची प्रतिक्रिया

एक पवार गेले तर दुसरे येतील..

http://www.indiaagainstcorruption.org/ वर तयार मसुदा आहे पंतप्रधानांना पत्र पाठविण्यासाठी . तुम्हि तुमचे नाव टाकुन पाठवु शकता.

मी आताच मेल टा़कला!

गणू,
आपल्या पुढार्‍यांना मेल कसा चेक करायचा ते माहिती आहे का? Inbox कधीच flood झाला असेल त्यांचा. आणि सोनिया मादाम जेव्हा परवानगी देत असतील तेव्हाच मेल उघडले जात असतील असं का कोण जाणे वाटतंय.. Proud

जसे ईजिप्त, टुनिशिया, लिबिया ई. देशात झाले/होत आहे, मला वाटते आता हिच संधी आहे, भारतात पण भ्रष्टाचाराविरुद्द क्रांती व्हायला हवी.

इतरवेळी हे मारे भ्रष्टाचाराविरुद्ध आवज उठवतात, आघाडीचे वृत्तपत्र म्हणे!!
मला आश्चर्य एवढंच आहे, की अज्ज्जिबातच बातमी नाही दिसली...
----- पवारांच्या विरुद्ध सकाळ 'ब्र' काढणार नाही. त्यांचे बंधू (श्री प्रतापराव पवार) मालक आहेत.

उद्याचा सकाळ आणि त्यातली अण्णांच्या आंदोलनाबाबतची इशारो इशारोंमे ध्वनीत झालेली नाराजी वाचायला हवी..

विशेषतः पवारांची नाराजी, अण्णांचा दुराग्रह हे असे शब्द असले कि आपण किती सकाळमय झालोय याची पुन्हा पुन्हा खात्री पटत राहील

मला एक प्रश्न पडतो - जसं विश्वचषकाच्या रात्री पूर्ण भारत जागा झाला होता, त्याच्या अर्धे तरी लोक आता उठून धावत येतील का आण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ? >> अनुमोदन.

एव्हढेच काय विश्वचषक सामान्यासाठी २-३ धागे काढावे लागले अ‍ॅड्मीनला, बघु आता किती धागे निघतात.

बर्‍याच जणांना माहित असेल, तरीही जर भ्रष्टाचाराची आकडेवारी, अनुभव वगैरे पाहायचे असेल तर
इथे पहा. www.ipaidabribe.com/
हा तर फक्त सामान्य लोकांनी अनुभवलेला भ्रष्टाचार आहे, बाकी राजकारण्यांचा तर वेगळाच.

Pages