अ‍ॅण्ड्रॉईड आणि देवनागरी

Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35

हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अ‍ॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.

(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.

आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही जाणकारानी थोडी मदत करा. माझा nokia मॉडेल २७०० हँडसेट आहे. browser = opera mini आहे. गेल्या आठवड्यापासून नेटवरील सर्व देवनागरी ब्लॉग्जलिखाण नीट दिसत नाहीये(जोडाक्षरे वगैरे). त्यामुळे नीट वाचता येत नाहीये. माझ्या एका मित्राचाही सेम हँडसेट आहे नि त्यालाही सेम problem आला आहे. कांय गंडलं असेल??

Samsung Galaxy Pop
Android 2.2
मला काहीच करावे लागले नाही ... Happy

हैला, मस्त.
माझा Motoxine zn5 आहे. त्याआधी Nokia 7610 होता. आतापर्यंत मोबाईलमध्ये मराठी फाँट दिसण्यावरुन दोन्हीच्या सर्विस सेंटर्स नी पळवून लावलं होतं.
आतापर्यंत पीसी गंडला की बहिणीचा कीपॅड वर मराठी मुळाक्षरे असलेला सेल वापरायला लागायचा.
आता प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड!
थँक यू च!

तुम्ही फोन रुट केला तर मायबोलीच काय सगळ्याच भाषा (जगातील) दिसतील. अर्थात हा सोपा मार्ग आहे.

धन्यवाद आशिष, मी जरा आय फोन की ड्रॉईड ह्या द्विधा मनस्थितीत होतो. ड्रॉईड चांगला आहे असं एकून होतो पण मायबोली चालणार नाही म्हणून इच्छा होत नव्हती घ्यायची. Happy

स्यामसंग वेव्ह वर डॉल्फिन डिफॉल्त ब्रौझर आहे. त्यात माबो जोडाक्षरे सुटी दिसतात. आता बरहा साठी काय करावे बरे?

हेम, बहुदा २.२ नसेल तर दिसणार नाही (फ्रोयो किंवा जिंजरब्रेड ओ.एस.)
अपग्रेड केले नसल्यास करुन पहा.
रच्याकने - आधी निट दिसायचे?

हेम, मलाही तोच प्रॉब्लेम येतो आहे. माझा Nokia Express Music ५१३० आहे. डिफॉल्ट ब्राऊजर ऑपेरा मिनी आहे. त्याव्र देवनागरी आधी एकदम भारी दिसत होतं. गेल्या दहा-बारा दिवसांपासून भयानक देवनागरी दिसतंय. सगळी जोडाक्षरं सुट्टी सुट्टी... काने, मात्रे, वेलांट्या नाहीत. बरं, फोनमधे देवनागरी नीट टाईप करता येतं आहे, फाँटचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त ब्राऊजरवर देवनागरी नीट दिसत नाहीये. आपल्याला किंवा कोणालाही त्यावर काही उपाय मिळाल्यास कृपया माझ्या विपूत कळवा, धन्यवाद. Happy

हुर्रे...... जमलं!

हेम, ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमधे opera:config टाकून पुढे आश्चिगने लिहिलंय तसं करा, सेव करा. मराठी फाँट्स पूर्ववत दिसताहेत. फक्त फाँट साईज आधीच्यापेक्षा मोठा आहे, पण चलता है. बहुतेक पेज साईज पण मोठी होतेय त्यामुळे, हिस्टरी वारंवार डिलीट करावी लागेल. पण हरकत नाही.

बाजो, मी काहीतरी चुकीचं लिहित असेन कदाचित, कारण सेटींग्जमधे फाँट साईज स्मॉल आहे, पण तरीही आधीच्यापेक्षा मोठा दिसतोय. बहुतेक फाँट टाईप आधीपेक्षा बदलला असणार. असो, आपल्याला हवं ते झाल्याशी कारण... Wink

हेssssss धंदर ततर धंदर ततर.......
जमलं.. धन्यू आशिष नि मंजू!!! फक्त फॉंट बदललाय...पण ओके!!
address bar मध्ये असलेला www सुद्धा खोडून टाकला नि opera:config type केलं!!!

Pages