अ‍ॅण्ड्रॉईड आणि देवनागरी

Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35

हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अ‍ॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.

(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.

आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होईल शक्य........जरा वेळ लक्ष देउन केलेस की होईल..... मला सुध्दा आधी त्रास होत होता.आता एकदम फास्ट टाईप करता येते...ड्बल किबोर्ड असल्याने फक्त "प" जास्त वेळ दाबल्यावर "फ" होतो.......हे लक्षात ठेवायचे... म्हणजे सारखा किबोर्ड बदलावा लागत नाही

येस बर्‍याच अक्षरांच्या बाबतीत तसे आहे, जरा जास्त वेळ की प्रेस केली की पुढचे ऑप्शन्स येतात.

तुमच्या फोनवर अँड्रॉइड आहे का? मला वाटते जावा आहे स्टारवर. मराठी कीबोर्ड असेल तर पाय मोडण्याची की आहे एक त्यात.

अन्ड्रॉईड असेल तर गूगल प्ले वरून व्हायलाच हवं. बाहेरून .apk फाईल मिळवली असेल तर ती लोड होण्यासाठी 'एक्स्टर्नल सोर्सेस कडून येणारी अ‍ॅप्लिकेशन' असा ऑप्शन 'अ‍ॅक्सेप्ट' करा.
हे करूनही झालेच नाही, तर तुमच्या स्पेसिफिक टॅबवरच्या सेटिंग मधे काही बदल झाले असतील तर पहायला हवे. टॅब घेतला तिथे दुकानात दाखवलेत तर फायदा होईल.

ओ महेश,

multiling keyboard and myalpha या दोन गोष्टी बाडावर इन्स्टॉल करता येतील का?

माझ्या नोट २ वर काही न करता वाचता येतेय युनिकोड.
पण लिहिता यावे यासाठी किती नंबरच्या पानापासून वाचू?

Settings -> Language & Input ->Tap on Android keyboard.
then tap on Input languages.

you will see many languages with check boxes. English (UK) or (US) is selected already. scroll down and check hindi, or marathi if your phone has it.

now you can select devnagri input while typing in ANY place where you need to type. like sms, notes, explorer etc.
just long tap the space bar.

नी, शक्यच नाही Happy इथेच वरती सॅमसंग टॅब२ चा कीबोर्ड डकवला आहे, तो स्क्रीन कॅप आहे. तिथेच पाहून कृती लिहिली आहे.

नी, you need to add a new keyboard. To do this, go to the settings of the phone, then select the options for the keyboard and then add, hindi or devnagari keyboard. Then save it. Once this is done then you will see a globe icon on the keyboard when keyboard appears at the time of text entering. When you tap that globe key the keyboard will then toggle between Hindi/Devnagari and English... hope this helps you.

Sorry for the EN, I typed this from iPhone...

<< इथेच वरती सॅमसंग टॅब२ चा कीबोर्ड डकवला आहे >>

टॅब२ वर असेल, पण नोट २ साठी मराठी/हिंदी लँग्वेज किंवा किबोर्ड मलाही अजून सापडले नाहीत. (माझा नोट२ उसगावातला आहे.)

वाचता मात्र येतं मराठी. आणी कॉपी/पेस्ट पण करता येतं.

त्या संपूर्ण बाफवर मराठी किबोर्ड कुठून आणायचा हे सापडले नाही.

योगेश, मला >> then select the options for the keyboard and then add, hindi or devnagari keyboard. <<
हे असे काही ऑप्शन्स मिळतच नाहीयेत.

नीधप पहील्याच पानावर अॅप्लीकेशन चे नाव लिहीले आहे... MULTILING KEYBOARD & MYALPHA हे दोन अॅप्लिकेशन डाऊनलोड करा... आणि नंतर...किबोर्ड सेटींग मधे जाऊन किबोर्ड बदलून MULTILING keyboard select करा

विलायती,
तुमचे खूप आभार. तुम्ही सांगितलेला कीबोर्ड उतरवून घेतला प्लेस्टोरमधून आणि यायला लागले की देवनागरी लिहीता... Happy

Euh!... म्हणजे, बिल्ट इन मल्टीलिग्युनल किबोर्डस आयओएस वरच फक्त उपलब्ध आहेत की काय?

नाही योगेश. मी वरच बिल्टिन कीबोर्डचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. इट्स अँड्रॉईड यू क्नो Wink बिसाईड्स यू डोन्ट नीड आय टून्स टू यूज इट Happy

Pages