चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १

Submitted by गजानन on 19 December, 2010 - 12:14

बर्‍याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

===========================
नंद्याने या धाग्यावरच्या ज्या पोस्टींमध्ये चीजांचे दुवे आहेत अशा पोस्टी शोधून काढलेली ही यादी -
यापुढे ही यादी अपडेट करत राहू.

पान ३:
लट उलझी सुलझा जा बालम-झिला खान (विलायत अली खाँ साहेबांची मुलगी)
दोन-तीन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक ब्लॉग्ज
गुलाम अली खांच्या आणि बशीर अली माही : जंगल भैरवी (म्हणजेच सिंध भैरवी का?) - नैना मोरे तरस गये आजा बलम परदेसी रे
बडे गुलाम अली खां : राग भैरवी - बाजूबंद खुल खुल जाए
भुवनेश कोमकलीच्या आवाजात सावरे ऐजय्यो
राग केदार : पिहरवा घर आओ. - बागेश्री
पान ४:
पंडित छन्नुलाल मिश्र (होरी) - खेलैं मसाने में होरी दिगंबर खेले मसाने में होरी
रचना : परवीन शाकिर, स्वर : बल्किस खानुम गोरी करत सिंगार
गिरीजादेवी : दादरा - गंगा-रेती में बंगला छबा मोरी राजा आवै लहर जमुने की
पान ५ :
रंग जीन डारो
काफी - अभिषेकी बुवांच्या आवाजात - काफीतली चीज.
राग देस - मालिनी राजूरकरांची होरी
पान ६ :
अबदुल करीम खाँच्या आवाजात - जमुना के तीर
पान ७ :
बेगम अख्तर : दादरा - ओ बेदर्दी सपने में आजा
जोहराबाई आग्रेवाली - कोयलिया कूक सुना दे
गिरिजादेवी : भैरवी ठुमरी - नाहक लाए गवनवा
चंद्रकंस - १,
पान ८ :
चंद्रकंस - २
काही दुर्मिळ चीजा
किशोरीताईंच्या आवाजात - गौड मल्हार
दाद यांची पोस्ट
गणपती भटांचा हंसध्वनी
बेगम अख्तर - पपीहा धीरे धीरे बोल
पान ९ :
यमन - ए री आली पिया बिन - लता मंगेशकर
पान १० :
नुसरत फतेह अली खां (उस्ताद रशीद खां यांच्या आवाजातही) : मिश्र काफी - किरपा करो महाराज मोइनुद्दीन
मारवा- (हे शब्द आहेत वसंतरावांच्या मारव्याचे) मदमाती चली चमकत दामनीसी |
श्री रागामधली द्रुत त्रितालामधली ही बंदिश कुमाजींनी अत्यंत भावदर्शी गायली आहे.
इतना तो करना स्वामी, जब प्रान तन से निकले -- शौनक अभिषेकींनी गायलेल
इतना तो करना स्वामी अभिषेकी बुवांच्या आवाजात

* * * * *

पान ११:
D V Paluskar : तिलककामोद
तिलककामोद मधील 'सूर संगत रागविद्या' अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांच्या आवाजातील
कबीराची सुंदर रचना....पं कुमार गंधर्वांच्या सुवर्णकंठातून ऐकली आहे.
डी व्ही पलुस्कर - कोमल रिषभ आसावरी
पं. रामाश्रेय झा यांची एक सुंदर रागमाला शुभा मुद्गलांच्या आवाजात
उस्ताद रशीद खां : भैरवी - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पान १२:
गुणकली
आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव : गुजरी तोडी - मन के पंछी भये बावरे
संजीवच्या आवाजात हंसध्वनी इथे ऐका
रशीदखाँची यमनातली - 'आओ आओ आओ बलमा' पण अप्रतिम आहे.
राग तिलंग : ठुमरी सजन तुम काहे को नेहा लगाये
मालिनी राजूरकर - भैरवी फुल गेंदवा अब ना मारो
शोभा गुर्टू : विभासआ जा रे मीत पिहरवा
राग देसः संजीव अभ्यंकर - नैनन मे छबि छायी सजनी |
पान १३:
निर्मला देवी व लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात : नैना मोरे तरस गये री श्याम
सविता देवी ( सिध्देश्वरी देवींच्या सुकन्या) यांच्या आवाजातील ही ठुमरी पड गैली नैहरवा में दाग धुमिल भइली चुनरिया
डॉ. अनिता सेन यांच्या आवाजातील चैती माणिक हमरो
बोल गुणिदास यांचे, म्हणजेच पं. जगन्नाथबुवा पुरोहित - 'आई शपथ' सिनेमातली एक सुंदर बंदिश.
गोरख कल्याण -संजीव अभ्यंकर
निर्मला देवी / निर्मला अरुण पहाडी - ठुमरी
पान १४:
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या आवाजात राग : मिश्र तिलक कामोद
ठुमरी : सैंय्या जी बैरन रतियां

राग : इराणी भैरवी
कबीराचे पंडित कुमार गंधर्व व श्रीमती वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातील निर्गुणी भजन
आशाताईंच्या आवाजात मीराबाईंचं भजन
भीमसेन जोशींचा एक मस्त दुर्गा
मुनावर अली खान यांच्या आवाजात ठुमरी : राग - पहाडी, दादरा
पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या आवाजात राग बिहारी
संजीव अभ्यंकर राग : जौनपुरी
अश्विनी भिडे-देशपांडेंचा एक मस्त यमन
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी यांची जुगलबंदी : कजरी
रशीद खाँ यांच्या आवाजात ही ठुमरी : निस्सार हुसैन खाँ यांच्या आवाजात : राग : मिश्र पिलू
पं. कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजात : राग भूपाली, तीनताल
पं कुमार गंधर्वांनी गायलेली अजून एक बंदिश : राग : नंद, तीनताल
हे मीराबाईंचे भजन भीमसेनजींच्या आवाजात : राग : पटदीप
पान १५:
एरी मोरी आली पिया घर आए.
गिरिजादेवींच्या आवाजात : राग मालकंस
अण्णांच्या आवाजात बाबूल मोरा
केसरिया बालम आवो नीं
संजीव अभ्यंकर - ऋतुरागरंग= बसंत, मल्हार, रागमाला
शोभा गुर्टूंनी गायलेलं केसरिया बालम ,
रंग रंगीला बदरा मोरा उस्ताद रशीद खाँ ,यात्रा अल्बम ,
कहूँ कैसे सखी मोहे लाज लगे उस्ताद रशीद खाँ , मिश्र मल्हार , ''नैना पिया से'' अल्बम ,
होरी गिरिजादेवींच्या आवाजात ,
जोगिया मेरे घर आये पं राजन साजन मिश्रा.. राग ललत ,
भैरव ,
राम निरंजन न्यारा रे पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
माया महाठगिनी हम जानी पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
तोडीमधलं 'तू है मेरा प्रेमदेवता' ,
कुमार गंधर्वांशी गप्पा ,
पान १६:
चैती बरवा कलापिनी कोमकली यांच्या आवाजात ,
झिनी चदरिया कलापिनी कोमकली यांच्या आवाजात,
उस्ताद आमीर खाँ साहेबांच्या आवाजात राग ललत ,
नैहरवा हम का न भावे, न भावे रे संत कबीरांची कुमार गंधर्वांच्या स्वरातील एक अजून निर्गुणी रचना ,
गगन की ओट निशाना है जगजीत सिंग यांच्या आवाजात संत कबीराची ही एक निर्गुणी रचना ,
गले बिच सेली मधे 'सेली' चा काय अर्थ असावा ,
बैरी जा बैरी जा जा जा जा बैरी जा शोभा गुर्टू ,
कुमार गंधर्वांच्या आवाजात - कबीराचे 'कौन ठगवा नगरिया' हे निर्गुणी भजन
पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात ही भैरवी - बांट चलत नयी चुनरी रंग डारी
पं अजय पोहनकरांच्या आवाजात राग बागेश्री - सखी मन लागे ना
जगजीत सिंग यांच्या आवाजात -दीनन दु:ख हरन देव संतन हितकारी
साजन मिश्रांच्या आवाजात - जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले
पं राजन साजन मिश्रा - ए जननी मैं न जिऊं बिन राम
पान १७:
उस्ताद नासिरुद्दीन सामी यांच्या आवाजात - राग तोडी : अब मोरी नैय्या पार करोगे
अजय चक्रवर्तींची एक भैरवी-याद पिया की आये
याद पिया की आए :
अजय चक्रवर्तींची, वडाली बंधूंची, बडे गुलाम अलीं, कौशिकी चक्रवर्ती, शोभा गुर्टूं , मीराबाई की मल्हार पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात , दयाघनाची मूळ बंदिश रसूलिल्लाह
स्वाती कानेटकर , रंग ना डालो श्यामजी
कलापिनी कोमकली : राग सोहनी , झीनी चदरिया
कलापिनी कोमकलींचंच हे निर्गुणी भजन , झीनी चदरिया मूळ भजनाचे शब्द
सुने री मैंने निर्बलके बल राम
डी एस पलुस्करबुवांच्या आवाजात सूरदासांची ही अजरामर रचना ,
पं भीमसेन जोशींच्या आवाजात : राजस सुकुमार
रसूलिल्लाह
मूळ हृदयनाथ मंगेशकर, लताताईंच्या आवाज , सांझ भयी घर आवो
सिध्देश्वरी देवी , लगन बिन जागे ना निर्मोही
भजन कबीराचं आहे. राग : हंसध्वनी, केहरवा ताल. आर्या , संजीव, लगन बिन जागे ना
अश्विनी भिडे देशपांडेंच्या आवाजात , वही जाओ जाओ जाओ बलम
मालिनीताई राजूरकर, मिया की तोडी : लंगर कंकरिया जी न मारो
पद्मावती शाळिग्राम, पं भीमसेन जोशीं, भीमसेनजी आणि उस्ताद रशीद खाँ , राग : देशकार/ देसकार : हूँ तो तोरे कारन जागी
उस्ताद रशीद खाँ , पं मल्लिकार्जुन मन्सूर , राग : बसंत : पिया संग खेलूँ खेलूँ होरी
उस्ताद रशीद खाँ , उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ , आज आये शाम मोहन
गणपती भट , सुनता है गुरू ग्यानी राहुल देशपांडे
पान १८:
सुनता है गुरु ग्यानी' चे शब्द आणि कुमार गंधर्वांच्या आवाजातील दुवा - सुनता है गुरु ग्यानी -
डी व्ही पलुस्कर बुवांच्या आवाजात तुलसीदासाचं सुंदर भजन - कहां के पथिक कहां कीन्हो है गवनवा
- भोला मन जाने आणि अवधुता कुदरत की गत न्यारी
अजय चक्रवर्तींचा काफी - जा रे जा रे जा रे जा कोयलिया
पं. कुमार गंधर्वांचा राग गौरी बसंत - आज फेरिले / पेरिले गोरी
गुरू नानकांची शबद रचना (गायक पं. राजन साजन मिश्रा) - जगत में झूठी देखी प्रीत
- अवधूता कुदरत की गत न्यारी
विदूषी प्रभा अत्रे- यमन - विलंबित- मन तू गा रे हरीनाम, द्रुत- लागी लागी रे हरीसंग
कजरी - शोभा गुर्टू - तरसत जियरा हमार नैहर
उस्ताद रशीद खाँ : राग पिलू - अब मान जाओ सैंय्या
पं अजय चक्रवर्ती व कौशिकी चक्रवर्ती - वैष्णव जन तो तेने कहिये
पं. भीमसेन जोशी : छाया मल्हार - बदरिया बरसन लागी उमड घुमड कर (गिरे)
पं. भीमसेन जोशी - बीत गये दिन भजन बिना रे
पं. भीमसेन जोशी : राग तोडी - ए री माई आज शुभ मंगल गावो
एम एस सुब्बलक्ष्मी, वाणी जयराम, लता मंगेशकर - श्याम मने चाकर राखो जी चाकर रहसूं बाग लगासूं
गंगूबाई हंगल - मिया की मल्हार - कहे लाडली लाड लडायी बरखा ऋत
पं. भीमसेन जोशी - मिया की मल्हार - करीम नाम तेरो
पान १९:
बडे गुलाम अली खाँ साहेबांची देसी रागातली चीज - जा रे कागा जा
बदर-उझ-नझम आणि कमर-उझ-नझम यांच्या आवाजातजमुना के तीर
पं भीमसेन जोशीं : राग भीमपलासी - ब्रिज में धूम मचावे कान्हा
संजीव अभ्यंकरः पूरिया कल्याण - विलंबित - अंधियारा कर दो उजाला, द्रुत - दिन रैन कछु न सुहावे
शौनक अभिषेकी - शिव तांडव स्तोत्र
अश्विनी भिडे-देशपांडे : राग मधुवंती - शिव आद मध अंत बलवंत जोगी
उस्ताद रशीद खाँ : राग बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगरा/डा प्रीतम प्यारे
पाकीस्तानी गायीका नयारा नुर
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - पायलिया झनकार मोरी
पं.जसराज भजन
उस्ताद रशीद खाँ : बिहागआली री अलबेली सुंदर नार
पं कुमार गंधर्व : मियां की मल्हार - विलंबित एकताल- करीम नाम तेरो, मध्यलय तीनताल - बोल रे पपैहरा
पं अजय चक्रवर्ती - जमुना के तीर
अश्विनी भिडे-देशपांडें (मीराबाईंचं भजन) - मेरे राणाजी, मैं गोविन्द-गूण गाना
डी व्ही पलुस्कर (कबीराचे भजन)भजो रे भैया राम गोविंद हरी
डी व्ही पलुस्कर, मुनावर अली खाँपग घुँगरू बांध मीरा नाची रे
उस्ताद रशीद खाँ : राग हंसध्वनीलागी लगन पती सखी संग
पान २० :
शोभा गुर्टू - सुनो सुनो सुनो रे दयाल म्हारी अरजी
माणिक वर्मा - जमुना के तीर
फतेह अली खान - पिया नही आए आए सखी
उस्ताद बडे गुलाम अली खाँ, मुनावर अली खाँ (मुघले आझम चित्रपटातील) : सोहिनी - प्रेम जोगन बन के
पं कुमार गंधर्व : शिवमत भैरव - अरी एरी माई मै
पं अजय पोहनकर - दरबारी कानडा - किन बैरन कान भरे
उस्ताद फतेह अली खान : राग : दरबारी कानडा - नैन सो नैन मिलाये रख लीजो
उस्ताद नजाकत अली - सलामत अली खाँ, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, बिल्किस खान्नुम - अनोखा लाडला ए मा
पं जसराज - अनोखा लाडला

कुमार गंधर्व - भैरव - ऋत आयी बोले मोरा रे

कुमार गंधर्व - कबीराची निर्गुणी रचना - उड जायेगा हंस अकेला

* * * * *
पान २१ :
उस्ताद सलामत अली खान : भैरवी ठुमरी - शापमोचन कलियन संग करता रंगरलियाँ
पं जसराज, उस्ताद रशीद खाँ - जा जा रे जा (ओ) कागवा
मालिनी राजूरकर : टप्पा काफी; ताल : पंजाबी (पश्तो) - माधो मुकुंद मुरारी
मालिनीताई राजूरकर - राग काफी - चांडो चांडो छैला मोरी बैय्यां
पं राजन साजन मिश्रा - राग अडाना - तान कपतान (कप्तान) कहां गयो
आरती अंकलीकर टिकेकर, सावनी शेंडे, आरती नायक, जानकी अय्यर (''सावली'' चित्रपटातील) - साँवरियां घर नही आये, घनन घनन घन गरजत आये, सुर जन सो मिला दे मैं को
शुभा मुद्गल : संत कबीर यांचे एक भजन - दुलहनी गावहु मंगलचार
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - खुश रहे सनम मोरा
उस्ताद रशीद खाँ : राग छायानट - झनन झनन झन नन नन नन नन
कुमार गंधर्वांवरील एक डॉक्युमेंट्री - कोई सुनता है - जर्नी वुईथ कुमार अ‍ॅन्ड कबीर
उस्ताद रशीद खाँ - राग देस - नादान जियरा गुम गयो रे
उस्ताद शाहिद परवेझ (सतार) व उस्ताद रशीद खाँ - करम कर दीजे ख्वाजा
श्रुती सडोलीकर : कुंभनदासांची रचना : हवेली संगीत - सखी बूँद अचानक लागी
श्रुती सडोलीकर - राग पटदीप - होरी खेलत बहार
पं छन्नुलाल मिश्रा - चैती - सेजियां से सैंया रूठ गईलो हो रामा
गिरिजा देवी - बरसन लागी बदरिया, रुमझूमके

पान २२ :
गिरिजा देवीं - बनारसी दादरा - दीवाना किये श्याम क्या जादू डारा
पं. डी व्ही पलुस्कर - अखियाँ हरीदर्शन की प्यासी
उस्ताद रशीद खाँ : भैरवी - मीराबाईंचं सुंदर भजन - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पं अजय चक्रवर्ती - राग कलावती - मेरा मन हार रसमत
उस्ताद रशीद खाँ - दरस देओ बलमा मोरा
पं डी व्ही पलुस्कर - राग विभास / बिभास - कैस कुमरवा जायल हमरा
अश्विनी भिडे देशपांडे : राग जौनपुरी - पायल बाजन लागी रे मोरी
पंडित भीमसेन जोशी : राग केदार - सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर
पंडित भीमसेन जोशी : भैरवी - बोले ना वो हमसे पिया संग
पंडित भीमसेन जोशी : केदार (विलंबित) - सोहे लराई माई बनरा जाने आवन ऋतु
पंडित भीमसेन जोशी - राग : यमन कल्याण - काहे सखी कैसे की करीये(विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया
पान २३ :
उस्ताद रशीद खाँ - राग : चारूकेशी - पलक न लागी मोरी गुइयां
शुभा मुद्गल - मीराबाईचं हे भजन - बंसीवारा आज्यो म्हारे देस
बडे गुलाम अली खान/भीमसेन जोशी/लता मंगेशकर/मुनावर अली खान/फरीदा खान्नुम - बाजुबंद खुल खुल जा
बडे गुलाम अली खाँ - राग : मेघ - मोरे मंदर अब आओ साजन
सलामत अली खान - ठुमरी राग : पहाडी - तोरे नैनोंने जादू किया मोरे सांवरियाँ
सिप्रा बोस - दादरा राग : पहाडी - चले जै हो बेदर्दा हम रोए मरी है
किशोरी आमोणकर - ठुमरी राग : पहाडी - सावन की ऋतु आयी री सजनीया
पं भीमसेन जोशी/सुब्बलक्ष्मी - संत पुरंदरदासांचे प्रसिध्द कानडी भजन - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
पंडित भीमसेन जोशी / पं जसराज - राग : मधुवंती - काहे मान करो सखी री अब
अश्विनी भिडे देशपांडे - सूरदासांचं भजन - सुंदर वदन सुख सदन श्याम को निरख नयन मन ठाग्यो
पं कुमार गंधर्व - राग मालावती - मंगल दिन आज बन्ना घर आयो
गिरिजा देवी - कजरी - पिया नही आये काली बदरिया बरसे
गिरिजा देवी - झूला - सिया संग झूले बगिया में राम ललना
गिरिजा देवी - होरी - रंग डारूंगी नन्द के लालन पे
कलापिनी कोमकली - चैती - पतिया न भेजे हो रामा
पं भीमसेन जोशी - मीराबाईंचं भजन - चलो मन गंगा-जमुना तीर
वसंतराव देशपांडे/भुवनेश कोमकली/राहुल देशपांडे - दादरा - जमुना किनारे मेरो गाँव ऐ जैय्यो साँवरे
पान २४ :
कैवल्यकुमार गुरव- यमन - सोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन मे(विलंबित), रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी(द्रुत)
झोहराबाई आग्रेवाली - खमाज मधील बंदिश / झिला - कोयलिया कूंक सुनादे/सुनाये
पं छन्नुलाल मिश्र - होरी - बरजोरी करो ना मोसे होली में
पं छन्नुलाल मिश्र - होरी - कन्‍हैया घर चलो गुईयां आज खेलैं होरी
पं भीमसेन जोशी - रघुवर तुम को मेरी लाज
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली - सूरदासांचे भजन - नैन घट घट तन एक घरी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - साहब है रंगरेज चुनरी मोरी रंग डारी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - अवधू मेरा मन मतवारा
गौहर जान/रसूलन बाई/शाहिदा परवीन - दादरा (राग गारा) - आन बान जिया में लागी, प्यारी चित चोर
पं भीमसेन जोशी - राग श्याम कल्याण / पूरिया कल्याण - आज सो बना बन आयो री
उ.रशीद खाँ - राग हंसध्वनी - भज मन नित हरी को नाम (विलंबित), लागी लगन(द्रुत)
पं. सत्यशील देशपांडे : राग चारुकेशी - सुंदर सूरजनवा ठाडो री माई
पं भीमसेन जोशी/अहमद हुसैन महम्मद हुसैन - संत मीराबाईंचे भजन - तुम बिन मोरी कौन खबर ले
उस्ताद अमीर खान - राग चारुकेशी - लाज रखो तुम मोरी गुसाईयां
पं. रघुनंदन पणशीकर :ठुमरी- राग धनाश्री - कटत ना बैरन रैन
पं. कुमार गंधर्व/डॉ. वसंतराव देशपांडे - भैरवी ठुमरी - ना मारो भर पिचकारी जा मे तोपे वारी
उस्ताद रशीद खाँ - राग चारुकेशी - प्रेम बाजे मोरी पायलिया
उस्ताद अमीर खाँ साहेब/उस्ताद रशीद खाँ : राग मारवा - गुरू बिन ग्यान नहीं पावे
उस्ताद अमीर खाँ साहेब/पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग मारवा - पिया मोरे आनत देस गैलवा(विलंबित), पिया बिन जियरा निकसो जात(द्रुत)
पान २५ :
पं भीमसेन जोशी : राग मारवा - बंगरी मोरी मुरक गयी छांडोना बैंय्यां
पं कुमार गंधर्व : राग मालकंस - आये हो जी अजरी रात यही रहियो जी(विलंबित), फूल बेहाग ये बना(द्रुत)
गणपती भट : राग कलावती - सपनोंमें आया पिहरवा
पं कुमार गंधर्व- मालकंस - कैसो निकोला गो मा, आनंद मना आज आनंद मना, छब तेरी छब तेरी
पं जसराज : राग गुर्जरी तोडी - चलो सखी सौतन के घर जइये(विलंबित), बरस उघर गयो मेहा(द्रुत)
पं जसराज : राग भटियार - कोइ नहीं है अपना
पं डी व्ही पलुस्कर : राग देसी - नैय्या मोरी भयी पुरानी, सांची कहत है अदारंग यह(द्रुत)
पं.जसराज - अहीर भैरव - मोहन मधुर आज
पं कुमार गंधर्व : संत कबीरदासाची निर्गुणी रचना - हिरना समझ बूझ बन चरना
पंडित जसराज : अहिर भैरव - रसिया म्हारा आवो जी मेरे द्वार
पं जसराज : राग मुलतानी - सखी कान्हा बिन कछु सूझत नाहीं
उस्ताद मुनावर अली खान : राग गुर्जरी तोडी - भर डारूँगी रंग सों
उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब : राग गुर्जरी तोडी - भोर भयी तोरी बांट तकत पिया
पं कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीराचे निर्गुणी भजन - सखिया, वा घर सबसे न्यारा
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी - बिन पिया निंदियां न आये हो रामा
शोभा गुर्टू -ठुमरी : राग पिलू - होरी खेलन कैसे जाऊं
शोभा गुर्टू -ठुमरी : राग मिश्र भैरवी - नैय्या पडी मझधार
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी : शिवरंजनी - दगा देके ना परदेसवा सिधारे
मालिनीताई राजूरकर : भैरवी भजन - रूप अरुपी रंगरंगीला बिना अगन उजियारा
कुमार गंधर्व - कबीरांचे निर्गुणी भजन - अवधूता कुदरत की गत न्यारी
पान २६ :
शुभा जोशी : ठुमरी - भोर भइ ना आये पिया
अनिता सेन : ठुमरी / होरी - मोरी भीगी रेशम चुनर हो
पं अजय चक्रवर्ती : ठुमरी - दामिनी दमके जियरा लरजे
पं. भीमसेन जोशी : राग अभोगी - ए री चरण धर आयो
पं अजय चक्रवर्ती : कजरी - निंबुवा तले डोला रख दे मुसाफिर
उस्ताद फतेह अली खान : राग जौनपुरी - आली मोरी लगन लागी
पंडित जसराज : अहिर भैरव - आज तो आनंद आनंद
पं. फिरोझ दस्तुर/चंद्रशेखर वझे/अब्दुल करीम खान : राग सरपरदा बिलावल - गोपाला मोरी करुणा क्यूं न आवै गोपाल
जगदीश प्रसाद, सलामत अली खान - चंचल नार दुधारी कटरिया... रे राम
शोभा गुर्टू : ठुमरी - मिश्र तिलक कामोद - चंचल नार चतर हठधर्मी
शोभा गुर्टू : कजरी - सजणा बांट निरखता हारी
पं मल्लिकार्जुन मन्सूर, डॉ. बालमुरली कृष्णन् : बसवण्णांचे कानडी भाषेतील सुमधुर वचन - कळ बेडा कोल बेडा हुसियनुडियलु बेडा
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग : ललितागौरी - प्रीतम सैंय्या दरस दिखा जा
मोगूबाई कुर्डीकर : सावनी कल्याण - देव देव सत संग श्रीरंग भवदंग
डॉ. वसंतराव देशपांडे : मारु बिहाग - उन ही से जाय कहो मोरे मन की बिथा; मै पतिया लिख भेजू (द्रुत- तीनताल)
पं अजय चक्रवर्ती : मारु बिहाग - तरपत रैना दिना
पं अजय चक्रवर्ती : यमन - चंद्रमा ललाट पर सोहे भुजंग गर; किनारे किनारे किनारे दरिया- कश्ती बांधो रे
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करबुवांवरील फिल्म्स डिव्हिजनचा - माहितीपट
शोभा गुर्टू : दादरा, मिश्र सारंग - पतझड आयी सखियां
पान २७ :
कृष्णा नी बेगने बारो - कृष्णा नी बेगने बारो
कौशिकी चक्रवर्ती : राग मिश्र तिलंग - मैं तो साँवर के रंग राची
पं भीमसेन जोशी व डॉ. बालमुरलीकृष्णन् : राग दरबारी - जुगलबंदी : नाथ हरे जगन्नाथ हरे
पं भीमसेन जोशी : वृंदावनी सारंग / ब्रिंदावनी सारंग - तुम रब तुम साहिब ; जाऊं मैं तोपे बलिहारी
मालिनी राजूरकर : राग विभास - पिया तुम वहीं जाओ ; बैरन ननदियाँ लागी दराद
उस्ताद आमिर खाँ - मोरे पिया ना बोले बतियाँ
फरीदा खानुम : राग शंकरा - झूलना झुला दे आयी ऋत सावन की
गिरिजा देवी : राग भैरवी - नयन की मत मारो तलवरिया
शशांक मक्तेदार : राग यमन - ननदी के बचनवा सहे न जात
पं. भीमसेन जोशी : राग खमाजी भटियार / झिंझोटी - महादेव देव पार्वतीपते त्रिशूलधारी शंभो
बेगम अख्तर : ठुमरी - ननदिया काहे मारे बोल

पान २८ :
उस्ताद रशीद खान/पं भीमसेन जोशी/गंगूबाई हानगल : राग अभोगी - चरण धर आयो मो पर दया करो
उस्ताद रशीद खान : बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगडा1
अजय चक्रवर्ती : राग अभोगी - कासे कहू दुखवा मै कैसे कहू ; लगन मोरी लागी श्यामबदनसो
अश्विनी भिडे देशपांडे : राग गारा - बदरिया बरसे रे सैंय्या, झुला धीरे झूल रे बदरिया
सलामत व नजाकत अली खान : राग अभोगी कानडा - लागी लगन मोहे पिया की ; तुम बिन मोहे पल(कल) नाही जावे
पं भीमसेन जोशी : राग बागेश्री कानडा - गोरे गोरे मुख पर बेसर सोहे
गंगूबाई हनगल : राग चंद्रकंस - कब घर आयो ओ पिया
गंगूबाई हनगल : राग बागेश्री - मान मनावे मेरी माने ; ऋतु बसंत तुम अपने उमंग सो
सुमधुर वाद्यसंगीत व गायनाच्या क्लिप्स आहेत तिथे - http://sarod.free.fr/
डॉ. सोमा घोष : राग कलावती - दरसन दीजो ओ श्याम (विलंबित) बोलन लागी कोयलिया (द्रुत)
अश्विनी भिडे-देशपांडे : राग काफी कानडा - लायी रे मद पिया (विलंबित) व कान्हा कुँवर के करपल्लव (द्रुत)
डी व्ही पलुसकर : राग बहार - कैसी निकसी चांदनी
पान २९ :
उस्ताद रशीद खान : राग जोग - साजन मोरे घर आये
वीणा सहस्रबुद्धे : राग शुध्द सारंग - अब मोरी बात मान ले पिहर
डॉ. प्रभा अत्रे : राग बागेश्री - जा रे जा बदरा तू जा
पं. जसराज : राग बिहाग भजन - किशोरी तोरे चरणन की रज पाऊँ
पं. जसराज (साथीला संजीव अभ्यंकर) : राग भैरव - मेरो अल्लाह मेहरबान
पं जसराज : राग चारुकेशी - लागेला मोरा मन
मालिनी राजूरकर : राग भोपाली - नू मन जोबन मान
शुभा मुद्गल : राग मारु बिहाग - मन ले गयो सांवरा
शुभा मुद्गल : राग नटभैरव - तन मन वारू रे तोपे मोरे पिहरवा
पं. नारायणराव व्यास : राग भैरव - जागो बृज/ ब्रिज राज कुंवर
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग यमनी बिलावल - आली रे कितवे गये लोगवा
पं. भीमसेन जोशी : राग सूर मल्हार - बादरवा बरसन लागी
पान ३० :
उस्ताद रशीद खान : राग अल्हैया बिलावल - सुमिरन भज मन नाम राम को
उस्ताद सलामत अली व नजाकत अली खान : राग जयजयवंती - आयो रे मोरा लालन घरवा
अमानत अली खाँ व फतेह अली खाँ : राग भोपाली - बाजे छुन छुन तेरे घुँगरू
फतेह अली खान : राग भूपाली - लागी रे नैन तुमसे पिया मोरे
उस्ताद अमानत अली, फतेह अली खान : राग मालकंस - प्यार नही है सुर से जिसको
मोगूबाई कुर्डीकर : राग बिहाग बहार - फिर आयी लौट बहारें
गंगूबाई हनगल : राग देशकार - अमिला मदमाती बोलो जी
वीणा सहस्रबुद्धे : मालकंस - दुर्गे भवानी
पं. भीमसेन जोशी : राग मालकंस - (विलंबित एकताल) पग लागन दे महाराज कुँवरा (द्रुत तीनताल) रंग रलिया करत सौतन के संग
पं. कुमार गंधर्व : मीराबाई भजन कजरी - म्हारा ओलगिया घर आया जी
संजीव अभ्यंकर : राग भटियार - (विलंबित) उचट गयी निंदिया मोरी व (द्रुत) पिया मिलन को जाऊं सखी री आज
प्रभा अत्रे/परवीन सुलताना : राग खमाज ठुमरी - कौन गली गयो श्याम
उस्ताद रशीद खान, हिरा देवी मिश्रा : देस ठुमरी - मोरा सैंया बुलावे आधी रात
शोभा गुर्टू : भैरवी ठुमरी (पंजाबी अंग) - छोड गया राम साजन मेरा
उस्ताद बरकत अली खान : राग पिलू ठुमरी - भजन : तुम राधे बनो श्याम
बडे गुलाम अली खाँ : ठुमरी खमाज - पानिया भरन कैसे जाऊं री

पान ३१:
पं मल्लिकार्जुन मन्सूर : सुघराई कानडा - पिया बनजारा बनज सुहाने
सूरश्री केसरबाई केरकर : राग गौड मल्हार - मानन करी रे गोरी
उस्ताद सलामत अली खान : राग मियां की मल्हार - जल रस बूँदन बरसे ('जलसा-घर' चित्रपट)
शोभा गुर्टू : दादरा - छाई घटा घन घोर
मिताली बॅनर्जी भौमिक : कजरी - सजनी छाई घटा घनघोर
बशीर अली माही : राग पिलू ठुमरी - तुम हो गरीब नवाझ दाता
बिदुर मलिक : भैरवी ठुमरी - बँसिया न तेरो कन्हैय्या मोरा
एम. एस. सुब्बलक्ष्मी : मीराबाई भजन - बसो मोरे नैनन में नंदलाल
पं अजय चक्रवर्ती : राग हमीर - मदवा पिया हे
डॉ. बालमुरलीकृष्णन् व पं. अजय चक्रवर्ती जुगलबंदी : राग हंसध्वनी - गायति वनमाली १
बशीर अली माही : खमाज ठुमरी - ना जा पी परदेस बालम
पं अजय चक्रवर्ती : राग रागेश्री, खमाज थाट - (विलंबित) सब सुख देवो मोरे करतार, (द्रुत) बेगुन को गुनवंत दाता
बडे गुलाम अली खान : राग पहाडी - हरी ॐ तत्सत्
पं. मलिक : राग भैरव : ध्रुपद - लंबोदर गज आनन गिरिजासुत
पं. डी. व्ही. पलुसकर/पं. भीमसेन जोशी : तुलसीदास भजन - भज मन राम चरण सुखदायी
उस्ताद रशीद खान : राग मियां की मल्हार - आये बदरा बरसन
पं. भीमसेन जोशी : मियां की मल्हार - मोहम्मद शाह रंगीले बालम
अनुराधा कुबेर : राग भिन्न षड्ज - बैरी बदरा
बिदुर मलिक : भैरवी दादरा - सखियन संग रार करत
शुभा मुद्गल : कबीर भजन - हँमारे राँम रहीम करीमा केसो
शुभा मुद्गल : बनारसी दादरा - सुंदर सारी मोरी
उमाकांत व रमाकांत गुंदेचा : ध्रुपद - एकदंत गजबदन बिनायक (तानसेन रचित)
पंडित जसराज- राग शंकरा - (विलंबित) शिव शंकर महादेव आदिपुरुष अनादि महेश्वर, (द्रुत) विभूषितानङ्गरिपूत्तमङ्गा
शोभा गुर्टू व गिरिजा देवी जुगलबंदी : दादरा - लागी बयरिया में सो गयी
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - सब रस बरसे नयनवा
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - शाम भई बिन शाम
पं भीमसेन जोशी : कबीर भजन - बीत गये दिन भजन बिना रे
पान ३२:
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सीरीज) - आवो आवो नगरिया हमारी रे
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली : मीरा भजन - सखी मोरी नींद नसानी हो
बेगम अख्तर : खमाज दादरा पूर्वी - जरा धीरे से बोलो कोई सुन लेगा
पं. डी व्ही पलुसकर : तुलसीदास भजन - जानकीनाथ सहाय करे जब
सिद्धेश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - अरे गुईयां दरवाजवा
पं. दिनकर कैकिणी : राग परज - सखी मैं क्यों गइ जमुना पानी
गिरिजा देवी/उस्ताद रशीद खान : दादरा - दीवाना किए श्याम क्या जादू डारा
===========================

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, नंद्या धन्यवाद.... त्या डॉक्यु मधील एका लोकगीत गायकाने सहज जाता जाता जे कबीराच्या एका ओळीचे स्पष्टीकरण सांगितलंय .... चंदा मरिहै, सूरज मरिहै चं.... तिथेच मी अजून थबकले आहे. पुढची डॉक्यु पाहिली पण अजून डायजेस्ट झाली नाहीए. परत पाहणार आहे. Happy

रैना, बरसन लागी माझ्या आवडीची कजरी आहे.... त्यातील ''रूमझूमके'' शब्दाचे किती पदर उलगडलेत गिरिजादेवींनी!

अनिलभाई, माझ्या रिपीट पोस्टींच्या वर्षावात तुमची छोटीशी पोस्ट पाऽर लपून गेली हो.... आता पाहिली. करते बदल तसा... ठांकू.

मिच्तो, मला नाही माहित हो त्या चीजेचे शब्द. लिंक असली किशोरीताईंच्या त्या गाण्याची तर टाकाल का इथे?

मी कित्येक ठिकाणी थबकले.
- लोकवाणीतील कबीर (ज्याचा त्याचा कबीर) ही थीम फार आवडली. निर्गुणीचा अर्थ मला पहिल्यांदा नीट समजल्यासारखा वाटला हे पाहून.
- ती फळवाली, तो 'सायन्स सीखो'वाला म्हातारा, टिकट कटाया चे स्पष्टीकरण.., गाडीतील फिरत्या मंडली बरोबर गुणगुणलेले 'अवधूता'..., धूनी आणि धूनीसंगीत, शुभामुदगल यांची दीक्षा घेणे आणि प्रामाणिक विसंगती मांडणे.., पोपडे उडालेल्या भिंती आणि प्रसन्न विजय सरदेशमुख.. सर्वच मस्त.
- कबसे गा रहे है कबीर या प्रश्नाला तो म्हातारा म्हणतो ना ' आख्खी जिंदगी', आणि तळहात आरशासारखा समोर धरून जो संदेश देतो.. अमेझिंग..
- मुख्य म्हणजे पूर्ण डॉक्युमेंटरीला 'आमी लै शाणे' ची दर्पोक्ती नाही. तो साधेपणा फार आवडला.

(रच्याकने- फक्त ती ठुमरीगायिका बाई माझ्या डोक्यात गेली. कसले 'कम हिदर' लुक होते तिचे आणि शब्दांशी विसंगत. असो.)

रैना, ती फळवाली बाई, मुलांना 'सायन्स सीखो' म्हणणारे आजोबा, टिकट कटाया, फिरत्या मंडलीबरोबरचे अवधूता, त्यांची तालीम..... किती सहजतेने व्यक्त केलाय कबीर त्यांनी.... फारच आवडला तो साधेपणा!
त्या ठुमरी गायिकेबद्दल अगदी अगदी. पण गात चांगलं होत्या.

गजानन, त्या डॉक्युचा हा सिनॉप्सिस :
Interweaving the folk music traditions of the mystic poet Kabir with the life and music of the late Indian classical singer Kumar Gandharva, this film searches for that elusive sound, that "jhini si awaaz", that Kabir urges us to hear. Where does it resonate, that subtle sound? Journeying between folk and classical, oral and written, rural and urban expressions of this 15th century mystic poet of north India, the film finds moments of both continuity and rupture between these disparate worlds.

गिरिजा देवींच्या आवाजात हा बनारसी दादरा :

दीवाना किये श्याम क्या जादू डारा

यूट्यूबवरची लिंक

दीवाना किये श्याम क्या जादू डारा
उस गलियन में आना जाना
हमसे करना बहाना

हमसे बैरन सवतिया से रस बसे
चले तो तीर चलाना जलाना
क्या जादू डारा....

पं. डी व्ही पलुस्करबुवांच्या स्वरांत सूरदासाचे हे भजन :

राग : झिंझोटी

अखियाँ हरीदर्शन की प्यासी

एम एस सुब्बलक्ष्मींच्या आवाजात : अखियाँ हरी दरसन की प्यासी

अखियाँ हरीदर्शन की प्यासी

देखियो चाहत कमल नैन को, निसदिन रहेत उदासी |

आये उधो फिरी गए आँगन, दारी गए गर फँसी |

केसर तिलक मोतीयन की माला, ब्रिन्दावन को वासी |

काहू के मन की कोवु न जानत, लोगन के मन हासी |

सूरदास प्रभु तुम्हरे दरस बिन, लेहो करवट कासी |

उस्ताद रशीद खाँ यांच्या आवाजात भैरवी : मीराबाईंचं सुंदर भजन

कोई कहियौ रे प्रभु आवन की

कोई कहियौ रे प्रभु आवन की
आवनकी मनभावन की।

आप न आवै लिख नहिं भेजै
बाण पड़ी ललचावन की।

ए दोउ नैण कह्यो नहिं मानै
नदियां बहै जैसे सावन की।

कहा करूं कछु नहिं बस मेरो
पांख नहीं उड़ जावनकी।

मीरा कहै प्रभु कब रे मिलोगे
चेरी भै हूँ तेरे दांवन की।

पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात : मेरा मन हार रसमत व पल न लागी मोरी

राग : कलावती

विलंबित एकताल

मेरा मन हार रसमत,
रंगीला छबीला

सुरत सावरी बतियाँ रसभरी उनकी ,
गुनन पर जाऊं बलिहार

तीनताल

पल न लागी मोरी अखियां उन बिन
कल न आए पिया घबराए
पिया बिन मोहे बिरह सताए निसदिन

पल न लागी मोरी अखियां उन बिन
बिरह आग लगी उर अंदर
तपन बुझत नाही पडत छिन छिन

हा माहितीपटही फार सुरेख आहे. टण्याने लिंक दिली.

टण्या23 March, 2011 - 00:00
अगं मी बघितलेली डॉक्यु वेगळी होती.. पण शबनम विराणींचीच होती.. कबीरावरची ही डॉक्यु बघच..

http://www.ndtv.com/video/player/documentary-24x7/chalo-hamara-des-by-sh...

http://www.ndtv.com/video/player/documentary-24x7/chalo-hamara-des-by-sh...

ही लिंक मयूरेश (ट्यागो) ने दिली आहे.
हे सर्व माहितीपट कबीर प्रोजेक्टच्या अंतर्गत दिसतायेत.
http://www.kabirproject.org/

अगं रैने, वरच्या अकुच्या लिंकवरून शबनम विराणी यांच्या पानावर गेले की ४ माहितीपट दिसतात. त्यातला एक "चलो हमारा देस"

हो रैना, नंद्या, त्या कबीर प्रोजेक्ट अंतर्गतच ह्या सगळ्या डॉक्यु दिसताहेत. आज माझं नेट कनेक्शन जाम स्लो आहे, त्यामुळे नीट बघता येत नाहीएत. पण नंतर बघणार आहे सगळ्या डॉक्युज. धन्स!! Happy

राग : जयजयवंती

उस्ताद रशीद खाँ यांच्या आवाजात.

दरस देओ बलमा भाग १

दरस देओ बलमा भाग २

दरस देओ बलमा मोरा
तुम बिन नाही चैन न आवे

राग : विभास / बिभास

पं डी व्ही पलुस्कर बुवांच्या आवाजात : कैस कुमरवा जायल हमरा

कैस कुमरवा जायल हमरा
मोरे दरवा नयन गरकन वार रे

मोहम्मद शाह के सदारंगीले
प्रेम पियाला जब ते अपने
हूँ तन मन वारू रे

अरुंधती, गजानन, रैना, मामी, चैतन्य, षडज पंचम आणि मंडळी कस्सला धागा काढलाय! रोज मस्त मेजवानी असते. धन्यवाद! खूपच काम केलंय सगळ्यांनी!

राग : जौनपुरी

अश्विनी भिडे देशपांडेंच्या आवाजात : पायल बाजन लागी रे मोरी

पायल बाजन लागी रे मोरी
कैसे दर आऊं तुमरे पास अब

सांस ननद मोरी जनम की बैरन
सबरंग पिया हूँ तोरी दास अब

अरुंधती, मानुषी 'केश कुंवरवा/कैस कुमरवा जायल हमरा' चा अर्थ काय? मी अनेकदा ती ऐकली आहे पण अर्थ ठाऊक नाही.

अकु, त्या डॉक्यु.च्या ओळखपरिच्छेदाबद्दल धन्यवाद. या आठवडाखेरीला बघेन.

गजानन, त्या लिंक खालीच एकांनी अर्थ दिलाय :

केश कुंवरवा जायल हमरा
माझे अस्ताव्यस्त केस तसेच न विंचरता राहिलेत

अजून एक अर्थ निघू शकतो :

कैसे कुमरवा जायल हमरा
माझे यौवन / कौमार्य आता कसे व्यतीत होणार?

मोरे दरवा नयन घर कां वारे रे
माझी नजर सारखी दरवाजाकडे लागून आहे.

मोहम्मद शाह के सदारंगीले
मी मोहम्मद शाह साठी झुरत आहे / मोहम्मद शाह च्या सेवेत सदारंग

प्रेम पियाला चपटे अपने / जब ते अपने
ज्याने आपला मदिरेचा प्याला जवळ केलाय (/ प्रेम पिया हेही एका रचनाकाराचे नाव आहे. तसे असेल तर 'ज्याने प्रेम पिया'ला जवळ केलं आहे. )

हूँ तन मन वारू रे
मी त्याला माझे तन मन समर्पित केले आहे.

अरुंधती,
ते (मला) असे ऐकु येते आहे.

मेरा मन हार रसमत,
रंगीला छबीला

सुरत सावरी बतियाँ रसभरी उनकी ,
गुनन पर जाऊं बलिहार
______
सॉरी रे नंद्या- मी पण बिनडोकच आहे.
_____

मानुषी- Happy

गजानन,
मौहम्मदशाह रंगीले ची माहिती
http://www.indianetzone.com/52/development_dhrupad_mughal_era.htm

अरुंधती,
एकदा सदारंगाची बंदिश आहे म्हणल्यावर 'प्रेम पिया' हे नाव म्हणून येणार नाही बहुधा
कैस कुमरवा जायल हमरा (जायल वि० [फा०] जिसका नाश हो गया हो। जो नष्ट हो चुका हो। विनष्ट।()
मोरे दरवा नयन गरकन वार रे..
मला तू सांगीतलेला दुसरा अर्थ जास्त योग्य वाटतो आहे.
तसेच ते.
'जब ते अपने' च आहे.

ओह्ह ते असं आहे होय!!!
<< मेरा मन हार रसमत, रंगीला छबीला, सुरत सावरी....>>
आता जरा अर्थ लागतोय त्या चीजेचा... नाहीतर मी कितीवेळ विचार केला... मीरा... मनोहर/ मनहर (म्हणजे श्याम का.... इत्यादी उत्यादी)

धन्स रैना, करते बदल. Happy

मोरे दरवा नयन गरकन वार रे .... हेदेखील पर्फेक्ट आहे. आता जास्त लागतोय अर्थ.

कैसे कुमरवा जायल हमरा चा दुसरा अर्थच बरोबर वाटतोय ना? मला अस्ताव्यस्त केसांविषयी जरा शंकाच होती! Proud पण म्हटलं, बिरहन असल्यामुळे असेल तसं!

मोहम्मद शाहची लिंक पाहिली... त्यावरून 'प्रेम पियाला जब से अपने' चा अर्थ ज्याने (प्रेमरूपी??) मदिरेचा प्याला जवळ केलाय असा अर्थ जास्त बरोबर वाटतोय.

रैना, अरुंधती धन्यवाद.

मला अस्ताव्यस्त केसांविषयी जरा शंकाच होती! Proud <<< अकु, काल मला पण जरा शंका आली पण मी काही बोललो नाही. Lol

राग : केदार
ताल : एकताल

पंडित भीमसेन जोशींच्या आवाजात :

सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर

सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर
बिजली चमकत धमकत
दासननवा अति लरजत
मोर करे शोर

भैरवी
मध्यलय तीनताल

पंडित भीमसेन जोशींच्या आवाजात : बोले ना वो हमसे पिया संग

बोले ना वो हमसे पिया संग
औरन संग रहन जात
हम संग नित करत चतुराई
पिया बोले ना
हम संग लागी प्रीत
उन संग करावो सुख चैन
मनरंग नित नाम मचावो रूम झूम

गजानन Lol

कैस कुमरवा>>>>>>>>>>.या ओळीचा अर्थ ..मेरा यौवन व्यर्थ जा रहा है ...असा आमच्या सरांनी सांगितल्याचं आठवतं!
मोरे दरवा नयन गरकन वार रे .... इथे गरकन च्या ऐवजी आम्ही धडकन म्हणायचो( वहीतही तसंच दिसतय) पण या प्रकारच्या भाषेत धडकन(उर्दू टाईप) शब्द येऊ शतो का? आणि मग अर्थ लागेल का?आम्ही म्हणायचो---- मोरे दरवा नाय ना(न आये ना) धडकन वार रे....
>>>>>मला अस्ताव्यस्त केसांविषयी जरा शंकाच होती! पण म्हटलं, बिरहन असल्यामुळे असेल तसं! >>>>>>>हाहाहाहाहा! अकू!

राग केदार
ताल एकताल विलंबित

पं भीमसेन जोशींनी गायलेली बंदिश : सोहे लराई माई बनरा

सोहे लराई माई बनरा जाने आवन ऋतु
कौन कौन गाने को आत धूम धाम
बनरा दान बनरी

अरे वा! वर अपडेट केलेला दिसतोय धागा.... २२ व्या पानापर्यंत! मस्त!!
धन्यवाद गजानन... संदर्भासाठी खूप चांगला उपयोग होतोय त्याचा. Happy

राग : यमन कल्याण

तीनताल मध्यलय व द्रुत

पं भीमसेन जोशींच्या आवाजात : श्याम बजाये आज मुरलिया

श्याम बजाये आज मुरलिया
वे अपनो अधरन गुनी सो
योगी जंगल जती सती
और गुनी मुनी सब
नर नारी मिले मोह लियो
है मनरंग करत / कर के

ह्याच बंदिशीची ही अजून एक लिंक.

३५ मिनिटांनंतर ही बंदिश सुरू होते.

चैतन्य ने ह्या बंदिशीचा उल्लेख केलेला लेख : http://www.maayboli.com/node/21992

वरील ईस्निपच्या लिंकमधील विलंबित बंदिशीचे बोल आहेत :

यमन कल्याण : विलंबित

काहे सखी कैसे की करीये
भरीये दिन ऐसो लालन के संग
सुन री सखी मैं का कहूँ तोसे
उनही क्या जानत ढंग

Pages