निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमि,जागूला म्हणायचेय, खाऊन बघायला !

तर हे नैरोबीमधले आणखी एक झाड. हे बरेच उंच वाढते. पण हे लहान असले तरी घराजवळचे म्हणून फोटो काढता आला.

आता फूले यायला सुरवात झालीय, पण काही दिवसात हे झाड असे पूर्ण लाल फूलांनी भरुन जाईल.

हि फुले पण आकारानी जरा वेगळीच असतात.

जरा जवळून बघू..

या झाडाची आणखी एक मजा म्हणजे, काहि झाडांना उभ्या दोन फांद्या असतात, त्यापैकी एकच अशी फूलते आणि दुसरी हिरव्या पानांनी भरुन जाते. असेच झाड मी ऑकलंडच्या एक चर्चच्या आवारातही बघितलेय.

काय सही फुलं आहेत! त्यांच्या बाहेर वळलेल्या पाकळ्या तर अगदी चांदण्यांच्या आकाराचा आभास निर्माण करताहेत, जणू काही scarlet stars!

डाळींबाची आठवण झाली. पण हिरव्या झाडावर केशरी डाळिंबे असतात, ही तर केशरी झाडांवर केशरी डाळिंबे.

त्यांच्या बाहेर वळलेल्या पाकळ्या तर अगदी चांदण्यांच्या आकाराचा आभास निर्माण करताहेत>> सेम "फिलींग".

किती वेगळी फुलं आहेत !!

मी काही दिवसांपुर्वी बोरासारख्या गोल आकाराच्या सुक्या लाल मिरच्या आणल्या आहेत. त्यातल्या बिया पेरल्यास झाड येईल का?

दिनेशदा,
ही लालभडक फुले म्हणजे अगदी रेडीमड छोटी-छोटी आकाशकंदीलच जणु !
Happy
जागु,
धन्स ! अशी झाडाला लागलेली कच्ची करवंदे पहिल्यांदाच पहायला मिळाली

करवंदे लोणच आणि चटणीसाठी तयार आहेत.
आम्हाला फक्त ती करवंदे खाण्यासाठी अशीच ठेवा,लोणचे आणि चटणीसाठी न वापरता ! Lol

दिनेशदा काय मस्त फुल आहेत हो. काल रात्री आमच्या सोसायटीतल्या डाळींबाच फुल पाहिल.साधारण असच दिसत होत.
तुम्हा सर्व निसर्ग गुरुजनांमुळे हल्ली माझही लक्ष झाडांकडे जास्त असते.

काय वैद्यबुवा माझी संधी पळवलीत ना?
साधना, शताब्दीचे अभिनंदन!!!>>>>>

मला एकदम '' खानदानी आयुर्वेदिक दवाखाना'' वगैरे आठवला. Biggrin

असो, जागू,साधना,दिनेशदा त्रयीचे अभिनंदन आणि आभार . Happy

कुणाला कौशी दिसली का या मोसमात ? ती पण फूलायला लागली असेल.
असाच भडक केशरी फूलोरा असतो. खरे तर कळ्यांसारख्या दिसत असल्या तरी कळ्या नव्हेत. पाकळ्यांची भुमिका निभाऊन नेणारे पुष्पकोशच ते. (वरच्या झाडात पण तसेच झालेय.)
मग शेंगा लागतात त्याही खास. गर्द गुलाबी आणि पोपटी रंगाच्या, होडीच्या आकाराच्या. पण त्यांना शेंगा तरी कसे म्हणायचे ? कारण त्यातली बी, शेंगेच्या बाहेरच असते.
राणीच्या बागेत आहे. पाने कापसाच्या पानासारखी असतात, पण कायम किडलेली असतात.

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/124996.html?1176484849

इथे आहे फोटो.

मी अमि तुम्ही त्या बिया पेरल्या तर मिरच्या जरूर लागतील.दिनेशदा कौशी इथे पुण्यात स्मृती उद्यानात आहे पण अजून फुलावर आली नाहीये.

दिनेशदा मलाही डाळिंबाचीच आठवण आली. तुम्हाला मेल पाठवतेय थोड्या वेळात रिप्लाय द्या.

अनिल ती पिकुन गळायच्या आत या खायला नाहितर मी तुमची वाट पाहत ठेवेन झाडावर आणि मग ति ना मला ना तुम्हाला असे होईल त्या करवंदाचे.

अरे माझे काय अभिनंदन करताय.. इथे निसर्गप्रेमी वाढताहेत आणि त्यामुळे पोस्टीही वाढताहेत याचे लक्षण आहे. आता हे लक्षण उत्तम आहे हे वैद्यबुवा सांगतीलच Happy

जागू, इमेल अपलोड झाली नाही अजून. मग परत बघेन.

यावर्षी पण तिकडे कडक उन्हाळा असेल अशी लक्षणं दिसताहेत. बहर निर्माण करायला झाडांना बरीच शक्ती खर्च करावी लागते. पण त्या नंतर नियमित पावसाळा येईल अशी अपेक्षा असते झाडांचीही.
कडक उन्हाळा तर जास्त पाऊस, असे समीकरण होऊ घातलेय हल्ली.

जागू,साधना,दिनेशदा त्रयींबरोबर डॉक यांचेही अभिनंदन आणि आभार !!
Happy

आणि हे एक अनोख झाड ...
( हा फोटो मी काढलेला नाही, हे नियमात बसत नाही, तरी मोह आरला नाही, माफी असावी ) ZadChmanyanch.jpg

अनिल, फक्त कलाकाराचे नाव सांग, आणि त्याची परवानगी घे. म्हणजे नियमात बसतं.

२१ तारखेला जागतिक वन दिन आहे. त्यानिमित्ताने लोकप्रभात दोन लेख आहेत. एक आहे तो दिवसाकाठी केवळ १ लिटर पाणी घालून, मोठे झाड कसे वाढवायचे त्यावर आणि दुसरा आहे,
घाणेरी वर.

या लेखात घाणेरीची खुप तारिफ केलीय. मला ठाम आठवतेय, मारुति चितमपल्लींनी घाणेरीवर प्रतिकूल मत दिले होते. (त्यांचे लेखन मी इथे उधृत पण केले होते.) पण या लेखात मात्र तिचे गुणगान आहे.

घाणेरी आपल्याकडे बाहेरुन आली हे नक्की. तिही गेल्या २००/३०० वर्षातच. पण तिचा भयानक प्रसार झालाय सगळीकडे. या लेखात असे लिहिलेय कि, तिचे अनेक औषधी उपयोग आहेत. माझ्या आठवणीत घाणेरीच्या फळांचा नजर उतरवण्यासाठी उपयोग करत असत (आजीला तसे करताना बघितलेय) पण तिनेही कधी औषधी उपयोग सांगितले नाहीत. माझ्या आईची आजी, वैद्य होती, तिच्याकडुनही काही औषधी उपयोग सांगितले गेल्याचे आठवत नाहीत. कुणाला आणखी माहिती आहे का ?

अनिल ७६ मस्त आलाय फोटो. आजकाल चिमण्या बघायलाच मिळत नाहीत; आणि तुम्ही तर एवढ्या चिमण्यांचा फोटो दिलाय.खूप छान फोटो आहे.अजून काही दिवसांनी कदाचित अशा फोटोतच बघायला मिळतील अशी भिती वाटते.(अर्थात असे कधीच होऊ नाही).

दिनेशदा, घाणेरीबद्दल मला एवढेच माहित आहे की तिचा उगम Australia इथून झाला आहे. आपल्याकडे परदेशी असल्याकारणाने तिच्यावर controlling करणारे घटक आपल्याकडे नाहीत. शिवाय तिच्या पानांचा अन्न म्हणून प्राण्यांना काहीच उपयोग नाहीये आणि आपल्याला चुकून जरी त्या पानांचा स्पर्श झाला तरी पुरळ उठते, किंवा रॅश येते. क्वचित काही जातींच्या टणटणींची फळे थोडी विषारी पण असू शकतात. कारण ती खाल्ल्यामुळे उलट्या झाल्याची उदाहरणे आहेत. पण मला अजून अधिक माहिती नाही. चितमपल्लींचे लेखन मला पण आवडते.मी त्यांची १/२ पुस्तके वाचली आहेत. घाणेरी प्रमाणेच नीलगिरी, जलपर्णी ह्या वनस्पतीपण फारच प्रमाणाबाहेर फोफावल्या आहेत आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागताहेत.

शांकली, निलगिरी पण तिथूनच आलीय. आपल्याकडे पहिल्यांदा निलगिरी डोंगरावर तिची लागवड झाल्याने, तिला ते नाव पडले.

जलपर्णी ने तर नद्या, सरोवरे इतकेच नव्हे तर खाड्या पण व्यापून टाकल्या आहेत. ती बाकी कुठलीच जलवनस्पती वाढू देत नाही, आनि तिचा काहि उपयोगही नाही.

हे असे एकाच प्रकारची झाडे लावण्याचे दुष्परिणाम, ऑईलपाम च्या लागवडीमूळेही झालेत. अनेक एकरांवर केवळ तिच लागवड.

हो ना अगदी बरोबर! एकाच प्रकारची झाडे लावल्यामुळे खूपच वाईट परिणाम होताहेत, शिवाय bio diversity नष्ट होतीये ती वेगळीच गोष्ट आहे. पुण्यात काशीद, पेल्टोफोरम, गुलमोहोर,पिचकारी,करंज ह्याच झाडांचे राज्य आहे असे वाटावे इतकी त्यांची लागवड केलीये. कात्रजच्या घाटात तर उंदीरमारीचे रानच केले आहे. पण या झाडांमुळे जमिनीचा कस, पक्ष्यांचे निवासस्थान आपण नष्ट करत आहोत याची जरा देखील जाणीव आपल्या वनखात्याला किंवा उद्यानविभागाला नाही याचे वाईट वाटते.तसेच कुबाभूळ ( वेडी बाभूळ) हिची पण लागवड! एकसुरीपणा, सौंदर्य दृष्टीचा अभाव आणि हम करे सो कायदा या वृत्तीमुळे आपण काय मिळवतोय आणि काय गमावतोय हा विचारच नाही! वाईट वाटते हे सारं बघून. काही लोकं प्रयत्न करताहेत त्यांच्यापरीनं पण ही लोकं संख्येने कमी आहेत. सातार्‍याचे कास पठार! बिच्चारं! अशी अनेक स्थळं आहेत की ती नष्ट होतील अशी भिती वाटते. खरं तर आता असे वाटू लागले आहे की माणसाला काही ठिकाणं माहित नाही झाली तर बरं.निदान तेवढा तुकडा तरी वाचेल......................मी जरा जास्तच वहावले का हो? पण मनातलनं जे वाटलं तेच लिहिलं

घाणेरीबद्दल सहमत.
मी आजवर फक्त एकाच लेखात घाणेरीबद्दल चांगले वाचलेय. एका गावात, मला वाटते आंध्रामधल्या, टणटणीचे अमाप पिक, बाकी काहीच नाही. त्या गावातल्या लोकांनी त्याच्या फांद्या साफ करुन त्यापासुन टोपल्या बनवण्याच्या उद्योग केला. अजुन काहीच मार्ग नसल्याने गावातल्या काही एंटरप्रायझींग लोकांनी आपले डोके असे चालवले. त्या टोपल्यांना चांगला भावही मिळाला.

शांकली तुमचे बरोबर आहे. झाडे लावताना स्थानिक झाडे लावायला हवीत हा विचार केला जातच नाही. पक्ष्यांना खुप उपयोगी पडणारे वड पिंपळ इ. कुठेही मुद्दाम जोपासलेत असे दिसतच नाही. ते बिचारे आपलेआपण येतात. मुद्दाम लावायचे ते गुलमोहर, पेल्टोफोरम इ.इ. ज्यांच्यावर पक्षी फारसे फिरकत नाहीत.

हे पण इथल्या एका कॉफी च्या मळ्याजवळ दिसले होते. फूले फार नाही दिसली.

पण फळे मात्र खासच. आकाराने सुपारीएवढी. लाल मरुन रंगाच्या अनेक छटा. नाव माहित नाही, पण खाण्याजोगी पण नसावीत. याबाबतीत, माझ्या इथल्या भाभीचा रिमार्क, "खानेजैसी चीज होती, तो काले थोडी ना रहने देते,पेडपर " मानून मी चाखून बघायचा मोह आवरला !!

दिनेशदा,
(तो फोटो कालच्या पुढारीत आला होता,(पण कलाकार म्हणजे कोण असतो?)
तुमचे वरील फोटो पाहुन प्रथम मला ती स्ट्रॉबेरीच वाटली, आणि तोंडाला पाणी सुटलं ...!
Happy

शांकली,
तुमची निसर्गाबद्दल,झाडांबद्दल जे मांडलय त्यातुन त्यातुन तुमची तळमळ दिसुन येते, ती सार्थही आहे,खुप वाईट तर वाटतंच...
Happy

Pages