झेन कथा

Submitted by ठमादेवी on 8 March, 2011 - 06:04

झेन कथा... जपानी संस्कृतीतल्या या कथा भारतात फारशा ठाऊक नाहीत... पण या कथा वाचकांच्या मनात घर करून जातात... तेराव्या शतकात जपानी धर्मगुरू मुजू याने सांगितलेल्या या कथा आजही तितक्याच आवडीने वाचल्या जातात.
रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद या अवघा चारेक ओळींच्या कथांमध्ये आहे... या फक्त १०१ कथा आहेत... पण प्रत्येक वेळी वाचताना त्या एक नवी अनुभूती देतात... विसाव्या शतकाच्या सुरूवातीला त्या इंग्रजीत आल्या आणि नंतर संपूर्ण जगभर पसरल्या... जीवनाचा वास्तववादी दृष्टिकोन देणार्‍या या कथा अत्यंत सुंदर आहेत...
यातल्या काही कथा एकेक किंवा एका वेळी दोन अशा पद्धतीने देण्याचा माझा विचार आहे... या माझ्या कथा नाहीत. किंवा मी माझ्या मनाने त्यात काही कल्पनाविलासही केलेला नाही. त्यामुळे मला क्रेडिट नकोच आहे... पण या कथांनी मला कठीण परिस्थितीत मार्ग दाखवला आहे... निर्णय कसे घ्यावेत हे शिकवलं आहे... त्या मायबोलीच्या वाचकांशी शेअर कराव्याशा वाटतात... हा केवळ वाचनानंद आहे, दुसरे काही नाही... वाचकांना आवडल्या तर आणखी कथा देईन...
आता जी कथा देत आहे ती झेन तत्वज्ञानातली सर्वोत्तम कथा मानली गेलीय...
.................................
चहाचा कप
नान-इन या झेन धर्मगुरूला एक प्राध्यापक भेटायला आला... त्याला स्वतःच्या बुद्धीबद्दल खूप अभिमान होता आणि स्वतःच्या ज्ञानाबद्दलही. त्याला झेन जाणून घ्यायचा होता.
नान-इनने त्याला चहा देऊ केला.. पाहुण्याच्या कपात चहा ओतताना तो इतका ओतला की कप भरून वाहू लागला. प्राध्यापकाला काही राहवलं नाही. तो म्हणाला, कप भरून वाहू लागलाय. त्यात आणखी चहा मावणार नाही.
नान-इन उत्तरला
या कपाप्रमाणेच तुझं मनही स्वतःविषयीच्या मतांनी आणि पूर्वग्रहांनी भरलेलं आहे.. तुझ्या मनाचा कप तू रिकामा केल्याशिवाय मी तुला झेन कसा दाखवणार?

तात्पर्य- कोणतंही नवीन काही शिकायचं असेल, ज्ञान हवं असेल तर आधी मनाची पाटी कोरी करावी लागेल. मनाची पाटी कोरी केल्याशिवाय त्यावर नवीन अक्षरं उमटणार नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, शुभेच्छा!

कथा लहान असतील तर एकदम दोन तीन दिल्यास अधिक मजा यावी असे आपले वाटते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

छान..

कोमल चांगला उपक्रम. वाचायला नक्कीच आवडेल. फक्त तात्पर्य नका देऊ. झेनकथेच moral प्रत्येकाने आपापलं काढावं. त्या इतक्या तरल? (abstract) असतात की त्यातून ठाम एकच अनुमान निघतेच असे नाही. आणि कथेचा जीव कितीही छोटा असला तरी एका वेळी एकच द्या. ती आत झिरपायला वेळ लागेतोच. Happy

नक्की माधव... तात्पर्य देणार नाही मी यापुढे. Happy
आणि एका वेळी एक कथा वाचून ती मनात घोळवत बसण्याचा आनंदच काही और आहे. लिमलेटची गोळी तोंडात घोळवल्यासारखा...
बाकी सर्वांचे आभार... प्रतिक्रियांसाठी...

आणि एका वेळी एक कथा वाचून ती मनात घोळवत बसण्याचा आनंदच काही और आहे. लिमलेटची गोळी तोंडात घोळवल्यासारखा.. हे एकदम बरोबर !!

पु.ले.शु.
नक्किच सहमत. तात्पर्य प्रत्येकाची वेगळी असतील आणि विचारही.
झेन कथेची मज्ज येइल नाही का???

Waiting..........................!

ठमे छान उपक्रम. हो, एकावेळी एकच कथा दे. माधवने सांगितल्याप्रमाणे ती झिरपायला वेळ हवा.

माधव, अगदी योग्य शब्द दिलास हं.

जुन्या माबोकरांना आठवत असेल कदाचित.. श्रीनी म्हणून एकजण होता तो झेन कथा टाकायचा. अर्थावर चर्चा व्हायची. ते सगळं असेल अजून जुन्या माबोवर.

खुप आवडली
उपक्रम खुप चांगला असणार आहे
धन्यवाद आणि शुभेच्छा!
आणि हो! झेन हे 'ध्यान'चे बदललेले रूप आहे
रामकुमार

फार छान उपक्रम ठमादेवी.

पुढच्या कथांची वाट पहातोय.

ठमे, धन्स झेनकथा पुन्हा चालू केल्याबद्दल. नीधप ने म्हटल्याप्रमाणे जुन्या माबोवर झेनकथा होत्या. पण त्यात तात्पर्य न देता, ज्याला जसा अर्थ कळेल तसा तो सांगायचा... वेगवेगळे अर्थ आणि मतं मिळायची... खरंच झेनकथा खूप तरल असतात... माधवने म्हटल्याप्रमाणे... तात्पर्य देऊन त्यांची मजा कमी होते... तू अर्थात सांगितलं आहेसच की यापुढील कथांना तात्पर्य दिलं नसेल म्हणून. आणि एका वेळी एकच कथा असूदे... मग त्यावर चर्चा करायला छान वाटेल. पण रोज न चुकता १ पोस्ट बरं का... Happy

छान.

तात्पर्याबद्दलः झेन कथांना शब्दांमध्ये मांडण्यासारखे तात्पर्य नसते, आणि म्हणुनच त्या झेन कथा असतात.

Pages