Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बुद्धीबळ

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » बुद्धीबळ « Previous Next »

Shrini
Saturday, July 14, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक झेन कथा आहे. जिज्ञासूंनी झेन बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरता गूगल चा वापर करावा ही विनंती. :-)
----------------------------------------------------------

बुद्धीबळ.

झेन सद्गुरू रिंझाईकडे हिरोमा नावाचा एक मनुष्य आला, आणि त्याने झेन शिकण्याची आपली ईच्छा त्याच्यासमोर व्यक्त केली.

"तू जपानमधला सर्वश्रेष्ठ बुद्धीबळपटू आहेस असे मी ऐकतो," रिंझाई म्हणाला, "तेव्हा जर तू मला बुद्धीबळात हरवलेस तर मी तुला झेन शिकवीन".

हिरोमाने या अटीला तात्काळ संमती दिली. मग रिंझाईने खेळाचे साहित्य आणवले आणि डाव मांडला.

खेळाला रंग चढू लागला, तसे रिंझाई हा एक महान बुद्धीबळपटू आहे हे हिरोमाच्या लक्षात आले. हिरोमाने केलेल्या रचना, आक्रमण, बचावाचे आणि शेवटी यशस्वी माघारीचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले आणि रिंझाई डाव जिंकणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली.

आपली किर्ती आता धुळीला मिळणार या विचाराने हिरोमा पराकोटीचा निराश झाला, पण हार स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसल्याने तो डाव संपण्याची वाट पाहू लागला.

खेळ निर्णायक वळणावर येऊन ठेपला. रिंझाईने आपली शेवटची खेळी करण्याकरता हात उचलला, आणि हिरोमावर मात करण्या ऐवजी स्वतःचाच राजा पाडून टाकला.

हिरोमा काही क्षण अगदी स्तब्ध बसला, आणि मग रिंझाईला वंदन करून निघून गेला.




Rahulphatak
Saturday, July 14, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one श्रीनि.

आणि काही मूळ झेन कथांप्रमाणे ही अगम्य (आणि 'गूढरम्य') नाहीये उगाचच :-)

रिंझाईच्या शेवटच्या खेळीसारखी सहज पण परिणामकारक ! छान !


Chinnu
Saturday, July 14, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी कथा फार आवडली. अजून येवू द्या.

Ashwini
Saturday, July 14, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, झेन कथा. मस्त आहे रे श्रीनि.

Bee
Monday, July 16, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा पुन्हा एकदा झेन.. पण काही झेपली नाही.. :-)

Zakasrao
Monday, July 16, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कथा आहे.
स्वत्:चा अहंकार सोडा अस काहिस यात आहे असे मला वाटले.
बाकी झेन कथा माझ्या बुद्धीच्या out of range आहेत. माझ्या बुद्धीचा टॉवर कमी पडतो उंचीला.:-)
जाणकारानी नंतर समजावुन सांगितले तर बरे होइल. माझा अंदाज मी सांगितला आहेच. :-)


Shamli
Monday, July 16, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee tumhalaa dusryaanaa naaw thewanyatach interest aahe kaa ho. Protsahan dyaawe ki

Shyamli
Monday, July 16, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गोष्ट स्पष्ट करते,
कथेबद्दल नाहिये
ही shamli म्हणजे मी नाहि तर मी shyamli आहे:-) बाकी चालु द्या


Bee
Monday, July 16, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामली, मी 'अरे वा' म्हंटले त्यातच स्तुती प्रोत्साहन आले की :-)

Sanghamitra
Monday, July 16, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्रिनि. छान जमलीय!
शेवट अगदी सहज झेनपर्यंत नेऊन सोडणारा.


Manjud
Monday, July 16, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनि, thanks a lot झेन कथांचं नवं दालन उघडून दिल्याबद्दल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गूगल वर सर्च केले, अलिबाबाची गुहाच उघडली. कथांचा खजिनाच आहे.

हे जिज्ञासूंसाठी, अर्थात गूगलवरून,
Zen Stories or Koans are short tales designed to provoke the mind into enlightenment.
Amongst the oldest stories told by man, Zen Stories are used as tools to open the mind into new ways of thinking. Ways of thinking that often do not follow what we would call rational thought. This goes to the heart of Zen. By moving yourself outside of what you would call normal or rational, you can see the world and yourself from a new perspective, thereby acheiving satori, or enlightenment, in the process.
While Zen Stories often seem surreal and absurd at first glance, give them more thought and you'll find meaning relevant to much of your everyday life, even if you don't find enlightenment straight away.

श्रिनि परत एकदा धन्यवाद.


Bee
Monday, July 16, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू, झेन कथांबद्दलची माहिती वगैरे... theory part कित्येकांना माहिती असतो पण झेन कथा उलगडत नाही. म्हणून त्या गुढ दुर्बोध वाटतात.

हीच झेन कथा घेतली तर..


>>हिरोमा काही क्षण अगदी स्तब्ध बसला, आणि मग रिंझाईला वंदन करून निघून गेला. >>

वरील वाक्यापर्यंत कथा अगदी सरळ सरळ आहे पण ह्या शेवटच्या वाक्यातून काय बोध घ्यावा काही कळले नाही. इथे हिरोमा वंदन करतो आणि निघून जातो. रिंझाई डाव जिंकत असून मुद्दाम हरतो... (विचारात पडलेला एक चेहरा :=?)

Meenu
Monday, July 16, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज लिहीते हं ! वर चाललेल्या चर्चेला आणि माझ्याही विचारांना दिशा मिळावी म्हणुन कदाचित ..

१. रिझाईंनी घातलेली अट हिरोमानी सहज मान्य केली फार विचार न करता. या माणसालाही चांगलं खेळता येत असेल असा विचारही त्याच्या मनात आला नाही. त्याला वाटत होतं की तोच जपानमधला सर्वश्रेष्ठ बुद्धीबळपटु आहे म्हणुन ..
२. हरायला लागल्यावर त्याला आपली किर्ती धुळीला मिळणार याची चिंता वाटतं होती ..
३. रिझाईंनी मात्र हुकमी डावावर सहजपणे पाणी सोडलं
४. मग हिरोमानी काय बरं विचार केला असेल ..?

बुद्धीबळातली किर्ती माझ्यासाठी झेन शिकण्यापेक्षा महत्त्वाची वाटतेय का मला याक्षणी ? (मला आत्ता नक्की काय हवय ? अथवा कशाला मी जास्त महत्त्व देतो ? )
माझ्यापेक्षा उत्तम बुद्धीबळ खेळणारं कुणी जपानमधे असणार नाही असं मी उगीचच समजत होतो .. (अहंकार कमी करायला हवाय)
अरेच्चा ! मी सर्वोत्कृष्ट खेळाडू पण याहीपेक्षा चांगलं बुद्धीबळ खेळता येतं त्याअर्थी मला बुद्धीबळाचा परत एकदा उघड्या डोळ्यांनी अभ्यास करायला हवाय .. (मी जिथे आहे तिथुन अजुनही पुढे जाता येतं .. येणार आहे .. )
रिझाईंनी ज्या सहजपणे किर्तीवर ( fame ) पाणी सोडलं (सर्वोत्कृष्ट बुद्धीबळपटुला हरवल्यावर त्यांना किती तरी प्रसिद्धी मिळाली असती अथवा ते स्वतः झेनचा अभ्यास न करता सर्वोत्र्कृष्ट बुद्धिबळपटु होऊ शकले असते.) तसं मला जमेल का ?
असं काय असेल त्या झेन मधे कि ज्यासाठी रिझाई या सर्व ऐहिक गोष्टींकडे पाठ फिरवु शकले.

या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला हिरोमा गेला असणार. आणि तेच तर ज्ञान आहे ना ? जे रिझाईंनी त्याला दिलं ..

श्रीनी धन्यवाद .. मजा आली वाचायला .. अजून लिहा झेनकथा ..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators