झेन कथा

Submitted by ठमादेवी on 8 March, 2011 - 06:04

झेन कथा... जपानी संस्कृतीतल्या या कथा भारतात फारशा ठाऊक नाहीत... पण या कथा वाचकांच्या मनात घर करून जातात... तेराव्या शतकात जपानी धर्मगुरू मुजू याने सांगितलेल्या या कथा आजही तितक्याच आवडीने वाचल्या जातात.
रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद या अवघा चारेक ओळींच्या कथांमध्ये आहे... या फक्त १०१ कथा आहेत... पण प्रत्येक वेळी वाचताना त्या एक नवी अनुभूती देतात... विसाव्या शतकाच्या सुरूवातीला त्या इंग्रजीत आल्या आणि नंतर संपूर्ण जगभर पसरल्या... जीवनाचा वास्तववादी दृष्टिकोन देणार्‍या या कथा अत्यंत सुंदर आहेत...
यातल्या काही कथा एकेक किंवा एका वेळी दोन अशा पद्धतीने देण्याचा माझा विचार आहे... या माझ्या कथा नाहीत. किंवा मी माझ्या मनाने त्यात काही कल्पनाविलासही केलेला नाही. त्यामुळे मला क्रेडिट नकोच आहे... पण या कथांनी मला कठीण परिस्थितीत मार्ग दाखवला आहे... निर्णय कसे घ्यावेत हे शिकवलं आहे... त्या मायबोलीच्या वाचकांशी शेअर कराव्याशा वाटतात... हा केवळ वाचनानंद आहे, दुसरे काही नाही... वाचकांना आवडल्या तर आणखी कथा देईन...
आता जी कथा देत आहे ती झेन तत्वज्ञानातली सर्वोत्तम कथा मानली गेलीय...
.................................
चहाचा कप
नान-इन या झेन धर्मगुरूला एक प्राध्यापक भेटायला आला... त्याला स्वतःच्या बुद्धीबद्दल खूप अभिमान होता आणि स्वतःच्या ज्ञानाबद्दलही. त्याला झेन जाणून घ्यायचा होता.
नान-इनने त्याला चहा देऊ केला.. पाहुण्याच्या कपात चहा ओतताना तो इतका ओतला की कप भरून वाहू लागला. प्राध्यापकाला काही राहवलं नाही. तो म्हणाला, कप भरून वाहू लागलाय. त्यात आणखी चहा मावणार नाही.
नान-इन उत्तरला
या कपाप्रमाणेच तुझं मनही स्वतःविषयीच्या मतांनी आणि पूर्वग्रहांनी भरलेलं आहे.. तुझ्या मनाचा कप तू रिकामा केल्याशिवाय मी तुला झेन कसा दाखवणार?

तात्पर्य- कोणतंही नवीन काही शिकायचं असेल, ज्ञान हवं असेल तर आधी मनाची पाटी कोरी करावी लागेल. मनाची पाटी कोरी केल्याशिवाय त्यावर नवीन अक्षरं उमटणार नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठमा, सगळ्या कथा येऊ दे. पण एकावेळी एकच.
(मनाचे श्लोकही एका दमात सगळे वाचायची माझी अजून हिम्मत होत नाही. Proud )

या सर्व झेन एकपानी कथांचे १ पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे...
झेनदर्शन!
लेखक- अरविंद दोडे

प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लीशिंग हाऊस

झेनतत्वज्ञान, झेनप्रतिक, झेनकथा, चीन-जपान-कोरिया मधील ध्यानपद्धती(झाझेन), सातोरी(साक्षात्कार) सबकुछ झेन टाईप माहीतीचे सुरस आणि रसाळ वर्णन वाचावयास मिळेल.

गुगल करा हो, सगळ्या आहेत. शिवाय काही शंकराचार्यांच्या आणि इतर मंडळींच्या कथा झेनच्या नावावर खपवल्यात.

झेनकथा मराठीतून पहिल्यांदाच वाटतोय.
इंग्रजीत खुप झेन कथा वाचल्यात, पण मराठीची मजा काही औरच! Happy
कृपया आणखी कथा येऊद्या.

तुम्ही volunteering कुठे करता? किंवा करता का?
ही मी वाचलेली सुपरसिद्ध झेन कथा आहे

Pages