तन्वीर सन्मान सोहळा - २००८

Submitted by चिनूक्स on 28 February, 2011 - 02:39
पाचवा तन्वीर सन्मान सोहळा पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ९ डिसेंबर, २००८ रोजी आयोजित केला होता. त्या वर्षीचे सत्कारमूर्ती होते पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ नाटककार श्री. गो. पु. देशपांडे. पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे यांच्या कारकिर्दीचा आढावा नाटककार श्री. मकरंद साठे, श्री. गोविंद निहलानी व श्रीमती नीना कुलकर्णी यांनी घेतला.

Tanveer2008.JPG

श्री. गजानन परांजपे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारानं गौरवलं गेलं. त्यांच्या नाट्यक्षेत्रातल्या वाटचालीचा आणि एकंदर योगदानाचा आढावा घेतला श्री. मकरंद साठे यांनी. विज्ञानतंत्रज्ञानाच्या युगात मुलभूत मानवी मूल्यं आणि त्यांचं आजच्या काळाशी असलेलं नातं, यांचा अतिशय वेगळ्या पद्धतीनं विचर करणारे श्री. साठे आधुनिक नाट्यचळवळीचे एक आधारस्तंभ आहेत. ’चारशे कोटी विसरभोळे’, ’ठोंब्या’, ’सूर्य पाहिलेला माणूस’, ’गोळायुग डॉट कॉम, ’चौक’, ’ते पुढे गेले’ ही त्यांची काही महत्त्वाची नाटकं. गेली दहा वर्षं ते पुण्याच्या ललित कला केंद्रात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Makarand Sathe.JPG

’चौक’, ’ते पुढे गेले’ अशा नाटकांमधून श्री. साठे यांनी गजानन परांजप्यांबरोबर काम केलं आहे. श्री. मकरंद साठे यांचे हे मनोगत.


***************************
Prize2.JPG

’सूर्य पाहिलेला माणूस’, ’ते पुढे गेले’ ’चौक’ अशा नाटकांतून केलेल्या भूमिकांमुळे आणि कुसुमाग्रजांच्या कवितांच्या रंगमंचीय आविष्कारामुळे एक अभ्यासू नट अशी ओळख श्री. गजानन परांजपे यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या रंगमंचावरील भूमिका या उत्कृष्ट वाचिक अभिनयाचा एक वस्तुपाठ असतात. मनस्वी नाट्यधर्मी श्री. गजानन परांजपे यांचं हे मनोगत.

Gajanan Paranjape.JPG


*************************** २००८ सालचा तन्वीर सन्मान पं. सत्यदेव दुबे यांना प्रदान करण्यात आला. त्यांची ओळख रुपवेध प्रतिष्ठानाचे एक विश्वस्त व रंगकर्मी डॉ. श्रीधर कानिटकर यांनी करून दिली. पुण्याची रंगभूमी आणि बी. जे. मेडिकल महाविद्यालय यांचे फार पूर्वीपासून नातं आहे. डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल या मालिकेतलं अजून एक नाव म्हणजे डॉ. श्रीधर कानिटकर. डॉ. कानिटकर यांना संगीत नाटक अकादमीनं ’लक्षवेधी दिग्दर्शक’ या पुरस्कारानं गौरवलं आहे. दुबेजींनी पुण्यात आयोजित केलेल्या नाट्यशिबिरांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या शिबिरांचे मंतरलेले दिवस आणि दुबेजींचा प्रभाव यांबद्दल सांगत आहेत डॉ. श्रीधर कानिटकर.

Ashok Kanitkar.JPG

***************************
Neena Kulkarni.JPG

पं. सत्यदेव दुबे यांनी घडवलेल्या असंख्य गुणी शिष्यांपैकी एक म्हणजे श्रीमती नीना कुलकर्णी. रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट ही तिन्ही माध्यमं आपल्या अफलातून अभिनयानं काबीज करणार्‍या नीनाताईंना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच श्रीमती विजया मेहता आणि पं. सत्यदेव दुबे या दोघांचं मार्गदर्शन लाभलं. या मार्गदर्शनाला आपला विचार आणि अभिनय यांची समर्थ जोड देऊन त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. ’महासागर’मधली पाठीचं पोक काढून चालणारी चंपू, ’ध्यानीमनी’मधली सैरभैर झालेली आई, किंवा ’एज्युकेटिंग रिटा’मधली तरतरीत, चंट रिटा प्रेक्षक कधीही विसरणं शक्य नाही. श्री. माधव वझे यांना दिलेल्या एका मुलाखतीत नीनाताईंनी दुबेजींना ’मला अतिशय त्रास देणारा, एकेका वाक्यासाठी मला जसं काही उभंआडवं झोडपून काढणारा, पण संवादांत प्रभावीपण आणण्यासाठी मला एकशे पंचवीस टक्के मदत करणारा गुरू’ असं म्हटलं आहे. या विलक्षण गुरूबद्दल तितक्याच प्रतिभावान शिष्येचं हे मनोगत.


***************************
Deepa Lagoo.JPG

पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गोविंद निहलानी यांचं फार जुनं मैत्र. दोघेही सहाध्यायी आणि नंतर सहकारी. या दोघांनी समांतर चित्रपटचळवळीत फार मोठं योगदान दिलं. ’शांतता! कोर्ट चालू आहे’, ’अंकुर’, ’आक्रोश’, ’विजेता’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केलं. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे श्री. निहलानी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचं भाषण श्रीमती दीपा लागू यांनी वाचून दाखवलं.


***************************
Prize1.JPG

पं. सत्यदेव दुबे यांच्या नाट्यनिष्ठेचा, नाट्यतपश्चर्येला दिलेली मानवंदना म्हणजे तन्वीर सन्मान, असं डॉ. श्रीराम लागू म्हणाले. मूळचे बिलासपूरचे असलेले दुबेजी क्रिकेटपटू होण्यासाठी मुंबईला आले, आणि एब्राहिम अल्काझींच्या 'थिएटर युनिट'कडे ओढले गेले. तिथे त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. नंतर अल्काझी दिल्लीला गेले, आणि 'थिएटर युनिट'ची जबाबदारी दुबेजींकडे आली. ’ययाती’, ’हयवदन’, ’अंधा युग’, ’एवं इन्द्रजित’, ’पगला घोडा’, ’आधे अधुरे’ ’अ‍ॅन्टिगॉन’ अशी नाटकं त्यांनी निर्मिली. ’भूमिका’, ’निशांत’, ’मंडी’, ’जुनून’, ’कलयुग’, ’विजेता’, ’आक्रोश’ या चित्रपटांचे संवाद लिहिले. नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, अमरीश पुरी यांपासून चेतन दातार, इरावती कर्णिक, सोनाली कुलकर्णी यांसारख्या निष्ठावान रंगकर्मींच्या अनेक पिढ्यांवर त्यांनी प्रभाव पाडला.

Satyadev Dubey1.JPG

पद्मभूषण पं. सत्यदेव दुबे यांना २००८ सालचा तन्वीर सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी केलेलं हे भाषण.

***************************
G P Deshpande.JPG

भारतीय नाट्यविश्वातील एक महत्त्वाचे नाटककार, तसंच चिनी भाषातज्ज्ञ व भारत - चीन संबंधांचे जाणकार म्हणून श्री. गो. पु. देशपांडे परिचित आहेत. डॉ. देशपांडे यांचा वेगवेगळ्या भूमिकांतून नाट्यक्षेत्राशी संबंध आला आहे. रंगभूमीशी संबंधित लेख, पुस्तकं यांचे साक्षेपी संपादक म्हणून ते नावाजले गेले आहेत. ’उद्ध्वस्त धर्मशाळा’, ’चाणक्य विष्णुगुप्त’, ’अंधारयात्रा’ ही त्यांनी लिहिलेली नाटकं बरीच गाजली आहेत. या नाटकांचे इंग्रजी तसंच इतर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

श्री. गो. पु. देशपांडे यांचं अध्यक्षीय भाषण.


***
ही ध्वनिमुद्रणं उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती दीपा लागू व 'रुपवेध प्रतिष्ठान'च्या सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक आभार.

***

पुरस्कारसोहळ्यातली प्रकाशचित्रं - श्री. प्रकाश कान्हेरे, कान्हेरे फोटो स्टुडियो, पुणे

***
या लेखातील सर्व ध्वनिमुद्रणांवर आणि पुरस्कारसोहळ्यातील प्रकाशचित्रांवर रूपवेध प्रतिष्ठान, पुणे, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं आणि प्रकाशचित्रं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास वा कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखेर दुब्यांना ऐकलं.
दुबेन्स्की इन हिज ओन सेल्फ.. फटकळ आणि लव्हेबल. Happy

बाकीचे ऐकते एकेक आणि टाकते प्रतिक्रिया!!

सुरेख उपक्रम. सगळी नाही ऐकता आली भाषणं आज. पण नीना कुलकर्णी, डॉ. कानिटकर आणि गजानन परांजपे यांची ऐकली. अप्रतिम आहेत! Happy
पुढची ऐकेन उद्या.
ब्राव्हो! Happy

परांजप्यांचे मनोगत म हा न आहे!
एक मित्र आणि मी 'ते पुढे गेले' बघायला सुदर्शनला गेलो होतो आणि अक्षरशः अवाक् होऊन कुठल्यातरी धुंदीत बाहेर पडलो. परांजप्यांनी त्या रंगमंचावर जे काही केले ते कळण्यासाठी 'सहानुभूत'च व्हायला पाहिजे. भाषणात साठ्यांनी बलात्काराच्या प्रसंगाच्या अभिवाचनाचा किस्सा सांगितला आहे. कल्पना करा, आता तो माणूस प्रत्यक्ष अभिनय करत आहे........ ते खरोखर सहन करण्यापलीकडे होते! वाचिक अभिनयाचा वस्तुपाठ...... २००%. रंगमंचावरची स्पेस व्यापणे...... २००%. पण हे विचार नंतरच. त्या नाट्यावकाशात परांजप्यांनी आम्हाला जिथे नेले होते तो प्रदेश डोक्यात कायमचा रुतून बसला आहे. प्रयोग संपल्यावरची धुंदी म्हणा, व्यग्रता म्हणा, इतकी होती की निघायच्या आधी त्यांच्या पायांवर डोके ठेवण्याचेही सुचले नाही.
चिन्मय, अनेकानेकानेक धन्यवाद! बाकीचे ऐकले की सांगेनच.

"नाटककार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, रंगभूषाकार........ प्रेक्षक या सर्व घटकांमधून अंशाअंशाने मिळत जातं, साठत जातं. ते एकमेकांशी जोडले जातात; प्रयोग घडतो आणि नाटकाचं एक स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होतं आणि हा सांघिक कलाप्रकार स्वभान आणि समाजभान जागृत ठेवायला उद्युक्त करतो. मला हे मनापासून आवडतं आणि माझ्यासाठी हे महत्त्वाचं वाटतं."

अर्भाटा, 'ते पुढे गेले' बद्दल अगदी अगदी. गजाभाऊ 'आयुष्यात पहिल्यांदाच' मधे कुसुमाग्रजांची 'खुर्च्या' कविता करायचे संपूर्ण व्हिस्पर मधे. आमची सगळ्यांची विंगेत गर्दी. सेंटर फ्रंटला खाली बसलेल्या गजाभाउंची प्रोफाइल, झगझगता स्पॉट त्यांच्यावर... आम्ही विंगेतही शहारायचो.

गजाभाऊ खास आहेत हे परत एकदा अधोरेखित झालं त्यांचं ऐकताना.

नीना आणि दुबेजी दोघान्ची भाषणं आत्ताच ऐकली.
चिन्मय. धन्यवाद
खरच खजिनाच आहे हा.
चिन्मय, परत धन्यवाद आणि मायबोलीला पण धन्यवाद.
नाही तर कुठे आम्हाला ऐकायला मिळाली असती अशी उत्तमोत्तम भाषणं?:)

दुबेजी, नीना कुलकर्णी, कानेटकर आणि गजानन परांजपे... सुपर ऑसम..
गजाभाउंची नाटकाची व्याख्या तर किती चपखल आहे... आणि अस्खलित शुदध आणि स्वछ शब्दोच्चार .
चिन्मय आणि रुपवेध शतशः धन्यवाद...

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

Marilyn Monroe spoke for women designer shoes all over the world when she said, "I don't know who invented yves saint laurent shoes high heels, but all women owe ysl pumps him a lot!" And, really, ysl booties what's not to love? A pair of high heel pumps can do wonders for your posture, give you that ysl sandals extra boost of confidence, and lengthen your legs like no other shoe.