तन्वीर सन्मान सोहळा

अधिक माहिती

तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात सोळा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दु:ख बाजूला ठेवून त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली, आणि तन्वीर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.

tanveer2010_2.JPG

नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू आणि श्रीमती दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानानं केलेला हा सन्मान अतिशय महत्त्वाचा आहे. रंगभूमीप्रती असलेल्या जबरदस्त निष्ठेचा रंगभूमीसाठी आयुष्य वेचणार्‍या लागू दांपत्यानं केलेला हा सन्मान आहे. या सोहळ्यांतील भाषणं, मुलाखती हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतीय आणि जागतिक रंगभूमीवरही आपलं नाव अजरामर करणार्‍या थोर रंगकर्मींनी केलेली भाषणं, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या समकालीनांनी, शिष्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंकाच नाही. हे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचावं, तरुणांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून तन्वीर सन्मान सोहळ्यांतली भाषणं, मुलाखती मायबोलीवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या वर्षभर दर महिन्याला काही भाषणं आपण या विभागात ऐकू शकाल.

शीर्षक लेखक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
तन्वीर सन्मान सोहळा - २००९ लेखनाचा धागा चिनूक्स 3 मे 24 2011 - 3:04am
तन्वीर सन्मान सोहळा - २०१० लेखनाचा धागा चिनूक्स 36 Jan 9 2012 - 12:51pm
तन्वीर सन्मान सोहळा - २००८ लेखनाचा धागा चिनूक्स 17 Jan 10 2012 - 4:08am