मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे ऑक्टॉपस खातात ते माहीतच नव्हते!!
मी आपली इकडे जपानी लोकांना सांगायचे "आमच्याकडे नै बै खात." :P 
बाकी धागा छान. जागू ताईंकडे जाणारच आहे एकदा जेवायला. Happy

अरे.. एवढं सगळं एकत्रं एकाच फॅन क्लब मधे Happy ?
पोल्ट्री क्लब वेगळा, रेड मिट, वेगळा, सीफुड कल्ब वेगळा होईल इतक्या रेसिपी इथेच असतील !
असो.. माझा फक्त पोल्ट्री कल्ब साठी हात वर पण सगळं एकत्रं असेल तर नाही यावसं वाटणार :).

ऑक्टोपस अन स्क्विडच्या देशी रेसिपी टाका ना प्लीज. इथे चिनी किंवा इटालियन रेस्टॉमधे मिळतात काही प्रकार, पण ताजे ऑक्टोपस सहज मिळत असल्याने घरी करुन पहाणे कठीण नाही.

ऑक्टोपस ला आम्ही माकली/माकुळ म्हणतो. ती मटण करतात तशीच करायची असते. शिजायलाही मटणासारखाच वेळ लागतो. ही साफ करण थोड कटकटीच काम असत. ह्या माकलीत पण दोन प्रकार असतात. एक मण्यांची आणि एक साधी माकली. माकलीची अंडीही खातात.

जागु, ह्या बाफवर पदार्थ चाखुन बघायची पण सोय करना.... नाहितर कठिण होणार अस नुसतच बघत बसण.... (चाखुन बघायच्या प्रतिक्षेत असलेली बाहुली.....) Proud

आता मी नेहमीच इथेच पडिक मिळणार..... Proud

अमा, मी जेलीफिशची रेसीपी लिहीन. ५० छोटे ट्रान्स्परंट जेलीफिश घ्यायचे. चांगले धूवून निथळायचे. त्याला मीठ जीरे लावायचे. मग गच्चीत प्लॅस्टीक पसरुन एक एक जेलीफिश साबुदाण्याच्या चिकवड्या घालतात तसा प्लॅस्टीकवर टाकायचा. दुपारी राखणीला बसायचे. अर्धवट सुकलेला जे.फि. हळूच कुणी बघत नाही हे पाहून तोंडात टाकायचा. संध्याकाळी प्लॅस्टीक घरात आणायचे. उद्या परत उन्हात घालायचे. पूर्ण सुकले की धूवून उन्हात वाळवलेल्या पत्र्याच्या डब्यात ठेवून द्यायचे. डावीकडे तळणी म्हणून जेवायच्या जस्ट आधी तळून घ्यायचे. चिकवड्यांएवढे फुलतात की नाही माहित नाही.

वाढणी : सांगता येत नाही.
स्त्रोत : कल्पना तिरकेडोके.
टीप : ही वरची पाकृ म्हणजे भंकस आहे. Wink त्यामुळे कुणीही ट्राय करु नये.

:या बाफ वरुन हकालपट्टी होणार हे नक्की माहित असलेली बाहुली:

मामी येउद्यात लवकर रेसिपी.

अश्वे तुझ्या अशा पोस्टी हव्यातच ग. हकालपट्टी कशाला स्वागतच आहे तुझ.

जागू | 25 February, 2011 - 10:16
आज काय मेनु आहे तुमच्याकडे ?
थोड्या वेळात एक रेसिपी टाकणार आहे. >>>> anim_62.gif

जागू...
एक जबरदस्त फॅन अ‍ॅड झालेय या धाग्यात!!! Happy
मस्त माहीती आणि एकत्रित दिल्यामुळे खरंच सोय झालेय... आमच्या आईबाई खास अलिबाग-मुरूडची सुकी मच्छी पाठवणारेय... नवीन प्रकारे ट्राय करून बघेन... Happy

आपल्याकडे ऑक्टॉपस खातात ते माहीतच नव्हते!!
मी आपली इकडे जपानी लोकांना सांगायचे "आमच्याकडे नै बै खात." >> अरे तुमच्यापैकी गोव्याला कोणीच गेलं नाहीये मासे खायला???? तिथली हिट अ‍ॅण्ड हॉट डिश आहे माकूळ उर्फ स्क्वीड!!!

ड्रिमगर्ल तुझ स्वागत आहे. अलिबाग मुरुडला सुके सोडे खुप छान मिळतात. आम्ही मागच्यावर्षी आणले होते. इतर ठिकाणि जरा भेसळीचे मिळतात.

अलिबाग मुरुडला सुके सोडे खुप छान मिळतात. आम्ही मागच्यावर्षी आणले होते. इतर ठिकाणि जरा भेसळीचे मिळतात.>> अगदी अगदी!!! थोडे महाग असतात पण चवीला १ नंबर!!! नुस्ती चटणी वाटली फ्राय केलेल्या सोड्यांची, तरी बाकी तोंडी लावण्यासाठी कशाची गरज नाही. सोड्याची चटणी भरून अंडी आणि वांगी..., सोड्याचा पुलाव्/मसाले भात, सोड्याचे अंडी,वांगी टाकून कालवण... स्लर्प.... यम्मी...

काळ्या रंगाची कोलंबी मिळते, ती ताजी आहे का हे कसे ओळाखावे?

मी रविवारी बाजारात एक प्रकारचे मासे पाहिले, जे गुलाबी रंगाचे होते पण कडांना fluorescent colour होता (हिरवट पिवळा असा), ते कोणते मासे आहेत?

>> अमी फोटो काढला असतास तर बर झाल असत.>>
मला वाटलं की फोटो काढावा, पण उगाच कोळीण रागावली वगैरे तर.... म्हणून नाही काढला.

तू मला काळ्या रंगाच्या कोळंबीबद्दल सांग ना.

...

Pages