आपण आग्रही ग्राहक

Submitted by मामी on 20 January, 2011 - 10:27

बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी मला चेन्नइला जायचे होते सकळी ६.४० च्या फ्लाईटने..नवरा बाहेरगावी गेला असल्याने मी मेरू बुक केली, तेही शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता. शनिवारी पहाटे ५.१५ पासून त्यांना फोन करून विचारणा करत होते. आधी गाडी पाठवत आहे असे सांगितले. ५.३० पर्यंत मेसेज आला नाही म्हणून परत फोन केला तर १० मिनिटे वेळ लागेल असे सांगितले. ड्रायव्हरच्या नंबरचा मेसेज आल्यावर त्या नंबरवर फोन केला तर तो सांताक्रुझला होता. त्याला माझा एरिया नीट माहितही नव्हता, म्हणून मीच आमच्या जवळ असलेल्या बसस्टँड्पर्यत गेले. तिथेही तो ५ मिनिटे वेळाने आला आणि तिथून निघाल्यावर चुकिच्या लेनमध्ये गाडी घातली. त्यामुळे पुर्ण यू टर्न घेऊन जावे लागले.

शेवटी अगदी ऐनवेळी एअरपोर्टवर पोहोचले पण तिथे पुन्हा जेट एअरवेजच्या ढिसाळपणामुळे माझं फ्लाईट मिस झालं... Sad
सिस्टममध्ये काहीतरी प्रोब्लेम झाल्याने खुप वेळ लागत होता, त्यात एक एक्सरे मशिन बंद होते, त्यामुळे सिक्युरिटी चेकला सुद्धा वेळ लागत होता.... त्यात माझ्याकडे बेव चेकइअन असून सुद्धा दोन ग्राऊड स्टाफनी मला क्यू मध्ये उभं रहायला सांगितल Sad

परीणामी फ्लाईट मिस झालं. जेटच्या अजागळ कारभाराचा फटका बसलेले इतर अनेक जण तिथे होते. ते सर्वजण भांडू लागले. शेवटी त्यांची एक सिनियर मॅडम आली. मग पुढच्या फ्लाईटमध्ये आम्हाला अ‍ॅडजस्ट केलं.

चेन्नाईला पोहोचले. पण दोन तास प्रचंड मनस्ताप झाला.

आता मी कधीही मेरूने प्रवास करणार नाही आणि जेटनेही प्रवास करणार नाही.

समु,

फार मनस्तापातून जायला लागतंय तुला. Sad

सकाळ वृत्तपत्रात ग्राहकांच्या अशा तक्रारींची दखल घेतात. सकाळ च्या साईट वरती कुठेतरी उपयोगी लिंक वा मेल अ‍ॅड्रेस असेल तर त्यांना तुझी ही तक्रार प्रकाशित करायला सांग. बघ काही उपयोग होतो का ते. त्याच प्रमाणे सकाळ मध्ये एरीया प्रमाणे ग्राहक हित संघटनांचे पत्ते व फोन नं. दुद्धा दिलेले असतात. तिथे तक्रार करता येते का ते पण बघ. मी सकाळ ची लिंक बघून उपयोगी सापडले तर इथेच पोस्ट करेन.

डीलरचे नावच कंपनीत कळविले नाहीतर कंपनी कशी अ‍ॅक्शन घेइल. मला खूप हसू आले. प्रत्येक डीलरचे एक कोड असते. आम्हीही कोणाशी बोलताना कस्ट्मर कोड मागतो मग त्याचे सर्व डीटेल्स सिस्टिम मध्ये असतात. देशभरात किती हजार डीलर्स असतील कंपनीचे. उगीच कंपनीला सर्विसला नावे ठेऊ नये. खरे तर कंपनीच्या रीजनल ऑफिस मध्ये जाऊन त्या एरियाच्या मॅनेजरशी बोलावे. तिथूनच डीलरला फोन लावावा. मॅनेजर चे डीलरचे रोज बोलणे होत असते.

काल मी "ऊद्या सकाळी ९ वा. येते" अस सांगुन आलेले, येतांना मॅनेजर मॅडमचा सेल नंबर आणला त्यांनी मला "मी तुम्हाला संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान फोन करुन ऊद्या केनेकशन मीळेल का कळवते सांगीतलेल" पण त्यांचा फोन काही आला नाही मग मीच त्यांना फोन केला "ऊद्या मी यायच ना" विचारल त्या म्हणाल्या "आज अजुन सर आलेले नाही, त्यांच्या शी बोलुन मी तासाभराने तुम्हाला फोन करते" संध्याकाळी ६ पर्यंत फोन ची बघुन मी परत त्यांना फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या "ऊद्या १० ला या"

आज सकाळी बरोबर १०:०० ला मी तीथे पोहचले, १०:२५-३० पर्यंत बसवुन ठेवल (आधी तर मला आत जातांना मी मला क्षक्षक्ष मॅडम नि बोलावलय सांगीतल तरी तीथल्या एका माणसाने थांबवल म्हणाला "बाहेरच थांबा" पण तीथल्या दुसर्‍या मॅडम ला सगळा प्रकार माहित आहे त्याच पहिल्यांदा माझ्याशी बोलला होत्या त्यांनी मला आत बोलावुन बसायला सांगीतल)

डिलर हि आज तीथे होता ई बसलेले असतांना "ईतक्या तक्रारी केल्या" असा आवाज त्या मॅनेजर मॅडमचा आला म्हणजे माझ्या बद्दल डिलर व त्यांच बोलण सुरु होत. डिलर २-३ वेळा बाहेर आला पण मी त्याच्याशी बोलले नाही वा तो हि नाही. बसल्या बसल्या मी आज तीथे होणार्‍या घडामोडींचे सेल मध्ये व्हिडीयो रेकोर्डींग करत होते.

फोन वर फोन वाजत होते पण कुणीच फोन ऊचलत नव्हत, २-३ ग्राहक मला काल सांगीतलेल आज सीलेंडर मीळेल म्हणुन आलो आता नाही म्हणता असे वैतागले होते, काही ग्राहक च चुक होते अस सगळ रेकॉर्डिंग मी केलय.

डिलर ने बाहेर येऊन वाजणारे फोन ऊचला आणी फोन ऊचलत जा अस तीथे बसलेल्या ३ employees ना हळु आवाजात सांगीतल (जे मी एकल) तेव्हा employee फोन ऊचलु लागल्या. डिलर अस म्हणतांना माझ्या कडे बघुन गेला Happy

असो. मी बराच वेळ बसले होते मझ्या आधी एका काकांना बोलावल, माझ्या नंतर एक आजी आणी ताई बसल्या होत्या (बर्‍याच वेळा पासुन). त्या काकां नंतर आमच्या मगुन आलेला एक माणुस मध्येच शीरला त्या आ़जी आणी ताई पण वैतागल्या आणी उभ्या राहिल्या पण तो गेल्यावर त्यांना सांगण्यात आल "त्या मॅडमच झाल्यावर तुमचा नंबर येईल"

माझा नंबर आला "आज कनेकशन मीळेल पण कागद-पत्र ५-६ दिवसांनी आमच्या कडे S/W change झाल्याने" (त्या काकांना पण असच संगीतलेल) तेवढ्यात डिलर आला, त्याच आणी employee च बोलण झाल डिलर त्या employee ला म्हणाला "हे आपल आपल्यालाच करायचय/शीकायचय कुणी येणार नाही करायला"

मला ३९५०.०० रुपये मागीतले मी ४०००.०० दिले आणी कागद पत्र नाही पण पैसे भरल्याचा पुरावा तर द्या अस म्हणाले तर त्या employee म्हणाल्या मॅनेजर शी बोलुन येते आणी नंतर मला मॅनेजर कडे घेऊन गेल्या त्या मॅडम म्हणाल्या "५-६ दिवसांनी सगली कागद देतो"

तीथेच कनेकशनची प्रोसेस करणार्‍या बाईंनी मॅनेजर कडुन घेऊन मला ५० रु. परत केले आणी म्हणाल्या ऊरलेले ६ रुपये माझ्या डेस्क वर देते. मी एकुण किती पैसे झाले विचारल तर त्या म्हणाल्या ३९४४.०० रुपये.

मॅनेजर बाई "तुमच्या कडुन काहीच जास्त पैसे घेतलेले नाहीत" म्हणाल्या Happy

सीलेंडर च कुपन घेऊन सीलेंडर कलेक्ट करायला बाहेर गेले तीथल्या बाईंनि कार्ड मागीतल मग परत आत गेले आणी कनेकशन डेस्क वर कार्ड मागीतल तेव्हा डिलर तीथे होता, तो म्हणाला "काय मॅडम किती तक्रारी केल्या आमच्या, मागे दोन सोमवारी आमचा माणुस येणार होता पण तुम्हीच आल्या नाही , तुम्हीच स्केड्युल बदलल" (हे म्हणजे छानच सोमवारच कधीच फायनल झालेल नव्हत)

मग मी ही म्हणाले "मी आले होते सोमवारी पण आज प्रमाणेच तुमचा फोन बिझी वा नो रीसपोन्स असा होता" (आणी जर माणुस येणार होता मला फोन कसा नाही आला, माणुस येतांना निघतांना फोन करेल अस डिलरशी बोलण झाल होत)

तपासणीला आलेल्या माणसाने मला नाही सांगीतल कि तो आधी येऊन गेला, ऊलट तो माणुस चांगला म्हणुन त्याने मला मॅनेजरच नाव सांगीतल व त्यांचा सेल नंबर घ्या अस सुचवल

असो मी जास्त वाद न करता कार्ड घेतल, सीलेंडर घेतले, रीक्षा बोलावली सीलेंडर, ट्युब, रेग्युलेटर त्यात टाकल आणी घरी नेल (कादग पत्रां शीवाय) Happy Happy

आता कादग पत्र मीळायची तेवढी वाट बघत आहे. Happy

तुमच्या सगळ्यांचे मनापासुन आभार!!!, ह्या सगळ्यात मा. बो. चा खुप आधार मीळाला (मी घरी कोणाला हे सगळ सांगीतलेल नाही आणी फ्रेंडस मध्ये हि माझ गॅस कनेकशन च काही तर सुरु आहे एवढच माहीत आहे, इथे तेवढी माझी कथा विस्ताराने मांडली आहे)

ज्या रीक्षात सीलेंडर नेले त्या काकांशी बोलण झाल ८-९ वर्षां पुर्वी त्यांना ही डिलर कडुन शेगडी घ्यावी लागलेली जी बाहेर पेक्षा जास्त माहगडी आणी त्यांच्या शब्दात "एकदम बंडल" आहे. तळेगावात "डिलर कडुन शेगडी घ्यावीच लागले" असच सगळ्यांना माहित आहे आणी तेच सगळे गुमान मानतात.

आज हो माझ्या मागे असलेल्या त्या आजी आणी ताईंनी हि मला विचारल "नव कनेकशन का" मी "हो" म्हणाल्यावर त्यां म्हणाल्या "मग शेगडी पण घेतली असेल ना ईथुन" मी "नाही घेतली" म्हणाले आणी त्यांना सांगीतल "ईथुन शेगडी घ्यायचीच अस काही नाही " बस ईतकच बोलु शकले त्यांच्याशी

एका गोष्टच मला खुप वाईट वाटतय माझ्या साठी तेवढी मी खटाटोप केली पण ईतर खास करुन गरीब, कमी शीकलेल्या लोकांना मात्र हा त्रास आहेच त्यांच्या साठी काही करता आल नाही मला Sad

काल तीथे एक माणुस भेटलेला त्याला अजुन ८ - १० दिवस कनेकशन बंद आहेत सांगण्यात आल, तो ही आधी येऊन गेलेला. आजही लोकांना कनेकशन देण अजुन ८ - १० दिवस बंद आहे सांगुन परतवल.

@ मामी,
हो मी तक्रारीत डिलर नाव टाकल नव्हत पण शेवटची तक्रार मी ई-मेल (२ ई-मेल) नेही पाठवली होती, आधीच्या दोन तक्रारींना आलेल्या रीप्लाय मेल ला रीप्लाय म्हणुन Happy

@ हिरकु,
होय. माझ्या पोस्टस मध्ये मी टाकलय तळेगावात कुकींग गॅस चा एकच डीलर तो हि HP चाच आहे Happy

ग्रेट. सब्र का फल मीठा होता है! Happy
तु लावुन धरलंस म्हणुन झालं हे काम, नाहीतर पुढच्या त्रासाला घाबरुन आधीच पैसे घ्या पण कटकट नको या वॄत्तीमुळे हे लोक असे माज करतात.

आता स्वतःला बक्षीस म्हणुन एक मस्त आयस्क्रीम नाहीतर कॅडबरी खा. Proud

अभिनंदन समु. पण मला तरीही वाटतं की सगळ्यात पहिले तक्रार करतानाच तु डिलरचं नाव दिलं असतस तर हा एवढाही मनःस्ताप झाला नसता. मला स्वतःला HP चा फारच चांगला अनुभव आहे.

आता तुला माहित असलेल्या सगळ्यांना सांग की गॅस कनेक्शनबरोबर शेगडी सुध्दा डिलरकडून विकत घेणे गरजेचे नसते.

आजच माझा ड्रायव्हर सांगत होता की त्याच्या घरचा गॅस नीट पेटत व्हता म्हणून त्याने HP वाल्यांना तपासणीकरता बोलावले. त्यांनी तपासून सांगितले की, शेगडीच बदलायला लागेल आणि आमच्याकडची घ्या हे तुणतुणे चालू केले. बर्नर कुठेच मिळत नाही असेही सांगितले. तर तसेही काही नसते. बर्नर्स सुटीही बाजारात मिळतात. दादरला कीर्तीकर मार्केटात असतात. बाकी ठिकाणचं माहित नाही. २०० रुपयांच्या बर्नरकरता हजारो रुपयांची शेगडी विकत घेऊ नका.

आभार निंबुडा, चिंगी Happy

@आधीच पैसे घ्या पण कटकट नको या वॄत्तीमुळे हे लोक असे माज करतात>>> बरोबर आहे आणी मला अस करण्याचे सल्ले पण मीळालेत बिल्डर, शेजारी यांचे कडुन Happy

माझ्या एका मैत्रीणीच्या मीत्राला मला गॅस कनेकशन घ्यायला त्रास होतोय आणी मी एकटीच सगळा पराकम करतेय हे गप्पा करतांना मागच्या रविवारी समजल तो म्हणालेला "आपली आहे ओळख तळेगावात, वा बघु काय करायच ते, काही करायचय का?" मी नकार दिला म्हणाले "काही लागल तर कळवेल"

काल त्याचा फोन आलेला कनेकशनच काय झाल विचारायला काल ही तो म्हणाला "मी काही करु का? " मी "सध्या डिलरच कनेकशन देण बंद आहे, ते सुरु झाल कि बघु" एवढच त्याला सांगीतल

आपण स्वःता प्रयत्न न करता मदत का घ्यायची!!! अस मला वाटत आणी शीवाय अनुभवी मार्गदर्शन करायला मा. बो. आहे ना. आभार मा. बो. Happy

@ चिंगी,
आता स्वतःला बक्षीस म्हणुन एक मस्त आयस्क्रीम नाहीतर कॅडबरी खा>>> हे कागद पत्र अल्यावर Happy

हो मामी सांगतेय जमेल तीतक्या लोकांना, रीक्षावाल्या काकांना तर नेट वरुन HP ची मदत कशी घ्यायची तेही समजावण्याचा प्रयत्न केला Happy

तळेगावात राहणारा आणि स्वतःचा बिझनेस करण्यास जर कोणी इच्छुक असेल तर त्याला चांगली संधी आहे... BP किंवा IO कडे जाऊन नवीन गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी....

समु.. तुमचं अभिनंदन... आणि तुम्ही शक्य तितक्या लोकांना शेगडी न घेता नवीन कनेक्शन मिळते हे सांगत जा..

मामी सगळीकडे असे सुटे बर्नर्स मिळतात.. फक्त गॅसच्या शेगड्यांची दुकानंच्या दुकानं आहेत आणि त्यांच्याकडे सुटे बर्नर्स नक्की मिळतात.. नक्की गॅस का पेटत नाही हे कळल्यावर काय करावे लागेल ते बघावे लागेल.. बर्‍याच वेळा कचरा आडकल्यामुळे पण गॅस नीट पेटत नाही... वांग भाजल्यावर तर हा प्रॉब्लेम नक्कीच येतो..
तुमच्या ड्रायव्हरला शेगडी जर सहज ज्या दुकानातून घेतली तिथे घेऊन जाणे शक्य असेल तर तिथे घेऊन जायला सांगा.. किंवा शेगडी ज्यानी बनवली आहे त्याला संपर्क करायला सांगा... त्यांचाकडचा माणूस येऊन शेगडीत नक्की काय चूक आहे ते बघू शकेल...

राम राम मंडळी परत एक Sad शॉपींग अनुभव येतोय

काही दिवसांपुर्वी आई बाबा आलेले, त्यांच्या सोबत 15 April ला 'ऊत्सव' Exibition ला गेले तीथे आम्ही Maharashtra Electronic Corp ह्यांच्या स्टॉल वर फ्रीज व LG LED 32" PLUS बुक केला. त्यांच्या अटी प्रमाणे पुर्ण पैसे त्यांच्या दुकानात भरल्यावर २ दिवसात वस्तुंची डिलेवरी मीळणार होती. 17 April 2011 Sunday ला आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन पुर्ण रक्कम भरली व सामान 19 April 2011 Tuesday ला येणार होत जे आल नाही. बरेच फोन, त्रास नंतर 22 Apr 2011 Friday ला नक्की डिलेवरी करु अस त्यांनी मंगळवारी रात्री ९:३० ला कळवल पण बुधवारी अचानक त्यांचा फोन आला "तुमच सामान येतय संध्याकाळ ७:०० पर्यंत" जे रात्री १०:३० च्या सुमारास आल. पण अजुन त्रास संपलेला नाही!!!!!!!!!!!!!!

LG LED सोबत Tata Sky ची डिश मीळणार होती ज्या साठी मी LED आल्यावर (२३ Apr 2011 Saturday) Tata ला SMS केला त्याच दिवशी Tata चा ७२ तासात कनेकशन होईल असा फोन पण आला पण अजुन ही Tata Sky आलेल नाही. आठवडा भरा पेक्षा जास्त झाला LED तसाच पडुन आहे.

MH Elect ने आधी मला "तुम्हालाच Tata Sky ला संपर्क साधावा लागेल, मेसेज करावा लागेल अस काही सांगीतल नाही , बाबांनी LED सोबत मीळालेल कुपन ऊघडल त्यावर मेसेज बद्दल वाचल. डिलेवरी बॉयला कुपन वरच्या प्रोसेस बद्दल विचारलेल तर तो म्हणालेला तुम्ही नाही आम्हीच Tata Sky ला संपर्क करतो कस्टमर च्या कनेकशन साठी" Sad म्हणुन मी दोन दिवस वाया घातले आणी मग MH Elect ला फोन केला तेव्हा कळाल मीच Tata Sky ला मेसेज करायचाय.

Tata Sky आज येईल ऊद्या येईल म्हणुन आई बाबा २ दिवस थांबले (त्यांना परतायच असुन). Tata Sky ला माझे बरेच फोन झालेत पण No Out-Put.

Tata Sky Customer Care फक्त तक्रारी नोंदवुन खोटी आश्वासन देत "२४ तासात कनेकश्न येईल", ऊद्या कनेकशन येईल" ......काल ...."माल चा शॉर्टेज आहे"

My experience with Tata Sky is: Tata Sky Customer Care representatives do NOT provide Solution or Resolution to customers they just listen to you and make fake promises that is it. There is no provision on Tata Sky web-site for customer feedback.

काल तर मला रेप. म्हणाला "मॅम तुम्ही आमचा नंबर डायल केल्यावर तो महाराष्ट्रात कुठल्या ही शहरात जातो औरंगाबाद, कोल्हापुर वै." Uhoh Angry मी नंबर च्या आधी ०२० हा पुण्याचा कोड लावलेला आणी मी परवा ज्या सीनियर रेप. शी बोललेले त्याला कनेकट करा सांगीतल त्यावर मला हे ऊत्तर मीळाल. (परवा ज्या सीनियर रेप. शी मी बोललेले तो म्हणालेला मी ईथे नेहमी असतो, तुम्ही माझ नाव सांगुन माझ्याशी कनेक्ट होऊ शकता")

जाऊ देत, मी काय करु मला प्लीज गाईड करा. MH Elect वाले पण हा Tata Sky चा पार्ट आहे म्हणुन जास्त काहीच assist करत नाही आहेत. Sad

माझ्या सोबत हे अस काय होतय!!!!!!!!!!!!!!!!!! ..... LPG Connetion Stove, LED Tata Sky Connection, फ्रीज.... वस्तु घेण्यासाठी, घेतल्यावर त्रास का होतो/होतोय Sad ...... आई बाबा पण नाराज परतले. आई फोनवर विचारते "Tata Sky आल का" आणी नाराज होते. काल मी घरी फोनच नाही केला म्हणुन Sad

अरे! बरेच दिवसा पासुन ईथे कोणी फिरकलेल दिसत नाही चला म्हणजे सगळ्यांना ग्राहक असण्याचे चांगले अनुभव येत आहेत Happy

माझ टाटा स्काय प्रकरण पण LPG Connection प्रमाणेच एक छोटीशी फाईट होत , इथ पोस्ट टाकतांना मी खुप नाराज होते, पण पोस्ट टाकल्यावर विचार केला, "नाही अस गीव-अप करायच नाही " म्हणुन परत डिलर आणी टाटा स्काय कस्टमर केअर ला फोन केला... पण पुन्हा खोट्या आश्वासनां शीवाय काही मीळाल नाही Sad (डिलरने स्वःताच "अजुन कनेकशन आल नाही" अस आश्चर्य व्यक्त केल).....

.....मग शेवटचा म्हणुन परत एक नेट सर्च मारला "टाटा स्काय हेड ऑफीस" असा..... टाटा स्काय च्या मुंबई हेड ऑफीसचा नंबर मीळाला त्यावर फोन केला तो अकाऊंट-फायनांस विभागाचा नंबर होता पण रीसेपशन ला मी "प्लीज माझ म्हणण एका" सांगीतल्या वर त्या मॅडमने माझ म्हणण एकल आणी "आत्ता १:०० वाजलाय तुम्ही दुपारी २:०० ला फोन करा आमच्या DGM येणार आहेत" सांगीतल...

.....दुपारी २:०० च्या आधीच मला DGM चा कॉल आला आणी त्या नंतर तासाभराने बँगलोर आणी पुणे विभागाच्या हेड चे फोन आले.....संध्याकाळी ६:३० ला टाटा स्काय आल Happy ..... संध्या. ७:०० ला परत पुणे हेड चा फोन आला "मॅडम कनेकशन व्यवस्थीत झाल ना" विचारायला Happy

Tata Sky DGM रीटा मुनकर ह्यांनी, त्या बेस्ट employee असण्याचा अनुभव दिला.....माझे आभार त्या फ्रंट-डेस्क (रीसेपशन) च्या मॅडम ला ही Happy

मी सांगीतल, DGM and Heads ला "कस्टमर चे कॉल रेकॉर्ड होतात ना मग माझे कॉल्स ऐका, तुमच्या कस्टमर केअर ने मला काय काय ऊत्तर दिली आहेत ते"

आणी हो पुण्याच्या हेड ने मला शेवटी विचारलच "मॅम तुम्हाला एक विचारु का, तुम्ही DGM ला कश्या ओळखतात" Happy

सध्या मी सारख टिव्ही बघण्यात डोळे खराब करत असते Happy

अरे वा समु. ग्रेट्च. दोन्ही वेळेस चांगलीच फाईट दिलीस. अभिनंदन. आणि धन्यवाद - तुझे अनुभव इथे शेअर केल्याबद्दल.

समु ..आग्रही राहिल्याबद्दल अभिनंदन.
बर्‍याच वेळा मोठ्या साहेबाकडे तक्रार केल्यास लवकर लवकर काम होतात असा अनुभव आहे. मागच्या महिन्यात एचएसबीसी ने एनआरआय खाते बंद करण्यासाठी पण खुप त्रास दिला. शेवटी नोडल ऑफिसरकडे तक्रार केल्यावर लवकर काम झाले.

@ मामी
आभार तुमच्या सगळ्यांचे आणी मा. बो. चे Happy ...... ईथे आपले अनुभव व्यक्त करता येतात आणी मा.बो. कर वाचतात, सल्ले देतात आपुलकिने... Happy

@ महागुरु
हो मला पण असाच अनुभव आहे कि मोठ्या साहेबां कडे तक्रार केली कि काम लवकर होतात Happy

समु, चांगले केलेत.

गेल्या महिन्यापासून स्वयंपाकाचा गॅस महागणार होता, म्हणून परत इथे खोटा तुटवडा निर्माण केला गेला. बुक करून दीड महिना झाला तब्बल, तरी सिलिंडरचा पत्ता नाही. मग पुन्हा थेट गॅसकंपनीकडे तक्रार केली. लगेच संध्याकाळी एजन्सीमधून फोन - साहेब तुम्ही केव्हा घरी आहात, सिलिंडर द्यायचा आहे. मी म्हणालो, मी आज उशीरा घरी पोहचणार आहे, आणि उद्यापासून चार दिवस घराबाहेर आहे.

तर, तुम्ही कृपया मोकळा सिलिंडर तुमच्या शेजार्‍यांकडे ठेवू शकता का? किंवा आज किती वाजेपर्यंत याल ते सांगा, म्हणजे आजच सिलिंडर पोचवतो.

शेजार्‍याकडे सिलिंडर ठेवून गेलो. मग सिलिंडर पोचवल्यावर पुन्हा फोन - साहेब, जरा शेजार्‍यांना फोन करून तुम्हाला सिलिंडर मिळाला आहे याचे आम्हाला कन्फर्मेशन द्याल का?

फसवणूक झालेल्या ग्राहक राजांनो हे पहा -
International Consumer Rights Protection Council (ICRPC)
File Consumer Complaint, Consumer court address, Fearless action against corruption
http://www.consumergrievance.com/

यांना इमेलद्वारे संपर्क साधता येतो. त्यांनी एकदम कडक भाषेत सूचना लिहीलेल्या आहेत वेबसाइटवर.

एमएसईबी कंपनीबद्दल कोणाला अनुभव नाहीत वाट्टं....
माझ्या डोंबिवलीच्या घरी कोणी राहत नसुन पण ३००-४०० बिल यायला लागलं म्हणून तक्रार दिली तर मीटर फॉल्टी म्हणुन सांगितले. मिटर बदलुन घेतल्यावर एक महिना ठिक होतं सगळं. पुन्हा दुसर्‍या महिन्यात बिल एकदम १५०० रुपये!!
नवरा त्यांच्या हपिसात गेला तर म्हणे बरेच मीटर फॉल्टी असल्याने सरसकट १३४ युनिट्स चे बिल पाठवले जातेय!! ऑफिसर बद्दल विचारले तर तो म्हणे रजेवर आहे.
सध्या प्रत्येक शनिवारी नवर्‍याला हाच उद्योग लावलाय... एमएसईबी कंपनीत खेपा घालायचा.
महराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आहे ही.

>>> एमएसईबी कंपनीबद्दल कोणाला अनुभव नाहीत वाट्टं....

एमएसईबी ही बहुधा जगातली सर्वात वाईट कंपनी असावी. Angry

या कंपनीकडून चांगला अनुभव क्वचितच येतो.

आमच्या कडे पण एका बंद मीटर बद्दल पण असेच बिल येते.... त्यावर एक उपाय करायचा काही वेळासाठी कुठले तरी एक उपकरण चालू ठेवायचे जेणेकरुन मीटर व्यवस्थित चालू आहे हे सिद्ध होऊ शकते आणि मग त्यांच्याकडून बील बदलून आणायचे... हा प्रकार आम्ही केलेला आहे.. पण पुढच्या महिन्यात परत तोच घोळ घातलाय.. आता परत तेच करायचे आहे..

बजाजची आफ्टर सेल्स सर्विस खूप चांगली वाटली. एक साधी पाणी गरम करण्याची किटली (माझ्या कृपेमुळे) बंद पडली. लेवलपेक्षा जास्त पाणी भरून मस्तपैकी उकळू दिलं तर ती शॉर्ट झाली. फोन केल्यावर लगेच टेक्निशियन येऊन घरच्या घरी रिपेअर करून गेला. त्यामुळे आता नवा मिक्सर घेतला तो बजाजचाच घेतला.

हिम्सकूल | 5 May, 2012 - 16:01
आमच्या कडे पण एका बंद मीटर बद्दल..
<<
एमएसईबीत जाऊन रीतसर वापर नसल्याची नोंद करा.
मीटरच्या जवळ "हे मीटर वापर नसल्याने बंद दिसते आहे, खात्री करायची अस्ल्यास अमुक तमुक नंशी संपर्क करा" अशी काँप्युटर प्रिण्टाऊट लॅमिनेट करून चिकटवा, जी मीटरच्या रीडींग फोटो मधे दिसेल.
म्हणजे तुमची नेहेमीची कटकट टळेल. आमच्या रीडींगवाल्याला आता ठाऊक झालंय आमची २ मीटर्स बंद आहेत असं. पण फ्लॅट सिस्टीम असेल तर त्याला पकडणे कठीण. वॉचमन/सिकुरिटीला सांगून ठेवा.

Pages