आपण आग्रही ग्राहक

Submitted by मामी on 20 January, 2011 - 10:27

बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळ वृत्तपत्रात सेम असाच एक कॉलम असतो. त्यात ग्राहकांनी असे अनुभव शेअर करण्याचे आवाहन असते. त्यातूनही बरीच उपयुक्त माहिती मिळते. मामी, हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. Happy

समु, तु HP च्या साईटवर तक्रार नोंदवली आहेस ना? फोनपेक्षाही ऑनलाईन तक्रार जास्त पटकन लक्षात घेतली जाते हा माझा वैयक्तीक अनुभव आहे. सगळे डिटेल्स दे. उपयोग होईल. वर मनीषने लिहिल्याप्रमाणे डिलरला सांग की, मी शेगडी घ्यायलाच पाहिजे असे तुझ्या लेटरहेडवर लिहून दे.

तपासणीला येतात. पण त्यात ते खुसपटं काढायची शक्यता आहे. पण जर तुझी ऑनलाईन तक्रार गेली असेल तर ते काही करू शकत नाहीत. माझ्याकडेही तपासणीला आले होते. शेगडी अशी आहे, तशी आहे सांगत होते. मी त्यांना सांगितले मी ही शेगडी रोज वापरते त्यात मला काहीही प्रॉब्लेम झाला नाहीये. मग ते म्हणाले की नळी बदलून घ्यायला हवी. तर ती मी घेतली कारण तशीही ती जुनीच झाली होती.

मामी आभार, प्रतिसादा साठी आणी हा धागा उघडण्यासाठी पण!

तपासणीत खुसपट तर निघेलच म्हणजे ते ठरवुन होणारच मला खात्री आहे. मी अजुन शेगडी ताब्यात घेतलेली नाही, बुक केली आहे, माझ्या सोयीनुसार ते होम-डिलेवरी देणार आहेत, मी जर शेगडी माझ्या तळेगावातल्या पत्त्यावर पोहचवायला सांगीतली तर मला तीथे प्रत्यक्ष रहाव लागेल. तपासणी साठी हि मी तीथे असायला हव ना. सगळा गोंधळ झालाय.

मी गॅस कनेकशन घेतल्यावर तीथे रहायला जाणार होते कारण गॅस कनेकशन शीवाय मला अंघोळीच पाणी गरम करण, जेवण वै काहीच करता येणार नाही खुप गैरसोय होईल. नुकताच मी Visiting Faculty चा जॉब सुरु केलाय जॉब ची वेळ सांभाळण हि महत्वाच आहे.

मी HP "जी हाँ" मध्ये आत्तच अकाऊंट ओपन केल Happy

HP च्या साईट वर नव कनेकशन घेण्यासाठी ऑनलाईन रेजीस्ट्रेशन ची सुविधा पण आहे Happy मी ते ट्राय करत आहे. Happy

माझ्या तक्रारीला मला HP Gas कडुन e-mail ने खालील प्रतिसाद मीळाला
Dear Customer,
We thank you for bringing the complaint to our notice regarding forced Sale of Hot Plate. Also we wish to inform you that we have launched HP Co-branded Green Label Gas Stoves. The Green lable Gas stoves will help to customers to save gas considerably due to its high thermal efficiency. We would request you to compare the unique features of these Green lable stoves Vis-a-Vis the stoves you get in the market. We are sure, with this comparison you yourself will opt for Green lable stoves which are available with our Distributor. If you are still not convinced to purchase a Green Label Stove, you may do so by paying inspection charges in this regard and complete the formalities to release NC. If you are having any problem regarding the same please contact us on phone No. 26213104 / 5. We regret the inconvenience caused to you. HP GAS CSC, Pune

मला माझ्या शेगडीची तपासणी करुनच घ्यावी लागेल का? त्या शीवाय कनेकशन मीळणार नाही का?
ह्या तपासणी साठी ग्राहकाला वार वेळ काही मीळत नाही वा सुचवल जात नाही का?
मला तर अजुन शेगडीची डिलेवरी घ्यायची आहे. तपासणी ला किती पैसे मोजावे लागतील?
आणी जर डिलर ने तपासणी रीपोर्ट "फेल" दाखवला तर?? Sad Sad Sad

प्लीज मला मदत करा.

मी आत्ताच 26213104 वर वरचे प्रश्न विचारण्यास फोन केला, फोन वर पहिला प्रतिसाद "तुम्हाला डिलर कडुन अजुन फोन आला नाही का?" हा प्रश्न होता. मी "नाही" म्हणाल्यावर ते सर म्हणाले "तुम्हाला डिलर कडुन फोन येईल आणी तुम्हाला मेल ने रील्पाय दिला आहे"

"डिलर कडे काल बिझी वातावरण असल्याने फोन आला नसेल" अस हि ते म्हणाले!!!

मला रीप्लाय संदर्भातच बोलायच आहे अस सांगुन मी वरचे प्रश्न विचारले त्यावर ते सर म्हणाले "शेगडी शीवाय कनेकशन मीळणार नाही, डिलरचा तुम्हाला फोन आल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोलुन तपसणी चा वार वेळ ठरवुन घ्या, तपासणीला २५०.०० रुपये लागतील"

याशीवाय ते म्हणाले आम्ही डिलरला फोन केला असता डिलर ने आम्हाला सांगीतले कि त्याने तुम्हाला ११,०००.०० हजार एवढी जास्त किंमत सांगीतली नाही Sad

"डिलर कडची शेगडी ईतकी महाग नसते पण तुम्हाला काळ्या रंगाची शेगडी हवी आहे जी त्याच्या कडे नाही ना" अस हि ते सर म्हणाले.

सद्य स्थितीत तळेगावात HP च्या ह्या डिलर शीवाय दुसरा कोणता हि गॅस डिलर नाही म्हणजे ग्राहकाला LPG Gas साठी दुसरा पर्यायच नाही (भारत गॅस तळेगावात नाही Sad ) त्यामुळे "तळ्यात राहुन माश्याशी वैर नका घेऊ" असा सल्ला अ‍ॅफीडेविट करणार्‍या नोटरी ने मला काल दिला पण त्या आधीच मी फोन आणी नेट तक्रार नोंदवली होती. असेच सल्ले मला मी जीथे घर घेतलय त्या बिल्डर आणी ईतर २-३ लोकांशी बोलल्यावर मीळाले होते (This Dealer is taking advantage of his Monopoly in Talegaon)

मला मीळेल ना गॅस कनेकशन!!!! मला काळजी वाटत आहे Sad

मला वाटतं ते शेगडीची तपासणी करतातच. तू एचपी वाल्यांना पुन्हा लिही की माझ्याकडे सध्या एक शेगडी आहे आणि चांगली चालली आहे. मला सध्या नविन शेगडी नकोच आहे. मला केवळ गॅस सिलिंडर हवे आहे. तपासणीच्या वेळी अगदी फर्म रहा. फारतर गॅसची नळी बदलून घे. ती एनीवे बदलायला झालीच असेल. शिवाय त्यांच्या तपासणीवाल्यांनी दिवस आणि वेळ ठरवून यावे असेही लिही.

If you are having any problem regarding the same please contact us on phone No. 26213104 / 5 <<< असं दिलंय ना त्यांनी, तिथे फोन करून किंवा त्या इ-पत्राच्या उत्तरात त्यांना विचारा की. रिपोर्ट 'फेल' दाखवला तर त्यांच्याकडून ते लेटरहेडवर लिहून घ्या आणि पुन्हा HP शी संपर्क साधा. पण तपासणीला येतील तेव्हा तुम्ही HP कडे तक्रार नोंदवली आहे याचा उल्लेख करायला विसरू नका. Proud

गजाननचं बरोबर आहे. 'फेल'चा रिपोर्ट असेल तर लेटरहेडवर लिहून द्यायला सांग.

आधीच जास्त विचार करून उगाच घाबरू नकोस. ती मंडळी येतील तेव्हा कोणी आणखी बरोबर असेल तर तुला त्यांच्याशी बोलायला जरा जोर येईल. मस्त ठामपणे बोल.

आभार मामी, गजानन

@ मामी, माझ्या कडे शेगडी नाहीच आहे Sad मी "मेस" "हॉटेल" अस बाहेर जेवते Sad

@गजानन माझी तक्रार डिलर च्या मेल-आयडी वर फॉरवर्ड करण्यात आली आहे, आणी मला आलेला ई-मेल रीप्लाय पण डीलर ला CC केलेला आहे HP ने तेव्हा डिलरला सगळ माहित आहे अस वाटत.... पण हे लेटर हेड च कामी येईल नक्किच .... थँक्स

माझ्या तक्रारीला HP ची रीप्लाय मेल आल्यावर मी तपासणी बाबत शंकाच निरसन करण्यास HP ला फोन केलेला तेव्हा त्यांनी "एजन्सी कडुन तुम्हाला फोन येईल, तेव्हा त्यांच्याशी बोलुन तपासणीची वेळ, वार ठरवुन घ्या वा तुम्ही जेव्हा तळेगावाला जाणार असला त्याच्या एक दिवस आधी डिलर ला कळवा आणी तपासणी करुन घ्या (फोनची वाट बघा)" अस सांगीतलेल पण मला सोमवार परुंत म्हणजे काल पर्यंत फोन आला नाही Sad

मी परत HP ला फोन केला तेव्हा त्यांनी मलाच "तुम्हीच डीलर ला फोन करा" सांगीतल, तसा मी डिलर ला दुपारी साधारण २:४५ ला फोन केला आणी तपासणीच कस करायच विचारल तर डिलर "आज संध्याकाळी ६ ला तुमच्या कडे माणुस येईल!!!!!"

मी त्याला "६ पर्यंत तीथ येण मला शक्य नाही, मी जॉब करते, आपल्यात झालेल्या किमतीच्या आणी ईतर डीस्कशन मध्ये काही क्लीयर न झाल्याने मी अजुन शेगडीची डिलेवरी घेतलेली नाही" सांगीतल तरी तो अडुनच होता "आजच संध्याकाळी ६ ला माणुस येईल" डिलर उगाच डाव खातोय हे मला जाणवल तो समजायलाच ययार नव्हता, शेवटी ४-६ वेळा जेव्हा मी त्याला सांगीतल "मी येऊ शकत नाही, मला सुट्टी टाकुन याव लागेल ,.....मी जर फोन केला नसता मग!!!" अस बरच समजावल तेव्हा तो म्हणाला
"तसही ह्या आठवड्यात कनेकशन मीळणार नाही, ह्या आठवड्याचा कोटा संपलाय आणी आमचा S/W चा प्रोग्राम चेंज झाला तर जरी पुढ्च्या आठवड्यात तपासणी झाली तरी कनेकशन मीळणार नाही, आमच्या कनेकशन देणार्‍या माणसाचा काल अपघात झालाय तो ठीक झाल्यावरच काम होईल" Sad Sad

एकंदर डिलर त्याच्या Monopoly चा गैर फायदा घेतोय आणी मला आता कनेकशन घेण्यास आणी नंतरही बराच त्रास होणार आहे अस दिसतय Sad

मला अगदी हताश आणी हेल्पलेस वाटतय ऊगाच स्ट्रेस येतेय, गॅस कनेकशन मीळाल असत तर १ तारखे पासुन म्हणजे आजपासुन घरात रहायला जाता आल असत Sad

समु, हे सगळे पोस्ट्स आणि पत्रव्यवहार, सर्व कंपन्यांकडे, वर्तमानपत्राच्या साइट्स वर इमेलने पाठवून दिले पाहिजे.

समु.. तुम्ही जी शेगडी बुक केलेली आहे ती घरी घेऊन या... त्याबरोबर नळी मिळते का नाही ते माहिती नाही.. पण असेल तर ती ही आणा.. मगच इन्स्पेक्शनला माणूस बोलवा.. जर नवीन नळी असेल तर तो काहीही खोट काढू शकणार नाही.. न वापरलेली जर नळी असेल तर त्यात का आणि कशी खोट काढणार.. दुसरी गोष्ट तुमची शेगडी ज्या कंपनीची आहे त्या कंपनीची शेगडीच्या संदर्भात नक्कीच काहीतरी मान्यताप्राप्त असल्याचा शिक्का शेगडीवर असेल कारण शेगडी हा प्रचंड धोकादायक प्रकार असल्याने बनविणारी प्रत्येक कंपनी क्वॉलिटी बाबत खूपच जागरुक असते..

समु टेन्शन नको घेउस.. आता तक्रार केली आहेस तर त्यावर ठाम रहा.
याशीवाय ते म्हणाले आम्ही डिलरला फोन केला असता डिलर ने आम्हाला सांगीतले कि त्याने तुम्हाला ११,०००.०० हजार एवढी जास्त किंमत सांगीतली नाही>> हे बोलणं फोनवर झालंय ना. तु त्या इमेलला रिप्लाय मध्ये हे लिहु शकतेस की शेगडीची किंमत किती असायला हवी ते. डीलरला मेल मध्ये लिहायला सांग. आता डीलरला ऑफिशीयल मेल मध्ये अव्वाच्या सव्वा किंमत सांगता येणार नाही. तो जी किंमत सांगतोय ती ठिक वाटत असेल तर तु त्यांच्याकडुन शेगडी घेउ शकतेस. नाहीतर तुला हवीये ती शेगडी घेउन ये आणि तपासणीत फेल केलं की लेटरहेडवर लिहुन घे. सगळं कम्युनिकेशन लिखीत स्वरुपात ठेव. hp callcenter & dealer calls दोन्हीचे डीटेल्स पण मेलवर टाक हवं तर.
आता तुझ्या वेळेचा प्रश्न आहे पण त्रास होणारच.कान्ट हेल्प इट. तु घाबरली आहेस वा तुलाच गरज आहे असं दाखवलंस तर आनखी त्रास होइल.

@ दिनेशदा मलाही असच वाटतय पण करणार काय सध्या मी पी.फ., गॅस कनेकशन सगळ्याच बाबतीत भ्रष्टाचाराचा अनुभव घेत आहे, मनात खुप राग येतो, खुप त्रास होतोय Sad

फोन कॉल मी रेकॉर्ड करुन ठेवायला पाहिजे होता अस वाटत पण रेकॉर्डींची सोय नाही ना माझ्याकडे.

डिलरला मी स्वःताच फोन केला असता कनेकशन्ची किंमत विचारली तर तो सांगायला तयार नव्हता, "मला कनेकशनला किती पैसे लागतील तेवढे सांगा म्हणजे तेवढे पैसे मला काढुन आणता येतील" अस मी त्याला २-३ वेळा विचारल तर नेहमी त्याच एकच ऊत्तर "दुकाणात या तपासणी नंतर किती पैसे लागतील ते सांगु".

मी त्याला "तुमच्या कडुन शेगडी घेण्यास मला हरकत नाही पण मुख्यता केवळ किमती मुळे आपल डिसकशन झाल होत, तुम्ही मला सांगाल का शेगडी किती ला देणार ते म्हणजे मला शेगडी बाबत ठरवता येईल किंमत मला परवडणारी असेल तर जरी मला रंग आवडला नसला मी तुमची शेगडी घेईन" असही सांगीतल तेव्हा तो म्हणाला "कोणती शेगडी घ्याल त्या प्रमाणे किंमत असेल"

मी त्याला १-२ दा तुमच्या कडच्या ३ बर्नर, ग्लास टॉप, क्रिम कलर शेगडीची किंमत विचारल्यावर तो ६,३००.०० च म्हणाला आणी बर्‍याच प्रयत्नां नंतर कनेकशन ची किंमत ३९४४.०० एवढी पडेल म्हणाला

डिलरची शेगडी जास्त efficient म्हणुन डबल किंमतीला??? ३,२००.०० आणी ६,३००.०० काही मेळ आहे का???? मी बुक केलेली ग्रीनशेफ शेगडी ISO Marked आहे.

तपासणीला आलेल्या माणसाने जर शेगडी फेल केली तर तस लेटर हेड वर लिहुन द्या सांगीतल तर तो "माझ्याकडे लेटर हेड नाही असच सांगेल" अस मला वाटतय.

अ‍ॅफीडेविट करणार्‍या नोटरीने मला "तक्रार वै नोंदवु नका, तळ्यात राहुन माश्याशी वैर कश्याला" अस फोन वर सांगीतलेल पण त्या आधीच मी तक्रार नोंदवली होती Sad

तळेगावात माझ्या समोरच्या घरात रहाणारे काका पण म्हणालेले "डिलर कडची सगळ्यात स्वस्त शेगडी घेऊन कनेकशन घेऊन टाक, तुझी शेगडी पण आण ती वापर आणी डिलर कडची शेगडी तशीच ठेऊन पुढे कोणाला तरी गीफ्ट म्हणुन देऊन टाक" तेव्हा मला अस माघार घेण दबण पटल नाही.

का म्हणुन लाचार व्हायच पण आता मलाच त्रास होतोय Sad

बघुया आता काय होतय Sad

समु, एचपी वाल्यांना पुन्हा इमेल कर ना. हे सगळ लिही. रोज एक इमेल लिही. आणि सरळ सांग जर माझी तक्रार तुम्ही अ‍ॅड्रेस केली नाही तर मला वर्तमानपत्राकडे जावे लागेल.

@ मामी मी एजंसी कडुन फोन येण्याची वाट बघुन रविवारी HP ला परत तक्रार केलेली ज्याचा रेफरंस नंबर पण मला मीळाला होता. सोमवारी दुपार पर्यंत माझ्या तक्रारीला रीप्लाय मीळाला नव्हता (ईमेल मध्ये) दुसर विशेष अस कि सोमवारी सकाळी १०.०० नंतर मी माझी तक्रार HP च्या साईट वर ट्रॅक केली तेव्हा माझी तक्रार ओपन झाली पण नंतर १०-१५ मी. माझी तक्रार ओपनच झाली नाही मी ५-६ वेळा ट्राय केल तेव्हाही नाही (साईटवर टेकनिकल प्रॉब्लेम होता कि काय माहित नाही पण ती तक्रार सोडुन बाकी सगळ ओपन होत होत, माझी पहिली तक्रार सुद्धा) शेवटी मी HP लाफोन केला आणी त्यांच्या सांगण्या नुसार डिलरला.

आज माझ्या मेल बॉक्स मध्ये माझ्या त्या दुसर्‍या तक्रारीला खालचा रीप्लाय आला आहे:
Dear Customer,
As per your earlier complaint, advised to Distributor to release New connection after completing necessary formalities as per the guidelines. Please get in touch with our distributor to complete the formalities.
Thanks.
HP GAS CSC, Pune

ह्या तक्रारीत मी कनेकशन चे चार्जेस पण विचारले होते.
हा रीप्लाय मला मी डीलरला कॉल केल्यानंतर आला आहे, काल रात्री!

अजुन मला गॅस कनेकशन मीळालेल नाही आणी ईन्सपेक्शन हि झालेल नाही Sad ... आज परत HP ला तक्रार केली Sad

2011 Feb 18 Friday

Dear Sir/Madam

I am trying to get HP gas connection from last month (Jan 2011)…..I have brand New 3 Burner Glass Top Stove of Greenchef brand (ISO Marked) and so not willing to buy (high cost) stove from dealer…..

As per my conversation with dealer I need to go through “Inspection” procedure to get connection without buying stove from him. I am ready for inspection and on 25th Jan 2011 Tuesday have filled the Inspection form also…..

I am working professional and have not shifted to Talegaon yet so I requested dealer to coordinate with me to schedule Inspection Date Day and Time. From last 2-3 weeks I am doing phonic follow up with dealer to set the Inspection schedule…..

As per my phonic conversation with dealer manager and representative, I was suppose to inform dealer 1 or 2 days before reaching to Talegaon and dealer had asked me to give them call again on reaching to Talegoan and had given word “Inspection will be done when I will be in Talegaon” ……….

Accordingly I planned to go to Talegaon on 16th Feb 2011 Wed and informed dealer about it over phone on 14th Feb 2011 Monday. As per my phonic conversation with dealers representative on 14th Feb 2011 Monday, Inspection was scheduled on 16th Feb 2011 Wednesday and dealers representative asked me to give them call around 9 to 9:30 Am on Wednesday

On 16th Feb 2011 Wednesday (Day before Yesterday) I went to Talegaon and I tried to reach dealer over phone from 9:00 Am till 10:30 Am but every time their phone was busy…..Around 10:30 Am I got response to my call and I told (requested) dealer representative….. “As per my phonic conversation with you, today I am in Talegaon please send person for inspection” …..Representative said “It May Not be possible as Inspection person has gone to company and will return late so he might come tomorrow”…..When I said, “I can Not stay here tomorrow as I am working person and today I have came here specially for Inspection for gas connection” then representative said, “Ok may be by 4:00 Pm today person will come to your house give us call again at around 3:30 or 3:45 Pm”…..As per dealers representatives suggestion I called dealer again, at that time representative said “Person will come by 5:00 Pm” but no one came for inspection…..

On 17th Feb 2011 Thursday also I tried to reach dealer over phone for more than 10 to 12 times but “Number was BUSY”…..

Today on 18th Feb 2011 Fri also I tried to reach dealer over phone from 9:00 Am to 9:30 Am but I got no response till 9:15 Am and after that “Number was Busy”

Before couple of days I tried to reach dealers manager over phone to set the inspection schedule but representative said “He is busy in meeting so cant come online”…..

In Talegaon there is only ONE dealer of HP and customers have NO other option for cooking gas connection…..

I am suffering a lot and I am going through stress just because I refused to buy COSTLY stove from dealer…..

I would appreciate your time and serious attention to this matter…..

Because of all this I have doubt dealer wont give me Pass report for inspection (for No reason)…..

If in dealer wont give me PASS report for inspection in that case I would like to request reasons and explanation of it on Letter Head of HP, may I ask for it?…..I am afraid after getting connection also I may not get proper services or response from dealer in future…..

I need your guidance and suggestion to get HP gas connection and to close this matter smoothly ….. Thank You!

I have made 2 complaints prior to this!

मला वरील तक्रारीचा तक्रार नंबर ई-मेल ने मीळाला पण तो वापरुन मी HP च्या साईट वर तक्रार ट्रॅक करायचा प्रयत्न करते तेव्हा तक्रार ओपन न होता Complaint/Feedback चा फॉर्म ओपन होतोय!!! मी तक्रारीत डिलरच नाव सीलेक्ट न केल्या मुळे अस होत असाव का? मी जाणुन बुजुन तक्रार नोंदवितांना डिलरच नाव सीलेक्ट केलेल नाही, HP डिलरला तक्रार फॉरवर्ड करते त्याने ऊगाच डिलर मला अजुन त्रास देईल ह्या विचाराने (भीतीने)

This is so stressful Sad

HP च्या साईटवर खालील पत्ता मिळाला. त्या पत्यावर साधे पत्र तसेच एमेल पाठवुन बघा. पत्र सरळ MD च्या नावानेच लिहा. बर्‍याच वेळा वरीष्ठ अधिकार्‍याकडे तक्रार केल्यास लवकर दखल घेतली जाते.

Mr. S. Roy Choudhury
Chairman & Managing Director
Hindustan Petroleum Corporation Limited,
Petroleum House,
17, Jamshedji Tata Road,
Mumbai 400020
Maharastra, India

e-mail: corphqo@hpcl.co.in

शक्य असल्यास पुण्याच्या कस्टमर सर्व्हीस कार्यालयात जाउन भेटुन बघा
HP GAS Customer Service Cell,
HPCL, 3/C, Dr. Ambedkar Road,
Camp ,Pune ,Maharashtra Pin:411001
फोनः 020 26213104 26213105 26213020

(वरील सर्व माहिती एचपी च्या संकेतस्थळावरुन घेतलेली आहे)

आत्ताच मी Mr. S. Roy Choudhury ना मेल लिहायला घेतल पण त्या आधी परत एकदा डिलरला फोन करुन पाहिला जो लागला .

मी मला मॅनेजर क्षक्षक्ष शी बोलायच आहे अस सांगीतल्यावर फोन वरच्या Representative ने माझ नाव विचारल मी नाव न सांगता कस्टमर बोलत आहे अस सांगीतल (माझ नाव डिलर कडे सगळ्यांना माहित आहे, आणी मी नाव सांगीतल्यावर मला टाळा टाळीची ऊत्तर मीळतात असा माझा अनुभव आहे म्हणुन) तेव्हा माझा फोन त्या मॅनेजर मॅडम ला देण्यात आला.

मी: "मॅम मला Inspection चा वार, तारीख, वेळ सेट करायची आहे आणी त्या संदर्भात तुमच्याशी बोलायच अस मला सांगण्यात आलय" अस बोलण सुरु केल

मॅडमः सध्या कनेकशन्स बंद आहेत

मी: मला कनेकशच्या आधी करावी लगणारी तपासणी करायची आहे त्यासाठी ता. वेळ हवी आहे.

मग त्यांनी मला कुठे रहाता वै. विचारल, तळेगवात अजुन तुम्ही शीफ्ट झाले नाही का हे पण विचारल माझ्या ऊत्तरांवरुन त्यांनि मला ओळखल. (गॅस हि बेसीक गरजेची वस्तु नसतांना तळेगावात शीफ्ट कस होणार हे मी परत त्यांना सांगीतल)

मी : "मॅडम सोमवारी तुमच्या कडे फोन करुन त्या प्रमाणे बुधावारी मी तळेगावात येऊन गेले, संध्याकाळ पर्यंत तुमच्या माणसाची वाट पाहिली पण कोणी आल नाही , मी तुमच्या कडुन शेगडी घेत नसल्याने मला ह्या त्रासातुन जाव लागतय अस मला वाटत" अस सांगीतल, त्यावर

मॅडमः "हो का बुधवारी तुम्ही येऊन गेल्या का!!!! पण तुम्ही शेगडी घेत नाही म्हणुन अस सगळ झाल अस नाही आणी सध्या कनेकशन बंद आहेत ते कधी सुरु होतील माहित नाही"

मी: "म्हणजे तपासणी करुन ठवई तरी पुढच्या महिन्यात हि कनेकशन मीळवार नाहीत, माझ्या सारख्या बर्‍याच ग्राहकांना कनेकशन साठी ताटकळत बसाव लागेल, किती दिवस?"

मॅडमः "नाही, नाही तस २-४ दिवसात सुरु व्हायला पाहिजे कनेकशन, तुम्ही अस करा तासा भराने मला फोन करा मी आमच्या सरांना विचारुन तुम्हाला सांगते"

हा सर म्हणजे तीथला मुख्य माणुस ज्याच्याशी मी मला शेगडी नको , शेगडी खुप महाग आहे वै. बाबत बोलले होते आणी जो मला त्रास देतोय. मी कोण बोलतेय कळताच तीथले सगळे "सरांशी बोलाव लागेल, त्यांआ बोलुन सांगतो" अस करतात

आता तासाभराने परत फोन करते. Sad

डिलर कडे ह्या मॅडशी बोलायच त्या तीथल्या मॅनेजर आहेत हे मला कळायला हि मला बर्‍याच ऊपदव्यापातुन जाव लागल.

बुधावारी तळेगावात जाऊन मी डिलर ला फोन केला आणी जेव्हा आज माणुस येऊ शकणार नाही अस मला कळाल मी त्यांना "मला Inspection person चा सेल नंबर द्या" अस सांगीतल तर त्यांनी मला तो दिला नाही " माणसाला कम्पनित डिस्टर्ब होईल, नंबर देता येणार नाही" अस ऊत्तर मला मीळाल (मी कोण बोलतेय हे त्या Representative ला माहित होत)

नंतर दुपारी मी डिलरला परत फोन केला आणी "आज आमचे कडे तपासणीला माणुस येणार होता अजुन आला नाही, कधी येईल, किती वेळ लागेल आजुन" अस बोलले तेव्हा रीप्रेजेंटेटिव्हने "अजुन माणुस आला नाही? तुम्ही त्यांना फोन करुन विचारा ते किती पर्यंत येतील"
मी: "मला त्यांचा नंबर द्या" आणी मला नंबर मीळाला (माझ नाव विचारल नव्हत)

मग मी त्या तपासणीच्या माणसाला फोन केला तो कम्पनित होता म्हणाला यायला ऊशीर होईल, मी त्या माणसाला थोडक्यात सगळ सांगीतल तो म्हणाला "मॅडम तुम्ही आज थांबु नका पुढच्या वेळी एक दिवस अगोदर मला फोन करा मी तुम्ही आल्या की तपासणीला येऊन जाईल"

ह्या माणसाला फोन लावल्यावर मी परत डिलरला फोन लावला (तसही सकाळी डिलरला फोन केला असता तीथल्या बाईंनी मला "माणुस ४ पर्यंत येईल पण तुम्ही दुपारी परत फोन करा" अस सांगीतलच होत) आणी विचारल "मॅडम मी सकाळी तपासणी साठी फोन केलेला माणुस येईल ना ४ पर्यंत" तेव्हा तीथल्या बाई म्हणालेल्या " ४ वा ५ वाजे पर्यंत माणुस येईल" (आणी माणुस मला म्हणाला येण जमणार नाही) !!!

शनिवारी तळेगावात जाऊन तपासणी करुन घेऊ म्हणुन मी काल त्या माणसाला फोन केला तर तो म्हणाला "मॅडम, आमच्या सरांनी मला तुमच्याशी परस्पर बोलुन तपासणीला जायच नाही अस सांगीतलय, तुम्ही ऑफीसातच बोला" Sad

"ऑफीसात मी नेमक कोणाशी बोलु, दर वेळी कोणीतरी वेगळच फोन वर असत" अस मी विचारल्यावर त्याने मला ह्या क्षक्षक्ष मॅडम मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोला अस सांगीतल!!!

समु हे खुपच त्रासदायक चाललय गं. हम्म्म्म्म्म ......

महागुरूने सजेस्ट केल्याप्रमाणे सीएमडीच्या ऑफीसात इमेल कर. आणि तासाभराने त्यांच्याशी बोल. सगळी कहाणी सांग. आता डिलरशी बोलून काही फायदा नाही. हा डिलर फारच पोचलेला दिसतोय.

मला सांगतल्या प्रमाणे मी तासाभराने डिलरला त्या मॅडमशी बोलण्यासाठी फोन केला पण बराच वेळ फोन कोणी ऊचलला नाही मी ५ वाजुन गेल्या नंतरही फोन करत राहिले शेवटी फोन ऊचलला गेला व त्या मॅडम शी बोलले त्या म्हणाल्या "सोमवारी वा मंगळवारी तपासणी होऊ शकते पण कनेकशन बहुदा मीळणार नाही". त्यांच कनेकशन देण सध्या बंद आहे त्या मुळे तपासणी आत्ताच नको अस त्या सुचवत होत्या पण मी "मी सोमवारी यायला तयार आहे, निदान तपासणी करुन घेऊ" अस म्हणाले. तपासणी चा माणुस तीथेच होता फोन वर त्याच्याशी सुद्धा बोलले.

आज सकाळी ८ च्या आधी तळेगावाला पोहचले, तपासणी च्या माणसाला फोन केला (तो चांगला आहे) त्याने सर्व ओ. के. आहे सांगीतल आणी म्हणाला मी गेल्यावर १०-२० मी. ऑफीसात मॅडम ला फोन करा, कनेकशन च बघुन घ्या (१०-२० मी. तो ऑफीसला पोहचुन तपासणी रीपोर्ट मॅडम ला देणार होता, रीपोर्ट मॅडम पर्यंत पोहचु द्या मग फोन कारा अस त्याने सुचवल). त्याच्या म्हण्ण्या नुसार कनेकशन देण्याच काम आज पासुन सुरु होण्याचे चांसेस होते

मी मॅडमला फोन केला आधी नाव सांगीतल नाही तर मला नाव सांगाच अस फोन वरची रीप्रेजेंटेटिच म्हणाली मी नाव सांगीतल मग मॅडम ला फोन देते सांगुन मला ३-५ मी. होल्ड वर ठेवल , परत नाव विचारल परत ५-७ मी. होल्ड मग त्यां बाईंनिच मॅडम शी बोलुन "मॅडम आत्ता बिजी आहेत, त्यांच्या कडे बरीच लोक आहेत, तुमचा नंबर द्या त्या तुम्हाला फोन करतील!!!"

मी ऑफीस गाठल मला बराच वेळ आत जाऊ दिल नाही "मॅडम बिजी आहेत" म्हणाले. शेवटी तपासणीचा माणुस बाहेर आला त्याने मला पाहिल आणी तो मॅडम शी बोलला कि मला त्यांच्या शी बोलायच आहे आणी तोच मला त्यांच्या कडे घेउन गेला तेव्हा त्या म्हणाल्या "अजुन सर आलेले नाहीत शीवाय तुम्हाला आज ५ पर्यंत थांबायला संगीतल पण जर आमची गाडी आली नाहीतर!!"

"मी उद्या सकाळी ९ ला येते" सांगुन मी परत आले Sad

एच. पी. च्या साईट वर आजही तक्रात ट्रॅक करायचा प्रयत्न केला पण तक्रार नंबर दिला कि फिडबॅक फॉर्म ऊघडतोय, माझी तक्रार कुठे गेली??? मी तक्रार नोंदवितांना डिलर नेम टॅब मध्ये नाव सीलेअक्ट केल नव्हत मुद्दामच Sad

डिलर मला त्रास तर देतच आहे पण बहुदा मी पहिलीच अहे जीने त्याच्या विरोधात आवाज काढलाय आणी जी तो त्रास देत असुन नांगर न टाकता त्याला टक्कर देतेय हे त्याला जास्त खटकतय

पहिल्याच भेटीत "ग्राहकाने तुमचे कडुन शेगडी विकत द्यायचीच हि तुमची पॉलीसी आहे पण तसा कायदा (लॉ) नाही" मी अस त्याला म्हणालेले तेव्हा तो जरा निरुत्तर झालेला.

आणि वर महागुरुंनी सांगितलेल्या पत्त्यावर न विसरता पत्र पाठवा आणि मेल ही करा आणि लवकरात लवकर करा..

समु, अग डिलरचं नाव कंपनी पर्यंत जाऊ दे ना. हा सगळा घोळ म्हणूनच झालाय. तक्रार नोंदवताना डिलरचं नाव घालायला हव. मग कंपनी डायरेक्ट त्याच्याशी बोलेल.

Pages