मासे १७) रावस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 November, 2010 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.

तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती:

रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.

रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
कठीण आहे सांगणे.
अधिक टिपा: 

तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.

कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
हा रावस आता पृथ्वीवर कुठेच मिळत नाही का ?
Happy

मी तर या वर्षी मासे खायचा प्लान करतोय, अगदी सहज खाण्यासारखा, (काट्यांचा त्रास नको)कोणता मासा सुचवाल ?
Happy

प्रथमच मासे खायला सुरुवात करणार का? मग असे थोडीच मिळणार खायला? त्यासाठी थोडी पुजा वगैरे करा. देवाची हजार कारणे धरून माफी वगैरे मागा त्याशिवाय हे(मासे) खाणं नशिबात नसते... Proud
परशुरामाचा अवतार आहे. दुसरे म्हणजे समुद्रभाजी आहे त्यामुळे प्रत्येक देवाची माफी मागा आणि पापलेटाने सुरुवात करा.

जागू
निके नक्की ग. आणि ह्या छोट्या छोट्या मास्यांनाच चांगली चव असते

आमच्या कडे छोट्या मिक्स माश्यान्च्या वाट्याला नीवड म्हणतात्.तूला सान्गु जागु याची चव कश्शालाच नाही.

विजय आमच्याकडे त्याला खेंगट म्हणतात. खरच ह्यात वाटण वगैरे काही न टाकता फक्त चिंचेचा कोळ आणि लसुण टाकुन अप्रतिम चविचे सुके कालवण होते. आणि पावसाळ्यात ह्याला जास्त चव असते.

अनिल बिन काट्यांचे मासे म्हणजे भ्रमर ने सांगितल्या प्रमाणे कोलंबी, आणि अजुन घोळीच्या तुकड्या, रावसाच्या तुकड्या, हलवा, तांब, सुरमई. पापलेट, बांगड्यालाही एकच मधला काटा असतो.
तसेच माकुळ कोळणी कडूनच साफ करुन आणून मस्त सुकी बनवा घरी.
अजुन शिवल्या, खुबे, कालव, जवळा, बोंबिल आहेतच. ही पुरे नसतील तर अजुन आठवली की सांगते.

जागू, एकदम सही आणि सोपी रेसिपी.
मि आताच करी आणि फ्राय दोन्ही ही केले होते एकदम मस्त झाले होते दोन्हीही.
मि पहिल्यांदा मासे बनवले आणि खूप आवड्ले.(नवरा एकदम खूष झाला Happy )
मि ओले खोबरे नव्हते घातले तरीही छान झाले.
बारामुंडी म्हनजेच रावस ना?
तुझे खूप खूप थँक्स Happy
आता तुझ्या दुसर्‍या रेसिप्या ही ट्राय करनार .

चंपी खुप छान वाटलं वाचुन.
बारामुंडी हे नाव मी ऐकल नाही कधी. आता फोटो वरुन तुच बघ आणि जमल्यास तुझ्याकडचा पण फोटो दे. आणि बाकिचे तुझ्याकडे मिळणारे मासे नक्की ट्राय कर.

हो जागू नक्की ट्राय करनार. Happy
अग रावस सारखाच दिसतो बारामुंडी बहुतेक त्याचे इंग्लिश नाव असेल
थॅक्स अगेन Happy

वा वा... सकाळी सकाळी माश्याचं दर्शन झालं ते उत्तम!!! आता वीकांताला मेनुची काळजी नाही.... बाकी रावस मी खाल्ला नाहिये कधीच पण फोटो बघुन खावुन बघावा म्हणतेय... बाकी मागच्या वीकांताला बारबेक्यु नेशन ला सी फुड फेस्ट. होते... तेव्हा अनेक प्रकार खाल्ले... जे आधी कधीच नव्हते खाल्ले ते ही... Proud खेकडा, शार्क स्टेक, कलामारी वगैरे.... खुपच मस्त होता सगळाच मेनु...!!! खाण्याच्या नादात फोटो काढायचे राहुन गेले.. Sad नाहीतर अजुन मजा आली असती.... असो पण आता रावसही घरी करुन पहावा..म्हणतेय

संपदा धन्स. हे मासे असतात आमच्याइथे हे छोटे माकुळच आहेत ना ? मी ह्या रविवारीच मोठा माकुळ केला होता.

हा प्रकार मीही पाहिलाय. ह्याला माकुळ म्हणतात काय? जागु रेसिपी टाक ना.

मी ह्याला बेबी ऑक्टोपस म्हणते कारण ते तसे दिसतात म्हणुन. आम्ही कधीच आणला नाही हा मासा. एकदा माझ्या केरळी शेजारणीने हा माशा शिजवला. तिने कालवणासारखा पण खुप घट्ट, कुर्म्यासारखा दिसणारा प्रकार केला होता. मला मासे आवडतात म्हणुन मला वाटीभर पाठवला. नशीब मी घरी नव्हते तेव्हा. रात्री आईने मला हा प्रकार खायला दिल्यावर अस्से काय मळमळून आले... गुपचुप वाटीतले सामान फेकुन दिले आणि दुस-या दिवशी 'मस्त होता प्रकार' म्हणुन शेजारणीला सांगितले. Happy

जागु तु रेस्पी टाक आणि यांना साफ कसे करायचे तेही सांग.

अग हा शक्यतो कोळणीकडूनच साफकरुन घ्यायचा. खुप कटकटीच काम असत. मी काही दिवसात रेसिपी टाकेनच. ही मटणासारखी करतात.

वरचा ऑक्टोपससारखा दिसणारा भाग काढून टाकतात ( माझ्याकडच्या जर्मन बुक्समध्ये तरी तसेच लिहिलेले आहे Happy . ) मलाही तो भाग ठेवलेला आवडत नाही . Happy

कलामारीच्या रिंग्ज खुपच सही लागतात एकदम कुरकुरीत... मला आधी कळलेच नाही एवढा कुरुप मासा / प्राणी खाल्ला हे... Rofl
असो युरोपात खाल्ला होता.... त्यावेळेस फिश आहे खा म्हणुन आग्रह झाला म्हणुन खाल्ला होता घरि येऊन गुगलाय नमः केल्यावर खुप किळस आली... पण आता आवडीने खाते Happy

या अशाच रिंग्ज स्क्वीडच्या असतात. (स्क्वीड दिसतातही कलमारी फिशसारखे. तेच की काय?). माहिमच्या 'फ्रेश कॅच' मध्ये मस्त मिळतात.

एके ठिकाणी मी एकदा सीफुड राईस खाल्ला होता. त्यात स्क्वीड, ऑक्टोपस आणि बाकी नेहेमीचे यशस्वी कलाकार मासे होते. ते प्रकरणही झक्कास होतं.

मामी , कलामारी म्हणजेच स्क्विड Happy आणि तुम्ही जो राईस खाल्लात तो बहुतेक स्पॅनिश पाएला असणार .
फोटो बघा .

paella_0.JPG

जागू तू ऊगाचच जळवतेस. माझ्या आईशी तूझी गाठ घालून द्यायला हवी.
आता मी तूला जळवतॉ.
आमच्या शाळा कॉलेज च्या दिवसात आमच्या कडे कधी कधी एक बांगड्याची डीश बनायची.बांगडे त्या काळी गलबताने ससून डॉक ला यायचे.येताना गलबतावरचे खलाशी डॉक जवळ येत असताना पकड्लेला बांगडा शेगडीवर काहीही न लावता अर्धवट भाजायचे आणी परत समूद्रात बूडवून काढायचे.मग तो बांगडा
आई परत पूर्ण भाजायची. निव्वळ बांगडा आणि मीठ(समूद्राच). काय टेस्ट सांगू,

त्या रिंग्ज नक्की कशा करायच्या ? स्टार्टर म्हणून वापरतात का ? मी करेन येत्या संडेला.
विजय खरच आता तुम्ही मला जळवताय. माझ्या घरी सध्या सुके बांगडे आहेत उद्या आता त्याचा वापर करावा लागेल.
तुमच्या आईशी माझी खरच भेट घडवुन द्या.

मामी तो समुद्र पुलाव मी ग्रांट हाऊस मध्ये खाल्ला होता. त्याला पोलीस कॅन्टीन पण म्हणतात. सगळेच माशाचे प्रकार अगदी छान त्यात खेकड्याचे मांस, कोलंबी, पापलेट, माकुळ, आणि अजुन काही काही माश्यांचे मास होते.

मी ह्या रविवारीच मोठा माकुळ केला होता.>>>> पाक्रु उठायय्य्य्य्य्य्य्य... Angry फोटो Angry

संपदाताई....फोटो पाहुन माझ्या तोंडाचा नळ झाला आहे..... Happy

गुपचुप वाटीतले सामान फेकुन दिले आणि दुस-या दिवशी 'मस्त होता प्रकार' म्हणुन शेजारणीला सांगितले. >>> Sad

साधनातै तो प्रकार मस्तच असतो.....च्चं... Sad

माकुळ का माकली? शाळेत जीवशास्त्राच्या पुस्तकात याला माकली म्हटलेले असायचे.

अश्वे आम्ही माकलीला लाडाने माकुळ म्हणतो. Lol
चातक फोटो काढायचा राहीला माकलीचा. पुन्हा आणेन तेंव्हा टाकेन आता पाक्रू. तशा दोन तिन अजुन वेटींगलिस्ट्वर आहेत. उद्या एखादी टाकतेच.

Pages