संस्कृत भाषा मृत घोषित होणार??

Submitted by साधना on 7 February, 2011 - 22:32

एका इ-पत्रातुन खालिल माहिती आली.

"
मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा ई-मेल त्यांना सुद्धा पाठवा )
"

हे कितपत खरे आहे? म्हणजे अवगत असलेल्या भाषांमध्ये एखादी भाषा नसेल तर ती मृत घोषित केली जाते काय? आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी, फॉर्म घेताना तुला कोणी संस्कृत बोलता येते का म्हणुन विचारले तर सरळ रामः रामो रामस्य प्रथमा हे शाळेत घोकलेले धडाधडा सुरू कर. गुपचुन फॉर्म उचलुन पळतील विचारणारे Proud

रामस्य हे प्रथमा आहे? Uhoh नक्कीच पळतील ते लोक्स फॉर्म उचलून. Lol आता खरंच मला आठवी नववी दहावीचं संस्कृत पुस्तक आणावंसं वाटतंय Happy

पासआऊट झाल्यावर ऐटीत मी बायोडेटामध्ये known langauges संस्कृत लिहीलं होतं. तर technical round मध्ये मुलाखत घेणार्‍याने मला 'वन'चे पंचमी ब.व. विचारून गुगली टाकली. मला नेमकं पंचमी ब.व. सोडून सगळा वन आठवला होता. Proud
पण तेव्हापासून कानाला खडा लावून resume तून संस्कृत काढून टाकलं. Sad

लिंबू, संस्कृतात शब्द चालवायला सांगतात ते? मग मी रामो राजमणी म्हणून दाखवेन. त्यात राम शब्दाची संबोधन पर्यंतची ए.व. रुपं आहेत.

चैत्रगन्धा, तुझ्याजागी मी अस्तो तर तेव्हाही अन आत्ता तर नक्कीच, मुलाखतकाराला सरळ विचारल अस्त की त्या "रुपाचा" अन तुझ्या इथल्या कामाचा काय सम्बन्ध आहे? असो.
मुलाखतकार आगाऊ असतात बरेचदा, त्यान्ची शाब्दिक शिमटीशीच गाठ ठेवावी! Proud

अश्विनी, हो, आता खरच, पुस्तके काढलीच पाहिजेत बाहेर! Happy

लिंबूदा Proud पहिलाच interview होता आयुष्यातला त्यामुळे जाम टेन्शन आलेलं.. असं बोलायचं धाडस नसतं झालं.. आता होईल Happy

मुलाखतकाराला सरळ विचारल अस्त की त्या "रुपाचा" अन तुझ्या इथल्या कामाचा काय सम्बन्ध आहे? असो.
>>
त्यानेही विचारले असते इथल्या कामाचा संबंध नाहीतर अ‍ॅप्लिकेशन्मध्ये संस्कृतचा उल्लेख का केलाय?
असो शिमटीच्या फन्ड्यात्/फन्दात तू न पडणे बरे. शिमटी नव्हे सुदर्शनचक्र बाबा ते. उगीच रावणासारखे छाताडावर घेऊन पडशील... Proud

बाजो, सिम्पले, अ‍ॅप्लिकेशन मधे विचारलेल म्हणून लिवल! नस्त विचारल तर नस्त लिवल! बोम्बलायला विचारलच कशाला? त्यापेक्षा काय पायजे यायला तेवढच विचारायच ना जस की इन्ग्लिश येते की नाही, होय वा नाही मधे उत्तर द्या! Proud एकतर पाल्हाळ लिव्हायला सन्धी द्यायची अन वर आचरटासारखे वन चे रुप विचारायचे! (वन म्हणजे जन्गल)! काम ना धाम असले की अस्ले सुचते एचार वाल्यान्ना.
अन बाजो, रावण सुदर्शनचक्र नव्हे तर शिवधनुष्य छाताडावर घेऊन पडला होता! दोन शिमट्या तुलाच लगावल्या पायजेत, येवढ्यात रामायण विसरलास? Proud
(पण काय करणार तू तरी, हल्लीहल्लीच व्यालेन्टाईन डे ला गुलाब छाताडावर घेऊन पडण्याची स्वप्ने बघतोस, मग विसरणारच रामायण)

काल फॉर्म भरला, त्यात मातृभाषेव्यतिरिक्त "बोलता येणार्‍या" अन्य दोन भाषा विचारल्यात
अर्थातच मी व लिम्बीने संस्कृत व इन्ग्रजी अशा दिल्या! Happy

जनगणनपत्रिके संस्कृतभाषोल्लेख: कुर्यात ! हुश्श ! मला पण आलं संस्कृत

सर्वांशी सहमत. उद्या कपाळी गंध नाही म्हणुन हे निधर्मी सरकार धर्मही इस्लाम किंवा ख्रिश्चन म्हणुन जाहिर करतील.
सावधान हिंदु धर्म खतरे में.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

अश्विनी, एकतर दोनच विचारलेल्या, मग हिन्दी मुद्दामहुन दिली नाही, हो ना, इन्ग्रजी येते असे नै लिहिले तर निरक्षर/अडाणी/गावंढळ्/देसी अशी नोन्द झाली तर कोण जबाबदार?? Proud त्यामुळे इन्ग्रजिची कुबडी घ्यावीच लागली मला!

जनगणनपत्रिके संस्कृतभाषोल्लेख: कुर्यात

जनगणनपत्रिके संस्कृतभाषोल्लेखं कुर्यात .. हे बहुतेक बरोबर असणार.

कुर्यात सदा टिंगलम !
देवभाषेची टिंगल करणार्‍या लोकांचे तळपट होवो अशा अर्थाचे काही सुभाषित असले तर सुचवा.
ते पाठ करून म्हणून दाखवावे कोणी काही बोलले तर.

भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गिर्वाण भारती,
तस्यां हि काव्यम मधुरम, तस्मादपि सुभाषितम |

यावद गंगा च गोदा च, यावद विंध्यो महिधरः
यावद भारतवर्षस्याद तावदेव हि संस्कृतम |

<भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गिर्वाण भारती,
तस्यां हि काव्यम मधुरम, तस्मादपि सुभाषितम>

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती |
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् |

मी इग्लिश, हिंदी लिहीले. मला संस्कृत येते पण ते काय रोजच्या व्हवहारात वापरत नाही. संस्कृत काही मरत नाही. हा उगाच खाजवुन खरुज काढल्यासारखा मुद्दा वाटतो.
जाता जाता दिल्लीत एक संस्था आहे. तेथे फक्त संस्कृत मधे बोलले जाते. दुसरी भाषा वापरायला परवानगी नाही. माझ्या एका मित्राची पत्नी तेथे आली होती संस्कृत संभाषण शिकायला तेव्हा तेथे गेलो होतो. तेथे पब्लिक फाडफाड संस्कृत बोलत होते. असो..

>>>> मला संस्कृत येते पण ते काय रोजच्या व्हवहारात वापरत नाही. <<<<
रोजच्या व्यवहारात वापरत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे, तर आम्हीच सुरुवात करणारोत वापरायला, सुरुवात इथे मायबोलीवरूनच!
(काही अन्शी वापरतो पण ते सन्स्कृतोत्भव मराठी म्हणून वा एखाद दुसर्‍या श्लोक/वाक्प्रचाराची भेसळ म्हणून!)

//मी आताच हाती आलेल्या फॉर्ममध्ये संस्कृत येते म्हणून टाकले.. ..//----मी पण. ( आणि ह्या सगळ्या चर्चेचा उल्लेख करुन टाकले. माहिती भरुन घेणारे काही बोल्ले नाहीत. सगळे ऐकुन घेतले आणि "मग काय लिहू तुमची भाषा?" असे तटस्थपणे विचारले) Happy
आम्हाला फॉर्म भरावे लागले नाहीत, त्या माणसानीच भरले.

>>>> आम्हाला फॉर्म भरावे लागले नाहीत, त्या माणसानीच भरले. <<<
बरोबर आहे तुमचे, ओरिजिनल (मूळ) फॉर्म तेच भरतात, पण इकडे की नै, वेळ वाचणे व सोय म्हणून ते संगणक अधिकारी स्वखर्चाने फॉर्मच्या तक्त्याच्या झेरॉक्स देतात भरायला, अन त्या नन्तर गोळा करुन, घरी जाऊन निवान्तपणे सुवाच्य अक्षरात मूळ अर्जावर माहिती भरतात. आमच्या इथला संगणक माझा मित्रच आहे, सबब मला हे माहित. त्याला मात्र मी बजावुन सान्गितल आहे की संस्कृतच लिही! स्वतःच्या मनाने दुसरी कोणती लिहू नकोस.

योरॉक्स, अश्विनी, अभिनन्दन (अन धन्यवाद देखिल) Happy
महेश, येईल रे जनगणना अधिकारी. Happy

संस्कृत भाषेसाठी खास भूर्जपत्राची व्यवस्था करायला हवी. ( हवी = पाहिजे, यज्ञातला हवी नव्हे.)

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

Pages