संस्कृत भाषा मृत घोषित होणार??

Submitted by साधना on 7 February, 2011 - 22:32

एका इ-पत्रातुन खालिल माहिती आली.

"
मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा ई-मेल त्यांना सुद्धा पाठवा )
"

हे कितपत खरे आहे? म्हणजे अवगत असलेल्या भाषांमध्ये एखादी भाषा नसेल तर ती मृत घोषित केली जाते काय? आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

11 वर्षे झाली,
संस्कृत चे काय स्टेटस आहे?

actually वरील मेसेज मराठीच्या नावाने फिरवायची वेळ आली आहे

होऊ दे,

काय फरक पडतोय, academic pursuits साठी ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी तर उपलब्ध असेलच संस्कृत इतके रिसोर्सेस अन् टेक्स्ट बुक्स संस्कृत भाषेसाठी उपलब्ध आहेत, भाषा मरेल म्हणजे काय ? !

कारण academic interest सोडून संस्कृत भाषेवर पोट भरण्याचा स्कोप अत्यंत लिमिटेड आहे.

संस्कृत मरत बिरत नाही. पण लॅटिन सारखी ती बहुसंख्य समाजासाठी निरुपयोगी बनेल. म्हणजे बनली आहेच, म्हणून तर सोप्या अशा प्राकृत, अपभ्रंश, गुजराती, मराठी हिंदी बांगला वगैरे भाषा निर्माण झाल्या. ज्या लोकांना पौर्वात्य विद्या, Indology, वगैरे शिकायचे आहे ते ती शिकतीलच. किंवा ज्यांना धर्मशास्त्र, पौरोहित्य वगैरेंमध्ये रस असेल तेही शिकतील. थोडक्यात, ज्याला हवे असेल तो शिकेल. उगीच सगळ्यांवर सक्ती नको आणि काळजीसुद्धा नको. संस्कृत भाषा लोकांच्या जिभेवरून नष्ट झाली आणि ग्रंथालयाच्या कपाटांत जाऊन बसली आहे. प्रत्येक प्राचीन भाषेच्या कपाळी हेच प्राक्तन लिहिलेले असते.
दोन हजार वर्षांत काहीच बदल न होता एखादी भाषा जशीच्या तशी टिकून राहावी ही अपेक्षा अवास्तव आणि चुकीची आहे. आणि कृत्रिम रीत्या ती टिकवू पाहाणे हे देखील अनैसर्गिक आहे.
Gutenberg ने जे बायबल छापले ते जुन्या लॅटिन मध्ये नव्हते. मुळात बायबल हे Latin मध्ये हेब्रू आणि जुन्या ग्रीक भाषेतून आले.
म्हणजे clergy ची भाषासुद्धा बदलत आलेली आहे.

+१०००

बायबलच्या भाषेप्रमाणे आपल्याकडे पण स्थानिक वर्जन कधीच रुळली आहेत , उदाहरण मराठीचे घेतल्यास समग्र चातुर्मास पुस्तक चाळल्यास सगळ्या आरत्या मराठीत सापडतील, सत्यनारायण कथा मराठीत आहे, मंत्रपुष्पांजलीला पण "पुष्पांजली अर्पितसे सियदुवरा" उपलब्ध आहे. मंगलाष्टके तर प्राकृत मराठीत येऊन शतक लोटले असेल आता.

संस्कृत " भाषा" म्हणून शिकवली जात नाही. बाकी भाषा जशा आधी संवादांमधून कळत जातात तसे झाले तर संस्कृत नक्कीच पुनरुज्जिवित होईल आणि रोजच्या व्यवहारात देखील वापरली जाईल. नुसती परस्मैपद / आत्मनेपद आणि सुभाषिते/स्तोत्रे म्हणून भाषा शिकली जात नाही.

Pages