संस्कृत भाषा मृत घोषित होणार??

Submitted by साधना on 7 February, 2011 - 22:32

एका इ-पत्रातुन खालिल माहिती आली.

"
मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा ई-मेल त्यांना सुद्धा पाठवा )
"

हे कितपत खरे आहे? म्हणजे अवगत असलेल्या भाषांमध्ये एखादी भाषा नसेल तर ती मृत घोषित केली जाते काय? आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू टिंबू तुमच्या पावलावर पाऊल किंवा अक्षरांवर अक्षरं उमटवऊन अनेकांनी आपल्याला संस्कृत येते असं स्वतःच्याच छातीवर हात ठेवुन सांगितलंय. तेव्हा संस्कृत संभाषणाय कक्ष शीघ्रातिशीघ्र सुरू करा.
आणि ज्यांनी आपल्याला संस्कृत भाषा येते असे लिहिलेय त्यांना त्यांच्या निवडक दहा मध्ये टाकून रोज तिथे किमान पाच वाक्ये (स्वतःच्या मनाने) लिहायला लावा. सुरुवात तुमच्यापासून. सहा दिवस उलटले सुद्धा.

झक्की म्हणजे, (हिंदी शब्द)
http://hi.bab.la/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8B%...

किमान आयडी तरी मराठीत ठेवा. (अर्थात इतकं मातृभाषेवर प्रेम आहे हे दाखवताय म्हणून)
म्हणाल, नागपूर वगैरेकडे मराठीतच वापरतात हा शब्द.
पुन्हा आली का पंचाईत. मराठीतले तरी मुळ असे मराठी शब्द किती?
सगळीच भेसळ. शतकानुशतके होत आलेली.
जे योग्य/चांगले असते (सहसा लोकांना सहज अ‍ॅप्रिशिएट होते) ते टिकते, टाकाऊ मरते.
संस्कृत मरायची वेळ नाही आली अजुन. आणि जेव्हा मरेल तेव्हा मरेल. कसली देवांची वगैरे भाषा म्हणे. खुळचट प्रकार. कैच्याकै मेल्स आणि चर्चा.
मयेकर, आगाऊ, अस्चिग अनुमोदन तुमच्या बर्‍याच मुद्द्यांना.

कालाय तस्मै नमः Proud

देवभाषा नाही म्हणता, मग या अलौकिक भाषेचा उगम सांगा पाहू.
खुद्ध देवांनी मानवाला प्रदान केलेली भाषा आहे ही.
आणि एवढी समृद्ध आहे, तसेच या भाषेचे एक फारच सुरेख वैशिष्ट्य आहे व्याकरणाबद्दल,
कोणी सांगू शकेल काय ? या वैशिष्ट्यामुळे काव्य, सुभाषिते करणे सोपे आहे.
असे दुसर्‍या कोणत्याच भाषेत नाहीये. आहात कुठे, आणि म्हणे जग पुढे चालले आहे.
आजच्या काळात एक तरी नविन भाषा तयार करून दाखवा, है कोई माई का लाल ?

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

लोक्स इकडे वाचायला आणि लिहायला देखील उदासीन दिसताहेत.
असो, संस्कृत भाषेत वाक्यरचना करताना कोणताही शब्द वाक्यात कुठेही योजला तरी अर्थामधे फरक पडत नाही. म्हणजे प्रत्येक शब्दाला (प्रत्ययासह) स्वतंत्र ओळख असते. वाक्यातल्या ठराविकच स्थानी असले पाहिजे असे नाही.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

झक्की, खरय तुमचे, पण जित्याची खोड आहे ना माझी?

>>>>सुरुवात इथे मायबोलीवरूनच!
>>>>ती शक्यता कमी दिसते आहे.

झक्की, अन उदय, लौकरच सुरुवात करेन, अन आम्ही जे जे करतो ते ते नन्तर फ्याशन म्हणून रुढ होते!
पोराला शाळेत संस्कृत होते, त्याला पुस्तके काढून ठेवायला सान्गितलित, मी पण मिळवतोय, पूर्ण तयारीनिशिच सुरुवात करणार! Happy तोवर थोड थाम्बा, अथवा तुम्ही कुणी सुरुवात केली तरी हरकत नाही. मला किमान एक आठवडा तरी लागेल!

झक्कीन्च्या पोस्टी "चाबुकच" अस्तात, (फक्त काही पाठी गेन्ड्याच्या कातडीच्या अस्तात हे त्यांस कळूनही वळत नाही Proud हो ना झक्की? )

संस्कृत भाषा जनगणनेच्या फॉर्म मध्ये लिहिली.

संस्कृत भाषेबाबत अभिमान त्या भाषेचा गोडवा, साहित्य यामुळे आहे. पण संस्कृत ही सर्व भाषांची जननी अहे हे काही पटणारे नही. माकडापासून माणूस तयार होतो, माणसापासून माकड नाही.. बोली भाषा या प्रमाणभाषेपेक्षा पुरातन असून त्या आधीपासून अस्तित्वात असतात. नंतर कुणीतरी पाणिनी प्रमाणभाषेला नियमबद्ध करतो. ( असे कही लोकंचे म्हणणे आहे.)

वॉरन बफे, तुमच्या "आधी अण्ड की आधी कोम्बडी" या थाटाच्या मुद्द्याकरता वेगळा बीबी उघडा (चान्गला चालेल Proud )
इथे विषयान्तर नको! Happy

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

>>>>> लिंबूटिंबू, सांभाळून बरं का? आधीच ब्राह्मण त्यातून संस्कृत येते म्हणे! उद्या तो कोण गांधी पंतप्रधान झाला की आणीबाणी नि तुम्ही तुरुंगात!!! त्या आधीच इकडे निघून या!!

हे मात्र लाखमोलाचे बोल्लात झक्की! Proud
अन तिकडे यायला लागण्याकरता तो राहुल पन्तप्रधान बनायची वेळ येण्याची गरज नाही, त्या आधीच राश्ट्रवादि-ब्रिगेडी लोक ते काम करु पहाताहेत! स्वीडनकडे आश्रय मागावा का? की अमेरिकाच बरी पडेल? Proud

>>>> काही वर्षांनी भारतातली मराठी भाषा ही उर्दू व इंग्रजी भाषेतून निर्माण झाली असा शोध कुणि अमेरिकन किंवा युरोपियन लोक लावतील नि लगेच सगळ्या मराठी लोकांना ते मात्र पटेल! <<<< Lol Lol Lol
नुस्ता "शोध" असे म्हणू नका, "साईन्टीफिक रितीने सिद्ध करुन असा शोध" असे म्हणा, काये ना की इकडील "विद्वान/ज्येष्ठ सामाजिक वगैरे विचारवन्त" लोक केवळ विज्ञान्/सायन्सवर विश्वास ठेवतात, त्यान्ना त्याच भाषेत सान्गावे लागते, अन्यथा ते अन्धश्रद्धानिर्मुलनाची तलवार पाजळवतात!

जनगणनपत्रिके- पत्रिका- आकारान्त स्त्रीलिंगी- सप्तमी- पत्रिकायां-
जनगणनपत्रिकायां संस्कृतभाषोल्लेखं कुर्यात् |
(हलन्त (किंवा पायमोडके) लिहिण्यासाठी त्या शब्दापुढे कुठलेही व्यंजन टाईप करून 'बॅकस्पेस' दाबा)
उदा: कुर्यात(t+r) असे टंकून नंतर r खोडा.

बाकी संस्कृत टिकवण्यासाठी काही अंशी सरकारी मदत मिळते, आता या नेत्यांना ते पैसेही चरायचे असतील, म्हणून ही काहीतरी टूम निघाली असावी.
"जनगणनेच्या फार्मात संस्कृत लिहिण्याने काही बिघडणार नाही"- इतकी जरी लोकांना जाणीव झाली तर ते अवगत भाषांत संस्कृतचा उल्लेख करतील. म्हणजे किमान ऑफिशियली- संस्कृत भाषा जिवंत राहील.आणि सरकारने मदत केली नाही, तरीही काही वेडे आहेत जे स्वतः काहीतरी खटपट करून संस्कृत टिकवण्याचा प्रयत्न नक्की करतील.

अवांतर- मा.बो. वर संस्कृतबद्दल जास्त काही दिसले नाही म्हणून नीतिशतकाचा साधा सोपा अर्थ सांगणारे धागे काढलेत मी. कालच भाग-३ टाकलाय.
http://www.maayboli.com/node/23661

-चैतन्य.

चैतन्य, प्रथम 'दीक्षित' असे लिहिल्याबद्दल अभिनंदन! (माझ्या संस्कृत शिक्षकांचे आडनावही दीक्षितच होते.)
आपल्याला संस्कृत भाषा येत नसताना (काहींना संस्कृत हा शब्दही लिहिता येत नसताना) ती येते असे म्हणणे योग्य आहे का?
संस्कृत भाषा मृत घोषित होईल अशी आवई उठवणार्‍यांइतकेच जनगणनेत संस्कृत भाषा येते असे नोंदवून मग स्वस्थ बसणार्‍यांचे संस्कृतप्रेम बेगडी म्हणावे लागेल.
तुमच्या धाग्यावर आतापर्यंत एकही प्रतिसाद नाही, याला आणखी काय म्हणावे?

आता तुम्हीच संस्कृत संभाषणाचा धागा सुरू करा, मी तिथे संस्कृत (पुन्हा आणि पुढे) शिकण्यासाठी नक्की येईन.

वॉरन, वाल्या, अभिजित, रावि, योग्य नोन्द केल्याबद्दल अभिनन्दन आणि धन्यवाद Happy

भरतः....
>>>>> आपल्याला संस्कृत भाषा येत नसताना (काहींना संस्कृत हा शब्दही लिहिता येत नसताना) ती येते असे म्हणणे योग्य आहे का?
सन्स्क्रुत असे "टाईपणार्‍या" (लिहीणार्‍या नव्हे) त्या काहिन्ना संस्कृत येतच नाही हा जावईशोध तुम्ही कुठून लावलात? काही सान्ख्यिकी परिमाण? काही सन्शोधन वगैरे? Proud

>>>>> संस्कृत भाषा मृत घोषित होईल अशी आवई उठवणार्‍यांइतकेच जनगणनेत संस्कृत भाषा येते असे नोंदवून मग स्वस्थ बसणार्‍यांचे संस्कृतप्रेम बेगडी म्हणावे लागेल.
हे स्वस्थ बसणे म्हणजे काय? अन स्वस्थ न बसणे हे काय दरवेळेस तुमच्या समोर इथे मायबोलिवर गाजवाजा करत सान्गणार काय? तेव्हा बाकीचे "आवई उठवणारे" वा नुस्ते नोन्दवुन "स्वस्थ" बसणार्‍यान्पेक्षा तुमचे वरील "अभिप्रायात्मक" प्रतिसाद तेवढे "कृतिपूर्ण" का? Wink

>>>>> तुमच्या धाग्यावर आतापर्यंत एकही प्रतिसाद नाही, याला आणखी काय म्हणावे?
तुमच्या बाजुने बोलायचे झालेच तर "आडातच नै तर पोहोर्‍यात कुठून येणार?" ही म्हण वापरली अस्ती! Proud
पण दुर्दैवाने मी तुमच्या मतान्शी सहमत नाही. त्यामुळे तसे लिहीत नाही.
एखाद्या धाग्यावर लगेच्/उशिरा मिळालेल्या सन्ख्यात्मक प्रतिसादान्वरुनच जर काही एक सिद्ध करायचे असेल तर माबोवरील माझा पोपटाचा (ज्योतिषाचा) बीबी नम्बर एकचा ठरावा, नै? Biggrin
अन त्या धाग्यावर "प्रतिसाद(?)" देणे म्हणजे "उचलला कीबोर्ड बदडला बोटान्नी" (उचलली जीभ लावली टाळ्याला या धर्तीवर वाचावे) इत्के सोप्पे आहे का ते? Wink

तुमच्या धाग्यावर एकही प्रतिसाद नाही? हा नेमका कुठला धागा? त्याचा धागादोरा द्या.. Happy प्रतिसाद नाही म्हंजे काय? सध्या विष्णुसहस्त्रनाम सुरु आहे.

विष्णुसहस्त्रनामजपा: मनुष्यम् सहस्त्रायडीधारकम् कुर्वन्ति | Proud ( आम्हाला कुर्वन्ति हे क्रियापदच चालवायला येते , त्यामुळे जपा: केले. इतर व्याकरण दुरुस्त करावे.)

@ भरत,
संस्कृत सोडा हो, मराठी तरी कुठे नीट लिहितात सगळे?
(माझ्या आडनावाचंच घ्या. ते मी नीट लिहिल्याने तुम्हाला बरे वाटले, म्हणजे ते अशुद्ध लिहिणारे बरेच असतील.)
मला वेळ भेटत नाही वगैरे मराठी वापरणारे लोकही 'मराठी येते' असं म्हणतातच की.
मग संस्कृत येते म्हटलं तर काय बिघडलं? असंही (अर्थ माहिती नसला तरीही) बरीच स्तोत्रं बर्‍याच जणांना पाठ असतात.
राजकीय दृष्ट्या (सरकारने) संस्कृतभाषा मृत घोषित केली, की आपोआपच संस्कृतशी संबंधित अनुदानं सरकारला बंद करता येतील. नुकसान संस्कृतचं होईल असं नाही (भाषा अशा गोष्टींनी नुकसान होण्यातली गोष्टच नाही) पण संस्कृत शिकणार्‍यांचं मात्र नुकसान नक्कीच होईल.
आजकाल शाळांमधून संस्कृत शिकवायला शिक्षकच मिळत नाहीत, त्यात जर संस्कृत भाषा मृत म्हणून घोषित केली, तर फावेलच सरकारचे.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

काल 'The Story of India' चे पहिले २ भाग बघितले...त्यात Michael Wood संस्कृत भाषेच्या उगमा बद्दल थोड बोलतो. संस्कृत ही आर्य लोकांची भषा. आर्य मुळचे मध्य आशिया मधले. हे लोक वातावरण जस जस बदल गेल तस तसे हरप्पा आणि नंतर गंगेच्या तीरावर स्थलांतरीत होऊ लागले. संस्कृत बोलणारे लोक ३५००-३००० बी. सी किंवा त्याच्या आधी गंगेतीरी वसले. त्या मुळे संस्कृत, latin आणि ग्रिक भाषां मधे साम्य असावे.

अधिक माहिती इथे:
http://www.pbs.org/thestoryofindia/timeline/1/

ही थेअरी जुनी झाली..

बामण भारतातले नाहीत हे सिद्ध करायला ही थेअरी उपेगी पडली.. पण त्यातून बामण, वेद, संस्कृत हे किती प्राचीन आणि महान आहे हेच सिद्ध व्हायला लागले..

त्यामुळे आता तेच लोक ही आर्य्न मायग्रेशन थेअरी खोटी ठरवण्यासाठी आटापिटा करत आहेत... आर्य्/बामन्/वेद्/संस्कृत सगळे इथल्याच लोकांपासुन तयार झाले, हे कुठले परदेशातले? असा आक्रोश आता सुरु आहे.. Proud

अश्लील, गलिच्छ नि उर्दू शब्द वापरून गजल लिहा

च्या **ला , आताच अश्लील, गलिच्छ मराठी शब्द वापरलेली एक गजल उडून गेली... अश्लील उर्दु शब्द असणारीही गजल कुणी लिहिली होती काय? Happy

( प्रतिसाद संपादित केला. उगाच धाग्याचा जीव जायला नको.)

Pages