भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता नाही मिळ्त ओझोन मधे चांगले Sad
भेळ क्ल्याणची चांगली वाटते पण पापू नाही... ते गरम रगडा पापूत घालण काही झेपत नाही....

जल्ला ! शेवटी डोकावलेच इकडे. लई भूक लागली आता. अजून ४० मिनिटं तरी डबा खाता येणार नाही आणि त्यात काही भेळ नाहिये Sad

लाजो, तुला हाणायला हवं की!<<< Lol

मला हाणायला मी काय भेळ आहे की पापू???? Lol

लोकहो, मी हा धागा काढला खरा, पण आता महा पश्च्चाताप होतोय.... Uhoh

हे सगळं... ऑथेंटिक हां.... मला पुढच्या देशवारीशिवाय खायला मिळायच नाही Sad आता नुसतच वाचुन व्हर्च्यअल मिटक्या मारायला लागतायत Sad

बादवे, कुणी आजुन फोटो नाही टाकला... जलनेवालोंको और जलाने के क्\लिये Wink

भारी धागा आहे. चाट प्रकार न आवडणारा विरळाच असेल Happy

'वैशाली'च्या एसपीडीपीचे फॅन्स नाहीत का इथे? Happy
मनमीतमध्ये खाद्यप्रकार अतिशय वाईट पद्धतीने हाताळलेले पाहिले आणि मन उडाले. आता गर्दीही नसते तिथे फारशी. बास्केट चाट प्रकार भारी होता पण फार तेलकट Sad

कल्याण भेळला अनुमोदन. मस्त असते. गणेशची नाव आहे तितकी आवडली नाही.
सहकारनगमध्ये दशभुजा चिंतामणीच्या रस्त्यावर 'जायका' नावाचे चाट सेन्टर उघडले आहे. तिथेही मस्त आहेत सर्व प्रकार. आणि हो, 'स्वच्छ'ही Happy रिलॅक्सच्या समोर रस्त्यावरच एक पाणीपुरीवाला भैय्या आहे. फार भारी पाणीपुरी असते त्याच्याकडे. तो मात्र 'बुडवून' देतो Happy

कॉर्न भेळ, चायनीज भेळ हे उपप्रकारही खूप आवडतात. नावात 'भेळ' असलं की आवडतंच बहुदा Proud

इतक्या पोस्टी पडल्या तरी सरदवाडीच्या भेळेच नाव नाही काढलं अजून कोणी... कसे होणारे रे बाप्पा....
रांजणगाव गणपतीच्या पाचच मिनिटे अलिकडे सरदवाडी नावाचे जे गाव आहे तिथे अप्रतिम सुकी भेळ मिळते... एकदम ताजे ताजे चुरमुरे आणि फरसाण असते.. हिरवी मिरची आणि कांद्याबरोबरतर एकदम झकास...

बाकी कल्याण भेळ त्याच्या मेन दुकानात जाऊन खावी.. सेव्हन लव्ज चौकात युनियन बँक भवानी पेठ ब्रँचच्या शेजारी...

असाच एक पाणीपुरीवाला आहे नाना पेठेत... पत्ता सांगणे जरा अवघड आहे.. पण त्याच्याकडे पाणीपुरी आणि एक्त गोष्टी जबरी मिळतात...

शुभांगी कुलकर्णी ,

सिप्ला सेंटर जवळ कुठे? लवासाच ऑफिस आहे तिथे गाड्या असतात एक दोन तिथे कुठे मिळते का भेळ??>>>>

लवासाच्या ऑफिस कडुन सिप्ला कडे जायला रस्ता आहे ना, तिथे ४-५ दुकाने आहेत.

flowers, vegetable ,chat आणी fruits chi. तिथेच हे दुकान आहे. अगदी छोटस.....

उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नगिरीच्या समुद्रावर मिळणारी कैरी घातलेली भेळ..>>>...

हेच शोधत होते... Happy

आमच्या रत्नागिरीएवढी चांगली भेळ कुठ्ठेच नाही मिळत... Happy
मांडवीवर ब्रिजवर जाताना एक गाडी उभी असते त्यांच्याकडची भेळ किंवा ... सुर्वे स्नॅक्समधली भेळ आणि शेवपुरी समस्त रत्नागिरीकरांची एकदम फेवरेट... रगड पॅटिस वैगैरेही चांगले असते...
वैशली हॉटेल मधलीही भेळ आणि ईतर स्नॅक्स छान असतात...
थिबा पॉईंटची भेळ आणि कोनही मस्तच....

मुंबईतही बर्‍यापैकी मिळते भेळ... पण रत्नागिरीची सर नाहीच...
मलाड - एमएमच्या पाणीपुरीला पर्याय नाही... Happy
माहीम - सागरमधेही छान असतात स्नॅक्स...
माटुंगा - सिटीलाईटजवळची गल्लीही छान पर्याय आहे चाटसाठी...
सांताक्रुझ (वे) - समर्थ मधले समोसे. तिथे चायनिझ समोसा का भेळ समोसा असलाही प्रकार असतो... ज्यात कांदापोहे वैगैरे भरलेले असतात... कहीसा मिसळीसारखा प्रकार आहे हा समोस्याचा...

भेळ, शेवपुरी आणि पुरणपोळी... मी कधीच नाही म्हणु नाही शकत या तीन पदार्थाना... Happy

येस सरदवाडीचेच नाव मी आठवत होते मघापासुन. सासरी जाताना तो स्टॉप ठरलेला असतो नवर्‍याचा नाष्ट्यासाठी. Lol

फोर्टला विठ्ठल का कुणीतरी फेमस भेळवाल्याचे दुकान आहे. तिथे आम्ही खुप शोधाशोध करून भेळ खायला गेलो पण कसलं काय.... भेळेत घातलेले बटाटे शिळे होऊन खराब झालेले होते. तक्रार केल्यावर दुसरी प्लेट दिली पण 'नाव मोठे लक्षण खोटे' असेच वाटले.

लाजो, मस्त धागा. भेळ पाणिपुरी माझ्या पण आवडीची.
मुंबईत, बोरीवलीमधल्या श्रीरामची पाणीपुरी आवडायची. आत्ता ३ते ४ वर्षात खाल्ली नाहीये.
बास्केट चाट प्रकार माझा पण अत्यंत आवडता. सध्या कँप मध्यल्या रामकॄष्ण मधला आवडतो मला.

नी एवढी स्तुती करत्येय.
इर्ल्याच्या गाडीला गेलच पाहीजे या शनिवार रविवारी. Happy

पुण्याला आपा बळवंत चोक कडुन दगडुशेठ कडे जणार्‍या वळणावर एक वेगळीच भेळ मिळते.
पुण्याला असताना खुपदा आम्ही हॉस्टेलच्या मैत्रीणी जायचो. वेगळाच प्रकार असायचा तो.
वेगवेगळ्या चिवड्या पासुन बनवायचा वाटत तो.

असह्य धागा आहे हा!!! Proud
मला पुण्यापलीकडे जास्त ठिकाणच्या भेळ, चाट इत्यादीची माहिती नाही. इथे सर्वांनी अगोदरच पुण्यातले फेमस हॉट स्पॉट्स सांगितलेत.
माझ्या काही सिंधी मित्रमैत्रिणींकडे मी चाट, रगडा-पॅटिस, पापु हे प्रकार अगदी सकाळी नाश्त्यालाही खाल्लेत. संध्याकाळी तर हा मेन्यू त्यांच्याकडे घरोघरी असतोच! किंवा बाहेर चौपाटीवर जाऊन तरी खातात.
डीपीएसपीसाठी वैशाली एक नंबर!!!
दही-भल्ले हाही टेस्टला एक नंबर लागणारा प्रकार! पुण्यात जंगली महाराज रोडला २-३ ठिकाणे आहेत, तिथे मस्त मिळतो.

नावात 'भेळ' असलं की आवडतंच बहुदा>>
अगदी अगदी!!
कल्याण भेळ, गणेश भेळ मस्तच...
विषयांतरः KNP बाहेरचा बासुंदीचहा कुणी प्यायलाय का? (बासुंदीच म्हणतात ना त्याला?)

अंजली, भेळवाल्याच्या चटाण्यांची रेसिपी माहित नाही. त्याचं पापुचं जे पाणी असतं ते तर घरी करणं केवळ अशक्य आहे माझ्या मते. पण भेळेच्या चटण्यांची माझी कृती:

हिरवी चटणी :कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, आलं, कैरीचे तुकडे, मीठ- हे सगळं भरपूर पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं. जसं पाणी लागेल तसं वाढवायचं. मस्त येते चव.

गोड चटणी- बिया काढून खजूर, चिंच, गूळ कुकरला शिजवून घ्यायचं. बाहेर काढून गाळून घेऊन बराच वेळ उकळत ठेवावे. गार झाल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, पाणीपुरी मसाला घालावा.

सायो.. त्या गोड चटणीत चवीला थोडी साखर पण घालून बघ... एका पाणीपुरीवाल्यानीच मला दिलेली टीप आहे..

Pages