सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
मनस्मी, चांगला लेख आहे. इथे
मनस्मी, चांगला लेख आहे. इथे टाकल्या बद्दल धन्यवाद.
आज प्रि ट्रेड मध्ये पार
आज प्रि ट्रेड मध्ये पार ५५००+ ला जाऊन आला. बहुदा आज वर जाईल असे वाटत आहे. तसे झाले तर निफ्टी स्वेअर ऑफ करू शकता. मग परत ५४०० लेवल येईल तेंव्हा लाँग करता येईल.
केदार, L & T घेतला/घेत आहे.
केदार,
L & T घेतला/घेत आहे.
मारुती बद्दल काय मत आहे ११८५ ला चान्गला वाटत आहे. घ्यावा का?
मारूती चांगला आहे. घ्या. मी
मारूती चांगला आहे. घ्या.
मी स्वतः देखील LNT, RIL, ICICI, OBC, TM इ अॅव्हरेज करतच आहे. सकाळी अंदाज जामच चुकला!
काही दिवस आधी लिहिल्याप्रमाणे बाजार ५३५० टेस्ट करत आहे. इथे घसरला तर ५२२० ची रेंज.
सध्या तरी वेट अॅन्ड वॉच व स्टॉक अॅव्हरेज. बजेट नंतर ही संधी परत येणार नाही.
बजेट नंतर ही संधी परत येणार
बजेट नंतर ही संधी परत येणार नाही >>>>>>>>> असे का वाटतेय? बजेट नंतर पोझिटिव ट्रेण्ड येणार असा अन्दाज आहे का? सध्याच्या अनेक घोटाळ्यान्मुळे आणि inflation मुळे positive sentiment कसे येणार बजेट नंतर ??
बाकी वेट अॅन्ड वॉच व स्टॉक अॅव्हरेज चालूच आहे!
केदार JSW Steel , Usha Martin
केदार JSW Steel , Usha Martin कसे वाटतात?
आता मार्केट वर वर वर वर वर वर
आता मार्केट वर वर वर वर वर वर वर वर वर वर वर वर जाऊ दे.....................
केदार, मजजवळ ओनजिसी आहेत. आता
केदार, मजजवळ ओनजिसी आहेत. आता अजुन अव्हरेज कधि करु?
आज निफ़्टीने वीकली सपोर्ट
आज निफ़्टीने वीकली सपोर्ट घेतला. येथून २२३० ची पातळी येते का ते पहायचे.
बजेट नतर मे मधे मार्केट खाली जाण्याचीच श्यक्यता आहे.
जागो मोहन ऑप्शन साटी वेगळा धागा सुरु करवा त्या बद्दल बरेच बोलता येईल.
से का वाटतेय? बजेट नंतर
से का वाटतेय? बजेट नंतर पोझिटिव ट्रेण्ड येणार असा अन्दाज आहे का >>. नाही आधी लिहिल्याप्रमाणे मार्च पर्यंत तरी पॉझिटिव्ह ट्रेन्ड येईल असे वाटत नाही. पण सध्या हे समभाग खूप खाली गेले आहेत. मे पर्यंत वाट पाहत बसलो तर अनेक रिलीफ रॅली येऊन गेलेल्या असतील आणि भाव थोडा वाढलेला असेल. अर्थात कॅश मध्ये राहणे कधीही चांगलेच. पण ज्यांना लाँग टर्म गुंतवणूक करायची आहे त्यांनी घ्यायचा विचार करावा.
स्टेट बँकेचा चार्ट - लोअर
स्टेट बँकेचा चार्ट -
लोअर पाँईट १५ जुलै २००९
हायर - ८ नोव्हे २०१०
SBI आधी बहुदा फिबॉनॉची फ्रेन्डली चार्ट नव्हता पण गेल्या बुल मार्केट मध्ये तो फिबॉनॉची फ्रेन्डली झालेला दिसत आहे. फिबॉनॉची रिट्रेसमेंट लेवल्स कडे लक्ष दिले तर प्रत्येक वेळी रिट्रेसमेंट लेवल्सवर त्याने एकतर सपोर्ट तरी घेतला आहे वा रेसिस्टन्स तरी आहे. अगदी आताच्या पडझडीत देखील २७५० लेवल्स वर तो रेंगाळला आणि ५० टक्के लेवलला सपोर्ट घेऊन तो परत वर चढायचा प्रयत्न करत आहे. ६२ टक्के लेवल त्याने ब्रेक केला तर तो सहज ३१०० ला जाणार कारण नेक्स्ट लेवल ती असणार.
MACD सिग्न्ल बाय मध्ये येत आहे कारण लोअर टॉप्स फॉर्म होत आहेत. चार्ट लेवलला एकदम इन्ट्रेस्टिंग झाला आहे.
मी आज ३१०० साठी शेअर्स घेणार व २७४९ अप्पर लेवल व्हॉल्युम ने ब्रेक झाला तर फ्युचर्स पण घेणार.
ऑप्शन साठी वेगळा धागा आहे..
ऑप्शन साठी वेगळा धागा आहे.. पण तिथे थेअरी लेक्चए चालतात..
रोजच्या प्रॅक्टिकलला वेगळा धागा कढायचा का?
आज निफ़्टीने वीकली सपोर्ट
आज निफ़्टीने वीकली सपोर्ट घेतला. येथून २२३० ची पातळी येते का ते पहायचे.
२२३०????
ऑप्शन साठी वेगळा धागा आहे..
ऑप्शन साठी वेगळा धागा आहे.. पण तिथे थेअरी लेक्चए चालतात.. रोजच्या प्रॅक्टिकलला वेगळा धागा कढायचा का?>>>>>
ऑप्शन साठी नवा धागा उघडायला अनुमोदन. ह्यात फक्त ट्रेड रिलेटेड माहिती टाकायला हवी.
cummins and eclerx बद्दल काय
cummins and eclerx बद्दल काय मत आहे???????
बाजाराची घसरण काही थांबायला
बाजाराची घसरण काही थांबायला तयार नाही. अजून किती खाली जाणार आहे खुदा जाने.
केदार, बाजार परत कधी वर जायला लागेल याचे काही अनुमान आहे का?
आज मार्केट दुपारपर्यंत ठीक
आज मार्केट दुपारपर्यंत ठीक होते.. नंतर अचानक रिलायन्स ग्रुप गडगडला... अनिल अंबानी सेबीकडे तक्रार करणार आहेत.. http://in.finance.yahoo.com/news/ADAG-shares-tank-group-files-pti-367603... हे नेमके काय झाले आहे? रिलायन्स नसते गडगडले तर आज मार्केट हिरवे झाले असते...
( मला वाटते शेअर मार्केटच्या धाग्यासाठी स्मायली हिरव्या आणि लाल रंगाची ठेवावी.
) उद्या बहुतेक हिरवे होईल.
आज जवळजवळ २५-३० दिवस मार्केट गडगडत आहे... साधारणपणे रिकवरीला किमान डबल टाइम लागतो. त्यामुळे जरी मार्केट आता वाढत गेले तरी मार्च एक्स्पायरी ५५५०-५६०० च्या आसपास होईल असे वाटते. पुन्हा ६००० दिसायला एप्रिल्-मे यावा लागेल..
>>> पुन्हा ६००० दिसायला
>>> पुन्हा ६००० दिसायला एप्रिल्-मे यावा लागेल..
हरकत नाही. तुमच्या तोंडात साखर पडो.
पुन्हा ६००० दिसायला
पुन्हा ६००० दिसायला एप्रिल्-मे यावा लागेल.. >>> ? आणि मे नंतर डिसे पर्यंत किती???
मला नाही वाटत ६००० नोव्हेच्या आधी येतील. परवा मी ५३५० तोडला तर ५२२० ला सपोर्ट आहे असे लिहिले आणि काल ५२२० चा सपोर्ट सध्या घेतला व थोडी रिकव्हरी झाली पण मला नाही वाटत की लगेच रॅली सुरू होणार.
मार्केट फंडामेंट्ल्ससाठी अगदी योग्य झाले आहे. टेक्निकल्ससाठी अजुनही बियरीश आहे. ५१३७ ची पण एक लेवल आहे. तिथे जाऊ नये असे वाटते पण तसे होणारच असे काही सांगता येत नाही.
येथून पुढच्या काही रॅलीज ह्या रिलिफ असणार त्यामुळे मार्केट ट्रेन्ड बदलला असे म्हणता येत नाही.
कालच hero honda, Maruti, L&T,
कालच hero honda, Maruti, L&T, ICICI चे shares घेतले आणी आज सगळे गडगडले... सोमवारवरच आता आशा आहे मार्केट हिरवे होण्याची. (उद्या झाले तर मस्तच
)
मार्केट फंडामेंट्ल्ससाठी अगदी
मार्केट फंडामेंट्ल्ससाठी अगदी योग्य झाले आहे. टेक्निकल्ससाठी अजुनही बियरीश आहे
काही कळले नाही.
शिवाय फंडामेंटली म्हणजे नेमकं काय? गेल्या वर्षभरात निफ्टी २२-२६ च्या पी ई ला ट्रेड होत होता... निफ्टीचा इ पी एस २५० येतो... आता ५३०० म्हणजे २२ पेक्षाही पी ई गडग्डला... कंपन्यांचे फंडा तर तसेच आहेत. मग अचानक मार्केट इतक्या कमी पी ई ला का उतरले?
सध्या मार्केट ओवरसोल्ड आहे
सध्या मार्केट ओवरसोल्ड आहे असेच सगळे म्हणतात.. मग आता मारकेट वाड्।अत का नाही?
गुंतवणूक ही फंडामेंटल्स पाहून
गुंतवणूक ही फंडामेंटल्स पाहून केली जाते व ट्रेडींग हे चार्ट पाहून.
मार्केट फंडामेंट्ल्ससाठी अगदी योग्य झाले आहे म्हणजे दीर्घकालीन ( सध्यातरी ९ महिने १ वर्ष कारण गेले काही वर्षे जानेवारीत मार्केट पडते) गुंतवणूकीसाठी अगदी योग्य.
टेक्निकल्ससाठी अजुनही बियरीश आहे >> म्हणजे मार्केटचा ट्रेन्ड हा बियरीश आहे. मार्केट कदाचित अजुन खाली जाईल, त्यामुळे पोझिशन (शॉर्ट टर्म १ दिवस ते ८ -९ दिवस) घ्यायची असेल तर दोनदा विचार करून घ्या. किंवा रोजच्या रोज लक्ष ठेवून स्वेअर ऑफ कराव्यात. (नफा किंवा तोटा घेऊन).
कंपन्यांचे फंडा तर तसेच आहेत. मग अचानक मार्केट इतक्या कमी पी ई ला का उतरले? >>>
मोठ्या वित्तीय संस्था मार्केट कसे चालवतात ते बघा. मागचा इतिहास पाहिला तर २४.५ आसपासच्या PE ला निफ्टी खूप वर गेलेले असते व तिथून बरेचदा खाली उतरते. नुसता पिई रेशो काही कामाचा नसतो. शिवाय मार्केट हे तुम्ही आम्ही जसे सेंटिमेंटवर चालवतो तसेच मोठ्या वित्तीय संस्था नफ्यासाठी चालवतात. दरवर्षी त्यांना त्यांचा परफॉरमन्स दाखवावा लागतो, ह्यासाठी मग टेबलवरून काही प्रॉफिट खिशात घालने ओघाने आलेच, मग ते असा PE टॉप रेंजला गेला की पैसे काढून घ्यायला सुरूवात करतात, मग त्यांनंतर खूप उशीरा कॅश मार्केटवाले (आपण) जागे होतो व भितीमुळे विकायला सुरू करतो, तेंव्हा संस्था शॉर्टवर असतात मग मार्केट फंडामेंटली बरे दिसले की तेच परत विकत घ्यायला सुरूवात करतात व आपण (साधारण लोक) भितीमुळे दुर्लक्ष करतो.
अगदी २००८-०९ च्या बेअर मार्केट मध्ये पण मी हेच लिहित होतो की मार्केट इज राईप खरेदी करा आणि अवघ्या ९ महिन्यानंतर मार्केट खूपवर चढले होते. ( पुण्यातल्या पुणेकर बाफवरच्यांना हे आठवत असेल.
)
थोडक्यात ही सायकल असते. मग ओळखायची कशी तर मार्केट मेकर्स ज्या टेक्नीक्लसचा वापरत करतात त्याच्या वापर आपणही करायचा आणि दोन्ही टाईपच्या खेळी करायच्या. (शॉर्ट टर्म आणि लाँगटर्म) फक्त कुठली खेळी कधी करायची ते मात्र कळले पाहिजे. तुम्ही म्हणता तसे फंडामेंटल्स अजिबात बदलले नाहीत आणि त्यामुळेच लाँग टर्म खेळी करायची कारण मार्केट फंडामेंटली योग्य आहे. कारण ३ जानेला PE 24.57 होता तर आज 20.12 आहे.
सध्या मार्केट ओवरसोल्ड आहे असेच सगळे म्हणतात.. मग आता मारकेट वाड्।अत का नाही? >>>
कारण तसा इव्हेंट यावा लागतो.
मार्च एन्डला अॅडव्हान्स टॅक्स डिटेल्स जेंव्हा बाहेर येतील त्यावरुन मार्केटच्या दिशेचा अंदाज वर्तवता येईल कारण नेक्स्ट मुव्ह व्हायला आता तिमाही रिझल्टच कामाला येतील.
पहिले, जोपर्यंत लोकांच्या
पहिले, जोपर्यंत लोकांच्या मनात होप्स आहेत मार्केट बॉटम होत नाही. सगळे निराश, हताश झाले आणि असे वाटले की आता काहीच होप्स नाहीत आणि मार्केट कॅपिचुलेशन होइल तेव्हा मार्केट टर्न होईल.
दुसरे, एखादा स्टॉक दोन महिन्यापेक्षा कमी किमतीला आहे म्हणुन स्वस्त आहे असे नाही. जर त्याचे पुढच्या क्वार्टरला अर्निंग कमी झाले तर पी ई रेशोही कमी होइल आणि कदाचित ही "कमी" किंमतही त्या स्टॉक साठी महाग असु शकेल.
हिले, जोपर्यंत लोकांच्या मनात
हिले, जोपर्यंत लोकांच्या मनात होप्स आहेत मार्केट बॉटम होत नाही >> व्हेरी वेल पुट!
एखादा स्टॉक दोन महिन्यापेक्षा कमी किमतीला आहे म्हणुन स्वस्त आहे असे नाही. जर त्याचे पुढच्या क्वार्टरला अर्निंग कमी झाले तर पी ई रेशोही कमी होइल आणि कदाचित ही "कमी" किंमतही त्या स्टॉक साठी महाग असु शकेल. >>> बरोबर. त्या सेक्टर मधील इतर स्टॉक्स सोबत कंम्पेअर करावे व निर्णय घ्यावा पण SBI आणि LNT चा पिई एकमेकांशी कम्पेअर करू नये.
.
भारतातल्या सध्याच्या ब्ल्यु चिप्स मध्ये तसे होणार नाही कारण भारत गेले काही वर्षे १० ते १५ प्रिमियम वर विकला जातो. हळूहळू हे प्रिमियम कमी होणार ह्यात वाद नाही. २०११ मध्ये कमी फ्लो येईल असे अंदाज वर्तविले जात आहेत. २०११ एन्ड नंतर खरे काय ते कळेल.
मार्केट वर जाण्याची श्यक्यता
मार्केट वर जाण्याची श्यक्यता वाट्ते बजेट पर्यत कन्सोलिदेशन होईल आणि मे मधे खाली येईल असा अदाज आहे.
हम्म्म्म ... खरेदी चालु करुया
हम्म्म्म ... खरेदी चालु करुया म्हन्जे इवेंट आपोआपच येईल..
वाल्या, तुमच्या माझ्या
वाल्या,
तुमच्या माझ्या सारख्यानी २००,५०० शेअर घेउन होत नाही हे
५०,०००, ८०,००० १,००,००० असे ब्लॉक्स घ्यावे लागतात.
आणि तुम्ही ट्रेडर असाल तर मार्केट वर जायची वाट का पाहता? शॉर्टींग करा किंवा पुट्स घ्या.
केदार, जरा शॉर्टींग बद्दल
केदार,
जरा शॉर्टींग बद्दल लिहा ना,. जर छोट्या प्रमाणावर करायचे असेल तर कसे करावे?
मी नुकतेच वाचले की, जो
मी नुकतेच वाचले की, जो शेअरमार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करतो किंवा खूप फ्रिक्वेंटली ट्रांझॅक्शन्स करतो, त्याला आयकर विभाग गुंतवणूकदार न समजता ट्रेडर समजते व अशा व्यक्तीला लॉंगटर्म कॅपिटल गेनवर सुध्दा टॅक्स भरावा लागतो.
याविषयी कोणाला काही माहिती आहे का?
एका आर्थिक वर्षात किती ट्रेडिंग केल्यावर ("विक्री + खरेदी" किंवा "वर्षातील एकूण ट्रांझॅक्शन्स") एखादी व्यक्ती गुंतवणूकदार न समजता ट्रेडर समजली जाते?
यात म्युच्युअल फंडाची तसेच आयपीओत घेतलेल्या शेअरची एकूण रक्कम व ट्रांझॅक्शन्स सुध्दा गृहित धरली जातात का?
जाणकारांनी कृपया ज्ञान द्यावे.
Pages