संस्कृत भाषा मृत घोषित होणार??

Submitted by साधना on 7 February, 2011 - 22:32

एका इ-पत्रातुन खालिल माहिती आली.

"
मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा ई-मेल त्यांना सुद्धा पाठवा )
"

हे कितपत खरे आहे? म्हणजे अवगत असलेल्या भाषांमध्ये एखादी भाषा नसेल तर ती मृत घोषित केली जाते काय? आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना,

मृत भाषा घोषित होण्याचा नेमका अर्थ काय आहे ते कृपया सांगावेत. (निधी मिळू शकत नाही हे लक्षात आलेच, पण याशिवाय काही आहे का?)

असे वाटते की ज्यांना त्या भाषेत अभ्यास करायचा आहे ते करत राहतीलच व त्यांना खासगी संस्थांकडून निधीही मिळत राहील. मुळात शासनाला अशी एखादी भाषा मृत म्हणून जाहीर करण्याची कृती का करावी लागते / करायची असते याबाबत अधिक काही सांगू शकाल का? आपण किंवा ज्यांना हे माहीत आहे ते सांगतील का?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मृत भाषा घोषित होण्याचा नेमका अर्थ काय आहे ते कृपया सांगावेत

हे मलाही नक्की काय ते माहित नाही. मी याआधीही वाचलेय की संस्कृत मृत भाषा झालीय म्हणुन.

पण ही भाषा मृत कशी तेच मला कळत नाही. शाळेत अजुनही संस्कृत शिकवतात, आपले सगळे ज्ञानभांडार संस्कृतमध्ये आहे, वेदशाळांमध्ये कुठल्या भाषेत शिकवतात माहित नाही, पण नेरुळमध्ये अशी एक वेदशाळा आजही आहे. रोजच्या देवपुजेतील अनेक गोष्टी आपण संस्कृतमध्ये करतो. २०-२५ वर्षांपुर्वी मी वसुंधरा पटवर्धन, सुहासिनी मुळगावकर, दाजी भाटवडेकर यांची संस्कृत नाटके टिवीवर पाहिलीत. अर्थात त्यांची संख्या जास्त नसेल, पण काहीतरी होत होतेच ना? दुरदर्शनवर एक कार्यक्रमही संस्कृतमध्ये असायचा असे अंधुक आठवतेय.

मग हे सगळे ज्या भाषेत होतेय ती भाषा मृत कशी? भारताच्या अशोकचक्रावरचे 'सत्यमेय जयते' हे ज्या भाषेत आहे ती भाषा मृत कशी?

देववाणी संस्कृत भाषा अशी मृत कशी होईल? गणपती अथर्वशिर्षा पासून वंदे मातरम पर्यंत रोजच आपण संस्कृत चा वापर करतोय ना? असो, मी मात्र जनगणनेत आपली भाषा म्हणुन संस्कृत चा उल्लेख जरूर जरूर करणार. फेसबूक वर आताच प्रोफाइल अपडेट केल्येय ...!

साधना , मलाही इ-पत्रातून हा मजकूर आला होता. त्यात प्रस्तावनेत पुढील विधानेही होती .
संस्कृत व मातृभाषा टिकली तरच (भारतीय) संस्कृती टिकेल. संस्कृत टिकली तर (हिंदू) धर्म टिकेल. धर्म टिकला तर आपण (हिंदू) टिकू. नाहीतर ख्रिस्त्यांचे फावेल व पुन्हा आपण परवशतेच्या गर्तेत (गुलामगिरीत) जाऊ. मग आहेच "असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला" म्हणून.
पुढे पत्रात फारसी /उर्दूचा उल्लेखही आहे.

त्यामुळे या पत्रात व्यक्त झालेले संस्कृत भाषेचे प्रेम बेगडी आहे असे मला वाटते. इतकी शतके किती हिंदूंना संस्कृत भाषा अवगत होती, की ज्यामुळे हिंदू धर्म टिकून राहिला? हे प्रतिक्रियावादी भूमिकेतून आले आहे. (इस्लाम खतरेमें सारखं हिंदू धर्म/संस्कृती खतरे में!)
भाषा ही माणसांना जोडायचे काम करते, ती तोडण्यासाठी का वापरली जावी?
आमच्या शाळेत एकदा पंडित गुलाम दस्तकीर यांचे संस्कृतमध्ये भाषण झाले होते.

मला संस्कृत भाषा आवडते, आणि शाळेत शिकलो त्यापुढे शिकायची इच्छाही आहे.

रच्याकने : जनगणनेत 'जात' या रकान्यात मी 'कोणतीही नाही' असे लिहायचे ठरवले आहे.

८ जानेवारीला मी बेंगळुरात पहिले संस्कृत अधिवेशन होते तिथे हजेरी लावुन आलो. जिकडे-तिकडे संस्कृत कानांवर पडत होते. भाषणे पण संस्कृत मध्ये झाली. संस्कृत विकिपेडीया च्या लोकांना भेटलो (http://sa.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%...), अनेक नवी पुस्तके संस्कृत मध्ये प्रकाशीत झाली. यथावकाश सचीत्र रिपोर्ट लिहायचा विचार आहे.

थोडक्यात म्हणजे इतक्यात संस्कृत ला मरण नाही. पण केवळ एखादी भाषा शिकवल्या जाते म्हणुन ती मृत नाही असे नसते उदा. लॅटीन मृत आहे. तशा दृष्टीने संस्कृतचेही थोडेफार तसेच आहे. त्यामुळे नुसते संस्कृत भाषा येते असे न लिहिता ती बोलायचा व (अधीक) समजायचा प्रयत्न करा.

अवगत वा ज्ञात भाषा म्हणून संस्कृतचा उल्लेख करायला हवाच
अनुमोदन. संस्कृत थोडेफार कळते त्यामुळे ज्ञात भाषा म्हणुन उल्लेख करायला हवाच.

पेन्डसे गुरुजीना विचारले असता त्यानी दोन चार शिमटीचे सपासपा वार करून सांगितले' अरे मूर्खा (म्हणजे मी) 'भारतीय राज्यघटनेच्या ८व्या परिशिष्टात संस्कृत भाषेचा एकूण २२ भाषांत समावेश आहे.आणि सरकारावर त्या भाषेच्या संवर्धनाची कायद्याने जबाबदारी असते. अगदी संघ लोक्सेवा आयोगाची परीक्षाही तुम्ही त्या भाषेत देऊ शकता'

त्यावर मी त्याना विचारले मग हे असले इ मेल कोण पाठवते?

त्यावर गुरुजी करवादले' शिंच्या आता जातोस इथून की बघू तुझ्याकडे? "

हे विकी मधून
An extinct language is a language that no longer has any speakers Extinct languages may be contrasted with dead languages, which are no longer spoken by anyone as his or her main language.

हे पण वाचावे असे :
http://en.wikipedia.org/wiki/Language_death

तेव्हा संस्कृत मृत भाषा घोषित व्हायला नको असेल तर ती आपली मुख्य भाषा आहे असे सांगावे लागेल.
http://censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/p...

आजही भारतात संस्कृत पाठशाळा आहेत. शाळांमध्येही संस्कृत शिकवली जाते. भारतीय घटनेच्या भाषाविषयक परिशिष्टात तिचा समावेश आहे.

पाली ही एक मृत भाषा मानली जाते.

मला वाटले मृत याचा अर्थ हा की जगाच्या लोकसंखेच्या कीती टक्के लोक ही भाषा बोलतात व्यवहारात वापरतात. ती भाषा आज व्यवहारात अत्यल्प असल्यामुळे मृत झाली असे म्हटले असावे

असो महत्वपुर्ण लेख आणि तसे घरी जरुर सांगेल.
धन्यवाद

संस्कृत शाळां कॉलेजांमधून अजूनही शिकवली जाते. संस्कृतमधून संवाद करणारेही आहेत. संख्येने खूप नसतील, पण म्हणून भाषा मृत आहे असा निष्कर्ष टोकाचा वाटतो.

संस्कृत मृत कशी होईल ? अगदी अंगणवाडीपासुन बालकांना संस्कृत शिकवले जाते. प्रत्येक धार्मिक कार्यातील मंत्र, पुजा,श्लोक संस्कृतमध्ये असतात.

कुठूनतरी लोकांच्या मनात भयगंड तयार करण्याचे नवनवे उपाय काढले जातात, हा त्यातलाच एक.
भाषा मृत होण्यासाठी ती भाषा लिहू, वाचू अथवा समजू शकणारे लोक अस्तित्वात नसणे हा निकष आहे का?
रच्याकने, भरत यांनी दिलेल्या सेंन्ससच्या धाग्यावर मेघालयात मराठी येणारे ३८हजार लोक आहेत, हा काय प्रकार आहे?

मेघालयात मराठी येणारे ३८हजार लोक आहेत, हा काय प्रकार आहे?
भविष्यात तिथून कोण्या मराठी लेखकाला एखादा रत्न/श्री वगैरे मिळायची शक्यता असेल! Proud

कालच मलाही असंच ईपत्र आलं होतं आणि इथे विचारावं असं ठरवलं होतं तर सकाळी आयता धागा मिळाला. धन्स साधना. आता ही लिंक बाकीच्याना पाठवते.

चांगली चर्चा. वाचतेय. Happy

भरत, यावेळेस मी संस्कृत भाषा येते असे सान्गितल्यावर मला लिहीता/बोलता वगैरे देखिल येते का, नेहेमी वापरता का, असले प्रश्न विचारुन त्यातिल एखाच्या नकारार्थी उत्तरास धरुन संस्कृत भाषा वापरणारा म्हणून नोन्दविले नव्हते.
इथुन पुढे मात्र ते जबरदस्तीनेच नोन्दवावे लागेल असे दिसतय Happy

नोकरीसाठी अर्ज देताना तुम्हाला एखादी भाषा येते याचा अर्थ त्या भाषेत लेखी आणि तोंडी संवाद साधता येतो असा असतो ना?
मग मला नाही बुवा संस्कृत येत :). (गुजराती तोंडी संवाद येतो, लेखी नाही)
कुणीतरी रोजच्या व्यवहारात संस्कृत संभाषण कसे करायचे याचा वर्ग इथे सुरू करा बरं.

>>>> नोकरीसाठी अर्ज देताना तुम्हाला एखादी भाषा येते याचा अर्थ त्या भाषेत लेखी आणि तोंडी संवाद साधता येतो असा असतो ना?
अरे भरत, काल मी हेच घरी बोललो लिम्बीला अन जनगणनावाल्या मित्राला,
की लेको जेव्हा इन्टरव्ह्युला गेलेलो पन्धरासोळा वर्षान्पुर्वी तेव्हा विचारलेले फॉर्म मधे की इन्ग्लिश येते का, तर तेव्हा मात्र मी (अन बहुतेकान्नी देखिल) बिनधास्त ठोकुन दिलेले अस्ते की बोलता-वाचता-लिहीता येते, मग भले का एक सरळ ओळीचे पत्र नसेल लिहीता येत वा बोलता येत वा अजुन काही. अहो तिथे येत नाही असे लिहीले अस्ते तर इन्टरव्ह्युला बोलावलेच नस्ते आतमधे! तिथे नै तडजोड केली तेव्हा? अजुनही करतात असन्ख्य जण!
मग संस्कृत बद्दलच असले नियम का पाळावेत? एखाददोन वाक्ये बोलता येत असली तरी म्हणावे, हो माझी मूळ भाषा संस्क्रुत आहे, (जरी मातृभाषा मराठी असली तरीही)
लिम्बीला अन मित्राला युक्तिवाद पटला! जनगणनेच्या येत्या नेक्स्ट राऊण्ड मधे मी तरी संस्क्रुत येते म्हणून लिहीणार! Happy

आमची झाली जनगणना ९ तारखेलाच. सगळीकडे सांगतात की प्रत्येक व्यक्तीबद्दल २६ की २९ प्रश्न विचारले जातील. मला तरी १०-१२च विचारले.
जात ओबीसी/एससी असेल तरच लिहून घेतात.

लिंबूटिंबू , संस्कृत भाषा नोंदवणार असाल तर बोलायला शिका आणि माबोवर संस्कृत मधून गप्पाचा कट्टा सुरू करा. (तुमचा आयडी रोमनमध्ये असला तरी :))
शुभस्य शीघ्रम्

लिंबुशी सहमत. मी कित्येक ठिकाणी मला माहित असलेली भाषा म्हणुन गुजरातीचाही उल्लेख करते कारण मला गुजराती बोललेली पुर्ण समजते आणि वाचताही येते. फक्त मी बोलत नाही त्या भाषेत. (प्रवासात कोणी गुजराती शेजारी मिळाला तर मी जागा बदलुन घेते Happy )

ओक्के भरत, ठीके, आता ट्रन्क उपसतो अन काढतो पुस्तके बाहेर, अन इथे थोड्याच दिवसात संस्क्रुतमधेच पोस्टायला सुरुवात करतो. Happy [म्हणजे झक्कीन्ना अजुन एक रान मोकळे... Proud ]
साधना, अगदी अगदी! मला संस्क्रुत बातम्या समजतात, श्लोक/सुक्ते/गीता वगैरे धडाधडा म्हणू शकतो, बर्‍याचश्या सन्धी फोडून वाचताही येते, नै फोडल्या तरी फरक पडत नस्तो. पुजेला सन्कल्प सान्गतो तो तर संस्कृत मधुनच अस्तो, व पुजेगणीक वेगवेगळा अस्तो, ऐनवेळेस रचून सान्गावा लागतो, अहो लग्नाची मन्गलाष्टके देखिल संस्क्रुत मधुन अस्तात! फार काय? एलाआयसी म्हणा वा अन्य कोणतीही सरकारी कार्यालयान्ची बोधवाक्ये देखिल संस्क्रुत मधुन अस्तात व ती समजतात, त्याशिवाय का ती घेतली आहेत? अन मग कोण म्हणेल की मला संस्कृत येत नाही? अहो ते तर आमच्या "रक्तातच" भिनलेले आहे! Proud

लिंबूटिंबू संस्क्रुत नाही संस्कृत. Happy

साधना गुजराती वाचता येते? तमें महान छो!
मला पण संस्कृत बातम्या कळतात. पण रोजच्या व्यवहारातलं संभाषण कसं करता येईल? पुन्हा पाठ्यपुस्तकं आणायला हवीत.

Mon nom est LimbuTimbu.
हे बघ भरत, गुगल कृपेने मी फ्रेन्च मधे लिहू शकलोय! Proud गुगलने संस्कृतची सोय नै केली पण! हिन्दीची केलीये! Sad

आमच्याकडे पण ९ तारखेलाच लोक्स येऊन हातावर एक फॉर्म टेकवून गेले. फॉर्म भरुन तयार ठेवा, नंतर येऊन घेऊन जाऊ असं सांगितलंय. फॉर्ममध्ये मातृभाषा आणि बाकिच्या भाषांचा कॉलम होता. मी आठवणीने बाकिच्या भाषांमध्ये पहिलं संस्कृत लिहून टाकलं. संस्कृत व्यवस्थित समजतं पण बोलायची बोंबः आहे. पाठ केलेलं घडाघडा बोलू शकते त्यामुळे मला संस्कृत येतेच Proud Wink

Pages