Submitted by चैतन्य दीक्षित on 4 November, 2010 - 02:00
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
गुंफुनी गजर्यात अन् वेणीत त्या माळू कसा रे?
मान्य आहे, ती तशी नाजूक आहे, पण तरीही,
तो फुलांचा अन् लतेचा बंध मी मोडू कसा रे?
टोचता तुम्हा सुईने यातना होतील ज्या,
त्या व्यथा माळून मी, प्रेमास त्या घेऊ कसा रे?
गुंफुनी दोर्यात किंवा लावुनी गळफास तुम्हा,
रेशमी केसांत जो ये, गंध तो घेऊ कसा रे?
माळता गजरा, कदाचित चुंबने देईल ती,
देउनी मृत्यू तुम्हाला, अमृता प्राशू कसा रे?
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
- चैतन्य
गुलमोहर:
शेअर करा
"माळता गजरा, कदाचित चुंबने
"माळता गजरा, कदाचित चुंबने देईल ती,
देउनी मृत्यू तुम्हाला, अमृता प्राशू कसा रे?"
.... क्या बात है !
तरल, लयबद्ध कविता
एकुण कल्पनाच भन्नाट असल्याने
एकुण कल्पनाच भन्नाट असल्याने कविता सरस वाटते. अर्थाला अगदी समर्पक शब्दात मांडलं आहे. आवडली. सदिच्छा!!!
एकदम वेगळी कल्पना ! छान आहे.
एकदम वेगळी कल्पना ! छान आहे.:)
मस्तच!!! कल्पना फार फार
मस्तच!!! कल्पना फार फार आवडली.
सह्हीच!
सह्हीच!
प्रेयसीचा रोष पत्करूनसुद्धा
प्रेयसीचा रोष पत्करूनसुद्धा फुलांना जिवंत ठेवण्याची कल्पना अतिशय आवडली.
शुभेच्छा!!
मस्त ! कित्ती दिवस झाले ही
मस्त !
कित्ती दिवस झाले ही कविता ऐकुन ....
२००२-०३ वगैरे असेल !!!
असो यु ट्युब वरची लिन्क दे की !!!
एकदम वेगळी कल्पना !!! सुंदर
एकदम वेगळी कल्पना !!! सुंदर मांडलय !!!
छान भन्नाट
छान भन्नाट
बाकी छान आहे पण ते सुईने का
बाकी छान आहे
पण ते सुईने का टोचायला हवं?
.
.
सुरेख लयबद्ध शब्दांकन !
सुरेख लयबद्ध शब्दांकन !
चैतन्य, मस्त रे......!!!
चैतन्य, मस्त रे......!!!
सुंदर.
सुंदर.
छान...
छान...
छान
छान
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
@मंदार- अहो सुई वापरून गजरा करताना, सुईने टोचणारच ना फुलांना.
चैतन्या खरंच ग्रेटच आहेस तू व
चैतन्या खरंच ग्रेटच आहेस तू व तुझी काव्यप्रतिभा......
धन्यवाद काका, -चैतन्य.
धन्यवाद काका,
-चैतन्य.
सुरेख..
सुरेख..
खूप आवडली.
खूप आवडली.
सुंदर...
सुंदर...
मस्त, आशय संपन्न व तरल.
मस्त, आशय संपन्न व तरल.
अरे ही वाचायची कशी काय
अरे ही वाचायची कशी काय राहिली? एकदम खास. गजर्यासारखीच आकर्षक आणि हळवी.