आवर्तन..

Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 05:36

असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...

कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...

नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...

अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...

पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे....

गुलमोहर: 

फार छान.... आवडली. Happy

दोन ओळीं नंतर स्पेस ठेवला तर फार बरं होईल.

नभाने करावी धरा चिंब आणि
धारेने नटावे नव्या वैभवाने

यात दुसर्‍या ओळीत ''धरेने'' असं असायला हवं. Happy

लय आणि गोडवा छान आहे

फक्त सुयोग्य ठिकाणी ओळींमध्ये अंतर ठेवल्यास
वाचायला सुलभ होऊन प्रभाव वाढेल.

@निनाव,
धन्यवाद.. Happy

@डॉ. कैलास,
:-)बदल केला आहे.. लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार.. Happy

@UlhasBhide
Happy बदल केला आहे... धन्यवाद.. Happy

सुरेख Happy

hey छान आहे... निवांत वाचली...
शब्दकळा आवडल्या...
एकाच शब्दात - "जमलीये".. Happy

इतक्या "विचारपुर्वक" प्रतिसादाबद्दल आभार आनंदयात्रीजी.. >>

पुरे!! कळतात टोमणे... Proud

'कथावे' शब्द पहिल्यांदा वाचला.'कथावे'म्हणजे 'सांगावे' असे आहे का?तसे असेल तर 'सांगितले'साठी तोच शब्द कसा वापरावा.बाकी कविता लयबध्द असल्याने आवडली.

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
...नभाला कळावे तुझे गूज त्याने

ओळी आवडल्या.

..नभाला कळावे तुझे गूज त्याने
येथे 'त्याने' आहे का ' गाणे' हवे आहे?

@वाराजी, भरतजी, किरुजी,
खूप खूप आभार... Happy

@शांतिनाथजी,
कथावे म्हणजे सांगावे याच अर्थी वापरलय... ते जरा लयबद्ध आणि व्रुत्तबद्ध होण्यासाठी तसं केलय.. Happy आभार.. Happy

@अलकाजी,
नाही.. तिथे त्यानेच हवं आहे... त्याने म्हणजे गंधाने... Happy
प्रतिसादबद्दल धन्यवाद.. Happy

Pages