Submitted by vaiddya on 22 January, 2011 - 22:11
ही सारीच पाने आता विलगायची आहेत !
शाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...
...
एक काठी !
...
एकच रेघ !
...
इथे असे ..
एक काठी होऊन जीवन
चालूच आहे ..
ते असे निष्पर्ण उरताना
आणि आतून रसरशीत जगत असताना
एक लक्षात येते ..
झाड होणार्याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे !
बहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी !
चित्र होणार्याने व्हायला हवे केवळ एक रेघ
अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !
आणि
कविता होणार्याने,
असायला हवे शब्द
शब्दातील एक केवळ अक्षर म्हणून साधला पाहिजे
एक एक श्वास केवळ !
गुलमोहर:
शेअर करा
खुपच दाट भावना आहे. शब्दात
खुपच दाट भावना आहे. शब्दात उतरविण्याचा प्रयत्न उत्तमच आहे..छान!
छान !.आवडली !! केवळ एकच
छान !.आवडली !!
केवळ
एकच काठी
*
*
*
एक रेघ
छान.
छान.
आवडली.
आवडली.
सुरेख!
सुरेख!
"चित्र होणार्याने व्हायला
"चित्र होणार्याने व्हायला हवे केवळ एक रेघ
अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !"
.... हे आवडलं