मिसळिचे वरण

Submitted by प्राजक्ता on 28 December, 2008 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्रमाने खालिल डाळि
३/४ वाटि काळ्या पाठिचि ऊडिद डाळ
२/४ वाटि तुर डाळ
१/४ वाटि मुग डाळ
१ चमचा हरबरा डाळ
पाव वाटि खोबरे किसुन
१०-१२ लसणाचे तुकडे
फोडणि साहित्य
कोंथिबिर

क्रमवार पाककृती: 

सर्व डाळि एकत्र धुवुन कुकरला शिजवुन घ्याव्या, गरम असतानाच घोटुन घ्यावे.
कढईत लसणाचि खमंग फोडणि करुन त्यावर शिजलेलि डाळ्,खोबरे ,मिठ घालुन उकळावे.
वरुन कोंथिबिर घालुन सजवावे.
हे वरण पातळसर चांगले लागते, भाकरि बरोबर जास्त चवदार लागते.

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठि
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यु! खूप दिवसांनी मिसळीच्या वरणाबद्दल वाचलं. करायचं तर जवळजवळ विसरुन गेले होते . ह्यात आई 'खोबरं भाजून मिर्‍यांसगट वाटून' फोडणीत घालायची. (हिवाळ्यातलं फेवरिट वरण.)

प्राजे,छान आहे. वरण हा किती तरी दिवसात केलाच नाहीये.

(हिवाळ्यातलं फेवरिट वरण.)>>अगदि अगदि! हे वरण आणि भाकरि..ह्म्म्म! वरण कालच केले होते...पण भाकरि मात्र आता भारतवारित...

मिलिंदा! बी चि क्रुति वेगळि आहे.. माझि वेगळी आहे बरं!.. smiley4.gif(तस तुझि हरकत नाहि हे लिहलय तु)smiley2.gif