वाटले होते... !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तुझे खोटे बहाणे लाघवी का भासले होते?
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते..

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते

किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?

युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...

विषय: 
प्रकार: 

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते..>>>>

व्वा व्वा!

-'बेफिकीर'!

(आत्ता तुमचे सदस्यत्व वाचताना ही गझल दिसली, क्षमस्व, आधी प्रतिसाद दिला नव्हता.)

Pages