वृत्तांत

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तर मंडळी हा बारा मधे बारा तारखेला झालेल्या ए वि ए ठी चा वृत्तांत ( हाय लाइटस खरं तर ) ( कोण रे ते 'उशीर, उशीर' म्हणून आरडा ओरडा करतंय?)

पात्रं : ( काळे) विनय देसाई, ( जगताप) अनिलभाई
हजर राहिल्याने पुढच्या ए वि ए ठी ला पात्र : दस्तुरखुद्द अन संदिप चित्रे
शिवाय किंचीत मायबोलीकरीण राजश्री ( जयावीची बहीण) अन तिचे यजमान राजेश

अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे झालेला अपेक्षेबाहेर उशीर. त्यात बी एम एम च्या अधिवेशना ला या म्हणुन कार्यकर्त्यांचा आग्रह, कॅफेटेरिया /एट्रियम मधे होणारी प्रचंड गर्दी, गर्मी, आवाज. इकडून तिकडे फिरणार्‍या पैठण्या अन इतर रेशमी साड्या, सलवार कमीझ, पैठणीचे कुर्ते वगैरे काही दिसले नाहीत. पुरूषांच्या देशी स्टाईल कपड्यांचा एक रिफ्रेशर कोर्स करून झाला माझा तिथे बसल्या बसल्या.
एकदाचे विनय अन संदीप दिसले अन मग एक टेबल पटकावून तिथे बसलो. नाटकाचे नेपथ्य वाले शिशिर खांडेकर पण आमच्या बरोबर गप्पा मारत होते. काही वेळाने विनय नी भाईंची फ्यॅमिली दिसल्याचे जाहीर केले, पण भाई कुठे दिसले नाहीत. नाटकाबद्दल मात्र त्यांनी एकदम सस्पेन्स ठेवला होता. मीना नेरूरकरांचं दिग्दर्शन आहे एवढंच सांगितलं.
ऑफीस अन मायबोली सांभाळून नाटकं करायला वेळ कसा मिळतो या प्रश्नाला त्यांनी सराइतपणे बगल दिली ( एन जे बा फ चा परिणाम असणार .)

कंटाळून कंटाळून शेवटी एकदाची ती तांत्रिक अडचण दूर झाली ( साउंड वाला उशीरा आला असं बरेच जण कुजबुजत होते पण त्याला अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही.

भरपूर उशीर झाल्याने म फा च्या सुनिता धुमाळे यांनी थोडक्यात म फा च्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्या अलिकडेच भारतात एक प्रदीर्घ दौरा करून बर्‍याच उपक्रमांना भेटी देऊन आल्या आहेत. त्यांच्या जवळ त्या सर्व उपक्रमांबाबत बरंच काही सांगण्यासारखं असणार. ( म फा च्या वेब साइटवर माहिती आहे )

मग सूर पश्चिमेचे या कार्यक्रमाला सुरुवात झाली. किरण जोगळेकरांची ढोलकी वर करामत एकूनच अर्धे पैसे वसूल. ( इतकी कला असलेल्या माणसाला या देशात इतरांसारखंच Team Building, all hands meeting, security awareness असले ट्रेनिंग , शिवाय Status report, quarterly goals and accomplishment, 360 review अशा व्यापातून जावं लागत असेल या विचाराने गलबलून आलं मला ) बाकी मग परदेशस्थ मराठी संगितकरांच्या रचना अन मधून मधून इथल्या दुसर्‍या पिढीतल्या कलाकारंची गाणी लाइव्ह किंवा पडद्यावर.
रवी दातार अन आदित्य फाटक या दोघांची दॄष्ट काढायला हवी होती कार्यक्रमाच्या शेवटी.
एक दोन गाण्यांच्या 'रेकॉर्ड' लावून त्यावर इथल्या लहान मुलींचे नाच झाले. हॉलीवूडच्या लावणीचे शब्द , सूर दोन्ही एकदम मस्त. अन मुलींनी लावणी वर नाच पण अगदी झकास केला. दूर दूर रहाणार्‍या, मराठी व इतर भाषिक कुटुंबातल्या पंधरा -सोळा मुलींना घेऊन असा कार्यक्रम बसवणे म्हणजे किती organizational challenges असतात ते प्रत्यक्ष करणार्‍यांनाच माहित.

मध्यंतराच्या अगोदर अल्पोपहारामधे ' करंज्या' असल्याचा उल्लेख केला. पण ती कचोरीचं पुरण भरलेली अन वर चिंच्-गुळाची चटणी घालून दिलेली 'नमकीन' करंजी निघाली. पचका झाला. २० मिनिटांचं मध्यंतर चांगलं ४५ मिनिटे चाललं. दरम्यान बरेच प्रेक्षक मंडळी घरी गेली. कार्यक्रमात बेबी सिटिंग ची व्यवस्था नव्हती त्यामुळेही थोडी अडचणच झाली असावी.

मग आपल्या मायबोलीकरांची एकांकिका झाली .सस्पेन्स, डार्क कॉमेडी इत्यादी विशेषणं सार्थ आहेत अगदी. विनय अन भाई यांचे मुख्य रोल आहे येवढंच सांगते. बाकी आता तुमच्या शहरात दौरा येईल तेंव्हा पहा.पहाल तर हसाल. न पहाल तर फसाल!

नाटक सम्पल्यावर लगेच निघायची घाई असल्याने विनय व भाईंशी जास्त बोलता आलं नाही. पण माझं ७ तारखेचं आमंत्रण कंफर्म आहे एकदम!. शिवाय विनयचं घर कुठल्या कॉम्प्लेक्स मधे आहे याचा ही शोध लागला आहे. त्यामुळे आमंत्रण नसताना सुद्धा त्यांच्या घरी जाऊ शकते मी Happy

प्रकार: 

हुश्श! झाला एकदाचा वृतांत लिहून.

छे छे.. हा काय वृत्तांत झाला?
.
.
शोनूचे आभार... 'याल तरच हसाल, न याल तर फसाल'....
.
आणि लिहून तो प्रसिध्द केल्याबद्दल फेर आभार..... (आणि शेवटपर्यंत बसल्याबद्दल फेर फेर आभार)
.
विनय देसाई

Lol

किती वेळा फेर फेर ते?
(चुकून फेफरं वाचलं मी...)
'नाटकाच्या मार्केटिंगचे सर्व हक्क शोनूच्या स्वाधीन 'अशी तळटीप दिसतेय मला की भास होतोय? Happy
(विनय, दिवे घ्यालच. आजकाल लोकांना रागबिग येतो बाई मायबोलीवर...)

'मधुरिमा' तू देसाई होतीस म्हणून आणि आता बारा सोडून जाते आहेस म्हणून......
.
नाहीतर तुझे काय झाले असते?
.
.
विनय देसाई
.
Lol

काही झालं नसतं हो विनय...
देसाई लोक तसे 'लढाऊ' वृत्तीचेच असतात. (माझ्या नवर्‍याला विचारा :))
अन बारा सोडून जाणं बहुधा जूनपर्यंत लांबलंय...

>> ( इतकी कला असलेल्या माणसाला या देशात इतरांसारखंच Team Building, all hands meeting, security awareness असले ट्रेनिंग , शिवाय Status report, quarterly goals and accomplishment, 360 review अशा व्यापातून जावं लागत असेल या विचाराने गलबलून आलं मला )>>
एकदम सहमत शोनू Happy वाक्यही मस्त जमलंय.

सात जूनला भेटूच.

सुमॉ -- आता बारा सोडणं जून पर्यंत पुढे गेलंय तर सात तारखेनंतर, एवेएठि करूनच, जा !