नवालकोल आणि मुळ्याच्या पानांचा भगरा/झुणका

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 January, 2011 - 01:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नवअलकोल चा पाला चिरुन
कांदेमुळ्याचा पाला चिरुन
कांदा १ ते २
राई, जिर
हिंग
हळद
बेसन
मिरच्या चिरुन २-३
मिठ,
चिमुटभर साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
१ चमचा लिंबाचा रस
तेल

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल गरम करुन त्यावर राई जिर चांगल तडतडल की त्यावर कांदा, मिरची घाला. कांदा परतवुन त्यात हिंग, हळद घालुन नवअलकोल व मुळ्याचा पाला घाला. झाकण ठेउन थोडा शिजु द्या. मग त्यावर बेसन, गोडा मसाला घालुन ढवळून शिजु द्या. शिजत आले की त्यावर मिठ, साखर व लिंबाचा रस पिळून वाफ आणा. करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

नुसत्या नवअलकोलचा भगरा अजुन छान होतो. पण काल मी नवअलकोल आमटीसाठी आणि कांदेमुळा सॅलेडसाठी आणला होता. आणि हा जिवनसत्ववाला पाला टाकुन देण जिवावर आल. म्हणुन दोन्हींचा मिळून भगरा केला.
ह्याला तेल थोड जास्त घातल की अजुन चव येते.

माहितीचा स्रोत: 
सा.बा. आणि माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाकता टाकता वाचलेला नवअलकोल व मुळ्याचा पाला
नवअलकोल पाला
bhagara.JPG

कांदेमुळ्याचा पाला
bhagara1.JPG

भगर्‍यचे काही सामान
bhagara2.JPG

फोडणीला टाकलेला कांदा.
bhagara3.JPG

ह्यात खाताना मिरची दिसली जात नाही म्हणून खबरदारीसाठी मी मसाला घालते. पण मिरचीची चव चांगली येते.
bhagara4.JPG

पाला शिजल्यावर घातलेले बेसन
bhagara5.JPG

तयार होत आलेला भगरा/झुणका
bhagara6.JPG

मी मुळा आणि गाजर सॅलेड साठी कापले होते. त्याचेच ह्यावर डेकोरेशन केले. त्यामुळे एक प्लेटही वाचली.
bhagara7.JPG

रोचिन कांदेमुळा म्हणजे पांढरा मुळा खाली त्याचे पांढरे मुळ असते. वर सॅलेड डेकोरेशन केले आहेत त्यात पांढरा मुळा आहे.

करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.>> जागुतै अंतःनको पाहु....... मला प्रचि बघुनच भु़क लागलीय आणि २ मिनिटांआधीच जेवलो होतो Uhoh

येस्स! मी मुळ्याच्या पाल्याची भाजी नेहमी करते. डाळ घालून किंवा बेसन लावून. मला तर ती नुसती खायलाही आवडते.
भाकरीबरोबर तर अ ल टी अ मे अ ट लागते Happy

हो झुणका भाकर ही तर जोडीच आहे. आणि कोणतीही पालेभाजी आणि भाकरी छानच लागते.

दिनेशदा, वाल्याकोळी, चातक, प्रिती, सायो धन्यवाद.

मस्त Happy