लतादेवीची आरती

Submitted by जागोमोहनप्यारे on 3 January, 2011 - 01:39

images[24].jpg

जय देवी जय देवी जय लता देवी
शंभर वर्षे माझेही करियर करवी |

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरीही तू गात राही
काही विवाद करिता पडले प्रवाही Proud
तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी...

सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी
किती गायिकांची भरली शंभरी Proud
वीणा, नुपूर आणि आली बासुरी
तुझिया वाणीमध्ये परा वैखरी |२| जय देवी....

हृदयामध्ये उमले नित्य नवी उषा
मीनासंगे सागर रमवी जगदीशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा Proud
सारेगमपधनी पळवी निराशा |३| जय देवी...

तुझ्या कृपेने सारे मंगल होऊ दे
पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे Proud
भारतरत्न माझ्या घरात येऊ दे
'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |४| जय देवी...

गुलमोहर: 

सुंदर

मस्तच

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरी तू गात राही>>> इथे तरी नंतर लय तुटतेय तरीही असे वाचले तर?

(आता जुना झालेला एक माबोकर Wink )

तरीही .. असा बदल केलेला आहे.. धन्यवाद.

वीणा, नुपूर आणि आली बासुरी

लताचा आवाज म्हणजे सरस्वतीची वीणा, उर्वशीचे नुपूर आणि श्रीकृष्णाची बासरी यांचा संगम, असे आचार्य अत्रे यानी म्हटले होते. ही ओळ त्या संदर्भात आहे.

मस्त

मुकु | 7 January, 2011 - 15:33 नवीन
चांगली पण विडंबन झाल
काही बद्त पाहीजे होता
...........
बद्त म्हणजे काय?

छान

मला आणखी एक अंतरा सुचला....

हृदयामध्ये उमले नित्य नवी उषा
मीनासंगे सागर रमवी जगदीशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा Proud
सारेगमपधनी पळवी निराशा || जय देवी...

छान

छान.

छान

Pages