आमचा एंजल
५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.
सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.
नीरजाने सांगितलेले साहित्य : पांढरा सॅटीनचा डगला, पोटावर बांधायला सोनेरी दोरी, चंदेरी रंगाचे किंवा पांढर्या पिसांचे पंख, डोक्यावर फुलांची रिथ (हा काय प्रकार आहे हे माहित नसल्याले सरळ गुगलबाबाला शरण जावून फोटो बघून घेतले. ), हवे असल्यास हातात हार्प
सांगितलेल्या साहित्यापैकी कोणतेच साहित्य घरात असण्याची शक्यता नव्हती म्हणून पर्यायी साहित्यासाठी घरातले सगळ्यांचे पांढरे कपडे काढून ठेवले.
थंडी असल्याने पोराला डगल्याच्या आत घालायला पांढरे गरम कपडे सगळ्यात पहिल्यांदा सापडले.
सॅटिनचा डगला मिळणं अवघड आहे हे लक्षात आल्यावर स्वतःचे पांढरे टॉप पोराला घालून बघितला. पण त्याला अंगात नीट बसणार्या आपल्या टॉपवर बरेच डाग आहेत हे लक्षात आलं की परत दुसरे कपडे शोधायला सुरवात केली . हे शोधताना नवर्याचा एक पूर्ण बाह्यांचा पांढरा टी शर्ट मिळाला, ज्याच्या बाह्या लहान केल्यास चांगला डगला होवू शकतो असं वाटलं. स्वतःच्या शिवण कौशल्यावर पूर्ण विश्वास असल्याने, बाह्या लहान करण्याचे काम कामवालीला सांगितलं.
संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला हे सगळं दाखवल्यावर त्याने त्याच्याकडे एक अर्ध्या बाह्यांचा (मीच आणलेला) पांढरा टी शर्ट आहे, तो शोध असं सांगितलं. मग परत शोधाशोध सुरु. उन्हाळ्याचे कपडे ब्यागांमध्ये भरून ठेवल्यामूळे सगळ्या ब्यागा काढून तो हवा असलेला पांढरा टी शर्ट शोधला. नशिबाने तो अगदी स्वच्छ होता.
दुसर्या दिवशी २३ तारखेला दूपारी बाजारात इतर सामान आणायला गेले. एंजलसाठी पंख तयारच मिळतिल असं वाटलं होतं. पण बाजारात फक्त आणि फक्त सँटाचे ड्रेसच होते. त्यातलाच एक विकत घ्यायचा मोह होत होता. पण एंजलच बनवायचय असं ठरवल्यामूळे पंख बनवण्यासाठी थर्माकोलचं एक शीट आणि २ चंदेरी रंगाचे कागद एवढच सामान घेवून घरी आले.
संध्याकाळी नवरा आल्यावर बाकीचं काम करु आणि गरज पडल्यास अजून एक चक्कर बाजारात मारू असा विचार केला होता. पण अचानक दूपारी नवर्याचे २-३ मित्र रात्री जेवायला येणार असल्याचे कळाले. संध्याकाळचा सगळा वेळ पाहूणे, स्वैपाक, गप्पा-टप्पा असा गेला.
पाहूणेमंडळी गेल्यावर रात्री १० वाजता नवर्याने काय करायचंय असं विचारल्यावर त्याला अंदाजे प्लान सांगितला. डोक्यावर ठेवायला रीथ कसं बनवावं याचा अजूनही अंदाज आला नव्हता.
मूळात आयुष्यात आम्ही दोघांनीही थर्माकोल या प्रकाराला कधीही हात लावला नव्हता. थर्माकोल कसा कापतात, कश्याने चिटकवतात याचा काहीही अंदाज नसताना मी थर्माकोलचे पंख बनवायचे कसे काय ठरवले कोण जाणे ?
शेवटी माझ्या कापणे चिटकवणे इ च्या क्षमतेचा नवर्याला पूर्ण अंदाज असल्याने त्याने, स्वतःच कागदावर दोन पंख कापले. ते पंख थर्माकोलच्या शीटवर ठेवून सुरीने थर्माकोलचे पंख कापले. पंखांवर चंदेरी कागद चिटकवताना माझ्या लक्षात आले, की मी कागद एकाच बाजूने पंखांना पुरेल इतका आणलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात असलेल्या फेव्हिकॉलच्या तिन्ही ट्युब रिकाम्या आहेत. मग त्या रिकाम्या ट्युब दाबून दाबून जितका फेव्हिकॉल निघेल तितक्यानेच कागद एकाच बाजूने पंखांवर चिटकवला.
मी हे चिटकवण्याचं काम करेपर्यंत नवर्याने घरातल्या दोन डब्ब्यांची झाकणं घेवून ती थर्माकोलवर दाबून एक गोल रींग तयार केली होती. पण त्या रींगवर चिटकवायला पुरेसा चंदेरी कागद आणि फेव्हिकॉल नव्हता. मग घरात पूर्वी कृष्ण बनवताना आणलेल्यापैकी उरलेल्या सोनेरी लेसचे दोन तुकडे केले. एक तुकडा पोटावर बांधायला ठेवला. तर दूसर्याचे अजून लहान लहान तुकडे करून ते तुकडे फेव्हिकॉल आणि स्टेपलर अश्या दोन्हींच्या सहाय्याने झिरमिळ्यांसारखे रिंगवर लावले.
हार्प बनवण्यासाठी मात्र आम्हा दोघांकडे सामान आणि पेशन्स दोन्ही उरलं नव्हतं. तरीपण उगिचच थर्माकोलवर एक "डी" आकार कापून नवर्याने त्याला स्केचपेनने रंगवले.
एव्हाना रात्रीचे ११.३० झाले होते. ते पंख एकमेकांना कसे चिटकवायचे आणि नंतर आयामच्या खांद्यावर कसे चढवायचे हे काही मला समजत नव्हते. मग नवर्यानेच टुथपिक्सनी ते दोन्ही पंख एकमेकांना चिटकवले. माझ्याकडच्या एकमेव फाटलेल्या पांढर्या स्टोलनी ते पंख आयामच्या खांद्यावर बांधता येतिल हे लक्षात आल्यावरच एंजल बनवण्याची तयारी संपली.
हे एंजलची तयरी करतानाचे फोटो.
हा तयारीच्या आधी
टि शर्ट घातल्यावर
शर्टवर सोनेरी लेस बांधून
आणि हे आमचं फायनल प्रॉडक्ट.
(एंजलसाठी रात्री पंख बनवण्याचं काम चालू असताना अचानकच आमच्या लेकराने मै कल सँटाक्लॉज बनूंगा असं डिक्लेअर करून आमच्या मेहनतीवर पाणी फिरवायचा प्रयत्न केला होता)
आत्ताच आयाम शाळेतून आलाय. मुझे प्राइज मिला सांगत. त्याला पहिलं बक्षिस मिळालं म्हणे.
कसला गोडू दिसतोय एंजल !
कसला गोडू दिसतोय एंजल ! बक्षिसाबद्दल अभिनंदन.
मस्तय एंजल वर्णन एकदम सही
मस्तय एंजल
वर्णन एकदम सही
लै भारी
लै भारी
खूपच क्युट
खूपच क्युट
सही. एकदम गोऽड दिसतोय एंजल.
सही. एकदम गोऽड दिसतोय एंजल. अभिनंदन तुमचे दोघांचे आणि त्याचेपण.
मस्तच दिसतोय. आणि
मस्तच दिसतोय. आणि चेहर्यावरचा भाव पण मस्त.
परिश्रम कारणी लागले ...
अल्पना फारच गोड दिसतोय गं
अल्पना फारच गोड दिसतोय गं एंजल. मिळणारच होतं त्याला पहिला नंबर. गुड जॉब आई बाबा.
मस्त! अभिनंदन
मस्त! अभिनंदन
क्यूट ........!!!!!!! मस्त
क्यूट ........!!!!!!!
मस्त आलेत सगळे फोटो ..
गुड जॉब अल्पना आणि आयाम!!!
गुड जॉब अल्पना आणि आयाम!!!
सुंदर दिसतोय एंजल...गुड जॉब
सुंदर दिसतोय एंजल...गुड जॉब अल्पना!!
एंजल खूऽऽप गोड. आईबाबांचंही
एंजल खूऽऽप गोड. आईबाबांचंही अभिनंदन
भारी... मस्तच दिसतंय
भारी... मस्तच दिसतंय प्रॉडक्ट..
फार गोड दिसतोय तो!! very
फार गोड दिसतोय तो!! very cute!!
एकदम गोड.
एकदम गोड.
मस्त गोडूला एंजल दिसतोय आयाम
मस्त गोडूला एंजल दिसतोय आयाम
गुड जॉब आईबाबा
१लं बक्षिस? वॉव मत्त तुम्हा
१लं बक्षिस? वॉव मत्त तुम्हा तिघांचंही अभिनंदन. बाबाच्या पांढर्या डगल्यातलं तुझं पिल्लू एकदम गोड दिस्तंय.
असाही एंजलच वाट्तोय...
असाही एंजलच वाट्तोय...
अभिनंदन कसला ग्गोड एंजल आहे.
अभिनंदन
कसला ग्गोड एंजल आहे.
खूप छान दिसतो आहे. व
खूप छान दिसतो आहे. व चेहर्यावरील भाव अतिशय गोड. तुमच्या मेहनतीचे कौतूक. काल सिलेक्ट सीटीवॉक मध्ये खूप मुले मुली नटून आली होती सांटा चा सूट व टोपी घातलेले गोड खूप होते. अगदी बाबागाडीत झोपलेले पण गोड बेबीज होते. तिथे एक मोठे दिव्यांचे झाड व सुंदर डेकोरेशन होते. कॅनेडीअन बेकरी तील लोक मस्त कुकीज वगिरे विकत होते आम्ही चार जिंजर्ब्रेड कुकीज घेतल्या. अगदी सण सार्थकी लागला. आयाम बाबाला हॅपी न्यू यीअर. तुम्हाला पण.
कस्सला मस्त दिसतोय ग. येकदम
कस्सला मस्त दिसतोय ग. येकदम गोडंबा
आई-बाबाच अभिनंदन
मागे तुम्ही याच्यासाठी प्रश्न
मागे तुम्ही याच्यासाठी प्रश्न विचारलेला. मला लक्षातच नाही आलं तेव्हा..
काय मस्त केलाय पोषाख.. म्हणतात ना हौसेला मोल (आणि चैन सुद्धा ) नाही ! एंजल भारीच दिसतोय !!
अनिल, मी नव्हता हो प्रश्न
अनिल, मी नव्हता हो प्रश्न विचारला.
मला २-३ दिवस आधीच कळालं होतं असा काही कार्यक्रम होणार आहे हे. पण शाळेत प्रत्येक सणाच्या वेळी काही ना काही असतंच. मागे जन्माष्टमीच्या वेळी सगळ्या मुलांना कॄष्ण आणि मुलींना राधा बनायला सांगितलं होतं. नवरात्रामध्ये रामायणातल्या कोणत्याही व्यक्तिरेखेच्या वेशभुषेत बोलवलं होतं. दिवाळीला फॉर्मल कपड्यांमध्ये पणत्या / कँडल्स घेवून, बालदिनाला पांढरे कपडे घालून, लाल गुलाब घेवून बोलवलं होतं आणि आता यावेळी हे.
सगळ्यांना धन्यवाद. अमा, काल तिकडे सिटी वॉकमध्ये खूप गर्दी होती म्हणे. आम्ही पण बाहेर जायचं ठरवत होतो, पण थंडीमूळे शेवटी भावाला केक आणि कुकीज वैगरे घेवून घरीच बोलवलं.
कसला क्युट एंजल आहे! मस्त
कसला क्युट एंजल आहे! मस्त लिहीलंयस अल्पना ..
सही !
सही !
सही! गोड आहे तुमचा एंजल.
सही! गोड आहे तुमचा एंजल. रात्रभर खपून केलेल्या मेहनतीचं कौतुक
अल्पना सो व्हेरी क्यूट ऑफ
अल्पना
सो व्हेरी क्यूट ऑफ यूवर सन
फार गोड दिसतोय एंजलच्या ड्रेस मध्ये.
मस्तच जमलयं ग!!! फार गोड
मस्तच जमलयं ग!!!
फार गोड दिसतोय आयाम
कित्ती गोड दिसतोय एंजल!
कित्ती गोड दिसतोय एंजल!
अभिनंदन!!!!!
Pages