रवा दोसा

Submitted by वर्षू. on 23 November, 2010 - 22:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल

क्रमवार पाककृती: 

आता ही कृती प्रचि त टाकण्याचं कारन कि पाककृती सदरात फोटो कसा टाकायचा ते समजलच नाय मला Sad

rawa dosa 002.jpg

दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल एकत्र करून १ तास भिजवून ठेवा.

rawa dosa 003.jpg

गरम निर्लेप तव्यावर १ टी स्पून तेल पसरून नेहमीप्रमाणे दोसा करा

rawa dosa 004.jpg

दोन्ही बाजूने खरपूस ,सोनेरी रंग येईस्तोवर भाजा

rawa dosa 005.jpg

अधिक टिपा: 

शेंगदाण्याच्या चटणीबरोबर छान लागतो
शेन्गदाण्याच्या चटणीची कृती
एक टी स्पून तेलावर थोडा चिरलेला कांदा, कढीपत्ता,लाल ,सुक्या मिर्च्या , हे सर्व परतून ,सोललेल्या शेंगदाण्यांबरोबर,चवीपुरते मीठ,चिंचेचा कोळ मिक्स करून ब्लेंडरवर चटणी वाटावी.
वरून मोहर्‍या,हिंग,सुक्या लाल मिर्च्या ची फोडणी करून घालावी.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभु,मंजिरी, थांकु थांकु.. Happy
भाग्यश्री, आता तुझी नेक्स्ट हॉलिडे स्पॉट 'चायना' ठरव.. फिर दोसे क्या .. बहुत कुछ खिलाऊंगी ,,,,

करुन पाहिला हा डोसा. एकदम छान झाला. चटणी तर अप्रतिम!!

एवढी सोपी आणि छान रेसिपी टाकल्याबद्द्ल धन्यवाद.

वर्षा खूप खूप धन्स... दर रविवारी पोहे, उपमा करून कंटाळा आलेला, म्हणून एकदा सक्काळी सक्काळी भेळ केली काहीतरी वेगळा नाष्टा करावा म्हणून... Uhoh
हे बरे आहे स्वादिष्ट, पोटभरू आणि पौष्टीक आयटम... दिसतंय पण म्स्त तोंपासू आणि खास चटणीची रेसिपीपण टाकल्याबद्दल धन्स.. पुढच्या सोमवारी पोस्टते... आमच्या गिनीपिगची प्रतिक्रिया... Happy

सूकिची मज्जाय बुवा... डोसा, चटणी वर धम्मकलाडू पण?? सूकि, नुस्तच रेसेप्या ४वर्ड करू नये... मदत पण करावी... खाण्याची नव्हे, करण्याची! Happy

ते बाजूचे काचेचे बाऊल्स पण मस्त आहेत!>> अगदी अगदी!

करुन पाहिले आज. मस्त झाले. चव एकदम सुंदर. चटणीही तू लिहील्याप्रमाणेच केली.
धन्यवाद वर्षु. Happy

(अवांतर-माझे करताना काहीतरी चुकले बहुतेक. थोडेसे जाड झाले दोसे. thin जमायला हवे. )

निलू, आज तुझ्या पध्द्तीने दाण्याची चटणी केली होती. मी त्यात आल्याचा तुकडापण घातला. छानच लागते ग. सँडवीचसाठीपण मस्त होईल ही चटणी.

वर्षूतै, कॅन यू बिलीव्ह. मी बनवलेला पहिला पदार्थ. (आता नाही, न्हानपनी) मस्त जमायला लागला होता. अगदी पातळ बनवता यायचे, पण मग अडजीभेला लागले नी पडजीभ बोंबलली अस व्हायचं.

वर्षु, आत्ताच तुझ्या पध्दतीने डोसा आणि शेन्गदाण्याची चटणी करुन खाल्ले. एकदम मस्त. नवरा आणि मुलगा दोघे खुश.... धन्स.

खुप छान रेसिपी आहे, रविवारच्या नास्ट्यासाठी उत्तम! मी नक्की करुन पाहीन

वर्षुतै.... रवा बाआआआआआआरीक असेल तर चालेल का? की जाडच हवा? माझ्या साबांना लै आवडतो रवा डोसा, करुन घालीन म्हणते.

रच्याकने, इथे कोणाला उपासाच्या कचोरीची रेसिपी येते का? इथे टाकली असेल तर लिंक देईल का मला कोणी???

Pages