रवा दोसा

Submitted by वर्षू. on 23 November, 2010 - 22:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल

क्रमवार पाककृती: 

आता ही कृती प्रचि त टाकण्याचं कारन कि पाककृती सदरात फोटो कसा टाकायचा ते समजलच नाय मला Sad

rawa dosa 002.jpg

दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल एकत्र करून १ तास भिजवून ठेवा.

rawa dosa 003.jpg

गरम निर्लेप तव्यावर १ टी स्पून तेल पसरून नेहमीप्रमाणे दोसा करा

rawa dosa 004.jpg

दोन्ही बाजूने खरपूस ,सोनेरी रंग येईस्तोवर भाजा

rawa dosa 005.jpg

अधिक टिपा: 

शेंगदाण्याच्या चटणीबरोबर छान लागतो
शेन्गदाण्याच्या चटणीची कृती
एक टी स्पून तेलावर थोडा चिरलेला कांदा, कढीपत्ता,लाल ,सुक्या मिर्च्या , हे सर्व परतून ,सोललेल्या शेंगदाण्यांबरोबर,चवीपुरते मीठ,चिंचेचा कोळ मिक्स करून ब्लेंडरवर चटणी वाटावी.
वरून मोहर्‍या,हिंग,सुक्या लाल मिर्च्या ची फोडणी करून घालावी.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! या पध्दतीने आता करून बघणार Happy
मला रवा डोसा खूप आवडतो. आत्तापर्यंत २-३ निरनिराळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणावा तसा जमलाच नाही पण. आता हा 'अजून एक प्रयोग' म्हणून करून पहायला हरकत नाही. मी केलेले पदार्थ न कुरकुरता (किंवा नाईलाजास्तव) खाणारी हक्काची २ गिनी पिग्ज् आहेतच ... Proud

वर्षे, मला आत्ताच्या आत्ता पाठवुन दे रवा डोसा.. Proud

मी केलेले पदार्थ न कुरकुरता (किंवा नाईलाजास्तव) खाणारी हक्काची २ गिनी पिग्ज् आहेतच
>>
लले, न खाऊन सांगतील कुणाला बिचारे??

ललिता.. मलापण रवा दोसा खूप आवडतो.. ही अगदी शुअर शॉट रेसिपीये.. नक्की आवडेल तुला आणी तुझ्या गिनी पिग्स ना Proud
धन्स.. योडे तुला इकडे यावं लागेल.. .. Happy
सुक्या.. लौकरच दोसे काय तुला (धम्मक) लाडू सुद्धा मिळणारेत खायला Lol

हे वर्षू, माझी आवडती रेसीपी आहे ही..... चट्णी अश्या पध्दतीने कधिच केली नाही, आता करुन बघायला पाहीजेच Wink

धन्स जागू,दिनेश दा.. आमच्याकडे भारतात,बंगलोर ची कुक होती तिनेच हे आणी बरेचसे कन्नड प्रकार शिकवले होते.. चटण्या तर काय सुरेख करायची.. अगदीच वेगळ्या रेसिपीज होत्या तिच्या

आमची शेजारीण, हि चटणी तीळ घालून करायची, ती पण छान लागायची. (तीपण कुर्गी म्हणजे कर्नाटकातलीच होती.)
जाड सालीचे एक प्रकारचे लिंबू, थेट गॅसवर भाजून पण ती एक चटणी करायची, कडवट आंबट अशी ती चटणी मस्तच लागायची.

सहीच गं वर्षूताई Happy नक्की करणार Happy

एक आयडिया.. पाकृ मधे जाऊन नवीन पाकृ वर टिचकी मार. त्यात तुझी रेसिपी लिही आणि इथे (या धाग्याच्या संपादनात जाव लागेल) ज्या फोटोच्या लिन्का टाकल्यायस ना त्या तिकडे डकव. नवीन पाकृमधे फोटु डायरेक्ट डकवण्याची सोय नाही.दुसरा ब्राऊझर उघडुन त्यातला एखादा बाफ उघडुन त्याच्या प्रतिक्रिया मधे लिंक टाकुन ती कॉपी पेस्टावी लागते.. द्रवीडी प्राणायाम Proud .. आय होप तुला कळतय मला काय म्हणायचय ते Happy

अगदीच जमला नाही तर नुसती रेसिपी लिही आणि खाली प्रतिक्रिया मधे फोटु टाक. हाकानाका Happy

मी अगदी अस्साच करते हा डोसा. फक्त सुकं खोबरं नाही घालत. इन फॅक्ट रव्या ऐवजी ओट्स टाकले तरी छान होतात हे डोसे. दिनेशदांच्या ओट्स्च्या धिरड्यांची कृतीही जवळपास अशीच आहे नाही का???

@ तीव्र म- सर्वच दोश्या,धिरड्यांच्या कृती जवळपास सारख्याच असतात.. Happy यात जरा वेगळे इन्ग्रेडिएन्ट्स डेसिकेटेड कोकोनट चुरा ,कढीपत्ता वापरले जातात. त्यामुळे चव छान येते

वर्षू, सही रेसिपी... तों पा.सु. नक्की करणार.... सगळे जिन्नस आहेत, फक्त मेन रवाच नाही... नाहीतर आजच लग्गेच केला असता मी हा दोसा नी चटणी Sad

वा वर्षू......दोसा तर छान आहेच पण चटणीही वेगळी आहे. करून बघीन!.........जाऊ दे .........नाहीतर असं करू का........अं............चायनालाच येऊ का हे खायला?

ललिता Proud और तुम बच गई खानेसे???
मानुषी..तू येच्च इकडे दोसे खायला..रच्याकने चायनीज चालतील का??? आजकाल मुंबईमधे दोश्याचे मिळत असलेले प्रकार पाहून डोळे फिरले नुस्ते!! Lol

वर्षु, काल करुन बघितले ह्या कृतीनी. एकदम मस्त झाले. प्रमाण एकदम परफेक्ट Happy आणि डेसिकेटेड कोकोनट, कढीपत्ता यामुळे तर छान चव आली.

Pages